About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Monday, June 7, 2021

लसाकम चे प्रबोधन

मा बालाजी शिंदे साहेब ,काल दिनांक 6 जून ला तुम्ही विषयाची सुंदर अशी मांडणी केली ,त्याबद्दल तुमचे अभिनंदन 
समाज मंदिर,आणि विहार यामधून शिक्षण कसे देता येईल ,यांचे सुंदर नियोजन तुम्ही मांडले ,
प्राथमिक शिक्षण जेवढे सक्षम रीतीने होईल ,तेवढीच पुढची पिढी सक्षम आणि परीपक्व निघण्यास मदत होईल ,
आज ग्रामीण भागात मातंग समाजाचा विचार केला ,शिक्षणाचे प्रमाण नगण्य आहे ,
10 वि पर्यंत येता येता सर्व मुले ड्रॉप होतात ,
लोकसंख्येचा विचार जर केला तर ,एक टक्का सुद्धा विद्यार्थी 10 वीच्या पुढे शिक्षण घेत नाही ,
ही अवस्था खूपच वाईट आणि समाज उन्नतीच्या दृष्टीने दयनीय आहे 
डॉक्टर बाबासाहेब यांनी आपणास ,शिका ,संघटित व्हा ,आणि संघर्ष करा ,ही त्रिसूत्री आपणास दिली ,
पण या सूत्राचा विचार आपल्या समाजाने केला नाही ,या सूत्रा पासून आपण दूर राहिल्यामुळे आपला समाज खूप मागे राहिला 
ज्यांनी या सूत्राचा अवलंब केला तो समाज वेगाने पुढे गेला ,
महार समाजाने बाबासाहेब यांनी दिलेल्या सर्व सूत्राचा स्वीकार करून आज उच्च कोटींची पात्रता त्यांनी स्वतः मध्ये निर्माण केली आहे 
कोणे एके काळी महार समाजाची आणि मातंग समाजाची अवस्था एकच होती ,
पण आज काय चित्र दिसते ,महार समाज हा मातंग चे तुलनेत खूप पुढे गेला आहे ,ही जादू केवळ बाबासाहेब यांनी सांगितलेली त्रिसूत्री त्यांनी अंगिकरल्यामुळे झाली ,
आपला समाज केवळ शिक्षणा मुळे मागे राहिला 
आता आपण महार समाजाची बरोबरी कधीही करू शकत नाही ,
आपला समाज शिक्षण न घेता ,आणि बाबासाहेब यांनी दिलेल्या अनेक सवलतीचा लाभ न घेता ,केवळ द्वेष भावनेने महारांचा विरोध करीत आले आहेत ,आणि आजही तेच करतात ,
मांग लोकांना बाबासाहेब आणि बुद्धावर सांगितले तर ते ऐकून घेण्याचे मनस्थितीत नसतात ,ते म्हणतात तेवढे सोडून बाकीचे बोला ,असे म्हणतात ,काय म्हणावे त्यांच्या या आद्यनाला ,
1980 ते 1990 या काळात  
मातंग समाज अण्णा भाऊ मुळे आंबेडकरी विचारा कडे वळत होता ,परंतु येथील मनू वादी लोकांनी ,काही मांग पुढारी याना हाताशी धरून ,आणि त्यांना लालूच देऊन ,मांतग समाजात दुफळी निर्माण केली ,आणी 
समाज फोडला ,त्याची परिणीती ,जे लोक आंबेडकरी विचारा कडे वळत होते ,आणि तशी सुरुवात झाली होती ,त्याला मनू वाद्यांनी खिंडार पाडली ,
त्यामुळे केवळ काही घर भेदी ,पुढारी यांच्यामुळे समाज दिशाहीन झाला आणि समाजाचे मोठे नुकसान झाले ,
शिक्षण हे फार महत्वाचे आहे ,शिक्षणाने च समाजाचा विकास होणार आहे ,
शिंदे साहेब धर्म ही बाब खूपच किचकट आहे ,तिची चिकिसा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे या गोष्टी मांग लोकांना सध्या तरी कळणे अशक्य वाटते ,म्हणून आपण आता फक्त आणि फक्त केवळ शिक्षण या विषयावरचं मंथन करने उचित वाटते ,
कारण एकदा शिक्षण झाले तर समाज आपोआपच धर्म चिकिसा करेल ,आणि आपले शत्रू आणि मित्र कोण त्यांना कळे ल ,
आपण केलेल्या सूचनांची आता अंमलबजावणी कशी करता येईल त्या दृष्टीने आपण महासंघामार्फत सर्वांनी प्रयन्त करू या 
आपले अध्यक्ष सुजाण आणि या बाबती मध्ये सक्रिय आहेत ,
त्यामुळे आपण मांडलेल्या विषया नुसार ,समाज मंदिर ,आणि विहार ,यामधून 
मुलांना चांगले शिक्षण ,आणि चांगले संस्कार कसे देता येईल या दृष्टीने आपण सर्व जण मिळून प्रयन्त करू या 
पुन्हा एकदा आपले हार्दिक अभिनंदन ,
असेच महासंघाला मार्ग दर्शन करणे ,चालू ठेवा ,आणि योगदान पण असू द्या ,
धन्यवाद 
आपला 
दिगंबर मण्यार 
औरंगाबाद 


मा. मानियर सर ,आपण रविवार दिनांक ०६ ,जून २०२१ रोजी लसाकम महाराष्ट्र  द्वारे आयोजित  घेण्यात आलेल्या *माता रमाई स्मृति दीनांनीम्मित्त  - प्रबोधन शिबीर मालिकेत माझे “समाज मंदिर व विहरातून शिक्षणाचा प्रसार "*  हा विषय घेऊन माझ्या अल्पश्या बुद्धिला झेपेल अशी झेप घेत मातंग समाजातील शिक्षण आणि ते लयास गेलेली मरगळ ,पुन्हा कशी उभी करता येईल याची कारण मीमांसा आणि त्यावर करण्यात येणारी उपाय योजना व व्यवस्था यावर माझा विचार  विशद केला होता .
सध्य स्टीतिथ असलेले विहार आणि समजमंदिर याचा संदर्भ देत विहरातून “बाल शिक्षण याची सुरुवात काशी करता येईल हे संगत असताना ,विहारातून भिकखू संघाने ज्ञान प्राप्ती ,ज्ञांनार्जन  करून एकएक भिकखू ने संघ कसा  मजबूत केला हे जुळते मिळते उदाहरण देत तेच काम लसाकम पुढे कारेल  असे मी अश्या व्यक्त केली .तथागताने दिलेली “शुद्ध आचारणाची शिकवण “ हा मूळ बुद्ध धम्माचा (शिकवणीचा) रस लहान वयात किंवा बालमनावर वयाच्या ५ वर्षाच्या आत जर संस्कारित शिक्षण दिले तर पुढील शालेय शिक्षण घेत असताना त्या बालकास उपयोगी होतील असे माझे मत होते . जगातील कोणतेही बाळ मातृभाषेच्या आधारवरा ( Mother tongue is very important for  Development ot Speech and Language in a critical age. The Critical  age  is most supported tool in entire life of the child “Village Naughty boy  BR Shinde p.21 ) पुढील शिक्षणाची ऊंची गाठते. 
मग घराबाहेर फिरती मुले ,शाळा बाहये आणि शाळेत न जाणारी किंवा मधेच शाळा सोडलेली मुले यांना संगत करून समाज ‘मंदिर व विहरतून’ शिक्षणाचे धडे का देण्यात येऊ नये असे आज मला वाटते . 
या *विहार आणि मंदिर* माध्यमांचा उपयोग करून मुलांत शिक्षण गोडी निर्मित केंद्र का बनू नये असे मला सदैव वाटते . आजच्या अन्र्तराष्ट्रीय शिक्षण प्रणालीत आपली मुले का तग धरत नाहीत ? . पूर्वी शिक्षण घेऊ देत न्हवते ,आज मोफत शिक्षणाची दवंडी पेटत किती महाग केले आहे यावर विचार करण्यात यावा. त्यांच्या शिक्षण प्रक्रियेला कुठे *उट्टी* लागली आहे हे आजच्या धुरीनाणी विचार करून ती *उट्टी* काढणायचे कष्ठ उपसावे अशी माजी विनंती आहे . सांगणायचे तत्पर्ये सामाजशिक्षित लोकांनी संघट्ंना  ,मोर्चे ,जयंती या कार्याला न गुंतवता त्यांना शिक्षणाची ओढ कशी लागेल असे अंनुंबंध अनुबंध करावे . 
बोलत असताना माता ,रमाई ने डॉक्टर बाबासाहेबांना काशी साथ दिली आणि महामानव कसे उदयास आले याचे उदाहरण देऊन ,शिक्षण न घेतलेली व्यक्ति ही *धोंडा* असे सावित्री मायी यांच्या शिक्षणाची व्याख्या मला सांगता आली . 
आपण आणि आपला समाज आज कोणत्या गर्तेत उभा आहे हे विषाद करावे लागले . आज आपण ज्या धर्मात आहोत तिथे आपला विकास कसा खुंटला आहे ,अजून आपण त्या पद्धतीचा का भाग महणून जगतो आहे असे मला वाटते . सोबतचा सकखा भाऊ अंतराष्ट्रीय स्थावर कार्यरत असताना आपण अजून गाव आणि जात समाज सोडलेला नाही अशी माझी खंत आहे . कोणी जैन तर कोणी येशू छायेत जगतो आहे . एक उदाहरण द्यावेसे वाटले ते असे ,एक मांगाची बाई एका रस्त्याने जात असताना तिला भिंतीवर एक बुद्धाची पेंटिग दिसली तेंव्हा पदर पुढे करत ठुमका मारत पुढे गेले आणि कांहीच अंतर पार केली तर तिला एका झाडाखाली एक शेंदूर लावलेला दगड दिसला तिथे पदर बाजूला सारून तिथे खाली वाकून नमस्कार करती झाली . हे कशाचे ध्योतक आहे या वर विचार करावा . 
एके ठिकाणी आगरकर म्हणाले की ‘देवाची कल्पना माणसाचीच’ . “आकाशातून देव येथे कधी आले नाहीत, येथून परत कधी गेले नाहीत .हे आपल्याला माहिती असताना हे बिनदीककीत सोपस्कार करतो आहोत आणि मातंग समाजाने आपले कुळ दैवत अजून शाबूत ठेवले आहे या सारखे समाजाचे दुक्ख काय वेगळे असू शकते ?
लसाकम च्या संपूर्ण पदाअधिकारी वर्गांना अशी विनंती केली की आप -आपल्या विभागातील विहार आणि समाजमंदिरातून *बालशिक्षण वर्ग* कसे सुरू करता येतील याची सूची तयार करून आराखडे तयार करून ते कसे राबवणायचे मनसुबे तयार करावे . पण आज मला अशी खंत वाटते की आपल्या कडे विहार असताना सांजमंदिरा ची गरज का भासली ? हा प्रश्न अनुतारीत राहील. 
अश्या आणि अनेक बाबीवर विषय मांडून शिक्षण हे कसे वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध बाल वयात देत असताना तथागत बुद्धांचा सदाचार ,आचरण,धम्माचे धडे कमी वयात पाजवून *बालमन सशक्त* करावे यावर अनेक मान्यवर सदस्याने चर्चा केली. 
प्रा बालाजी शिंदे 
राज्य सचिव लसाकम ,महाराष्ट्र प्रदेश .(नेरूळ ,ठाणे मुंबई -४०० ७०६ )

