About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Sunday, July 7, 2024

हिंदू कोड बिल


डॉ. भीमराव आंबेडकर यांनी ५ फेब्रुवारी १९५१ रोजी हिंदू कोड बिल संसदेत मांडले.


भारत देशात स्त्रियांचा आवाज नेहमीच दडपला गेला होता आणि हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) त्यांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते. भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी पहिले कायदामंत्री डॉ.आंबेडकर यांना हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ.आंबेडकरांनी स्वतःसह आपल्या अध्यक्ष म्हणून एक समिती स्थापन केली. ज्यात सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. १९४७ स्वातंत्र्य पूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यास समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्या अगोदर हिंदू जनजागृतीच्या नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरु केली.


बाबासाहेबांनी १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले. हिंदू कोड बिल संसदेत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. 


भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामा प्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य असलेले मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला जोरदार विरोध केला. 


आंबेडकरांनी स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले होते. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे :


१) जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत.

२) मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार

३) पोटगी

४) विवाह

५) घटस्फोट

६) दत्तकविधान

७) अज्ञानत्व व पालकत्व


हे सातही विषय स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. भारतीय संविधान सभेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल, अशी घोषणा करून स्वातंत्र्य व समता या तत्त्वांचा अंगीकार केलेला होता. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला.


या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी प्रचंड विरोध केला. "सुधारणेच्या युगात स्त्रियांना समान हक्क द्यायला तुम्ही विरोध का करत आहात? असा सवाल डॉ.आंबेडकरांनी प्रतिगामी विरोधकांना २० सप्टेंबर १९५१ रोजी केला. 


हिंदू कोड बिल संमत व्हावे म्हणून बाबासाहेब एकटेच लढले. पण सत्र संपताना या बिलाची केवळ ४ कलमेच मंजूर झाली होती. कायद्याचे स्वरूप बदलून सती प्रतिबंधक कायदा व हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा असे तुटपुंजे झाले, यास्तव दु:खीकष्टी होऊन राजीनामा देण्याचे ठरवले परतू नेहरूंनी त्यांना धीर धरा असा सल्ला दिला. डॉ.आंबेडकरांनी २७ सप्टेंबर १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात हिंदू कोड बिलाचा खून झाला अशी बातमी आली होती.


पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे म्हणजे,


* हिंदू विवाह कायदा

* हिंदू वारसा हक्क कायदा

* हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा

* हिंदू दत्तक व पोटगी कायदा


हे कायदे मंजूर होणे म्हणजे कायद्याच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, 


“समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”


संदर्भ : विकिपीडिया

                प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई - ७०६ 

 अपील  

मी प्रा. बी.  आर.  शिंदे ,(विशेष शिक्षा कर्णबधिर विभाग ,भारत सरकार ) सध्या सामाजिक कार्यासाठी लेखन स्वरूपात  स्वताला समर्पित केले आहे . पूर्वी कर्णबधिर  सरकारी क्षेत्रात  कार्यरत होतो . तिथे पण मी ३१ वर्ष सेवा केली आहे . शेवटी आपले घर आपला  समाज ,हयाचे ऋण देणे असते , ते मी करीत आहे .आपले हे हेच कर्तव्य असायला हवे .  समाज कार्य करण्यास नक्कीच अर्थसहाय्य करावे .  हयाच  मूळ कारणाने समाज आज तळा गाळात आहे .राष्ट्रपिता  महात्मा फुले यांनी सांगितल्या प्रमाणे ' अर्था विना शूद्र खचले ' माझ्या  सारख्या अनेक धुरीण व्यक्तीने मोठया कसोसिने समाजात विविध पदावर राहून ,वेगवेगळ्या क्षत्रात कार्य केले आहे . 

 


                          ( लेख अच्छा लगे तो प्रोत्साहन राशि भेट स्वरूप दे ..दूरध्वनी : ९७०२ १५८ ५६४)

    तेच कार्य मी आज एक खारीचा वाटा  उचलून कार्य करण्याचा  करीत आहे ,आपण ही एक खारीचा वाटा होऊन समाज कार्य करावे ही अपील आहे. आणि उपरोक्त गुगल लोगोवर आपल्या इच्छे प्रमाणे मदत करावे हे माझे अपील आहे . 

 

जय भीम ! नमो बुद्धाय ! 

 



शिष्यवृत्तीसाठी गुणांची जाचक अट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर




अनिल वैद्य ( माजी न्यायाधीश) मो. ९६५७७५८५५५      


     महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतिवर्षी अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील प्रदेशात विशेष अध्ययन करण्याकरिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. शासनाने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार उक्त लाभ मिळण्यासाठी शासनाने आधीच्या (सन २०२३-२४) योजनेत बदल करून नवीन जाचक अटी अंतर्भूत केल्या आहेत. त्या पैकी 

     शिष्यवृत्ती मिळण्यासाठी पदवीमध्ये ७५% गुण असणे आवश्यक ठरविण्यात आले आहे. तसेच पीएचडी साठी पदव्युत्तर मध्ये ७५% असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

     शिष्यवृत्तीचा लाभ एका कुटुंबातील एकच विद्यार्थी घेवू शकेल असे ठरविण्यात आले आहे.

