Friday, February 9, 2018

मराठा आणि इतिहासाच्या पाउलखुणा : तुम्ही कंचा मराठा ?

मराठा आणि इतिहासाच्या पाउलखुणा :

तुम्ही कंचा मराठा ?

दिनांक ०९/०८/२०१७ ,१०/०८ २०१७



महामोठा मराठा मोर्चा  मुंबई परिसरात निघाला होता ,त्या निमित्ताने काही लिहावे हे मोर्च्या बघितल्या  पासून जाणवत होत .इतिहात जर डोकाउन पहिले तर हा मराठा मोर्च्या काढण्याचे कारण कांही असो या मराठा  संघाने बहुजानावर खूप अन्याय अत्याचार केलेले पुरावे मिळतील ,आज माणुसकी लयाला जात आहे,हजारो शेतकरी विविध कारणानं आत्महत्या करीत आहेत ,त्याचे करणे वेगळी आहेत . म्हणून अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी ही जमात रस्त्यावर धुडगूस घालू पाहत आहे ,याच्या  मागचे राजकारण जरी वेगळे असले तरी आज या विखुरलेल्या समाजाची एकी होण्याचे आजची करणे  वेगळी आहेत त्याचा  उहापोह इथे नको ? इतिहास पहिला तर हे मराठे तीन प्रवर्गात विभागले गेले होते .एक गढीवरील मराठा ,चिरेबंदी वाड्यातील मराठा आणि वाडीवरील मराठा ...



तीन मराठे आज रस्त्यावर का उतरत आहेत ते कळने जरी कठीण असले तरी उमगणे सोप्पे आहे यांना सत्तर वर्षानंतर आरक्षणाची गरज वाटत आहे . या तिघा मराठ्यात  कधी रोटी बेटी  व्यवहार झाला नाही तरी पण एक झेंड्याखाली आले आहेत ? हे मोठी राजकीय खेळी आहे .



मराठा हा महाराष्ट्र पुरता पाहावयाचा असेल तर उल्लेख केल्या प्रमाणे  तीन भागात  विखुरलेले पहावयास मिळतील .आज जरी काही कारणाने रस्त्यावर  एकत्र आले असले  तरी पुढील काळात ही एकत्र येतील का हा एक अनुउत्तरीत स्वप्न राहील . आणि पुढे जाऊन  रोटी बेटी व्यवहार होतील असे ही नाही .मग हे तीन मराठा कोण ?





 या गोष्टीला इतिहास साक्षी आहे ,एक मराठा जो गढीवर राहतो ,त्यास गढीवरील मराठा म्हणतात हा एकदम गावाच्या माध्येभागी सुरक्षित वास्तव्यात राहण्याचे ठिकाण म्हणजे  बुरुज.या बुरुजावर या मराठ्याचे वास्तव्य पूर्वी प्रत्येक गावात एक तरी उंच बुरुज असे.गावाला एक गोलाकार बारा ते वीस फुट भिंत असे  आणि या आवारात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे असत ते एका ठराविक वेळेला उघडत आणि बंद होत असत , हे पाटील आशय अलिशान महालात  राहत असे , उंच बुरूजावर ऐक पैस आवार आणि त्या आवारात चिरे बंदी वाडा बांधून राहत असे , भागात या पाटलास मालीपाटील  असे ही म्हणत असत . मात्र बहुजन या आवाराच्या बाहेर ,त्यात मांग ,महार ,आणि त्यांचे सर्व वंश्यावळ भरभक्कम शेतीचे.त्यांना सर्व गाव मालक म्हणायचे देव की हो गावचा.खूप दरारा जे पाटील म्हणतील तेच होणार .



