About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Sunday, May 12, 2024

पळस : फ्लेम ऑफ फॉरेस्ट

 

पळस :  फ्लेम ऑफ फॉरेस्ट



( पळस ,पिवळा ,काळा आणि पांढरा रंगात पाहावयास मिळतो ) 

 ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड असतात. जेवणाच्या पत्रावळीसाठी याचा उपयोग पूर्वी खूप होत असे . 

सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांतून लाल रस पाझरतो व सुकल्यावर त्याचा विशिष्ट गोंद बनतो, त्याला इंग्रजीत 'ब्युटिया गम' किंवा 'बेंगॉल कीनो' म्हणतात.

यज्ञ आणि हवनात पळसाची पाने वापरली जातात. धार्मिक कार्यात वापरण्यात येणारी भांडी बनवण्यासाठी पळस लाकडाचा वापर केला जातो. त्याची फुले देवी सरस्वतीला अर्पण केली जातात. 

 

पळसाला पाने तीनच  पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समुहातचं असतात, यावरून पळसाला पाने तिनचं ही म्हणं मराठी रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो संपूर्ण झाड पेटल्या सारखे दिसते .


 


 



पिवळ्या पळसामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, मुतखडा, महिलांच्या मासिक पाळीची समस्या दूर करण्याची आणि बाळंतपणानंतर किंवा अति काबाडकष्टांमुळे शक्तिहीन झालेल्या स्नायूंना बळकट करण्याची क्षमता आहे.

काश्मीर ते कन्याकुमारी आणि ईशान्येतील अरुणाचल ते पश्चिमेकडील गुजरातच्या कच्छपर्यंतचा प्रदेश पाहता भारताला हवामानाची शीतोष्ण उतरंड लाभलेली आहे. जैवविविधतेने व्याप्त आणि नटलेला हा सारा परिसर! पर्यावरण अभ्यासकांच्या मते १० लाखांवर विविधरंगी, औषधी गुणयुक्त वनस्पतींची संपदा भारतभूमीत आहे. पैकी जेमतेम साडेतीन लाखांवरच वृक्ष-फूल-फळांची ओळख सुस्पष्ट झाली आहे. उर्वरित वनस्पतींच्या नावांचा उलगडा बाकीच आहे. यातील अनेक वनस्पती कालौघात नामशेष झाल्या.

 

काही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, त्या त्यांच्यातील बहुमोल उपयोगी गुणांचा लाभ उठवता-उठवता संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच! यातलीच एक प्रमुख आणि दुर्मिळातील दुर्मीळ झालेली वनस्पती आहे पिवळा, पांढरा व काळा पळस!

 

पिवळ्या-पांढऱ्या पळसाचे मूळ शोधत गेलो तर त्याचे संदर्भ रामायणातील संजीवनीसारखे वेदादी पौराणिक ग्रंथांमधून आढळतात. पिवळ्या पळसाचे फूल हे महादेवाला अत्यंत प्रिय, अशी श्रद्धावंतांची धारणा आहे.

शिशिर ऋतूच्या आगमनाची चाहूल लागताच पळसाची झाडे बहरू लागतात. याच दरम्यान, महाशिवरात्रही असल्याने बहरलेल्या पिवळ्या पळसाची फुले महादेवाच्या पिंडीवर अर्पण केली जात. त्यासंदर्भातील उल्लेख पौराणिक वेद आदी ग्रंथांमध्ये आढळतो. पळसावर काव्यही लिहिले गेले आहे. वेदांच्या काही ऋचाही पळसाचा संदर्भ देणाऱ्या आहेत.

पळसाच्या पाना-फुलांच्या वर्णनातून एखादी उपमाही दिली गेली आहे. ‘किंशुक’ या नावानेही काव्यातून पळसाचे रूपक मांडले आहे. ‘काय त्या झाडावर पोपट (शुक) बसला आहे?’ अशी पृच्छाच ‘किंशुक’ या शब्दातून केली आहे. शिशिरागमनाला उन्हाचा रखरखाट जाणवू लागताच रानोमाळी बहरू लागलेल्या पळसाकडे दुरून बघितले तर केशरी, पिवळी, पांढरी फुले त्यांच्या पाकळय़ांतील टोकदार वैशिष्ट्यांमुळे जणू पोपट बसल्यासारखी भासतात, असे ते रूपक किंशुकमधून मांडल्याचे दिसते.