     पदव्युत्तर साठी एकदा शिष्यवृत्ती मिळाली तर पूर्व पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय इतरही जाचक अटी आहेत. शिष्यवृत्ती देण्यासाठी पदवी परीक्षेत ७५ टक्के गुणांची अट वाचून 

     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशाच प्रकारच्या जाचक अटीसाठी सरकार विरुद्ध संसदेत १९५४ ला लढून जाचक अट रद्द करून घेतली होती. तशीच परिस्थिती आज निर्माण केली आहे. म्हणून हा लेखन प्रपंच.

     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९४१ मध्ये ब्रिटिश व्हाइसरॉयच्या हिंदुस्थान सरकारमध्ये संरक्षण सल्लागार समितीवर सभासद म्हणून नियुक्त केले होते.  त्यानंतर १९४२ ला व्हाइसरॉयच्या हिंदुस्थान सरकारच्या मंत्रिमंडळात कामगार व बांधकाम मंत्री म्हणून नियुक्त केले होते. त्यांच्याकडे शिक्षण खाते नव्हते, परंतु मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या समस्येकडे त्यांनी ब्रिटिशांचे लक्ष वेधले.  २९ ऑक्टोबर १९४२ रोजी गव्हर्नर जनरलला एक मेमोरॅंडम देवून देशात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन लाख रुपये व विदेशात शिक्षण घेणाऱ्यांना तीन लाख रुपये अनुदानाची मागणी केली.

ब्रिटीशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मागणी पूर्ण केली व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली.‌ विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मंजूर केली.  त्यामुळे त्यावेळी अनुसूचित जातीचे १६ विद्यार्थी विदेशात उच्च शिक्षणासाठी गेले होते.  पुढे शिष्यवृत्तीच्या रकमेत दरवर्षी वाढ होत गेली.

      इ. स. १९४६ मध्ये ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्य देण्याच्या हेतूने संविधान सभेची निवडणूक घेतली.‌  निवडून आलेल्या सदस्यांचे हंगामी सरकार नियुक्त केले.  त्या सरकारने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विदेशात पाठविण्याचे बंद केले.  याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तीव्र निषेध व्यक्त केला आणि संधी मिळताच दि. ६ सप्टेंबर १९५४ रोजी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला.  'पवित्र कार्याला अपवित्र करण्यात' शिक्षणमंत्री राजगोपालाचारी यांची हातोटी असल्याची, टीका करून सरकारचा खरपूस समाचार घेतला.  पुढे ते म्हणाले, प्रत्येक सचिवाचा मुलगा आणि मुलगी केंब्रिज किंवा ऑक्सफर्डमध्ये सापडू शकतो.  त्यांच्या मुलांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी दोनदा किंवा तीनदा परदेशी यात्रा केलेली आहे.  कारण त्यांच्याकडे विपुल साधनसामग्री आहे.  मागासवर्गीय मुलाला प्राथमिक शिक्षणसुद्धा मिळू शकत नाही.  दोन वर्गातील या प्रकारचे व्यवहार शेकडो वर्षांपासून चालू आहेत.  हा असह्य व्यवहार असून अनंत काळापर्यंत तो आम्ही चालू देणार नाही.  भाषण सुरू असतांनाच सरकारच्या वतीने संसद सदस्य डॉ. काटजू मध्येच म्हणाले की, गेल्या वर्षापासून ही योजना पुन्हा सुरू केली आहे.  त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खडसावून विचारले की, इतके वर्षे का बंद केली होती?  त्यावर डॉ. काटजू निरुत्तर झाले व मला माहित नाही, असे त्यांनी उत्तर दिले. काही उत्तरच नव्हते त्यांच्याकडे !

