Monday, December 12, 2016

मी कसा झालो , मुक्कदर का शिकंदर !

मी कसा झालो

मुक्कदर का शिकंदर !


मी कार्यालीन  कॅम्प वर नसेल तर कधी सायकल वर जातो ,तर कधी मोर्निंग वाक करतो ,मी कॉलेज  मध्ये असताना माझ्या  वडिलाने मला एक सायकल घेऊन दिली होती तो काळ होता १९८४ चा मी माझी शाळा करून नुकताच लातूरला कॉलेज करण्यासाठी आलो होतो  ,वडील माझे खूप हरणकाळजी स्वभावाचे ,माझ्यावर त्यांचे खूप प्रेम ,कारण माझ्या पाटीवर एकूण तीन मुलीचा आणि तीन भावांचा विस्तार ,मी मोठा असल्या कारणाने ते मला खूप जपत असत ,म्हणून ते काळजी करीत असत. तसे कारने खूप होती त्यातले मला असे एक  वाटते ते म्हणजे मी त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा  माझ्या अगोदर एक मला बहीण होती ती लगेच काही कारणास्तव लहानपणी  मरण पावली होती ,असे नंतर  माय  ने मला सांगितले होते ,मी आणि माझ्या  नंतर एकूण तीन मुली आशालता ,उषा आणि महानंदा .या तिघीचा पाठीवर परत तीन भाऊ झाले .विजय ,दीपक आणि शिद्धेश्वर .या प्रेमापोटी ते माझी खूप काळजी घेत .हि गोस्त आहे ती १९८४ सालची .

मी शिवाजी विद्यालय हाळी -हंडरगुळी ,तालुका उदगीर येथून प्रथम वर्गात १० वि पास होऊन आलो ते ,जिल्ह्याचं ठिकाणी लातूर ला कॉलेज करण्यासाठी आणि श्री बसवेश्वर कॉलेज ला प्रवेश घेतला आणि माझे कॉलेज चे दिवस चालू झाले .

‘हरकुलस’ सायकल घेऊन दिली होती त्या वेळी माझ्या वडिलाने  त्यावर मी रोज  कॉलेजला जात  असे ..मला गावी असताना सायकल खूप येत होती ,  कारण सायकल चालवणे ,खेळणे खूप आवडत असे .

सायकल घेतल्यापासून सारखे वाटत होते कि सायकल वर कांही तरी नाव असावे ? कॉलेज ची मुलं आपापल्या परीने आवडीप्रमाणे सायकल वर नाव टाकीत असत . मग सायकल वर काय  नाव असावे असे मला सारखे विचारात टाकत असे  ,त्याच  दरम्यान लातूर मध्ये मी शिकत  असताना रिगल सिनामामध्ये  अमिताभ बच्चन चा सीनेला लागला होता आणि तो   मी पहिला तेव्हा असे वाटले कि ,सायकल वर नाव ......
“मुक्कदर का शिकंदर “ टाकावे हे पक्के झाले .  आणि मी ते सायकलच्या चैन च्या  मडगाड वर पेंटर  रंगारी सर यांच्या कडून ते काम करून घेतले .


आणि ते नाव  मी सार्थक केले  झाले.कारण मी केलेला माझा विकास आणि विश्वास आज मला दिसतो आहे.  

मी शाळेत ईयेत्ता आठवी पर्यंत नियमित गेलेलं आठवत नाही .माझे दादा खूप काळजीत असत ,एकदा असा योग आला कि यांचे चुलत भाऊ डॉ  .डी एन शिंदे हळीला गावी आले होते ,त्यांनी मला दादांच्या विंनती वरून शाळेत नियमित जा आणि अभ्यास कर असा सल्ला दिला नि मी खरोकर पूर्ण बदलून गेलो .सतत मेहनत केली नी ईयेत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांकाने पास झालो .हे श्रेय जाते ते माझे काका डॉ शिंदे यांना ,ते सर जे.जे.हॉस्पिटल ,भायकला येथे स्त्री रोग तञ् म्हणून कार्यरत होते . तसेच कामावरून रेर्टिर्ड होईपर्येंत त्यांचेकडे व जे जे  कॅन्टीन चार्जे  पण होता .

