Sunday, July 18, 2021

कोम्रेड अण्णा भाऊ साठे

 साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्मृति दिन !

----------- प्रा बा.र.शिंदे

तुकाराम भाऊराव उर्फअण्णाभाऊ साठे –त्यांचा १८ जुलै हा स्मरणदिन (मृत्यू १८ जुलै ,१९६९ ) त्यांना सलाम !


आज अण्णा आम्हाला सोडून गेले तो दिवस म्हणजे स्मृती दिवस .

संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो की गोवा मुक्ती संग्राम असो अण्णा सदैव स्मृतीत दिसतात . यांच्या यशात यांच्या आवेशपूर्ण पोवाड्यांची सन्मानपूर्वक वैश्विक  नोंद झालेली आहे.


लौकिकार्थाने एक अशिक्षित माणूस ३२ कादंबऱ्या ,२२ कथा संग्रह,१० लोकनाट्य असंख्य पोवाडे लिहितो हे कश्याचे द्योतक आहे . आज मितील त्याचे साहित्य मराठीचा उंबरा ओलांडून सात समुद्र पार गेले आहे .एकूण  २१ भाषेत जाते. 

त्यात झेक ,पोलिश ,जर्मन ,फ्रेंच या भाषा असतात याचा ताळमेळ कसा लावायचा ? असंख्य साहित्य जंत्री कमावलेले व्यक्ती लेखक .



'फकिरा' चा प्रसंग बाका देता येईल ... जेंव्हा सरकारी स्टोर्स वर दरोडा घालायाल येतो. तेंव्हा तेथील व्यवस्थापक तेथील कर्मचारी महिलांना एका खोलीत बंद करून ठेवतो . त्यांची अब्रू लुटली जाऊ नये यासाठीचा हा आटापिटा असतो.फकिरा त्या व्यवस्थापकाला ती खोली उघडायला लावतो.आणि आतील महिलांन उद्देशून म्हणतो” मी इथं धान्य आणी पैसा लुटण्यासाठी आलोय. तुमची आब्रू लुटण्यासाठी नाही.भुकेली माणसं बाया बापड्यांचा आत्मसन्मान पणाला लावून त्यांच्या पोटाची खळगी भरत नाहीत" .


इथे लेखकाने स्त्रियांच्या चारित्र्याला तर जपलंच पण डाकू दरोडेखोरांच्या माणुसकीचा,त्यांच्या मनात असलेला माता भगिनी बद्दलच्या आदरालाही सलाम केला आहे हे याचं वेगळेपण दिसून येत.


तमाशा उलट्या खिशा सारखा माहित असलेला हा शाहीर.आता तमाशा हेच साधन आपल्या बंडखोरीसाठी वापरु लागला.जुन्या कथा बदलून नव्या युगाच्या गोष्टी याच्या वगात दिसू लागल्या.अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्यासाठी ते आधुनिक सवाल जबाब चपखल वापरत. गण तर इतका आक्रमक केला की सुरवातच तळपणारया वीररसाने होत असे.प्रतिभेला एकदा बहर यायल लागला की सगळीकडे वसंत आणि वसंतच फुलतो; तसे त्यांचे झाले.


'ग्रामीण जीवन टिकावू काया आहे आणि समाजक्रांतीचा दलित जीवनातच पाया आहे'. हे त्यांचे जीवनसूत्र त्यांच्या साहित्यातून खळाळत समोर येते .


 त्यांच्या अनेक कादंबऱ्यावर चित्रपट निघाले. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्या कथानकात ग्रामीण महाराष्ट्राला गुंतवून ठेवण्याची ताकद होती, उत्कंठा वाढवणारी कलाटणी होती. म्हणूनच त्यासाठी आयुष्य वाहून घेण्याच्या त्यांच्या लेखणीला लोकमान्यता मिळाली त्यामुळेच ते लोक साहित्यिक म्हणून नावारूपाला आले .

त्यांचं कम्युनिस्ट असणं हे पोथीनिष्ट नव्हतं. तर ते त्यांच्या अर्धपोटी जगण्यातून ,श्रमिकांचा टाहो अंतःकरणा पासून ऐकून सारे आयुष्य त्यासाठी वाहून घेण्याच्या प्रवृत्तीतून जन्माला आलं होतं. या साऱ्या चा परिपाक . त्यांना आलेले इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीचे आमंत्रण

 हे त्या दृष्टिकोनातून पाहायला हवं . त्यांच्या रशिया भेटी आधी त्यांची चित्रा ही कादंबरी रशियन मंडळींनी आपल्या भाषेत वाचलीही होती.

नंतर माझा रशियाचा प्रवास हे त्यांचे आलेले पुस्तक.


जगभरातील इतर भाष्या व्यतिरिक्त हिंदी भाषेचे जपानी लोकांना अति वेड ,मग राज कपूरचे 'आवारा हूं' हे गाणं रशियन जपानी तरुणांनी डोक्यावर घेतलं होतं हे नवल वाटायला नको .


 त्याहूनही अधिक वेड त्यांना अण्णा भाऊ साठे  त्यांच्या ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ ने रशियाच्या क्रांतिकारी  वेदना जगजाहीर केल्या होत्या.

त्यांना सलाम !




No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...