      आजची एस.एस.सी. म्हणजे त्यावेळची ७वी मॅट्रीक.  मॅट्रीक पास विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची योजना डॉ. बाबासाहेबांच्या महत् प्रयत्नाने सुरु झाली.  परंतु १९४५ ला व्हाइसरॉयचे ब्रिटिश सरकार संपुष्टात आले व १९४६ ला ब्रिटिशांनी भारतीयांचे हिंदुस्थान सरकार निवडणुकीद्वारे निर्माण केले.   सरकारमधल्या या आरक्षण विरोधकांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे हे बघविले नाही.  त्यांनी दुष्टपणा केला व शिष्यवृत्तीसाठी ५०% गुणांची अट निर्माण केली.  त्या काळात पास होण्यास जेमतेम ३३ टक्के गुण मिळविणेसुद्धा फार कठीण होते.  परिस्थिती अशी होती की, अस्पृश्य समाजातून फक्त एकटेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीक झाले होते.   अशा परिस्थितीत ५० टक्के गुणांची अट घालणे म्हणजे संपूर्ण समाजाला शिष्यवृत्ती नाकारणे होते.  कारण जातीयतेच्या काळात अस्पृश्य विद्यार्थ्याला ५० मार्क्स् देण्याची परीक्षकातही दानत नव्हती.  विरोधकांना येनकेन प्रकारे शिष्यवृत्ती नाकारायची होती.  ही बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात येताच त्यांनी हा मुद्दा राज्यसभेत १९५४ ला उपस्थित केला व सरकारवर घणाघाती टीका केली.  सर्व सभागृहांचे लक्ष याकडे वेधले.  ते म्हणाले, अनुसूचित जातीची मुले ज्या परिस्थितीत राहतात ती तुम्ही विचारात घेतली पाहिजे.  त्यांच्या आईवडिलांजवळ त्यांच्या अभ्यासासाठी वेगळी खोलीही नसते.  रात्री अभ्यासासाठी दिवाही नसतो.  तो गर्दीमध्ये राहत त्याने परीक्षेत शेकडा ५० गुण मिळवावे, अशी अपेक्षा तरी तुम्ही कशी करता.... तो एक मूर्खपणा आहे. महामूर्खपणा आहे.  सर्व विद्यापीठांनी मान्य केलेली आणि सरकारी नोकरीसाठी तुम्हालाही मान्य असलेली सर्वसामान्य पात्रता म्हणजे ३३ टक्के मार्क्स. ते तुम्ही काही काळासाठी मान्य करावयास पाहिजे.  त्यांच्या शिष्यवृत्तीच्या कार्यात मुद्दाम अडथळा निर्माण करण्याचा हेतू असल्याशिवाय नुसता पास असलेला मुलगा जर सरकारी नोकरीसाठी पात्र असतो तर त्याच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीकरिता तो पात्र का ठरू नये ?

      यानंतर सरकारने ५०% गुणांची अट शिथील केली व तेव्हापासून तर आजही जेमतेम गुण एस.एस.सी. झालेल्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर ५० टक्क्यांच्या अटीमुळे लाखो मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित झाले असते व आज दिसणारे कर्मचारी व अधिकारीही नसते.

      या उदाहरणातून महाराष्ट्र सरकारने धडा घ्यावा व ७५ टक्क्याची अट रद्द करावी.  तसेच एका कुटुंबात एकाच विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती एकचदा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची अट.  हे संविधानिक आहे काय?  हे सरकारच्या कोणत्या मनोवृत्तीचे लक्षण आहे?  छत्रपती सयाजीराव गायकवाडांनी उदारपणे शिष्यवृत्ती दिल्या आणि त्यांचा वारसा सांगणारे अशा प्रकारे वागतात?

      शिष्यवृत्ती हा प्रत्येकाचा स्वतंत्र हक्क आहे.  घरात एका भावाला किंवा बहिणीला आधी मिळाली म्हणून दुसऱ्याला गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती नाकारणे व्यक्तिस्वातंत्र्याच्या विसंगत नाही काय?  तसेच एकदा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती घेतली तर पीएचडीला दिली जाणार नाही हा नियम म्हणजे विद्यार्थ्याच्या पुढील वाटचालीस किंवा विकासास अडथळा नव्हे काय?

      जेमतेम गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी सुद्धा पुढे चांगली कामगिरी करु शकतो.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाडांनी ७५ टक्क्याची अट लावली असती तर... ते अमेरिकेत जाऊ शकले असते काय?  आणि गेले नसते तर या देशाला इतके उत्कृष्ट संविधान कुणी दिले असते?

      सरकार कोट्यवधी रुपये उद्योजकांचे माफ करू शकते आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी हात आखूड करीत आहे.  बरे! सरकारी टॅक्स मागासवर्गीय लोक सुद्धा देतात.

      उच्चवर्णीय लोकांच्या टॅक्सच्या पैशातून मागासवर्गीय शिकतात अशा भ्रमात कुणी राहू नये.

      शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवण्याची जुनी सवय दांभिक लोकांनी सोडून द्यावी.  १९२६-२७ ला अस्पृश्यांना सरकारी शाळेत प्रवेश देण्याचा ब्रिटिश काळात आदेश असताना ठाणे व रत्नागिरी येथे अस्पृश्य विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला होता.  अशा जुन्या सवयी सोडून द्याव्यात.  देशाची प्रगती सर्वांच्या प्रगतीमध्ये आहे.  हे सत्ताधारी वर्गाने लक्षात घ्यावे.                                                      ▪️▪️▪️.                                                   


(संदर्भ : दैनिक "वृत्तरत्न सम्राट" रविवार, दि. १६ जून २०२४)

नवीन कलमाने दाखल करावयाची गुन्हे ठाणे अंमलदार साठी उपयुक्त

 


नवीन कलमाने दाखल करावयाची गुन्हे ठाणे अंमलदार साठी उपयुक्त 


01) NC अदखलपात्र गुन्हा 

323, 504, 506, 34.

नवीन कलम 

115(2), 352, 351(2)(3),  3(5) प्रमाणे


02) साधी दुखापत

324, 504, 506, 34

नवीन कलम

118(2) 352, 351(2)(3), 3(5) प्रमाणे,


03) गंभीर दुखापत

326, 324, 504, 506, 34

नवीन कलम

118(1), 118(2), 352, 351(2)(3),  3(5) प्रमाणे,


 04) खुनाचा प्रयत्न

307, 324, 504, 506, 34.

