Sunday, July 18, 2021

कोम्रेड अण्णा भाऊ साठे

 कॉ.अण्णा भाऊ चा स्टॅलिनग्राड चा पोवाडा आणि चौक सात !

ज्यांच्या आयुष्याकडे आणि साहित्याकडे पाहिल्यावर या व्याख्येची यथार्थता पटावी असे उदाहरण म्हणजे शाहीर अण्णा भाऊ साठे!

प्रतिभेचे लेणे कुणा भाग्यवन्ताला लाभेल हे सांगता येणे कठीण. नाहीतर, वाटेगावच्या गावकुसाबाहेर मातंग समाजात जन्मलेला अण्णा भाऊ साठे नावाचा मुलगा, ज्याला वयाच्या १५-१६व्या वर्षापर्यंत धड अक्षरओळखही झालेली नव्हती, तो मराठी साहित्यातील मानसन्मान मिळवितो, 'फकिरा' या त्याच्या बावनकशी कादंबरीच्या अनेक भाषात आवृत्ती निघतात , मराठीव्यतिरिक्त भाषा माहीत नसलेला हा अभिजात कलाकार रशियाला जाऊन येतो आणि त्याच्या साहित्यकृतींची भाषांतरे केवळ भारतीय नव्हेत तर भारताबाहेरील भाषांमध्येही केली जातात, या अघटिताचा अर्थ कसा लावायचा?

राशियात  गेल्यावर चौका चौकात अण्णा भाऊ साठे यानी तेथील चौका- चौकात पोवड़े गायले आणि आपल्या विचारांची उधळण केली . 

मनोरंजनातून समाजप्रबोधन कसे करता येते याचा वस्तुपाठच खरे तर अण्णा भाऊंनी समाजापुढे ठेवला. याबाबतची मतभिन्नता गृहीत धरूनही एवढे मात्र निश्चितच म्हणता येईल की लोककलेला कालानुरूप करण्याचे ऐतिहासिक मोलाचे कार्य करून अण्णा भाऊ साठे हेच  'लोकनाट्याचे जनक' ठरतात .

अपार करुणा आणि संपूर्ण मानवजातीच्या हिताची मनीषा तिथे सामावलेली असते. भगवान बुद्ध, ज्ञानोबा माऊली तुकोबा राया यांच्या डोळ्यांतून पाझरणाऱ्या करुणेचा आणि मनात दाटलेल्या मानवहिताच्या मनीषेचा अंश ज्यांना लाभतो त्यांच्या कृतीत, उक्तीत, साहित्यात सृजनाची बीजे आढळतात, संहाराची नव्हेत. अण्णा भाऊंच्या साहित्यात हेच दिसून येते.

अण्णा भाऊ साठे यांचे  १९४८ मध्ये सोविएत रशियाला जायचे तसे ठरले होते, पण काही कारणाने ते नाही गेले. पुढे १९६१ मध्ये इंडो-सोविएत कल्चरल सोसायटीतर्फे ते तिकडे गेले. भारत भरातून निवडलेल्या लोकांचे एक शिष्टमंडळ तेथे गेले, त्यात ते होते. तेथे ते महिनाभर होते. साम्यवादी रशियाला भेट देण्याची संधी अण्णा भाऊंना बरीच उशिरा (१९६१ साली) मिळाली असली तरी साम्यवादाशी त्यांची ओळख १९४० च्या आसपास झालीच होती. 

शोषितांना शोषणमुक्त करण्याचे, एक स्वतंत्र माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचे आश्वासन देणारे साम्यवादी तत्त्वज्ञान त्यांच्या मनात खोलवर ठसले आणि हा ठसा त्यांच्या साहित्यावर आणि सर्वाधिक स्वरूपात त्यांच्या लोकनाट्यांवर उमटलेला आढळतो. 

त्यांच्या लिखाणात १५ पोवडे व लावण्या ,२ नाटक ,१० लोकनाट्य ,८ प्रवास वर्णन ,२३ कथा ,३२ कादंबर्या  .