यांचे कडे खूप किंवा मधयम स्वरुपाची शेती असायची ,एवढी असायची की त्यांना ही माहित नसे  ,मग हे शेती कोण करीत असे तर खालच्या वर्गातील बहुजन आणि बहुजनाची कुटुंबे च्या कुटुंबे यांच्या शेतीचे रखवालदार ,शेतीतील सर्व कामे बहुजन करीत असे ,शेत नागरणी पासून ते धान्याची रास करेपार्येंत  ते राब राब राबत ,बहुजनांची मुले संपूर्ण वर्षासाठी घरगडी म्हणून काम करीत असत ,इथेच काम करणे आणि इथेच झोपणे ,जरी त्याचे लग्न झाले तरी सुट्टी नाही ,आई वडील आणि मुल मुली हे  संपूर्ण भूमिहीन शेतमजूर म्हणून काम करीत असत .याचे मोबदल्यात काय मिळत असे तर धान्य चौथाली हिस्सा किंवा कुठे कुठे पाचवा हिस्सा ,आणि उरले सुरले खळ्यातील रास.जास्तच झाले तर खाल्यातील पडलेले धान्ये सावडून घेऊन जाने ,आणि अखेरचा कळस असा की त्यांच्या गाई म्हसी बैल इत्यादी जनावराने खाऊन टाकलेल्या शेणातून मिळालेले धन्य यावर या समाजाची उपजीविका होत असे.अश्या क्रूर पणे धाकाने बहुजनांची सर्रास पिळवणूक करीत होते .



यांचे कडे घरगडी तर कामाला होतेच पण बहुजांची मुलगी उपवर झाली की यांचीच असायची ,यांचे कडून जन्माला आलेले मुल म्हणजे हरिजन ? याच हरिजन शब्दाचा डॉ बाबासाहेबांनी  पुढील आधुनिक काळात विरोध केला आणि महात्मा गांधीजीने त्याचा उहापोह केला .



अश्या आणि अनेक प्रकारे बहुजनाची आदिम काळापासून सामाजिक आर्थिक आणि मानसिक पिळवणूक केली होती ,हे सर्व श्रुत आहे .आणि निरंतर बहुजानावर अंकुश ठेवण्याचा पायंडा पाडून ठेवला होता ,हा मराठा ,मी म्हणील ते दिशा दाखवणारा मराठा ? आज बुरुज आणि त्या बुरुजाची माती ढासळून गेली आहे उरले आहे ते अवशेष पाटीलकीचे .



दिनांक : १४-०८-२०१७

१५.०० HRS -१६ :००

दुसऱ्या प्रकारातील मराठा हा चिरेबंदी वाड्यातील होय ,हे मराठे गावात थोडे जास्तच असतात शेती खूप असून ही सारखे कर्ज बाजरी असतात .यांचे वास्तव्ये गढीच्या पाटील यांच्या आसपास असते ,कादाचीच मंदिराजवळ चिरेबंदी वाडे असतात ,मध्यम आकाराची वाडे या वाड्यात संपूर्ण कुटुंब असते ,मुल मुली सुना बाळ एकत्र राहतात ,वाड्याती गुरे ढोरे बांधतात अथवा आसपास गुरा धोरणच गोठा असतो .यांचे मुले शेतीची देखभाल करतात यांना मदतीसाठी बहुजनांची पोरे कामावर लागतात ,पाटील असल्याचा मनात सुकाळ खूप असतो पण गढीवरील पाटील गावचा मुख्य असल्या कारणाने यांचा क्रमामंक मालीपातील असा लागतो ,बहुजावरील कामगारच्या मेहनतीवर यांची मदार असते ,यांना घर गडी लागतो वर्षभर करार पद्धतीने बहुजनांची मुले कमावर ठेवत असत ,भरगच्च  शेत आणि शेत मळे यांचे कडे असल्यामुळे उत्त्पन्न ही तश्याच पद्धतीने असते ,वर उल्लेख केल्यामुळे हे ही बहुजानाचे शोसित आहेत सर्व गह्रातील कामे करून घेत पण घरात प्रवेश नसे ,बहुजनासाठी यांनी एक वेगळी खोली आंदन म्हणून ठेवलेली असते ,तिथेच बसने आणि तिथेच खाणे ,करण प्रश्न सिवाशिव आणि बाटा बाटीचा असतो न ,समजा तुम्हाला चाहा हवा असेल तर ,एक राखून ठेवलेली कप बशी असते ,त्यातच चहा प्यायचा आणि स्वतः धुऊन ठेवायची आणि परत तलफ झाली की ती तुम्ही वापरायची ,आणि कायम ती तुमचीच असे .