जयभीम !नमो बुद्धाय !!

Monday, August 3, 2020

Doodle On Dr.B R Ambedkar .

Google गुरु ची Doodle देऊन महामानव ,बोधिसत्व डोक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी !


 

INDIAN SOCIAL REFORMER AND POLITICIAN HONOURED WITH A GOOGLE DOODLE

 

The jurist, who campaigned for the rights of India's 'untouchable' caste and converted to Buddhism, was born 124 years ago

 

https://lh4.googleusercontent.com/muIVHqzcvNKXOhUxohqtDdiTtkorJiQo10ZRGQZEs7a1Eci32q_Y7Rrb9HfgexWpUJqNL2eHM4N3H4xDH_v_CmPWWqPxBZsaJXdfSbkx1MyFd9aORCYLAyjV9o-ii0MKvyOjtOL1

 

सॅन फ्रान्सिस्को येथे तयार केलेल्या  विपणन दृष्टिकोनातून गूगल, अत्यंत फायदेशीर इंटरनेट सर्च इंजिन, हे  एक शोध इंजिन आहे, बातमी किंवा मनोरंजन साइट नाही. मुख्यपृष्ठ कधीही बदलत नाही, त्या डूडल वगळता कलात्मक, कधी मजेदार, कधीकधी आत लपलेल्या लोगोसह चकित करणारे – व्यक्ति चे विशेष त्यांचे समाजासाठी चे योगदान ,त्याग ,जगात केलेला आमुलाग्र बादल या आधारे त्यांचे डूडल प्रसिद्ध करतात . त्यात महामानव ,बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे Doodle हे महत्वाचे अंग होते .

 

Google हे मानवी मूल्ये जोपासण्यासाठी चे इंजिन ,मानव जीवन  पुनरुत्थान करण्यासाठी वापरलेले मशीन. मानव  आनंदित करण्यासाठी आणि Google चे मानवीकरण करण्यासाठी आज गूगल ने संपूर्ण जगावर कब्जा केला आहे . 

 

एके काळी नाराजगी दर्शवणारे जग आज गुगल हा उत्तम पर्याय म्हणून  स्वीकारित असताना दिसत आहेत . शाळा ,महाविध्यलय  आणि एकंदरीत एकदारीत कोर्पोरेटर क्षेत्र गूगल वर विसंबून आहे .

 

Google च्या व्यवसायाची बाजू जी डेटा आणि उपयोगाचे सतत विश्लेषण करते, डुडल्स त्यांचे व्यक्तिनिष्ठ निकषांवर मूल्यांकन करतात. जुरी बोर्ड ठरवत असते ,की कोणाचे Doodle तयार कराचे .

 

गूगल हे सामाजिक नेटवर्क आहे . गूगल  टीम दरवर्षी अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये  doodle केले आहेत आजवर ३०० हून अधिक डूडल तयार केले आहेत . परंतु राजकीय किंवा वादग्रस्त विषयांपासून सतत दूर असलेले पाहावयास मिळत आहे . 

 

मुळात गमतिची बाब अशी आहे की ,गूगल नाविन्यपूर्ण, कलात्मक आणि मूर्खपणाच्या कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करतो, जे Google साठी योग्य आहे. 

 

यात  डूडल कल्पना फक्त कोठूनही येऊ शकतात. गूगलची नाविन्यपूर्ण संस्कृती, आरामशीर वातावरण, काम आणि खेळाचे मिश्रण सर्जनशील प्रक्रियेस मदत करते.

 

डूडल चा इंजिनियर ख्रिस होम, ने आजवर ३०० पेक्षा जास्त जगभ्रतील प्रसिद्ध व्यक्ति सहित डूडल  बनवले आहेत . 

 

गूगल डूडलर म्हणतात की  आम्ही गूगल च्या जगभरातील वापरावर डूडल बनवत असतो आणि त्या   कलाकृतीचा अतुलनीय मान सन्मान  देतो त्यात त्या व्यक्ति विशेष  तीचे  अभिनव संस्कृतीचे प्रतिबिंबित करतो आणि Google वर Doodle तयार करतो . 

 

गूगल हे संपूर्ण जगात ऑनलाइन भेट देण्यात आलेले स्थान , यात मानवी मूल्ये  प्रतिबिंबित करते.

अशीच गूगल ने १२५ वर्षा पूर्वी  चतुर्थ प्रवर्गात जन्म घेतलेल्या  महामानव ,बोधिसत्व डॉक्टर  बाबासाहेब आंबेडकर यांचे डूडल/Doodle तयार केले होते . 

याची दखल जगभरातील बुद्धिजीवी वर्गाने घेतली . आणि या महामानव बोधिसत्व यांच्या डूडल लोगो मुळे त्रिलियायन व्यू आले होते . 

 

आजवर  डूडल ने ३०० च्या वर प्रसिद्ध केलेल्या Doodle मधील रांगेत प्रथम  १० मध्ये  स्थान आले होते याची नोंद घ्यावी .

 

अशी महती आज ही १२६ वर्षांनंतर महामानव ,बोधिसत्व डॉक्टर  बाबासाहेब आंबेडकर  कायम  टिकून आहे ,आणि मानव जमात या जमिनीवर जो पर्येंत जीवंत असेल तो पर्येंत महामानव ,बोधिसत्व डॉक्टर  बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि मोठेपण ,त्याग ,मानव उत्थान साठी केलेले समर्पण जगाच्या कृती पटलावर असणार आहे . 