परभणीतील चारठाणा येथील निवृत्त मुख्याध्यापक आणि वेद, संस्कृतचे अभ्यासक शिवाप्पा खके हे पिवळ्या पळसावरील सुभाषित अत्यंत लयीत म्हणून दाखवतात. त्यातले रूपक उलगडून दाखवतात.

 

ब्रह्मवृक्ष पलाशस्तवं श्रद्धां मेधां च देहि मे ।
वृक्षाधिपो नमस्तेस्तु त्वं चात्र सन्निधो भव ।।


या सुभाषितामध्ये पळसाचे माहात्म्य सांगताना त्याला ब्रह्मवृक्ष म्हणूनही संबोधले आहे. सुभाषितामध्ये पळसाचे नाव ‘पलाश’ म्हणून आले आहे. अर्थात हे संस्कृत नाम. पळसाला वृक्षातील राजाही म्हटले गेले आहे. त्याला श्रद्धा व मेधा- म्हणजे बुद्धी प्रदान करण्याचे आर्जव वरील सुभाषितामधून केले आहे. वेद, पुराणात पिवळ्या पळसाला त्रिपर्ण, पलाश, पलंकषा, पलंकषी, अशी नामाभिधाने आढळतात.

 

इ.स. १८०० मध्ये भारतावर जेव्हा इंग्रजांचा अमल होता तेव्हा त्यांनी येथील जशी थंड हवेची ठिकाणे शोधली तशी त्या त्या ठिकाणच्या जैवविविधतेचाही अभ्यास केला. ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’ नावाचा एक वनस्पती-फुलांचा कोषच लिहिला. या ग्रंथांत अनेक दुर्मीळ वनस्पतींचा उल्लेख आढळतो. पिवळ्या पळसाला इंग्रजीत साजेसे ‘ब्युटिया मोनसपर्मा’ नाव आहे. हिंदीत पलश म्हटले आहे. धुळवडीला पारंपरिक रंग खेळण्याची परंपरा जपणाऱ्या बंजारा समाजात पळसाला केसुला म्हटले जाते.

 

पूर्वीच्या काळी धुळवडीला जे नैसर्गिक रंग खेळले जायचे त्यात केशरी, पिवळ्या, पांढऱ्या व काळ्या पळसाच्या फुलांचीच भुकटी असे. या फुलांच्या रंगांमध्ये उष्णता शामक घटक असल्याचे सांगितले जाते. या फुलांच्या भुकटीचे औषध म्हणून सेवनही केले जात असे.

अत्यंत औषधी गुणयुक्त, पिवळ्या-पांढऱ्या पळसाचे वर्णन जमिनीवरचे सोने म्हणून केले गेले आहे. अर्थात त्याला त्या वृक्षाचे बहुगुणी वैशिष्ट्यच कारणीभूत आहे. मात्र, पिवळ्या पळसाच्या मुळाशी सोने असल्याचा समज करून घेत त्यावर नाहक कुऱ्हाड चालवली गेली असावी आणि ही प्रजात लुप्त झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जाते. वस्तुत: पिवळ्या पळसात अनेक आजार दूर करणारे गुण आहेत. त्यामुळे त्याला सोने म्हणून संबोधले जात असे

अलीकडे पर्यावरणाचा ऱ्हास हा जागतिक स्तरावरच चिंतेचा विषय झाला आहे. हवा, पाणी प्रदूषित होत आहे. दुर्मीळ आणि औषधीगुणयुक्त वनस्पती नामशेष होणे आणि निसर्गाचा समतोल राखण्यात हातभार लावणारी जैवविविधतेची साखळी तुटत जाणे हेदेखील त्यामागील एक कारण आहे.

 

हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याची जाणीव करून देणारे कोणीतरी मार्गदर्शक असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांचे मार्गदर्शन घेऊन दुर्मीळ वनस्पतींचे जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा धांडोळा घेणे क्रमप्राप्त आहे. याच उद्देशाने उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाचे प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांचा एक वनस्पती उद्यान विकसित करण्यासाचा प्रयत्न करणे आहे.