नवीन कलम

109, 118(2), 352, 351(2)(3),  3(5) प्रमाणे,


 05) खून करणे/पुरावा नष्ट करणे 

302, 34, 120(B) 

नवीन कलम

103(1), 3(5), 61(1) प्रमाणे,

 

06) अपघात करणे 

304(A), 279, 337, 338, 427 MV ACT 134A,134B,184.

नवीन कलम

106(1)(2), 281, 125(A), 125(2) 324(4)(5), MV ACT 134(A)(B),184.


07) स्त्रीचा विनयभंग

354, 354(A), 354(B), 354(C), 354(D), 509. 

नवीन कलम

74, 75, 76, 77, 78 79. प्रमाणे,


08) स्त्रीला क्रूर वागणूक देणे 

498(A), 494,  323, 405, 506, 34.

नवीन कलम 

85, 86, 82, 115(2), 352, 351(2)(3), 3(5) प्रमाणे.


09) बलात्काराची कलम

363, 376, 376(2)(N)  नवीन कलम

137(2), 64, 64(2)(N)

 

10) चोरीची व दरोडा कलमे

379, 380, 454, 457 392, 394, 395, 397.

नवीन कलम

303(2), 305(A), 331(3), 331(4),

309(4), 399(6), 310(2), 311. प्रमाणे 


👉 The following "IPC Sections" have been converted to "BNS Sections"


01)302 IPC = 103 BNS


02) 304(A) IPC = 106 BNS


03) 304(B) IPC = 80 BNS


04) 306 IPC = 108 BNS


05) 307 IPC = 109 BNS


06) 309 IPC = 226 BNS

  

07) 286 IPC = 287 BNS


08) 294 IPC = 296 BNS


09) 509 IPC = 79 BNS


10) 323 IPC = 115 BNS


11) R/W 34 IPC = 3(5) BNS


12) R/W 149 = R/W 190 BNS


13) 324 IPC = 118(1) BNS


14) 325 IPC = 118(2) BNS


15) 326 IPC = 118(3) BNS


16) 353 IPC = 121 BNS


17) 336 IPC = 125 BNS


18) 337 IPC = 125 BNS(A)


19) 338 IPC = 125 BNS(B)


20) 341 IPC = 126 BNS


21) 353 IPC = 132 BNS


22) 354 IPC = 74 BNS


23) 354(A) IPC = 75 BNS


24) 354(B) IPC = 76 BNS


25) 354(C) IPC = 77 BNS


26) 354(D) IPC = 78 BNS


27) 363 IPC = 139 BNS


28) 376 IPC = 64 BNS


29) 284 IPC = 286 BNS


30) 286 IPC = 288 BNS

(Fine - 5000/-)


31) 290 IPC = 292 BNS    

(Fine - Rs 1000/-)


32) 294 IPC = 296 BNS


33) 447 IPC = 329 (3) BNS


34) 448 IPC = 329 (4) BNS


35) 392 IPC = 309 BNS


36) 411 IPC = 317 BNS


37) 420 IPC = 318 BNS


38) 382 IPC = 304 BNS


39) 442 IPC = 330 BNS


40) 445 IPC = 330 BNS


41) 447 IPC = 330 BNS


42) 448 IPC = 331 BNS

  

43) 494 IPC = 82 BNS


44) 498(A) IPC = 85 BNS


45) 506 IPC = 351 BNS

 

46) 509 IPC = 79 BNS

       

(Petty Basic Offences)

  

47) 9(I), 9(II) = 112 BNS

  

The above Sections of IPC for BNS will be applicable from 01.07.2024.

समान_नागरी_ कायदा : ‘एकसमान’ (युनिफॉर्म) म्हणजे ‘समान’ (कॉमन) नाही.






 समान_नागरी_ कायदा :  ‘एकसमान’ (युनिफॉर्म) म्हणजे ‘समान’ (कॉमन) नाही.

___ प्रा.बी. आर. शिंदे ,नेरूळ नवी मुंबई ७०६ 

आपल्या भारतीय राज्यघटनेत राज्यासंबंधीच्या धोरणांबाबत मार्गदर्शक तत्त्वे सांगणारे एक पूर्ण प्रकरण दिलेले आहे . अनुच्छेद ४४ वा  हा चौथ्या प्रकरणात दिलेल्या १८ अनुच्छेदांपैकी एक आहे. तो अनुच्छेद काय आहे ते पाहू या ,समानता आणण्याच्या आणि भेदभाव दूर करण्याच्या संदर्भात अनुच्छेद ३८(२) मध्ये खालील नमूद केलेले निर्देश खूप महत्वाचे आहेत . 

उत्पन्नातील दरी कमी करणे. 

दर्जातील असमानता दूर करणे. 

सुविधा आणि संधींमधील असमानता दूर करणे. 