दादा नुकतेच गावी गेले आहेत. कारण मी लातूर सोडल्या मुले ते पण गावी कायमचे स्थायिक झाले आहेत ,ते एक कुशल क्लॅरिनेट वादक ,गायक ,आणि उत्तम सिव्हिल चे काम करत असत . त्यांनी १९९५ ला राजा शाहू छत्रपती महविद्यालय येथील माझ्या डोळ्यासमोर संपूर्ण वर्गातील भिंती वरील  फळे तयार केले होते ,तेंव्हा डॉ वाघमारे सर ,प्राचार्य होते . त्यांनी हे वर्गातील फळे (ब्लॅक बोर्ड ) बघून माझ्या वडिलांची प्रशंसा केली होती . “ शिंदे मिस्त्री तुम्ही हे सर्व कुठे शिकला आहेत ,एखाद्या शिल्पकाराला लाजवेल असे फळे तुम्ही कोरून काढले आहेत “ आज के वाक्य एकूण माझे डोळे पाणावले आहेत ?

माझे दादा एक कुशल वादक पण होते ,ते नेहमी हैद्राबाद ला वाजवण्या साठी जात ,ते बरेचदा शीख बँड मध्ये काम करीत असत . एकदा हैद्राबाद ला असताना त्यांचा सनई वादक बिस्मिल्ला खान यांच्याशीही संपर्क आला होता ,दोघांनी एका मंचावर गीत गायनाचा कार्यक्रम केला होता ,जेंव्हा माझे वडील क्लॅरिनेट वाजून उठले तेंव्हा उस्ताद खान साहेबानी माझ्या दादांची शबासकी देऊन पाठ थोपटली होती . असे माझे कष्टकरी होते ?

    त्यांनी ती १९८४ ची सायकल पुनः दुरुस्त केली आहे ,ती बघून मला माझे कॉलेज चे दिवस आठवले ,व तो दुष्काळ पण आठवला .तेव्हा मी आणि माझे वडील दोघेच लातूर ला राहत असू ,माय आणि इतर भाऊ- बहिणी गावी राहत असत .

माझे दादा भूमिहीन शेतमजूर पण शहरात असल्याकारणाने ते  शेतात काम न करता ,गोवंडी काम करत .माझे अकरावी ते बी .ए .चे तृतीय वर्ष पर्येंत चे पूर्ण  शिक्षण घरातले काम करून  पूर्ण केले आहे ,दोघांचा स्वयपाक ,घर सफाई भांडी धुनि नि घरातील इतर कामे करून कॉलेज ला जात होतो आणि दुपारच्या सुट्टीत येऊन भाकर खाऊन परत कॉलेज ला जाई

जेंव्हा मी लातूर सोडलं तेंव्हा माझे दादा काही दिवस राहिले ,पण खाण्यापिण्याचा त्रास व इतर काम यामुळे ते पण १९८९ -१९९० ला लातूर सोडून गावी गेले .

मी मुंबईत एम .ए .इंग्लिश या पदवी अभ्यास क्रमाल प्रवेश घेतला ,आणि डॉ .बाबसाहेब आंबेडकर ,शासकीय मुलांचे वसतिगृह ,बी,डी .डी.चाळ वरळी  येथे प्रवेश मिळताच  राहावयास गेलो. त्या पूर्वी मला जो आधार होता तो माझी बहीण आशा हीचा तिच्याकडे मी मुंबईत आल्यापासून ते वसतिगृह प्रवेश पर्येंत घोडबंदर ला वास्तव्यात होतो .


प्रथम वर्ष पूर्ण झाल्यावर दिव्तीय वर्षात असताना मी बी .एड (कर्णबधीर ) डिग्री साठी अली यावर जंग राष्ट्रीय विकलांग संस्थान ,बांद्रा मुंबई येथे प्रवेश घेतला नी मी तेथून पास झालो ..आणि माझे एम.ए .चे दिव्तीय वर्ष अधुरे राहिले ..

आणि माझा विस्तार सेवा सहायक ( विशेष शिक्षा ) म्हणून १९९५ साली अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था ,के. सि . मार्ग बांद्रा मुंबई ( भारत सरकार ).... एकात भरणा झाला नी भारत भाराचा  प्रवास  सुरु झाला तो कधी न संपणारा .....

No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...