 

 महाविद्यालयातील दुर्मीळ वनस्पतींचा ठेवा जतन करणे, त्यात आणखी भर घालून नामशेष होऊ पाहणाऱ्या वनस्पतींचे बीज संकलित करण्यासह रोप निर्मितीचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे.

 

प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी पिवळ्या पळसातील औषधी गुण हेरून त्याचे बीज मिळवून त्यापासून रोपे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पिवळ्या पळसामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, मुतखडा, महिलांच्या मासिक पाळीची समस्या दूर करण्याची आणि बाळंतपणानंतर किंवा अति काबाडकष्टांमुळे शक्तिहीन झालेल्या स्नायूंना बळकट करण्याची क्षमता आहे. कामशक्तिवर्धक, तारुण्य वाढवणारे गुण त्यात आहेत. अतिसार, अंगदुखीसह कित्येक आजार आणि दुखण्यांमध्ये पळसाचे सर्व घटक उपयोगी ठरतात. पिवळ्या पळसाचा डिंकही अत्यंत गुणकारी मानला गेला आहे. त्याचे लाडू पूर्वी बाळंतपणानंतर महिलांचे स्नायू बळकट करण्यासाठी दिले जात. अशा जैवविविधतेतील बहुगुणी, नामशेष किंवा लुप्त होत जाणाऱ्या वनस्पतींचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रकल्प डॉ. पटवारी यांनी उदयगिरीत राबवला आहे.



केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या एबीजी म्हणजे ‘असिस्टंट टू बोटॉनिकल गार्डन’ योजनेंतर्गत दुर्मीळ वनस्पती, बीजांचे जतन करण्याला प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय दिल्ली तर महाराष्ट्रात बोटॉनिकल सर्व्हे ऑफ इंडियाअंतर्गत असे प्रकल्प राबवण्यासाठी काही निधीही दिला जातो. वनस्पती उद्यान विकसित करणाऱ्या या योजनेसाठी महाराष्ट्रातून दोनच महाविद्यालयांची निवड झाली आहे. मराठवाड्यातून उदगीरचे महाराष्ट्र उदयगिरी हे एकमेव आहे. उदयगिरीत अनेक दुर्मीळ वनस्पतींचे जतन केले जात असल्याचे केंद्रस्तरावरून आलेल्या पथकाने पाहिले तेव्हा त्यात त्यांना कमतरता जाणवली ती पिवळय़ा पळसाची. दुर्मीळ झालेला का असेना पण पिवळा पळस मराठवाडय़ातच सापडेल, असे त्या पथकाने निदर्शनास आणून दिल्यानंतर पुन्हा नव्याने शोध सुरू झाला. महाशिवरात्रीनिमित्ताने महादेवाला प्रिय अशा पिवळय़ा पळसाच्या फुलांची चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आणि पिवळा पळस उदगीरनजीकच्या जायभायचीवाडीत असल्याची वार्ता कानी आली. डॉ. पटवारी यांनी पिवळा पळस तग धरून असलेल्या शिवाराला भेट दिली आणि तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून वृक्षाचे जतन करण्याचे आवाहन केले. त्याच्या बियांचे आता संकलन सुरू झाले आहे.



मराठवाड्यात पिवळ्यापांढऱ्यासोबतच काळा पळसही पूर्वी आढळायचा. जो आता 

दुर्मिळात दुर्मीळ झाला आहे. काळ्या पळसाला तिवस किंवा भुत्या पळसही म्हणतात. मराठवाड्यात बीडजवळील तागडगाव व उदगीरनजीकच्या जायभायाचीवाडी येथे पिवळ्या पळसाचे एखाद-दुसरे झाड आजही आढळते. केशरी-तांबडापिवळापांढरा अशा पळसाच्या विविध प्रजातींबाबत किंवा रंगांबाबत अभ्यासकांमध्ये मात्र काही मतमतांतरेही आढळतात. औरंगाबाद येथील वनस्पती अभ्यासक प्रा. मिलिंद गिरीधारी यांनी अभ्यासकांमधील मतमतांतरे मांडली. अनेक अभ्यासकांच्या मते माणसाच्या त्वचेचा रंग जसा अल्बिनो या पेशीतील दोषांमुळे बदलतो तसा काहीसा प्रकार केशरीपिवळा व पांढऱ्या पळसातील रंगांबाबत आहे.