शेतावरील कामात भयंकर पिळवणूक केली जात होती ,घर गड्याने पहाटे तीन वाजता मळ्यात  जाऊन विहरीवर पाणी सोडायचे ,उसाला पाणी द्यायचे आणि उस पूर्ण पाणी पिऊन झाल्यावर परत घरी यायचे आणि सर्व गुर ढोरांना पाणी पाजून झाल्यावर त्यांना नंदीवर घेऊन जाऊन धुऊन आणायचे हे सकाळ चे घरगद्याचे काम असे ,नंतर उरलेली शिळी पाकी भाकर पदरात घेऊन घरी जायचे .घरी जाऊन अंघोळ करून परत मालकाच्या शेतावर जुंपायचे ,हे वर्षभर अहो रात्र चालत असे ,आणि घरगाड्याच्या पदरी काय तर एक ठराविक ठरलेली रक्कम ,एक दिवस सुट्टी नाही,ज्या दिवशी कामावर गैरहजर त्या दिवसाची पगार वजा केली जाई .काय जीवन होते जीवनात काही तथ्य होते का आयुषभर राब राब राबता ? घरगडी वर्षभर बांधला असल्याकारणाने तो त्यांचा गुलाम असे म्हणेल ती कामे बैला सारखी करावी  लागत असे,एखाद चुकीचे काम झाले तर वेळ प्रसंगी मार खाण्यास सामोरे जावे लागत असे. शेत आणि घरातील सर्व कामे करायचे पण घरातील कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही ,हीच अवस्था शेतात काम करणाऱ्यांना भोगावी लागत असे ,शेतावर काम करणारी बायका ,आणि वयस्क पुरुष मंडळी यांचे गुलाम असत ,बारा बार तास काम करून जुजबी मोबदला पदरी पडे .या पिळवणूकी बरोबर गुलामासारखी वागणूक असे .पातला समोर मन वर करून बोलायचे नाही म्हणेल ते काम गुमाने आणि इमाने इतबारे करायचे .असे जाच खूप आणि अनंत काळ भूमिहीन शेतमजूर आणि बहुजनावर केले होते .

आता शेवटच्या मराठे बुवा कडे वळू या हे महाशय यांचा उस्रलेला सार ,यांचे कडे म्हणावे तेवढी शेती नाह्वती हे वर उल्लेख केलेल्या पाटला कडे काम करीत असे ,गाव गाड्यावर आणि गावाबाहेर वसलेल्या वस्तीती राहणारा पाटील ,गावात खूप आपुलकी आणि सर्व समाजाचा एकदुवा असलेला पाटील मराठा .जगभर मराठा असलेले बिरूद गावभर फिरनारा मराठा ,पाटील आणि मालीपातील यांच्या इश्र्यावर नाचणारा मराठा ,बहुजनांचा कट्टर आणि जाती वाचक आणी प्रचंड प्रमाणात शिवाशिव पाळणारा मराठा ,बहुजनांना गुलाम करून वेळे काळी बळजबरीने आरोप ठेऊन बहुजनांच्या सतत पथ्यावर असणारा मराठा .काम कमी पण कामाचे भाव खाऊन वाव आणणारा मराठा .बहुजांना सोबत मिळेल ते काम करणारा पण त्याच बहुजनाना कमी लेखणारा ,आणि देव देऊळ यावर आपले गुजरा करणारा व बहुजनाना देवळात मनाई करणारा मराठा .

 आज यांची पाळे मुले नस्ठ झाली आहेत .गढी ढासळून गेली आहे ,बुरुजाची माती विकुन खाण्याची वेळ आली आहे ,चिरेबंदी वाडे भुई सपाट झाली आहेत ,आणि राहिल्या आहेत त्या आठवणी ,गाव संपला आहे गावाचा नगारा फुटला आहे,गावाची तटबंदी वाहून गेली आहे ,आणि गावाची येस आणि तिचे दरवाजे ही नस्ट झाली आहेत ,उरला आहे फक्त मराठा ,एक मराठा लाख मराठा .

Last updates :१४ - ०८-२०१७

No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...