 


Thursday, July 30, 2020

आनंदवन कर्णबधिर विध्यालाय

मूकं करोति वाचालम्
July 16, 2020
महाराष्ट्रातील कर्णबधिरच्या क्षेत्रातील आनंद मूक बधिर विद्यालय आनंदवन या शाळेची  २ जुलॆ १९८३ ला या शाळेची स्थापना झाली. 

हा लेख मी वाचला आणि आणि संपूर्ण आनंदवनात व्यतीत केलेले दिवस आठवले आणि ,शिव सर यांनी एवढी मेहनत घेऊन लिहलेल्या लेखाला माझी प्रतिक्रिया न देणे हे राहवले नाही ...

या ३७ वर्षांचा शाळेचा प्रवास त्याला एक इतिहास आहे. आनंदवनातील अनाथ मुलांच्या प्रकल्पात कर्णबधिर विधायलाय चा सिंहाचा वाटा आहे .
माझा आनंदवन ला प्रथम भेट देण्याचा योग १९८५ ला आला होता. तेंव्हा नुकतीच आनंदवन ची स्थापना  झाली होती . तीन वर्षे वयात आले होते .

तो अनुभव खूप वेगळा होता ,येवढ्या मोठया प्रमाणात कुष्ठरोगी संख्या  पाहण्याचा वेगळा अनुभव . प्रतेक व्यक्ति आपल्या पुढील आयुष्यात बरे होण्याच्या जिद्धीने दिसली होती ,ती जिद्द खरी झाली . आज ती माणसे आनंदवनात आपले सुखी जीवन जगत आहेत . याचे श्रेय डॉ .आमटे दांपत्याला जाते . त्यांचा त्याग आणि मेहनत यावर आंनदवन येथे आनंदाची ‘वृक्ष वल्ली ’ उभा आहे .

इथे लिहण्याचा संधर्भ असा की १६ जुलाई ला शाळेचे आदर्श विशेष शिक्षक ,शिव सर यांना जाते . शिव सराणी आनंदवण च्या स्थापणे पासून ते आजतागायत इतिवृत खूप मार्मिक आणि सुंदर रीतने मांडले आहे ते सराहनिय आहे अजोड आहे .यावर मागील पंधरा दिवसात  कर्णबधिर क्षेत्रातील मान्यवराणी भर भरून आपल्या प्रतिकऱ्या  लिहाते झाले आहेत . वेळे अभावी मी त्या योग्ये वेळी माझी प्रतिक्रिया देऊ शकलो नाही महणून आज इथे लिहण्याचा उहापोह टाळता आला नाही . 

माझा या शाळेशी जूना  ऋनंनुबंध आहे ,म्हणजेच नाते घट्ट आहे . सन १९९८ ला येथे पुनः जाण्याचा योग आला तो थेट कार्यालयीन कामानिमित्त . 
कर्णबधिर शाळेत मुलांची कान तपासणी घेऊन मोफत श्रवण यंत्र वाटप करण्यात आली होती .तेंव्हा  बाबा आमटे आणि माझी भेट झाली नाही . या महान व्यक्तिला पाहणायची ईछा पूर्ण झाली नाही . 

परत पुढील दोन कार्यक्रम घेण्यात आले पण माझी प्रतेक्ष भेट कांही झालीच नाही . पण अशाच एका श्रवणयंत्र वाटपाट माझी भेट झाली तेंव्हा बाबा अंथुरणात होते . झोपून होते . त्यांना फिरणे चालणे शक्य  न्हवते कमरेला पट्टा बांधून झोपले होते .  मी आणि माझे स्नेही डोक्टर संजय खंडगाळे ,भाषा आणि वाचा तज्ञ आम्ही दोघांनी बाबांची घरी जाऊन भेट घेतली . यात आजच्या  कार्यक्रमाचे ,नियोजन आणि श्रवणयंत्र वाटप यावर चर्चा करून श्रवणयंत्र आणि त्याचा उपयोग ,वापर याविषयी माहिती दिली ,हे सर्व एकुण बाबा कमालीचे खुश दिसले आणि माझ्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला . 

त्या काळी प्राचार्य हिंगे सर ,कडक शिस्तीत असताना दिसले . त्याचा मुलाच्या भाषा आणि वाचा विकासावर खूप भर असे .

आनंद अंध विद्यालय ,आनंदवन व संधीनिकेतन ,अपंगाची कर्मशाळा तपासणीसाठी आनंदवनात असे अनेक उपक्रम येथे चालतात .

आज भाषा विकास आणि वाचा विकास यावर खूप मोठया प्रमानात काम होताना दिसत आहे . एकंदरीत शाळेतील शिक्षक ,पालक यांच्या संगनमताने शाळेचे वन हे आनंदात झाले आहे . 
मला आनंदवन ची ओढ अजून आहे .आज ही आहे ,आणि असणार आहे .
इथे वास्तव्यात असताना  सकाळी उठल्यावर जो देखावा असतो तो अविस्मरणीय आहे . सकाळी मोर्निग वाक  ला मला जायला हमकास आवडते . मी दोन किंवा तीन दिवशीय कार्यक्रमात जातो,तेंव्हा तेंव्हा शिव सर आणि मी गप्पा मारत ते संपूर्ण निसर्गमय रान फिरून येतो ,बाहेर पडताच पूर्व दिशेला संपूर्ण लाल सुर्ये उगवताना दिसेल ,लगेच उजवे वळण घेतले की सुंदर तलाव .या तलावात अनेक विविध मासे .ते बघत पुढे सरकावे वाटत नाही ,लगेच पुढे खाली घासर्तीला उतरावे लागते ,तोच वेग वेगळी झाडे ,फुले वाघून भारताचा पूर्व प्रदेश आठवतो . पुढे थोडे वळण घेतले की सरळ रास्ता आहे ,परत दोन्ही बाजूला तलाव ,यात मनमोहक कमळ ,आणि विविध फुले . पुढे सरकार गेले की विविध रंगांनी नटलेले गुलाब फुले ,आणि इतर फळांची झाडे . मी ग्रामीण,खेडे गावातून महणून माझे इथे खूप मन रमते आणि मन अडकून राहते . परत परत यावेसे वाटते .
लगेच थोडे पुढे गेले की ,डाव्या हाताला वन गाय ,नीलगाय आणि शहामृग अशी विविध प्राणी . काय तर  आखा निसर्ग इथे नांदतो आहे या वनात आनंद वनात .. बाबाच्या वनात . आठवण आली की परत जाण्याची चाहूल लागते .. 

मूकबधिर विद्यालयाची स्थापना ही एक बाबाची स्व्प्न्पुरती त्यामुळे त्यांनी  एका कॊलारू गेस्ट हाऊस मध्ये शाळा सुरु केली. असा इतिहास आहे . विशेष शिक्षिकेची गरज होती मग नखाते साहेबांनी श्रीमती सरोज कठाळे यांचे नाव सुचविले त्यांची शाळेत नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी येणारा कर्ण बधिर मुलांचा वयोगट वेगवेगळा होता. वय वर्ष ८ ते वय वर्ष १६ एकाच वर्गात अशी मुले सांभाळने ही मोठी कसरत होती. सरोजताईंनी प्रायोगिक तत्वावर काही वर्ग रचना केली. पुढे शाळेत कर्णबधीर मुलांची व शिक्षकांची संख्या वाढत गेली.आणि पुढे वटवृक्ष झाला . 

सर्व सामान्यांप्रमाणे या कर्णबधिर  शाळेतही भाषा, वाचा ,गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे विषय शिकविले जातात. कर्णबधिरांच्या अध्यापनातील विशेष गरजा लक्षात घेऊन अध्ययन विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्याचे विविध कौशल्य व साधनांचा वापर केला जातो. 
सर्व शिक्षकांसोबत  विद्यालयातील विशेष शिक्षक  आपल्या वर्गात श्रवण प्रशिक्षण आणि वाचा विकास  यावर भर देताना दिसतात आणि सतत मेहनत घेऊन मुलात भाषा आणि वाचा विकस कसा होइल आकडे त्यांचे ध्यान आणि मनन असते . 