 

उपयोग : 

आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या विविध आजारांवर फायदेशीर आहेत्यापैकीच एक पळस. पळस औषधी गुणधर्म असलेली एक झाड आहे आणि त्याचे सर्व भाग अनेक रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. लाल फुलांमुळे पळसाला ‘फॉरेस्ट फायर म्हणतात. आयुर्वेदात पळस एक शक्तिवर्धक म्हणून वापरला जातो. 

 

पळसामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरीअँटी-बॅक्टेरिअलवेदनाशामक आणि अँटी-ट्युमर गुणधर्म आहेत. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतोशिवाय लघवीचं प्रमाण वाढतं. त्याच्या पानांमध्ये तुरट आणि अँटी-ओव्हुलेटरी गुणधर्म असतात. त्याची फुलंसुद्धा अनेक गुणांनी समृद्ध आहेत. 

 

डोळ्यातील मोतीबिंदूचा उपचार :

मोतीबिंदू आणि रातांधळेपणा यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पळस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी पळसाच्या मुळांचा रस घ्या आणि डोळ्यांमध्ये घाला. असं केल्याने डोळ्याच्या इतर समस्यांपासूनही मुक्तता मिळेल. 

 

किडनी स्टोन दूर करतं :

साखर घालून पळसाच्या फुलांचं सूप बनवा. हे सूप दोनदा पिण्यामुळे मूत्रातील जळजळ दूर होईल आणि मूत्रपिंडातील स्टोनसुद्धा वितळतील. साखर न घालताही तुम्ही हे सूप बनवू शकताज्यामुळे यकृतासंबंधी समस्याही दूर होतील. 

 

सूज नाहीशी होते : 

पळस मुरगळजळजळ किंवा इतर कोणत्याही कारणामुळे होणारी सूज दूर करते. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर जाळी ठेवून या जाळीवर पळसाची फुलं ठेवा. ही फुलं तुम्हाला जिथं सूज आली आहेत्या भागावर लावा. दिवसातून दोनदा ही क्रिया करा. 

 

त्वचेसाठी फायदेशीर :

त्वचेशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठीदेखील पळस प्रभावी आहे. यासाठी पळसाची साल कोरडी किसून घ्या. एक चमचा पळसाच्या सालीची पावडर घेऊन त्यात तूप आणि मध मिसळून दिवसातून दोनदा प्या. अँटी-एजिंग म्हणून हा एक चांगला उपाय आहे. 

 

पोट फुगण्याच्या समस्या दूर होते :

 पळसाची फुलं पचन संबंधित समस्यांसाठी उपयुक्त आहे. तुमचं पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर पळसाची सालं घ्या आणि कोरड्या आल्यासकट पाण्यात उकळवा. हा काढा गाळून प्या. 

 

रक्तस्राव बंद होतो :

नाकातून  रक्त येणं हे नाकाच्या रक्तवाहिन्यांमधून रक्तस्त्राव होण्यामुळे होतं. याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे कोरडं नाक किंवा नाकात दुखापत. पळसाची फुलं नाकाच्या रक्तस्त्रावात देखील उपयुक्त आहे. 5-7 पळसाची फुलं घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. हे पाणी गाळून त्यात साखर मिसळून प्या. याने नाकाचा रक्तस्त्राव थांबतो. 

 

शरीरातील विषारी घटक दूर होतात :

पळसाच्या फुलांची पावडर तयार करा आणि दररोज 1-2 ग्रॅम पावडर पाण्यासह घ्या. चवीला कडू लागलं तरी यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर जाण्यास मदत होईल. 

(माहिती गुगल वरुण साभार )




लेख आवडला तर Gpay करून मदत करा .  

 


प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई 

'शैतान' चित्रपटाची कथा

 'शैतान' चित्रपटाची कथा


काळी जादू, चेटूक, वशिकरण, राक्षसी शक्ती, हे सर्व नेहमीच वादाचे विषय राहिले आहेत. याचा कोणताही पुरावा नाही. सुशिक्षित लोक याला अंधश्रद्धा मानतात, परंतु क्वचितच असे कोणतेही कुटुंब असेल ज्याने आपल्या मुलांवरील वाईट नजर दूर केली नसेल. अजय देवगणचा नवीन चित्रपट 'शैतान' म्हणतो की जे दिसत नाही ते अस्तित्वातच नाही. चित्रपटाचा केंद्रबिंदू ही काळी जादू आहे जी एका सुखी कुटुंबाच्या आयुष्यात अचानक गोंधळ आणते.