या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि विकासाला मूलभूत आहेत. अनुच्छेद ३९ मध्ये नमूद केलेले निर्देश सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाच्या मध्यवर्ती आहेत. हाच देश विकासाचा मानबिंदू मनाला जातो . देशातील लाखो कष्टकरी लोकांच्या इच्छा ,आकांक्षा ज्यात समाविष्ट आहेत, ते अनुच्छेद म्हणजे ४३ ‘उदरनिर्वाहाच्या साधना’ची हमी देण्याचे निर्देश देते.माणसाला उदरनिर्वाहाचे साधन नसेल तर मानवी मूल्य समाप्त झाल्याचे चिन्ह आहे . 


दुर्दैवाने, या निर्देशात्मक तत्त्वांवर देशाच्या संसद भवनात ,निवडून दिलेल्या नेत्यात क्वचितच चर्चा होते हे दुर्दैवाचे विलास आहे . उपरोक्त मूलभूत घटक असलेले   निर्देश सरकारच्या अजेंडय़ावर नाहीत.किंवा कधी चर्चेस येत नाहीत . विद्यमान  सर्वोच्च न्यायालयाच्या काही  निरीक्षणांमुळे आणि संघ-भाजपच्या अजेंडय़ामुळे एकटय़ा अनुच्छेद ४४ नेच सगळा राजकीय अवकाश व्यापला आहे.हे ध्यानात घेण्यासारखे आहे . 

राज्य घटनेच्या अनुच्छेद ४४ ची भाषा पाहा काय आहे ते पहा  ‘‘देशाच्या संपूर्ण भूभागात नागरिकांसाठी समान नागरी संहिता सुरक्षित करण्याचा सरकार प्रयत्न करेल.’’ हे सरकार ने करण्याचे कधी प्रयत्न केल्याचे दिसत नाही ? प्रतेक शब्दांना अर्थ असतो.कांही विचारावे आणि कांही ही उत्तर द्यावे असे होत नाही . . ‘एकसमान’ (‘युनिफॉर्म’) म्हणजे ‘समान’ (‘कॉमन) नाही. सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ‘सुरक्षित ठेवणे’ नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी अज्ञ नव्हते.हे या सरकर ने विसरले आहे .  त्यांना इतिहास, धर्म, जातिभेद, सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्था, भारतीय लोकांच्या सांस्कृतिक चालीरीती आणि परंपरांचे सखोल ज्ञान आणि आकलन होते. त्यांनी चौथ्या प्रकरणातील शब्द याच साठी  काळजीपूर्वक निवडले आहेत.

एकसमान नागरी संहिता म्हणजे Uniform Civil Code हे वैयक्तिक कायद्यांचे लघुलेखन आहे.ते कोणासाठी लागू होते ते पहा . खालील चार क्षेत्रांमधील कायद्यांशी संबंधित आहे. 

विवाह,घटस्फोट. 

उत्तराधिकार ,वारसाहक्क . 

अल्पसंख्याक . 

पालकत्व आणि दत्तक घेणे आणि त्याची देखभाल .  

या भारत  देशाच्या विविध भागांत आणि राज्यात  राहणाऱ्या, विविध स्तरांतील लोकांचे वैयक्तिक कायदे शतकानुशतके वेगवेगळय़ा पद्धतीने विकसित होत गेले आहेत. ज्यांनी ज्यांनी इथे राज्य केले त्या सगळय़ांनी या पद्धती विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यात धर्माची भूमिका महत्त्वाची आहे. भूगोल, प्रजननक्षमता, विजय, स्थलांतर आणि परदेशी प्रभाव यांचाही वैयक्तिक कायद्यांवर परिणाम झाला आहे.पण विद्यमान सरकार ने असे ठोस पाऊल कधी उचलेले आपणास पाहावयास मिळत ही खेदाची बाब आहे . 

आज अस्तित्वात असलेल्या कायद्यात १९५५ पासून सुधारणेला सुरुवात झालेली आहे .  वैयक्तिक कायद्यांमध्ये लैंगिक भेदभाव आहेच, तो कधी मिटेल का हे आज मितीला सांगता येणार नाही . हा भेदभाव पूर्वी होता आज ही  आहे.त्याचे कारण म्हणजे  या कायद्यांमध्ये अवैज्ञानिक आणि चुकीच्या रूढी प्रथा खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. अनेक  सामाजिक कुप्रथा आणि परंपरा आहेत. वैयक्तिक कायद्यांच्या या पैलूंमध्ये सुधारणा करणे नि:संशयपणे आवश्यक आहे.ते होताना दिसत नाही . 

राज्यघटनेच्या निर्मितीपासून ते देशाच्या अजेंडय़ावर हे  आहेच .वैयक्तिक कायद्यातील सुधारणा नवीन नाहीत. हे मुद्दे देशाच्या पहिल्या संसदेच्या (१९५२-५७) प्रमुख चिंतांपैकी एक होते. जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुधारणांमध्ये अग्रगण्य होते. त्यांना पुढील काळातील संभाव्य धोके माहिती होते . त्यांनी सनातनी आणि पुराणमतवादी वर्गाचा विरोध झुगारून खालील कायदे केले . आणि हे हिंदू कायद्यात सुधारणा करणारे खालील  चार प्रमुख कायदे मंजूर करण्यात आले होते .