ग्रामीण भागात मुले लवकर शाळेत दाखल होत नाहीत ही खंत आहे . यावर मात करून पुनर्वसन करणे कठीण जाते ,यावर ही या शाळेने मात केलेली दिसून येते .
५ ते ७ या वयोगटातील मुलात भाषा आणि वाचा वाढ करणे हे अवघड कार्ये . मुलांना ,त्यांची वायक्तिक श्रवणयंत्र लावणे ,त्याची काळजी निगा घेणे हे खूप जिकिरीचे असते . वर्गात सामूहिक श्रणवयंत्र ,स्पीच त्रैनर आणि इतर वाचा आणि भाषा आणि वाचा विकासाठी सहायक जे जे हवे त्याची खबरदारी घेणे हे ,निवासी  शाळेचे कौशल्य आहे . याच नसून भररातील निवासी शाळेची ही खूप मोठी अडचण आहे .

एखाद्या व्यक्तीने असे करा तसे करा दोन मिनिटात शाळेत येऊन उपदेश देऊन जाने आणि प्रतेक्ष अश्या मुळसोबत कार्य करणे हा पोर खेळ नाही . इथे आपली सर्वश्व मेहनत ,त्याग पणाला लावावा लागतो तेंव्हा खर्या  अर्थाने या मुलात विकास झाल्याचे दिसून येते . या शाळेत तेच मेहनत करणायचे काम तमाम शाळेतील टिम करीत आहे .  सर्व निरपेक्षतेने विशेष काळजी घेऊन सर्व  विशेष शिक्षक  शिकवितात. अतिशय मेहनत घेण्यांची वृत्ती या शिक्षक वर्गाकडे  आहे. हे मी अवलोकन केले आहे .

आज आनंदवनाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पुनर्वसन... संधीनिकेतन अपंगांची कर्मशाळा येथे अपंगांना व्यवसाय प्रशिक्षण दिल्या जाते. 
आदरणीय डॉ.विकास आमटे सर शाळेच्या प्रगतीला हातभार लावतात आणि शाळा विकासाला प्रथम प्राधान्य देतात . यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. ते स्वतः पाहुण्यांना शाळा दाखवायला घेऊन येत असतं, आणि शाळेचा विकास व प्रगती  आलेख दाखवतात . 

शेवटी ,शिक्षण म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तीला वाट करून देणारी प्रक्रिया आहे असे श्रध्देय बाबा आमटे म्हणतात.. तीच प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी आनंद मूकबधिर विद्यालय, आनंदवन  प्रयत्नशील व कटीबंध आहे......आणि पुढे ही राहील अशी अश्या व्यक्त करतो .
इथे सर्व आठवणी मला व्यक्त किंवा मांडता येणार नाहीत ,पण मी आनंदवन च्या एक आणि एक आठवणी चा साक्षी असून तेथील प्रतेका चा ऋणी आहे . 

दीपक शिव सरांनी फेसबुक वर  आपला लेख लिहला आणि मला आठवणी लिहण्याचा मोह न  झाला नाही हे नवलच . महणून शिव सर ,घोलप सर आणि प्राचार्य हिंगे सर ,व त्यांच्या सर्व विशेष शिक्षकांचा मी ऋणी आहे . 


३० जुलाई २०२०

Monday, July 27, 2020

परिशीलन

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3362065620478340&id=100000248063158

Saturday, July 18, 2020

पुण्य स्मरण :अण्णा भाऊ साठे !

*'तू गुलाम नाहीस तू तर या वास्तव जगाचा निखारा आहेस !’*

‘हि पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे’.  

‘ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है’
....  *कॉ. अण्णा भाऊ साठे* 

माणसाचा जन्म आणि मरण आतील जो काळ असतो तो  तमाम  मानव जातीला इशारा देणारा असतो  . तीच गत या महान लेखकाची झाली होती . अफाट बुद्धिमत्ता लाभलेले व्यक्तिमत्व क्रांतीकारी विचाराने प्रेरित जीवन जगले,कॉ. तुकाराम भाऊराव साठे (अण्णा ). 
---- *प्रा. बालाजी र. शिंदे.* 

वंचिताचे जीवन जगात असताना समाजाला आज उत्तुंग शिखरावर येण्यास जे श्रध्ये अण्णा भाऊ साठे जाते ते त्यांचे उत्तम कार्य होय .अण्णा हे एक मिश्रण ज्यांनी  स्वतंत्र विचारधारा समाजात रुजवली अशी सम्यक विचार प्रणाली  पेरलेले महान कलाकार . प्रतेक्षात सगळ्या “शोषित  समाजाला एकदिशा” देणारे साहित्य त्यांच्या लेखणीतून क्रांतीच्या ठिणग्या घेऊन उतरले होते . 


जन्म जरी अधोरेखित नसला तरी मरण नक्कीच अधोरेखित आहे ,कारण त्यांनी पेरलेली विचार धारा आणि ,पेटवलेली ज्वलंत मने ,ज्याने घाव घालण्याचे आणि जीवन जगत असताना जगात बदल घडवण्याचे धाडस केले . 
आज त्यांचा स्मृति दिवस ! अधोरेखित होतो आहे !!

गोरेगावच्या घरात अण्णा भाऊंचा १८ जुलै १९६९ रोजी मृत्यू झाला होता. जेंव्हा अण्णा भाऊ मरण पावेल त्या समयी कॉ. सत्येंद्र मोरे यांनी वर्तमानपत्रे, ऑल इंडिया रेडिओ, कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांना, शाहीर अमर शेख आणि अभिनव प्रकाशनाच्या वा. वि. भट यांना कळविली. अभिनव प्रकाशनाच्या दुकानावरच प्रगत साहित्य सभेची बैठक असल्याने, तेथे बातमी कळताच भट, बाबूराव बागूल, नारायण सुर्वे, दया पवार, प्र. श्री. नेरुरकर, अर्जुन डांगळे, राजा ढाले, प्रल्हाद चेंदवणकर, राजा राजवाडे, शिवराम देवलकर, वामन होवाळ, डॉ. सदा कऱ्हाडे, कॉ. जी. एल. रेड्डी, ए. के. हंगल.. आदी अनेक मान्यवर आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते अंत्ययात्रेला उपस्थित होते.(लोकसत्ता टिम जुलै २७ ,२०१९ ). 
पारंपरिक धार्मिक मूल्यांना छेद देणारे ऐतिहासिक विधान नोंदवून जगाकडे डोळस वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणार्याव वरील  विधानाप्रमाणे दलित-शोषित कष्टकरी चळवळीसोबत एकनिष्ठेने राहणार्या  लोकशाहीर, साहित्यिक कॉ. अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृति दिवस म्हणून पाळला जातो . 
 अण्णा भाऊ यांचा जन्म मातंग समाजात झाला हे अजून किती वर्ष सांगणार ते बहुजन समाजात बहुजन हिताय बहुजन सुखाय साठी जन्म घेतले मानव  . जात नको नको म्हणणारे जातीचे पोवाडे आणि वाभाडे गाण्या सारखे आहे का ? येवढ्या महान कलाकाराला एका  जातीती गुंतून ठेवणे हे माझ्या सारख्या विचारवंत ,समीक्षक माणसाला परवडणारे  नाही ? महाराष्ट्रातील उपेक्षित समाजात आणि त्यात फाशीपारधी नंतर गुन्हेगार म्हणून सरकारने शिक्का मारलेला समिश्र समाजात ,उपेक्षित वर्गात यांचा जन्म.
अशी ज्या समाजाची अवस्था तिथे  त्या समाजातील गुणवंत शांतिप्रिय  अण्णा नावाचा जन्म घेतो आणि तो माणूस  जगविख्यात साहित्यिक होऊन जातो हे अभिमनाची बाब आहे . जगातला एकमेव माणूस ज्याने साहित्यात आपली सीमापार करून रशियात जाऊन आपले विचार मांडले  .ते धाडस त्या शूर वीराचे .  अण्णा भाऊ यांनी आपले भविष्य स्वतः लिहिले आणि ते खरे करून दाखवले.स्वतः खडतर जीवन जगत शेवटी बुद्ध मार्गी गेले .

कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय असताना अण्णा भाऊंची आर्थिक स्थिती जरूर हलाखीची होती; परंतु संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर अण्णा भाऊ हे नामवंत शाहीर-कलावंत म्हणून पुढे आले होते. हे सर्व श्रुत आहे . या प्रस्थापित ,अफाट जगाच्या खुल्या आणि जीवंत विश्वात  शिकत असताना काही सिद्धांत त्यांनी स्व:ताच तयार करून  समजून घेतले होते .स्व:तचे सिधांत त्यांनी  अंगिकारले होते आणि . त्या सिद्धांत जगले. महामानव बोधिसत्व डॉ. बाबसाहेब आंबेडकर  यांच्या लेखणीस प्रेरित होऊन स्वतःला विसरून मानवतेसाठी जगणे हे  खरे जगणे  आहे जीवन आहे याची त्यांना उकल झाली होती  . मानवतेसाठी जगायचे मानवतेसाठी मारायचे हे त्यांच्या तेंव्हा ध्यानात आले होते. म्हणून या  माध्यमातून मानवतेची सेवा करायची. हाच कित्ता त्यांनी पुढे रेटून धरला आणि तसे जगले . कारण मानवता ही कोणत्यही जातीची किंवा धर्माच्या  मालकीची नाही.  हे अण्णा जाणून होते . हा जगण्याचा वैचारिक वारसा मनात ठेऊन जगले . 

आणा पुढे श्रमिकांच्या लढ्यात सहभागी झाले.  श्रमिकांचे नेतृत्व करू लागले. या लढ्यात त्यांचे मन पुढे रमत गेले आणि ते श्रमिक ,कामगार कष्टकरी ,मजदूर  यांचे कैवारी झाले . मुंबई सारख्या  रस्त्यावरची लढाई  त्यांनी लढली , येवढेच नसून  रंगमंचावर ही लढाई जिंकून राहिले . यात लढाईत  तमाशा या कलेचा वापर त्यांनी लोकहित ,जंनजागृती आणि लोकजागृतीसाठी भरपूर प्रमाणात केला.

अण्णा त्या कलेत पारंगत होते आणि लढवये होते महणून त्यांची मैना (मुंबई ) गावावर (महाराष्ट्रात ) राहिली . त्यांची ही  छ्क्कड जगभर गाजली . संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णा ने गायलेली छक्कड संयुक्त लढ्यात सार्थक झाली . आणा अमर झाले . अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्य आणि अनेक सामाजिक विषयात  त्यांनी लीलया पाहावयास मिळते ,यात त्यांनी  शोषित आणि  गरीबांचे जीवन चितारले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामात लढणा-या वीरांच्या वीरकथा लिहिल्या. येवढायवर न थांबता भटके- विमुक्त यांचेही जीवन दर्शविले चितरले होते . तुरुंगातील अपराध्यांचे  जग सांगितले यात लावणी, पोवाडा, गीते , नाटक, तमाशा , वगनाट्य  किती -किती विविध प्रकार. सर्व सहज हाताळले.कधी न्हवे येवढे साहित्ये एका अशिक्षित चतुर्थ वर्गातील भल्या माणसाने जगापुढे आपल्या उमद्या लेखणीतून विशद करून गेले आहे . 

अण्णा भाऊंनी कथांसोबत ३०  पेक्षा अधिक कादंबर्याथही लिहिल्या. त्यातील ‘फकिरा’, ‘वारणेच्या खोर्याभत’, ‘वैजयंता’, ‘माकडीचा माळ’, ‘चित्रा’, ‘चिखलातील कमळ’, ‘गुलाम’, ‘वारणेचा वाघ’, ‘आवडी’, ‘वैर’, ‘फुलपांखरू’, ‘अलगूज’, ‘रानबोका’, ‘मूर्ती’, ‘संघर्ष’, ‘चंदन’ आदी कादंबर्याा खूप गाजल्या. त्यापैकी सात कादंबर्यांअवर चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ सारख्या कादंबरीला १९६१ साली राज्यशासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला.

तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही या कादंबरीची प्रसतावना लिहिली व कादंबरीचे कौतुक केले होते . अण्णा भाऊंनी ‘फकिरा’ कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे.आणि पुढे अण्णा  वद्ले “जग बदल घालूणी घाव सांगून गेले मज भीमराव ”.... 

फकिरा  कादंबरीत भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना व दलितांना वाटप करणार्याे मांग समाजातील ‘फकिरा’ या लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वारणेच्या खोर्याूत’ या कादंबरीत १९४२  च्या चले जावच्या स्वातंत्र्यलढ्याचे व स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणार्यांंचे चित्रण आहे. तर ‘वारणेचा वाघ’ या कादंबरीत सावकार-जमीनदार व ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या शोषणाविरुद्ध लढा पुकारणार्या२ ‘सत्तू भोसलेचे’ प्रत्यकारी चित्रण  अण्णा ने खूप प्रभावशाली केलेलं आहे. 

अण्णाभाऊंनी महात्मा जोतिराव फुल्यांच्या सत्यशोधकी जलसा व प पू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील आंबेडकरी जलसाची जनप्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या तमाशा-लोकनाट्यातून पुढे नेली.या दोन महान नेत्यांचा संगम आपल्या साहित्यातून प्रखरपणे मांडला  आहे .अण्णा भाऊ हे  मराठी व भारतीय साहित्य-संस्कृतीच्या उच्चभ्रू पांढरपेशीय कक्षा रुंदावन्यात येशस्वी झाले .जगात याचा परिणाम असा झाला की  अण्णा भाऊंचे साहित्य इंग्रजी व हिंदी, रशियन, फ्रेंच, आणि झेक आदी जागतिक भाषांतही अनुवादीत झाले.आणि जगात त्यांच्या साहित्याला झळाळी मिळाली . 

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक व दलित साहित्याचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी अण्णाभाऊंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्याशी केली आणि अण्णाभाऊंचा ‘महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की’ असा गौरव केला.

या अफाट लिहलेल्या साहित्याच्या जोरावर त्यांचेवर  अण्णा भाऊ साठे कोण ? आणि  यांच्या साहित्यावर मातबर साहितीक मंडळी ग्रंथ लिहू लागले. हा  निरक्षर माणूस साहित्याचा आधारवाड आज १८ जुलै ला आजरामर झाला . 

*त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!*

Friday, July 10, 2020

प्रज्ञा आणि आचरण

*प्रज्ञा आणि आचरण*

बुद्ध तत्वप्रणालीत *दान आणि शिल* या  पाठोपाठ  *प्रज्ञा आणि आचरण* यास  तेवढेच महत्व आहे . 

*प्रा. बा र शिंदे ,नेरूळ नवी मुंबई -७०६*

=========

(संदर्भ  - विनय -पिटक :अनुवाद -राहुल संकृत्यायन ,बुध्दाब्द १६३५ ई.)



बौद्ध धम्माची आचरण आणि प्रज्ञा  हे दोन अंग आपणास मतंगाची (हत्ती ) बळे देतात .ते कसे पहा . 

आचरण हा असा दागिना आहे ,ज्याच्याकडे आहे तो सोनं आहे .या आचारणास जो घाबरतो तो बुद्ध धम्मा चा अनुयायी अथवा प्रसारक किंवा रक्षिता होऊ शकत नाही . म्हणून बहुजन वर्गातील बर्‍याच जाती किती तरी कोसो दूर असल्याचे  हे भयावह आहे . 

 आज बुद्ध धर्माचे अंग होऊ शकले  नाहीत त्याचे आंतरिक बरीच कारणे आहेत ते मी इथे विषद करणार नाही .  .आचरण हे वयक्तिक बाब असून ती प्रतेक व्यक्ति तसे करू शकेल असे म्हणता येईल . 

आचरण   हे प्रज्ञा न असलेले व्यक्ती पण पालन करू शकते .आचरण शुद्ध नसेल तर त्या व्यक्ती ची विद्या ,विकास आणि त्याने संपादन केलेली त्याच्या  विकासाची संकल्पना शून्य आहे .

उदा. एखाद व्यक्ती डॉक्टर ,अभियंता आणि प्राध्यापक होणं ही त्याच्या विकासासाठी एक बाल  कल्पना आहे .किंवा त्या व्यक्तीची तशी आणि तेवढीच धारणा असते . *मी आणि माझी* . या पलियाकडे त्यास  जग दिसत नाही याचाच अर्थ त्या व्यक्तीची प्रज्ञा अजून तरी विकसित झाली नाही असेच म्हणावे लागेल . ज्या व्यक्तीत ही प्रज्ञा जागृत झालेली असते त्यात चेतना वास करीत असते ,थोडक्यात ती वैज्ञानिक अंगाने पाहत असते ,आणि इतर समाज वर्गास त्या चेतनामय वाटेवर घेऊन जात असते .  