चौक पहिला –

दलितांचा आशाकिरण रशियाचा प्राण । जगजंगी ज्यानं ज्याने लढविले रोस्तोव आणि खार्कोव । 

रक्षिले लेनिनग्राड मास्को नाझीचा काळ तिमोशेको ।।


चौक दूसरा –


नाझीनी बेत मग केला । हेस परि गेला । करू या म्हणे हल्ला । रशियाचा लाल कोट

पाडून । सोविएट लोकशाही मोडून । आशिया सारा घेऊ जिंकून ।

सन एकोणीसशे एकेचाळ । मोठे जंजाळ । युद्धाचा काळ । जून बावीस तारखेला।

नाझी सैन्याने हल्ला केला । मध्यरात्रीच्या सुमाराला ।।

चौक तिसरा-


जिंकित शहरांपाठी शहर । नाझी निशाचर । करीत अत्याचार । आले लेनिनग्राद शहर

भूमीत । अगणित गोळ्या घेऊन पाठीत । पळती माघारी धूम ठोकीत ।।

परतला पुन्हा जर्मन । आला धावून । कोट पाडून । उपनगरात हल्ला केला। लाल सैनिक

पुढे भिडला | पुन्हा लढाईला रंग चढला ।।

वेशीत तोफ धडधडे । पडति भिताडे । अग्नि भडभडे । नाझीकडे यशकाटा झुकला

लाल सैनिक खिन झाला । निराशा झडपी हृदयाला ॥३॥

या चौकत अण्णानी नाझी यश संपनदासाठी कसा झुकला आणि लाल सैनिक कसा खिन्न या वर भाष्य केले आहे.  

चौक चौथा-


रशियाची पोकळ भिंत । नाझी शोधीत । शिरकावया हात । नाही पर कोठे वाव मिळाला।

लाल फौजेचा जोर कळला । त्यांनी मग आपुला मोहरा वळला ।।

या चौकात नझिला लाल फौजेचा जोर कळला आणि नाझी ने आपली कशी माघार घेतली ते संगितले आहे. नाझीने पळ कसा काढला याचे वर्णन पाहावयास मिळते . 


चौक पाचवा –


पराजित गुलाम फौजेला । आणी आघाडीला । युद्ध करण्याला । घ्यावया स्तालिनग्राड शहर । 

जावया इराक इराणवर । पुन्हा मग हिंद पेशावर ।। जो जो हल्ला शत्रूनं केला ।

तो तो परतविला । नाझी संतापला । कराया ठार रशियाला । कपटयुद्धाचा कट रचला ।

तोंड नाही इतिहासी ज्याला ।।

जगभरातील १९४२ च्या उद्धाचे पुरावे देत देश परत्वे चालू असलेले युद्ध आणि नाझी चे कपट कारस्थान नाझी कसा संपवला हे या पोवड्यातून संगितले आहे . 

चौक सहावा-


पसरला बर्फ मोहिको गारिगार । त्याने आछादिले संगर झाले शुभ्र । आकाशी रत्तरंगी निशाण लहरे । त्याखाली जमले धुरंधर । रशियाचे प्यार । कराया विचार ।।

खवळावा सिंधू किंवा उठावे तुफान । उपटावे वृक्ष अजस्त्र त्यानं मुळातून । तसा प्रचंड

हल्ला चवन । रशियाच्या भूमिवरून । द्याया हाकलून । नाझी सैतान ।।

देई वीर तोफेला बत्ती । डोळे कडकती । जाउनी पडती । फोडुनी नाझीचा रणगाडा ।

गर्जती दुसरी आधाडी उघडा  । जगातील नाझी नाव काढा । जी जी ।।

नाझी चा नायनाट करा ,जगातून नाझीचे नामो निशाण मिटवा हा मोलाचा क्रांति संदेश दिला आहे . 

 चौक सातवा-

उत्तराची वेळ संपली नौबत झडली । नाझींच्या अंतांची घंटा वाजू लागली । रशियाची

संगीन सारी वर उचलली। नाझींचा कराया अंत । निघाली जोरात । शत्रू-हृदयात धडकी

ती भरली।

नाझीला लाल सेने ची धडकी भरली . रशियाचा नाझीचा पराभव झाला . लाल सेनेचा विजय झाला . 

(अण्णा भाऊ च्या ‘पोवाडा या नावाची व्याप्ती’ खूप मोठी आहे ,यात मी एकूण सात चौकातील फक्त सुरुवातीच्या कांही ओळी घेतल्या आहेत ,पोवाड्याच्या  सविस्तर माहिती साठी संपूर्ण पोवाडा वाचावा याची वाचकांनी नोंद घ्यावी )

त्यांचे ते स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळच राहील.एक तारा साहित्ये रूपी गगनात आपले स्थान घेऊन याच दिवशी आपल्यातून १८ जुलै १९६९ ला निघून गेला . 

बा.र .शिंदे ,नेरूळ – ७०६

(लेखक  मिनण्डर )


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे!


No comments:

Post a Comment

अमर्त्य सेन

  "आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही." जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षर...