१९५५ चा हिंदू विवाह कायदा.  

१९५६ हिंदू उत्तराधिकार कायदा 

१९५६ हिंदू अल्पसंख्याक आणि पालकत्व कायदा

१९५६ हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा

एका नव्यानेच निर्माण झालेल्या देशाने बहुसंख्य हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे उल्लेखनीय कार्य केले. ते क्रांतिकारक होते, परंतु या क्रांतीमध्ये काही पैलू तसेच राहिले. भेदभाव करणाऱ्या काही तरतुदी काढल्या गेल्या नाहीत; त्याच मुळे भेदभाव कायम राहिला आहे .  हिंदू अविभक्त कुटुंबाचे कायदेशीर अस्तित्व मान्य केले गेले; आणि विवाहातील प्रथा अपवाद ठरवल्या गेल्या. भारतातील बहुतेक विवाह आजही ठरावीक प्रथांनुसार केले जातात.रूढी परंपरा कायम चिटकून आहेत हे खेदाची बाब आहे . 

१९६१, ते २००३ मध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्या. दरम्यान, यूपीए सरकारने २००५ आणि २००८ आणखी सुधारणा केल्या . वर सांगितलेल्या चारपैकी तीन कायद्यांत सुधारणा करण्यात आल्या. मुलींना आणि मुलग्यांना संपत्तीत समान अधिकार हा क्रांतिकारक बदल होता. खालील हे नवे कायदे मंजूर करण्यात आले.

सन २००५ चा घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा.  

सन २००६ बालविवाह प्रतिबंधक कायदा. 

सन २००७ पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा. 

विधिमंडळांनी टाळाटाळ केल्यामुळे तिथे न्यायालयांनी हस्तक्षेप केला. २२ ऑगस्ट २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांमधील तलाक-ए-बिदत (तिहेरी तलाक) ही प्रथेला घटनाबाह्य ठरवली.

भारत देशातील आदिवासींच्या वैयक्तिक कायद्यांचा मुद्दा येतो तेव्हा थांबून थोडा विचार करावा लागतो. घटनेच्या अनुच्छेद ३६६, अनुच्छेद २५ अंतर्गत अधिसूचित केलेल्या ‘अनुसूचित जमातींना - (वर सूचीबद्ध केलेल्या ) चार कायद्यांपैकी कोणतेही कायदे लागू होत नाहीत. ही २१ व्या कायदा आयोगाची दाखल खूप कांही सांगून जाते . 

पूर्वोत्तर भागातील आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासाठी राज्यघटनेची सहावी अनुसूची जोडण्यात आली आणि त्या राज्यांतील जिल्हा परिषदा तसेच प्रादेशिक परिषदांना वारसा, विवाह आणि घटस्फोट तसेच सामाजिक चालीरीती यांच्या संदर्भात कायदे करण्याचे अधिकार प्रदान करणारा परिच्छेद समाविष्ट करण्यात आला. नागालँड (अनुच्छेद ३७१ अ), सिक्कीम (अनुच्छेद ३७१ फ) आणि मिझोराम (अनुच्छेद ३७१ ग) साठी धार्मिक तसेच सामाजिक प्रथा आणि रूढी कायद्यांचे संरक्षण करणाऱ्या विशेष तरतुदी जोडल्या गेल्या आहेत. छत्तीसगड आणि झारखंडमधील आदिवासी संघटनांकडून तशाच विशेष तरतुदींची मागणी करण्यात आली आहे.त्या मागणीचे आज पावेतो काय झाले ते कळत नाही . 

एकसमानतेचा आग्रह धरताना देशाच्या प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण होईल या पातळीवर जाऊन  सांस्कृतिक वैविध्याशी तडजोड करता येणार नाही.’’

मानवी जीवन आणि मानवी मूल्यात वैयक्तिक कायद्यांमध्ये अधिक सुधारणा आवश्यक आहेत, यात शंका नाही. 

२१ व्या विधि आयोगाने सुज्ञ सल्ला दिला. ‘‘म्हणूनच, या आयोगाने या टप्प्यावर आवश्यक किंवा इष्ट नसलेला एकसमान नागरी कायदा आणण्याआधी भेदभाव करणाऱ्या कायद्यांबाबतच्या हाताळणीला प्राधान्य दिले आहे. एकसमान नागरी कायद्याच्या बाजूने किंवा विरोधात अशा दोनच बाजू असू शकतात, अशा पद्धतीने आपल्या पंतप्रधानांनी या प्रश्नाची मांडणी केली आहे. 

देशातल्या लोकांकडे आज असे पहावे लागते आहे की ,राजा उंटावर बसून शेळ्या रखतो आहे . शेळ्या आपल्या किती कुठे चरत आहेत किती लांडगे उचलून घेऊन जात आहेत . किती अन्याय अत्याचार होत आहे ? हे त्या शेळी पळणाऱ्या उंटावर बसून काय दिसणार ?