माझ्याच घरचे उदाहरण देतो एक काका स्त्रीरोग तज्ञा आहेत ,त्यांची उन्नती झाली विकास झाला . पण त्यांची प्रज्ञा जागृत झाली नाही . ,ते पुरोहित आणि देव धर्म करीत देशभर एकटेच फिरले पण त्यांच्या मनात चेतना जागृत झाली नाही ,म्हणजेच प्रज्ञावंत होता आले नाही . ?
 ते डॉ बाबासाहेब यांना  मानणाऱ्या पैकी आहेत .पण त्यांनी सांगितलेल्या *पथ मार्ग* त्यांना जमला नाही ,याचाच अर्थ हयात गेली पण त्यांची  प्रज्ञा जागृत नाही झाली . 


दुसरे काका कमी शिक्षित त्यांच्यात वेळीच प्रज्ञा जागृत झाली , शुध्द आचरण रहित वागू लागले . पुरोहित आणि देव धर्म करीत बसले नाहीत . समाजात राहून समाजाचे अंग होऊन ,बुद्ध देशना देते झाले . डॉ बाबासाहेब यांच्या पथमार्गावर राहिले . यांच्यात त्यांनी स्व चेतना जागृत केली , मनात चेतना जागृत झाली  ,म्हणजेच प्रज्ञावंत आले असेच म्हणावे लागेल . 

ते आजून पंच शीलाचे पालन करतात .ते पुरोहित आणि देव धर्म यापासून कोसो दूर आहेत .म्हणून आज कमी शिकलेले  काका  माझ्यासाठी आदर्श ठरतात ,असे  कमी शिकलेली व्यक्ति आज समाजात  आदर्श आहेत .

उच्च शिक्षण घेऊन प्रज्ञा जागृत होते असे कोणी म्हणत असेल तर ते खोटं आहे . शिक्षणा शिवाय प्रज्ञा जागृत होण्यास त्या व्यक्तीस शुद्ध आचरण आणि कमीत कमी पंचशीलाची जोड असावी लागते .

पंचशील आणी त्याचे पालन न जमत नसल्याने बरीच  विद्वान समजणारी विद्यमान मंडळी ,लोकांना नांवे ठेवत .बुद्धाने सांगितलेल्या शिलापासून कोसो दूर आहेत .हा संशोधन आणि चिंतांनाचा विषय आहे .

प्रज्ञा जागृत होण्याची क्षमता, चारित्र्य आणि पावित्र्य लागते त्यास मनाची तयारी लागते ,त्यास अवलोकन आणि आपले आचरण जोडीला असणं गरजेचं आहे .

शुद्ध आचरणात असल्याने काय फायदा असतो ?

लोक आपणास आदर्श व्यक्ती म्हणून पाहतात ,तुमच्या शिक्षणाला इथे गौण स्थान आहे ./असते .
जनात मान सन्मान मिळतो ,यामुळे आपण आपली सतत ची प्रज्ञा जागृत करण्यास आणि ती इतरांना देण्यास मनाने शुद्ध असतो .

झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत जे आपले इतर व्यक्ती प्रति आचरण असते तेच स्वतः प्रति असणे होय .
पत्नी ,आई वडील यांचा मानसन्मान ,मुलांचे नीट संगोपन आणि त्यांच्या सोबत आपला व्यवहार हा कसा असावा तर शुद्ध ! हाच बुद्ध देशना आणि  आचरणाचा गाभा आहे .

जो घरी शुद्ध आचरण करतो तो ,मित्र ,सोबती, कार्यालय आणि समाज या घटकसोबत ही तेच आचरण  करीत असतो. अशीच व्यक्ति  समाज हित करण्यास लायक असतो .स्वहिता पासून दूर राहते . 
स्वहित  पाहणारा समाज हीत कधीच करू शकत नाही ,कारण त्याच्या आचरणात खोट असते .तो समाजाला उलट खाईत घेऊन जात असतो . स्वतचे घर बघत समाजाच्या नावावर सरे आम लूट करीत असतो . समाज शिकावा ,सामाजिक ,आर्थिक प्रबळ व्हावा असे त्याला कधी वाटत नाही . कारण तो येवढा षंढ असतो की ,त्याचे आचरण हे समाजाला अधोगती कडे घेऊन जाणारे असते . अश्या खोट्या व्यक्ति ,नेता ,पुढारी ,आणि समाज सुधारक यापासून सावध असायला पाहिजे . 

प्रज्ञा म्हणजेच चेतना !

ही मानव कल्याण आणि विकास यातील अंतिम बाब आहे .
वर नमूद केल्या प्रमाणे आपली प्रज्ञा जागृत झाली आहे हे कसे ओळखाल ?

बुद्धाने प्रज्ञावंत व्यक्तीच्या तीन कसोट्या सांगितल्या आहेत .

हा तीन कसोटीत ...(पाराजीक १-४)

१.मैथुन : जो नियम जाणून ,कायद्यास नियम पालन करून ही ,त्यास  न जाणता त्याचे पालन करीत नाही ,सतत त्या आचरणात आणत असतो ,तेंव्हा त्याचे आचरण शुद्ध नसते .

२.चोरी : जी वस्तू आपली नसता ,ती आपली असण्याचे मान्य करतो ती चोरी समजावी .असा त्या व्यक्तीचा आचरणाचा भाग अमान्य असतो .

३.मनुष्य हत्या : एखादी गोस्ट माहीत असताना, त्या व्यक्तीस हत्या करण्यास मदत करतो,हत्यार उपलब्ध करून देतो ,किंवा त्यास मारण्यास प्रेरित करतो ,एकंदरीत मारणे आणि मारण्यात साह्य करतो ते त्याचे अशुद्ध आचरण होय .अशी व्यक्ति  समाजात कार्य करण्यास योग्य नसते .

४.दिव्यशक्ती दावा : जो नवविद्या ,दिव्य- शक्ती जाणतो असे वर्तन करतो  ,आणि असे मी जाणतो ,मी ज्ञानी आहे माझ्याकडे या ,असे वर्तन करणारा ,समाज विशुद्धी कडे घेऊन जाऊ शकत नाही.

आचरण डगमगले की बोट बुडाली म्हणून समजा .कीर्ती ,संपत्ती ,राज्य बुडाले तरी चालेल पण आचरण कधी अशुद्ध होऊ देऊ नये .
ते परत मिळवता येत नाही .प्रज्ञावंत कधी या उपरोक्त भौतिक वस्तूत आपले आचरण गहाण ठेऊन माया जपत नसतो . त्यास सतत सदोदित आपल्या आचारणाची काळजी असते .या मुळे तो आपले आणि समाज हीत रक्षित असतो .असा जर कोणी शुद्ध आचरण करणारा ,इतरांच्या मानवी मनात चेतना जागृत करणारा ,आपली  प्रज्ञा जागृत ठेऊन कार्ये करणारा नेता ,पुढारी असेल तर त्यास  आम्ही आमचा नेता म्हणू  ,आणि आदराने त्यास  बाबा ,अण्णा ,दादा ,आपा म्हणू . 

आज असा समाजात  धुरीण नेता असेल तर त्याचे समाज स्वागत करेल .असा असेल तर कळवा !

Thursday, July 9, 2020

का रे राजगृही ?

का रे राजगृही ?

का रे राजगृही ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतायेत 
केवळ तुजसाठी ….

का रे राजगृही ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतोय 
केवळ तुजसाठी …..
अजून बाबा दिसतात मला त्या शय्येवर
त्या आराम खुर्चीवर
अहोरात्र ,वीस वर्षे नसून ,वर्षो वर्षी .

का रे राजगृही ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचटायत
केवळ तुजसाठी …..
त्या वृक्षाखाली ,त्या कुंडीपाशी !

का रे राजगृही ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतायेत
केवळ तुजसाठी …..
त्या तावदाने समीप ,त्या रक्षे साक्षी .
शुभ्रवस्त्रे घालुनी प्रज्ञावंत तो बुद्धसाक्षी .

का रे राजगृही ?
अजून कवी बी. आर.पुसीतो तुजला  ,का रे रांडेच्या ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतायेत
केवळ तुजसाठी …..
प्रत्यक्ष बाळ पाहतोय त्या पुस्तकातूनी
म्हणून  बांधला 'राजगृह' केवळ त्या
ग्रंथापोटी ….
त्या ग्रंथापोटी ….

का रे राजगृही ?
आणि याद राख...
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतायेत
केवळ तुजसाठी …..
आजही पदोपदी  जिवंत मन तयाचे ग्रंथ न्याहळाती 
त्या 'राजगृही' रक्षेरूपी
केवळ तुझसाठी 
केवळ तुझसाठी ,तुझं रक्षणासाठी ?