'शैतान' चित्रपटाची कथा। 




कथा कबीर (अजय देवगण) आणि त्याच्या आनंदी कुटुंबाभोवती फिरते, जो पत्नी ज्योतिका, मुलगी जान्हवी (जानकी बोडीवाला) आणि मुलगा ध्रुव (अंगद राज) यांच्यासह फार्म हाऊसवर सुट्टीसाठी जातो. तिथे त्याला एक अनोळखी वनराज (आर माधवन) भेटतो, जो कबीरला थोडी मदत करतो पण ही ओळख कबीरला खूप जड ठरते.

वास्तविक, स्वतःला देव समजणारा वनराज काळी जादू करून जान्हवीला आपल्या ताब्यात ठेवतो. त्याला जान्हवीला सोबत घ्यायचे आहे आणि कबीरने नकार दिल्यावर, तो जान्हवीला चहाची पाने खाणे, न थांबता नाचणे, बिनधास्तपणे हसणे ते तिच्या स्वतःच्या आई-वडिलांवर आणि भावावर प्राणघातक हल्ले करण्यास भाग पाडतो. कबीर आपल्या मुलीला वाचवू शकतो की तिला वनराजच्या स्वाधीन करायला भाग पाडतो? वनराज हे सर्व का करत आहे? हे सर्व चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.

'शैतान' चित्रपटाचे पुनरावलोकन

विकास बहल दिग्दर्शित हा चित्रपट गेल्या वर्षीच्या समीक्षकांनी गाजलेल्या गुजराती सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट 'वाश'चा रिमेक आहे. ही कथा एका दिवसाची आहे, जी एकाच घरात घडते आणि वेळ वाया न घालवता ती मुद्द्यापर्यंत पोहोचते. कथेतील तणाव, भीती आणि थरकाप उडवणारे वातावरण प्रेक्षकांना पहिल्यापासूनच जाणवू लागते. याचे श्रेय कलाकारांना जाते, विशेषतः 'शैतान' आर. माधवन आणि त्याची बाहुली जानकी यांच्या अप्रतिम अभिनयाकडे जातो.


'वश' या गुजराती चित्रपटातील या व्यक्तिरेखेसाठी जानकीचे खूप कौतुकही झाले आहे. त्याचबरोबर माधवनने तो किती महान अभिनेता आहे हे पुन्हा दाखवून दिले आहे. अजय देवगण आणि ज्योतिका यांनीही त्यांच्या डोळ्यांतून असहाय आई-वडिलांची असहायता अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली आहे. मात्र, अजय देवगणचा दर्जा लक्षात घेता प्रेक्षकांना त्याच्याकडून आणखी काही दमदार दृश्यांची अपेक्षा आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सशक्त आहे. सुधाकर रेड्डी आणि एकांतीचे सिनेमॅटोग्राफी, अमित त्रिवेदीचं संगीत आणि संदीप फ्रान्सिसचं तगडे एडिटिंग तुमचं लक्ष दुसरीकडे जाऊ देत नाही.


चित्रपटाच्या उत्तरार्धात समस्या सुरू होतात. दुसरा भाग घाईघाईत केला आहे असे वाटते. चित्रपटाचा शेवट तर्काच्या पलीकडचा वाटतो. माधवनचे पात्र सैतान का बनते, तो कसा बनतो, त्याची पार्श्वभूमी पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली आहे, जी विचित्र आहे. परिसरात अनेक मुली बेपत्ता आहेत, मात्र कुठेही हालचाल नाही का? हे आणि असे अनेक प्रश्न मनात घर करून राहतात आणि या चित्रपटाची कमकुवत दुवा ठरतात. असे असले तरी, लाईट चालू करणे आणि बंद करणे, उलटे फिरणे आणि भूतबाधा करणे यासारख्या हॉरर चित्रपटांच्या सामान्य बॉलीवूड युक्त्या न स्वीकारणारा हा चित्रपट माधवन आणि जानकीच्या उत्तम अभिनयासाठी एकदा पहाता येईल.


का पहा- आर माधवन आणि जानकी बॉडीवाला यांच्या अप्रतिम अभिनयासाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.