यह आझादी झूठी है, देश की जनता भूखी है

 


यह आझादी झूठी है, देश की जनता भूखी है


.....  या वाक्याच्या समर्थकांकडे जर वरील प्रश्नांची मुद्देसूद व बिनतोड उत्तरे असतील तर त्यांनी ती जरुर द्यावीत, म्हणजे मी सुद्धा माझी ही पोस्ट जाहीरपणे मागे घेईल. निकोप चर्चा करणे आपल्याला जमले पाहिजे. पण उत्तरे न देता लगेच माझ्यावरच संघी, मनुवादी, काँग्रेसी असा आरोप करुन तसेच मला अण्णा भाऊ साठे विरोधी ठरवून पळून जाऊ नये, एवढीच अपेक्षा..... 

    संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊराव साठे यांची‌ १ आॕगस्ट रोजीची जयंती साजरी झाली की लगेच अण्णा भाऊ साठे यांनी १६ आॕगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर स्वातंत्र्याच्या विरोधात काढलेल्या मोर्चाचे 'यह आझादी झूठी है, देश की जनता भूखी...' हे घोषवाक्य होते, असा प्रचार मातंग समाजात सुरू केला जातो.

 काही वर्षापासून हा प्रचार जाणीवपूर्वक केला जात आहे. विशेषतः फेसबुक आणि व्हॉटसअप युनिर्व्हसिटी आल्यापासून तर हा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू झाला. 


परंतु साहित्यरत्न अण्णा भाऊराव साठे यांनी हे वाक्य खरंच म्हटले आहे का ? 

याचा शोध घेण्याचा प्रयत्न मातंग शिक्षक, प्राध्यापकांनी, इतिहास संशोधकांनी, बुद्धीजीवींनी आणि प्रामाणिक  कार्यकर्त्यांनी सुद्धा कधी केला नाही. 

काही संघटनांच्या मोठ्या नेत्यांनी सांगितले म्हणजे ते खरंच असणार असे समजून मातंग समाजातील काही मोजके कार्यकर्ते १६ आॕगस्टच्या तथाकथित मोर्चाचा प्रचार करत असतात. 

पण हे वाक्य साहित्यरत्न अण्णा भाऊराव साठे यांनी खरंच म्हटले आहे का, हे शोधण्याचा मी तीन वर्षापूर्वी प्रयत्न केला. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांची चर्चा करुन त्यांच्याकडून काही पुरावे, संदर्भ मिळतात का? याचा प्रयत्न केला.


 पण कोणाकडेच या वाक्याचा कसलाही पुरावा नसल्याचे सिद्ध झाले. 

काही प्रामाणिक विचारवंतांचे, कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की पुरावा नाही म्हणून हे वाक्य खोटे आहे, असे म्हणायचे का ? 

प्रत्येक वाक्याचा पुरावा मागायचा असतो का ? 

कदाचित हे वाक्य साहित्यरत्न अण्णा भाऊंराव साठेनी म्हटलेच नसेल पण या वाक्याचा मातंग तसेच दलित चळवळीला फायदा आहे. म्हणून या वाक्याच्या सत्यतेचा शोध घेणे योग्य नाही. म्हणून तुम्ही  शोध घेणे थांबवा, कारण हे वाक्य आता रुढ झाले आहे.

 परंतु प्रश्न केवळ खऱ्या खोट्याचा नाही किंवा दलित समाजाने निर्माण केलेल्या चळवळीच्या फायद्या तोट्याचा सुद्धा नाही. तर साहित्यरत्न अण्णा भाऊराव साठे सारख्या एका महापुरुषाच्या नावाने या वाक्याचा प्रचार केल्यामुळे मातंग समाजाला, मातंग समाजाच्या भविष्यातील वाटचालीला आणि मुख्यत्वे करुन अण्णा भाऊराव साठे यांच्या प्रतिमेला या वाक्याने धक्का बसतो का ? हा खरा प्रश्न आहे.

आपण कालबाह्य रुढी परंपरांना विवेकाने नाकारतो. मग या नवीन घातक रुढीला का नाकारु नये ?


कारण बहुसंख्य मातंग समाज अजूनही शैक्षणिक दृष्टीने मागास आहे. त्यात मांग समाज अतिशय भावनाप्रधान असल्यामुळे तो कोणाच्याही जोरदार अपप्रचाराला बळी पडतो. 

पण निदान मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी व बुद्धीजीवींनी तरी या वाक्याकडे चिकित्सक नजरेने, विवेकबुद्धीने पाहणे अतिशय गरजेचे आहे. असे मला वाटते.


म्हणून या वाक्याच्या समर्थकांनी खालील प्रश्नांची अधिकृत पुराव्यासहित तसेच किमान तर्कशुद्ध बुद्धीने उत्तरे द्यावीत. ही माफक अपेक्षा..... 

 जर साहित्यरत्न अण्णा भाऊराव साठे यांनी वरील वाक्य म्हटले असेल आणि १६ आॕगस्ट रोजी मोर्चाही काढला असेल तर या वाक्याच्या समर्थकांनी समकालीन दस्तावेजाचा म्हणजे अण्णा भाऊराव साठे यांनी त्यांच्या कोणत्या कादंबरीत, कथेत, पोवाड्यात अथवा भाषणात  या वाक्याचा उल्लेख केला ? किंवा समकालीन वृत्तपत्रे, बाॕम्बे गॕझेट, तत्कालिन पोलिस प्रशासन, मुंबई मनपा प्रशासन किंवा कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतील कार्यालयामधील ऐतिहासिक तपशीलाचा पुरावा द्यावा. म्हणजे हा वाद संपुष्टात येईल. 