९ जुलै २०२० |०३.१० (हर्स)

कवी | बी.आर.शिंदे | ९७०२१५८५६४

राजगृह - दादर ,मुंबई 


क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (लसाकम ) !

प्रेस न्यज

गुरुवार ०९ /०७/२०२०

क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (लसाकम ) या सामाजिक संघटनेच्या राज्येकार्यकारणीचा विस्तार नुकताच जाहीर करण्यात आला . या झालेल्या बैठकीत लसाकम कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला असून यात  नवीन प्रदेश कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे . या लाईव बैठकीत लसाकम चे संस्थापक मा. नर्सिंग घोडके यांची प्रमुख उपास्तिथी होती .

प्रा. बालाजी शिंदे ,हे कर्णबधिरांचे विशेष शिक्षण  या क्षेत्रात गेली पंचवीस वर्ष कार्यरत असून ,सध्या ते विस्तार सेवा विभाग ,अली यावर जंग राष्ट्रीय वाचा आणि श्रवण दिव्यांगजन संस्था (भारत सरकार ,नवी दिल्ली ) मुंबई  येथे कार्यरत आहेत . शाहू –फुले आंबेडकरी विचरांची धुरा शिरावर घेऊन कवि ,लेखक कथाकार अश्या  विविध अंगाने नटलेले व्यक्तिमत्व लसकामला लाभले आहे .

प्रा. बालाजी शिंदे हे आणा भाऊ साठे नगर हाळी ता उदगीर येथील मूळ रहिवाशी असून ,सध्या नेरूळ नवी मुंबई येथे वास्तव्यात आहेत .

या कार्यकारिणीत प्रा. बालाजी शिंदे ,यांची ठाणे – सचिव या पदी नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांच्या पुढील कार्यास तमाम मातंग समाजातर्फे हार्दिक शुभ कामना . लसाकम प्रदेश कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.

 1) बालाजी थोटवे , नांदेड - प्रदेशाध्यक्ष

2) राजकुमार नामवाड , लातूर -  महासचिव.

3) प्रा सोमनाथ कदम , कणकवली - कार्याध्यक्ष

4) मनोहर डाकरे , निलंगा  - उपाध्यक्ष

5) ललित अंभोरे , अकोला  - उपाध्यक्ष

6) विलास मानवतकर , बुलढाणा - उपाध्यक्ष

7) पी एल दाडेराव , मुखेड - कोषाध्यक्ष

8) प्रा डॉ.  मारोती कसाब , उदगीर - प्रवक्ता

9) अरूण कांबळे , औरंगाबाद - प्रवक्ता

10) प्रा.  डॉ.  नरेंद्र गायकवाड , कराड - सचिव

11) इंजि. मनियार , औरंगाबाद - सचिव

12)प्रा. बालाजी र. शिंदे , ठाणे - सचिव

दुसरा प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार व विभाग कार्यकारिणीची घोषणा लवकरच करण्यात येईल.

असे प्रदेश आधेक्ष यांनी कळवले आहे .

 

प्रा.बालाजी र. शिंदे ,नेरूळ -७०६

Mobile : 9702158564

balajishinde65@gmail.com


प्रा. बा र शिंदे 


Saturday, June 27, 2020

राजर्षी : राजा शाहू महाराज

राजर्षी : राजा शाहू महाराज

हिरे ,माणके ,सोने उधळा ,जयजयकार करा

जय राजर्षी,शाहूराजा ,तुजला हा मुजरा !


-सूर्यकांत खांडेकर  

शाहू तेरा मिशन अधुरा बी एस पी करेगी पुरा –कांशीराम

(कोल्हापूर येथे एतीहासिक आरक्षण चळवळ शताब्दी महोत्सव छ.राजर्षी शाहू महाराज जयंती समारोह .)

हिंदुस्तान च्या प्राचीन इतिहासात विश्वमित्र व जनक या दोघांना ‘राजर्षी’ महणून गौरविले गेले होते . त्यानंतर त्या मालिकेत ‘राजर्षी’ ही पदवी विभूषीत करणारे करविर (कोल्हापूर ) संस्थान चे अधिपति शाहू महराज हे होत . कागल चे अधिपति जयशिंगराव उर्फ आबासाहेब यांचे यशवंतराव उर्फ शाहू महराज हे पुत्र.

आखील भारतीय बहिष्कृत समाजाची परिषद नागपुर येथे ३० व ३१ मे  आणि १ जून या प्रमाणे तीन दिवस श्रीमहाराज राजर्षी  शाहू छत्रपती ,सरकार करविर यांच्या आदधेक्षेतखाली मोठ्या थाटात पार पडली . 

एकूण १४ ठराव पास झाले त्यात ठराव  ६ वा ठराव  – प्राथमिक शिक्षण मुलांना आणि मुलींना मोफत व सक्तीचे शक्य तितक्या लवकर सुरू करावे असा होता . 

यामुळे सक्तीच्या शिक्षणाचा फायदा  तोपर्येंत  पास झाला न्हवता  तोपर्यंत हे वरिष्ठ  वर्गाचे लोक सरकारला नावे ठेवीत होते ,परंतु १९१७ साली हा कायदा मुंबई इलाख्यात पास झाला आणि सकतीचे शिक्षण सुरू झाले.
 (मुकनायक मुंबई ,शनिवार १५ जून १९२०). 

मागास जातीचा विकास करण्यासाठी तळमळ नेहमी असे . त्या समाजाला नैसर्गिक हक्काची जाणीव निर्माण करून देण्यासाठी पहिले धाडशी पाऊल उचलले आणि याचे परिणाम कोल्हापुरात न्हवे तर अखिल महाराष्ट्रात ब्राह्मण वर्गात खळबळ उडाली . याच काळात महाराजांनी बहुजनसाठी अनेक उपक्रम राबवले.
 
राखीव जागांचा जाहीरनामा
अस्पृश्यता – निवारण कार्ये आणि इतर कार्य अलौकिक आहेत.
 
महाराजांचे शैक्षणिक कार्य –

मा. फुले यांनी मागासलेल्या दिनदलित अश्या बहुजन समाजाला शिक्षणाची संजीवनी दिली आणि समाजक्रांतीचा आरंभ केला . तोच समजक्रांतीचा वारसा  सांगितलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी चालू ठेवला . बहुजन समाज शहाणा कारायचा असेल तर शिक्षणाची गंगोत्रि खेड्यापाडतील गोरगरिबांच्या झोपडपट्टीत गेली पाहिजे . समाज शिक्षित झाल्याशिवाय चांगले काय आणि वाईट काय हे उमजणार नाही शिक्षण दिल्यानेच बहुजन समजाचा सर्वकष उत्कृष्ठ होईल व त्यातून उत्तम शेतकरी ,शिक्षक दिल्यानेच बहुजन उत्तम व्यापारी ,उत्तम सैनिक निर्माण होतील परिणाम सर्व समाज संपन्न होईल. 
आपल्या राज्यातील प्रजाजनास किमान प्राथमिक शिक्षण तरी मिळाले पाहिजे या एकाच ध्यासातून महाराजा राजर्षी यांनीआपल्या राज्यात ८ सप्टेंबर १९१७ रोजी मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा जारी केला . एक स्वातंत्र खाते जारी करून ते स्वतः देखरेख करू लागले यात ‘एड्युकेशन डायरेक्टर ’आणि ‘एड्युकेशन इसन्पेकटर’ या अधिकाऱ्याची  नेमणूक केली . जिथे जागा मिळेल तेथे शाळा सुरू केल्या ,समाजातील संपूर्ण वर्गाला या कार्यक्रमात सहभागी केले  . जे लोक आपली मूल शाळेत पाठवत नाहीत त्यांचेवर दंड बसवला आणि तसे कायदे केले  . तीन दिवसाच्या आत मुलांना शाळेत नाही पाठवले तर दंड वसुलीचा कडक कायदा केला . अगदी खालच्या घटकास शिक्षण मिळावे महणून महाराजांनी अविरत प्रयत्न चालवले .त्या काळी शिक्षणासाठी दरवर्षी १ लाख रुपये खर्च करीत होते . इंग्रज सरकार मात्र महाराष्ट्र ,गुजरात आणि सिंध या अफाट प्रसदेशाच्या मुंबई इलाख्यासाठी शिक्षणाचा १ लाख रुपयेही खर्च करीत नव्हते ,हे ध्यानात घेतले की तुलनात्मक दृष्ट्या महाराजचे शिक्षणावरील महत्व लक्ष्यात येते . 
खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून महाराजांनी  कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.ज्या आज त्याची फळे चाखत आहेत . 
वसतिगृह हे त्यांचेच नाव जनक म्हणून पुढे येते ,प्रतेक मूल शिकावे म्हणून अनेक वस्तीगुह काढली . अनेक बोर्डिंग ची स्थापना केली ,जातीस शहाणे केले . विविध जातीची एकूण २१ वस्तीगुह स्थापन केली होती . असे वस्तीगुह काढणारे कोल्हापूर हे देशातील पहिले शहर होते . म्हणून कोल्हापूर हे “Mother of Boarding House”  बनल्याचा सार्थ अभिमान महाराजांना वाटत होता . 
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.
याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.
स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले.
खास स्त्री शिक्षिका तयार करण्यासाठी ‘female Training School’ वर रखमाबाई केळकर या नेटीव्ह स्त्रीस शिक्षण अधिकारी महणून नियुक्त केले होते . शाळेत आलेल्या मुलींना बक्षिश योजना जारी केली . पहिल्या दुसऱ्या येणाऱ्या मुलीस आपली कन्या आककासाहेब महाराज व भावनगरच्या महाराणी ‘नंदकूंवर’ यांचे नावे परितोषिक ही जाहीर केले . 
स्त्री हक्कांचेही रक्षण केले 
स्त्रियांच्या शिक्षण प्रसारा प्रमाणे त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी व त्यांचेवर होणार्याक अन्याय ,अत्याचार निवारणासाठी विशेष प्रएत्न केल्याचे दिसून येते . 