लेख आवडला तर मला  : Gpay करा 



Gpay 

शैतान हिन्दी फिल्म

 शैतान_का_अंतिम_क्लाइमेक्स... ( अजय देवगन का है । )


तो भगवान आदमी भोजन नहीं करेंगे । कभी भगवान आदमी बन नहीं सकता आप भगवान हो और मैं इंसान हूं। मैं एक साधारण इंसान लेकिन जब साधारण आदमी जब बाप बनता है , तो अपने बच्चों के लिए भगवान बन जाता है उनसे इतना प्यार कर सकता है। कभी बता नही सकता। धूप पे चलता है ।बारिश में चलता है।है दर्द बर्दास्त करता है। ताके उसके बच्चो के ऊपर कोई आंच न आए।

और तू उसके बाप की दुनिया छीन ले जा रहा है। ताकत कहा से आती है। ताकत का असली मतलब समझना है ? तो कभी किसी माँ को उसके बच्चे के लिए लड़ते हुए देख।

पूरे ब्रह्मांड में एक से बडकर एक ताकतवर भगवान और कोई नही है।
मैंने तुझे कहा था तू रोज आपने नर्क में चलेगा। अब तेरा यह नर्क है। और मैं तेरा शैतान । कल मिलते है .......


कबीर

अबीss र अबीss र कहते रो लेता है । किंव की उसकी जुबान काटी हुयी है ,उसे कबीर कहना ,या बोल नहीं पाता है । चूहे खाते खाते आपण रोज का दिन बिताता है ।

#शैतान फ़िल्म ८ मार्च, २०२४ को सिनेमाघरों में रिलीज़ की । कथा एक ढाबे पर मनराज के चाय से शुरू होती है। फ़िल्म की कहानी एक ऐसे परिवार से है जो फ़ार्महाउस में छुट्टियां मना रहा होता है और फिर वहां एक बिन बुलाया मेहमान आ जाता है ।

और मनराज को चूहे खिलाने - खाने में खत्म हो जाती है। कर्म का फल इसी जन्म मे मिलता है । फ़िल्म की कहानी एक ऐसे परिवार से है जो फ़ार्महाउस में छुट्टियां मना रहा होता है और फिर वहां एक बिन बुलाया मेहमान ( मनराज ) आ जाता है। और पूरे परिवार को धस्त नस्थ कर देता है ।

मनराज ,जानवी को सिर्फ बेटा कहते कहते उसे आपने पास का लड्डू खिलाता है। बेटा कहने के चलते प्रथम दर्शनी जानवी के माँ को को शक नहीं होता है ।

लड्डू जब ध्रु के और जानवी के बीच रख देता है तो जानवी उसे एक लफ्क मारके आपने मुंह में डाल देती है।
ध्रू उसका छोटा भाई बेचारा देखते रहता है ।

कहानी एक फार्म हाउस में खत्म होती है। इस फिल्म मे इतना खौफनाक और दरिंदा इंसान का रूप दिखाया गया है । की आप इंसान को समज नहीं पाते ?

शैतान ,हैवान ,दरिंदे ,और क्या क्या नाम रखे इंसान के ? । इस तरह के लोग आपके पास बहुत मिलेंगे। जरा सावधानी बरतना है। और आपने परिवार को बचाए ।

अजय देवगन, ज्योतिका, आर माधवन, जानकी बोड़ीवाला, अंगद राज. बहुत ही उमदे पेश आए है ।
(आपने माधवन को ३ ईडियट मे देखा है ,इस फिल्म का उसका आखिरी सीन जिसमे अजय देवगन जुबान काटने बाद से लेकर चूहे के रूम मे जो फिल्माया गया है बहुत ही उम्दा और सराहनीय है , best Villain आर माधवन।

