About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Sunday, July 14, 2024

प्लॅटिक बकेट

 


माझ्या_एकच_दोष_आहे_की_मी_आवाज_जास्त_करतो . 

हे माझे दु:ख आहे की ,मी आवाज जास्त करतो. मला लातूर  गंज गोलाइत एका स्टील च्या भांडी दुकानातून  खरेदी करण्यात आले . कितीला खरेदी केले ते खरेदी करणारा  आणि विकणारा त्यास ठाऊक आहे .? वेगेले पैसे देऊन नाव पण कोरण्यात आले . 

" सौ. सोजार विश्वनाथ गवळी यांचे तर्फे ,घोलप यांना सप्रेम भेट २९ -५ -१९९४ . 

एका लग्नात माझी भेट वस्तु म्हणून वर्णी लागली ,मी बालाजी शिंदे ,हाळी ता . उदगीर जिल्हा लातूर यांच्या गावी आणि यांच्या घरी रविवार  २९ , मे १९९४  ( मे -१९९४  बैशाख - ज्येष्ठ २०५१ ) लग्नात झालो  दाखल झालो . 

लग्न झाले सर्व सोपसकसर संपले , लग्न जोडपे मुंबई येथे निघून गेले . कैक दिवस माझ्याकडे कोणी बघत नाही हे त्यांची आई नीला हिच्या लक्षात आले आणि तिने मला एका पांढऱ्या सूती कपड्यात बांधून मुंबई येते घेऊन आली .स्थळ होते वांद्रे सरकारी वसाहत ,मुंबई . त्यांच्या सूनबाई ने कश्याला घेऊन आलात हा शेरा मारला पण मागील ३० वर्ष मी इथे यांच्या घरात तग धरून कायम आहे . 

कपडे फटतील ,खराब होतील ,गंज लागेल म्हणून माझ्या वापर बाथरूम मध्ये कमी पण इतर साहित्य जसे धान्ये ठेवण्यास होवू लागला . पण कालांतराने इथे नवीन प्लॅस्टिक बकेट दाखल झाली मला बगल देण्यात येवू लागले . तरी मधून मधून माझी आठवण यांना होई ,आज पाऊस सुरू झाला आणि माझी वर्णी ओल्या झालेलेल्या छत्र्या ठेवण्यास होऊ लागली . बघा आहे की नाही माझा मानपाण मी आज घरच्या  दर्शनी भागात  आहे . छत्री राखण करतो .घरात पाणी होवू देत नाही . 

त्याच रूपयाच्या आठवणी आणि भेटवस्तु च्या  मोबदल्यात गेली ३० वर्ष मी सेवा करतो आहे . एक विनंती आहे ,माझ्या आवाज सहन करा ,मी बोलका सेवक आहे हो आपला . अशी माझी एक आत्मकथा आहे . जशा तुमच्या ही लग्नातल्या भेट वस्तूच्या कथा असतील ? तशी माझी ही एक लहान आत्मकथा !..

..............तो काळच तसा होता ,उट सूट आपले देखावे करण्याचा ,की मी किती मोठी वस्तु लग्नात भेट दिली आहे . लोक आपापल्या एपती प्रमाणे वस्तु स्वरूपात भेट वस्तु देत . दूर दूर गाववरून वस्तु खरेदी करून घेऊन यायचे . 

माझे आणि राधा चे जेंव्हा लग्न झाले तेंव्हा हे महाशय  माझ्या लग्नात घरी आले . खूप टिकाऊ वस्तु . अस्सल स्टील . बरीच भांडी कोंडी मिळाली . मी वांद्रे पूर्व मुंबई येथे राह्यला भाड्याच्या  खोलीत . मग यवढी भेट वस्तु कुठे घेऊन जाणार ? नगद स्वरूपात ,मिळालेल्या भेटी , रुपये ११ ,व ५१ त्या वरील किती मिळाले ते मला आज मितीला आठवत नाही ? ते मिळाले ली नगद रक्कम लगेच मंडपवाले,बॅन्ड बाजा ,स्वायपाकी ,देण्यात कामी आले . लग्न करून दादा रिकामे झाले . बरे झाले कर्ज काढून लग्न केले नाही ? नाहीतर ते आम्हा दोघाणा फेडावे लगेले असते ?

तब्बल तीस वर्ष झाली माझ्या लग्नाला ,पण हे बकेट माझ्या पिछा सोडत नाही . टाकावे से ही वाटत नाही , कारण भेट ही अमूल्य ठेवा आणि आठवण असते . याला हात लवताच आवाज करते म्हणून माझी बायको जास्त वापरत नाही . त्याचा आवाज ,वजन हे आजच्या प्लॅस्टिक युगात कालबाह्य झाले आहे . पण या तीस वर्षात कैक प्लॅस्टिक  बकेटस  घरात आली आणि गेली .  अंदाजे वर वर हिशोब केला तर एका  वर्षाकाटी एक branded बकेट धरून चला  एकूण १२०  बकेट आम्ही खरेदी केले असतील ( आज मितीला एकूण तीन  बकेट आणि एक टब अश्या चार वस्तु लागतात बाथरूम मध्ये ) 

तात्पर्य असे की अश्या दुर्मिळ वस्तु ज्या खूप टिकावू आणि आर्थिक बाबीने उपयोगी असतात . आजच्या पाचव्या जनरेशन नंतर आलेल्या #Anxious _Generation ला वापरा आणि फेकून द्या याचे भयानक वेड लागले आहे , याची जाणीव या जगाला नाही होत .? हे वैश्विक सत्य आहे .  मग ती वस्तु कोणती ही असो . 

प्रा. बा र शिंदे ,नेरूळ नवी मुंबई .


                                            लेख आवडला तर  धम्मदान करा   .......... 


अपील : मी प्रा. बी.  आर.  शिंदे ,(विशेष शिक्षा कर्णबधिर विभाग ,भारत सरकार ) सध्या सामाजिक कार्यासाठी लेखन स्वरूपात  स्वताला समर्पित केले आहे . पूर्वी कर्णबधिर  सरकारी क्षेत्रात  कार्यरत होतो . तिथे पण मी ३१ वर्ष सेवा केली आहे . शेवटी आपले घर आपला  समाज ,हयाचे ऋण देणे असते , ते मी करीत आहे .आपले हे हेच कर्तव्य असायला हवे .  समाज कार्य करण्यास नक्कीच अर्थसहाय्य करावे .  हयाच  मूळ कारणाने समाज आज तळा गाळात आहे .राष्ट्रपिता  महात्मा फुले यांनी सांगितल्या प्रमाणे ' अर्था विना शूद्र खचले ' माझ्या  सारख्या अनेक धुरीण व्यक्तीने मोठया कसोसिने समाजात विविध पदावर राहून ,वेगवेगळ्या क्षत्रात कार्य केले आहे . 

 

    तेच कार्य मी आज एक खारीचा वाटा  उचलून कार्य करण्याचा  करीत आहे ,आपण ही एक खारीचा वाटा होऊन समाज कार्य करावे ही अपील आहे. आणि उपरोक्त गुगल लोगोवर आपल्या इच्छे प्रमाणे मदत करावे हे माझे अपील आहे . 

 

जय भीम ! नमो बुद्धाय ! 





No comments:

Post a Comment

मांसाहारी माणसं.

कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...