१९१७ सालचा विधवा –पुनर्विवाह कायदा ,१९१९ चा अंतरजातीय – विवाह कायदा . बालविवाह विरोध ,अशी अनेक कायदे केले .असा राजा आज होणे नाही . 

प्रा.बालाजी रघुनाथराव शिंदे
नेरूळ ,नवी मुंबई -७०६ 

संधर्भ –
समाजक्रांतिकारक राजर्षी शाहू छत्रपती – सौ वसुधा ज पवार ,म.इतिहास प्रबोधिनी ,कोल्हापूर .

बहुजन नायक ,रविवार ४ ते ११ अगस्त २००३ ,संपादक कांशीराम .

प्रबुद्ध भारत ,साप्ताहिक बहुजन । हिताय बहुजन सुखाय । 

मुंबई ,शनिवार ता २८ जुलै १९५६ – अंक २३ वा .

बहिष्कृत भारत आणि मुकनायक ,मुंबई ,शनिवार १५ जून १९२० ,२००८ म शा चरित्र साधने प्रकाशन समिति .

राजर्षी शाहू गौरव ग्रंथ ,२०१६ प्रकाशक म. रा.शि. विभाग सचिवालय ,मुंबई.


#डिप्रेशन.

एक लव्ह Matter
सहा वर्षी पूर्वीची गोस्ट आहे ..( आप बिती).

एक माझा मानलेला भाचा डॉ. आहे ,त्याची ही बिती बात आहे....
१९९८ ला मी लातूर सोडले .उच्च शिक्षणासाठी मुंबई चा रस्ता धरला.
एके दिवशी अचानक समोरून आवाज आला ,मामा मी डॉ ...बोलताय .
मी अवाक झालो ,किती वर्षाने मला तिकडून फोन आला होता.
मला आनंद झाला त्यास खुशालीचा वर्तमान विचारला ..
तो क्षणभर न थांबता लगेच मुख्य विषयांवर आला ...त्याच्या मनात खूप गोंधळ जाणवला .
मामा माझे एका मुली सोबत ऑनलाइन अफैर झाले आहे ,मी काय करू ...? तुम्ही मला मार्ग दाखवा.
घाबरला होता .मी धीर दिला आणि त्याला बोलतं केलं ..
मी नेरुळ ला आणि तो लातूर ला .पूर्वी चार स्थळ येऊन गेली आणि कांही जमले नाहो करण काय तर त्याच्या घरा शेजारी ' किन्नराची घरं' .
यनारे स्थळं मुलगी देण्यास घाबरत होती , शेवटी कुठे ही स्थळ जमले नाहीच ..कदाचित ही शेवटची संधी असावी .असे त्याला वाटत होते ..?
मुलगी नवी मुंबईत ,वडील बँकेत चतुर्थ कर्मचारी .
चार दिवसाने परत कॉल आला मामा मला त्याच मुलीसोबत लग्न करायचे आहे .जर हे लग्न नाही जमले तर मी आत्महत्या करून मरून जाईन ..प्रकरण गंभीर होत .
आणि तो पुर्णतः डिप्रेशन मध्ये गेला होता ..?
तुम्ही हे करू शकता .मग रोज कॉल आणि व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्क सुरू झाला तो सोयरीक होई पर्यंत.
त्याच्या एकंदरीत फोन कॉल वरून मी अंदाज लावला आणि वेळीच त्यास सतर्क केले .त्याच मुलीसोबत लग्न करून देण्याचे वाचन दिले ...आणि पुढील पर्याय दिला.
मी त्यास धीर दिला असे नको करू आपण मार्ग काढू .तू आई बाबा ना घेऊन ये ,मुंबई ला .
मुलीच्या घरून मला कॉल आला ,मुलाचे घर पाहण्याचा बेत ठरला मी ,मुलीची आई आणि बाबा सेकंड क्लासच्या ट्रेन ने लातूरला गेलो .स्थळ बघुन झाले .मला ते घर नवीन न्हवते ..त्यांना मुंबई ला येण्याचे आमंत्रण देऊन आलो.
तो दिवस आला ,आई बाबा आणि तो माझ्या घरी आले .औपचारिक चर्चा ,चहा घेतल्यावर नंतर आम्ही सर्व मुलीच्या घरी गेलो .ओळखी झाल्या आणि सोयरीक लातूरला ला करण्याचे ठरले .डॉक्टर च्या जीवात जीव आला ..
जुमला जमला लग्नाची तारीख ही निघाली .मी उदगीर ला लग्नाला गेलो ,लग्न छान झाले ...
मी परत घरी ,मुंबई ला आलो .नंतर कधी त्या डॉक्टर ने मला 'मामा' म्हणून कधी विचारले नाही ,की व्हाटसप केला नाही ...आज सहा वर्षे पूर्ण झाली म्हणून आठवण आली .
व्यक्ती ओळख वेळीच करता नाही आली की आपण फसतो. म्हणून व्यक्ती ओळखून मदत करावी .
आज असे वाटते की तो डिप्रेशन मध्ये मुळीच न्हवता .तो नाटक होता ,डाव जिंकण्याचा ! कायम !

Wednesday, June 17, 2020

मले भी माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !

मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !

======== प्रा.बा. र. शिंदे==

मालकाचे शेत राखतो 
वर्षभर घरगडी म्हणून चोवीस तास तिकडेच असतो मी भौ 
माझी माय आणि  परडी एक अतूट नाते 
एकुलती एक बहीण मुरळी हाय  भौ 
आत्या आराधीन हाय अन मामी ने जटा ठेवल्यात भौ
मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ 
                                           मामा हलगी वाजवतो आणि मामे भौ सनई 
                                           गणू काका डफड वाजतो भ
                                           छोटा भौ पोतराज आणि बाप दोरखंड पिळतो 
                                           मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !
 एकच भावकीची मैना सांगते एका 
भीमाच्या गोस्टी ,म्हन्ती हीच काय एकता 
चल ग आपुन रानात खुरपाय जाऊ 
शाळा शिकून काय फायदाच नाही
मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !

वाघ्या बी आम्ही मुरळी बी आम्ही 

  हलग्या भी आम्ही जोगणी बी आम्ही 

  मोलकरीण अन देवदासी  बी आमी 

      येवढे शिक्षण घेऊन ज्ञानी का नाही झाले आमी 

      मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !

आता तरी सोडा हे ,मार्ग धरा शिक्षणाचा 
सोडून द्या नाद त्या पुरोहीताचा 
चला लागा समतेच्या धम्म मार्गी 
होईल इकास तुमच्या  जीवनाचा 
मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !

परत नाही येणार कोणी क्रांति भीमबाबा 

घडव जीवन तुझे आणि जा त्या मार्गा

अन  प्रभू तो मानवा 

मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !


मांसाहारी माणसं.

कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...