#BR









Saturday, May 4, 2024

वट्टपोतक_जातक_चर्या

वट्टपोतक_जातक_चर्या




जंगलात जेव्हा भिषण आग लागते तेव्हा ती आग आपल्या मार्गातील सर्वच वस्तुंना जाळुन खाक करते. या भिषण अग्निमध्ये काही निरपराध जीव आपले प्राण गमावून बसतात, काहीही चुक नसताना. ज्यांमधे क्षमता व ऐपत असते ते या अग्निला घाबरून पळ काढुन आपला जीव वाचवतात पण.....
काही निरपराध जीव ज्यांना पाय असुनही चालता येत नाही. पंख असुनही उडता येत नाही, असे जीव मृत्युला उघड्या डोळ्यांनी पाहुन मृत्युचा असहाय होऊन स्विकार करतात.....
जिवण व मृत्यु यांमध्ये जे काही क्षणांचे अंतर असते, जे लोक हे क्षण अनुभवुन या परिस्थती मधुन तरुन किंवा मरुन जातात त्यांची मानसिक परीस्थिती शब्दांत सांगणे कठीणच नाही तर अशक्य आहे.
खुपच मोठें संकट आल्यावर परकेच काय तर आपले जीवलग सुद्धा आपल्याला सोडून जातात. ती वेळच वाईट असते. अशीच एक घटना आहे वट्टपोतक बोधिसत्व यांची, जंगलात भिषण अग्नि प्रज्वलीत होते व वट्टपोतक यांचें आई वडील परिस्थितीची गंभीरता पाहून आपल्याच मुलास सोडून जाण्याचा दुर्दैवी निर्णय घेतात..... नाईलाजाने.
#वट्टपोतक_जातक
वट्टपोतक चर्या ही चरियापिटक ग्रंथामधील बोधिसत्व वट्टपोतक यांची सत्य पारमितावर आधारित जिवण चर्या आहे.
वट्टपोतक म्हणतात की
जेव्हा मी मगध देशात पंख न फुटलेला तरुण मांसाचा गोळा असा घरट्यामध्येच राहणारा लहान लावा पक्षाचे पिल्लू होतो, तेव्हा चोचीने दाणे आणुन माझी आई माझे पालन पोषण करीत होती. मी तिच्या स्पर्शाच्या आधाराने जगत होतो, माझ्यामध्ये शारीरिक बळ नव्हते.
दरवषी उन्हाळ्यात अरण्यामध्ये वणवा पेटत असे व तो आपल्या मार्गातील सर्वांची काळीराख करणारा अग्नी दरवर्षी आमच्या घरट्यांकडे येत असे. 'धमधम’ असा मोठा आवाज करीत नेहमीप्रमाणे शिखारूपी ज्वाला धारण करणारा तो अग्नी, वाटेतील सर्व वस्तू क्रमाक्रमाने जाळत आमच्या घरट्यांपर्यंत आला. तेव्हा अग्नी वेगाच्या भयाने घाबरलेले व त्रस्त झालेले माझे आई-वडील मला घरट्यात एकटं सोडून उडून गेले व त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. मी पाय व पंख फडफडले परंतु माझ्यात शारीरिक बळ नव्हते. त्यामुळे मी तेथे अगतिक होऊन असा विचार केला की, 
भयभीत, त्रस्त व थरकाप झालेला मी ज्यांच्याकडे आधारासाठी जावे ते माझे आई वडील मला संकटात एकट सोडून निघून गेले, मी एकटा आता काय करावे?
पण 
अजुनही जगात शीलगुण, सत्य, पावित्र्य व करुणा आहे याच सत्याच्या सामर्थ्याने मी आता उत्तम सत्यवचन क्रिया करीन.
 धम्म सामर्थ्याचा विचार करून व पुर्वकाळातील बुद्धांचे स्मरण करून सत्याच्या बळाच्या सहायाने मी सत्यवचन क्रिया केली.
"माझे पंख आहेत, पण ते उडण्यायोग्य नाहीत, माझे पाय असुनही मी चालू शकत नाही. मला आई-वडील संकटात एकटं सोडून गेले आहेत. आई वडीलही आता माझी मदत करु शकत नाही. या सत्य वचनाच्या सामर्थ्याने हे अग्नी तु परत जा."
मी सत्यवचन क्रिया केल्याबरोबर, महाप्रज्वलित झालेला अग्नी माझ्यापाशी येऊन पोहोचल्यावर सुद्धा नष्ट होणाऱ्या अग्नीप्रमाणे, सळसळ करीत भूमी मागे जाऊन नाहीसा झाला. सत्यवचना मध्ये माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. ही माझी सत्यपारमिता होती.
संदर्भ....
चरीयापिटक, खुद्दक निकाय

(राहुल खरे ,यांच्या fb वॉल वरुण साभार )

मांसाहारी माणसं.

कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...