साहित्यरत्न अण्णा भाऊराव साठे हे लाल झेंडा घेऊन एका जीपवर उभे आहेत. हा फोटो घेऊन त्याचा संदर्भ या मोर्चाशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. या फोटोचा १६ आॕगस्टच्या दिवसाशी, मोर्चाशी संबंध कसा जोडला जातो हे मात्र समर्थकांना सांगता येत नाही, पण समर्थक ऐकत नाहीत. 


साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊराव साठे भारताच्या स्वातंत्र्यासाठी १९४२ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारला भूमिगत राहून सहकार्य करतात, याचा पुरावा आहे. मग शेवटपर्यंत स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्यसैनिक अण्णा भाऊराव साठे हे स्वातंत्र्य मिळाल्यावर अचानक दुसऱ्याच दिवशी स्वातंत्र्य झूठ आहे,  असे कसे म्हणतील ?

साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊराव साठे हे फक्त भारताच्या स्वातंत्र्याचेच समर्थक नव्हते तर ते मराठी भाषिक राज्याचे सुद्धा तेवढेच कट्टर समर्थक होते. म्हणून तर भाषावार प्रांतरचना करताना मुंबई गुजरातला जोडल्यावर आणि बेळगाव, कारवार, निपाणी कर्नाटकला जोडल्यावर निर्माण झालेल्या  संयुक्त  महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचे खरे शिल्पकार हे अण्णा भाऊराव साठे हेच ठरतात. मराठी भाषादिन सुद्धा त्यांच्याच नावाने साजरा व्हावा अशी मागणी आज संपूर्ण मातंग समाज करीत आहे. 

मराठी भाषिकाचे राज्य निर्माण करण्यासाठी अगोदर देश निर्माण करणे गरजेचे होते. तरच मराठी भाषिकांचे राज्य निर्माण करणे शक्य होते. मग आझादीलाच झूठ म्हणणारे अण्णा भाऊराव साठे अवघ्या दहा वर्षांनी निर्माण झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला त्याचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी उतरले असते का ?

 संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी अण्णा भाऊराव साठे अहोरात्र झटले असते का ?


काही वर्षापासून आपण अण्णा भाऊंराव साठेंना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च किताब द्या, यासाठी सरकारला वेळोवेळी निवेदने देतोय, आंदोलने करतोय. एकीकडे आपण अण्णा भाऊराव साठे आझादीला झूठी म्हणाले होते, असे सांगतो आणि दुसरीकडे त्याच आझाद भारताकडून अण्णा भाऊंराव साठेंना भारतरत्न हा किताब द्या अशी मागणी करतोय. हे हास्यास्पद वाटत नाही का ?


या वाक्याचे समर्थक आणखी एक मजेशीर हास्यास्पद कृती करत असतात. दरवर्षी १५ आॕगस्ट स्वातंत्र्यदिन हे समर्थक मोठ्या धुमधडाक्यात आनंदाने साजरे करतात. पण लगेच दुसऱ्या दिवशी यह आझादी झूठी है... म्हणून रडतात. इतर लोक मांगांचे हे नाटक पाहून मनातल्या मनात काय म्हणत असतील ? याचा तरी विचार करा. 

 आॕगस्ट १९४७ च्या तथाकथित मोर्चा नंतर साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊराव साठे यांनी अनेक पुस्तके लिहीली. मग त्या एकाही पुस्तकात त्यांनी यह आझादी झूठी है,... या वाक्याचा किंवा १६ आॕगस्टच्या मोर्चाचा दूरवरुन सुद्धा उल्लेख का केला नाही ?

१९५८ मध्ये भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊराव साठे हे अध्यक्ष होते, त्यांचे गाजलेले लिखित भाषण आजही उपलब्ध आहे. त्याच भाषणात अण्णा म्हणतात की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकाच्या तळहातावर तरलेली आहे.  परंतु त्या अत्यंत महत्त्वाच्या भाषणात सुद्धा त्यांनी यह आझादी झूठी है,... या वाक्याचा आणि त्या कथित मोर्चाचा सुद्धा एका अक्षराने उल्लेख केला नाही. याचा अर्थ असा होतो की स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते थेट मृत्यूपर्यंत अण्णांना स्वातंत्र्य मान्य झाले होते, फक्त १६ आॕगस्ट १९४७ या एकाच दिवशी मात्र मान्य नव्हते, या प्रश्नाचे समर्थक काय उत्तर देतील ?

स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी स्वातंत्र्य झूठ कसे ठरते ? 


अण्णांना जर खरेच आझादी झूठी आहे, असे वाटत असते तर त्यांनी जेव्हा इंग्लंडच्या संसदेत १८ जुलै १९४७ रोजी भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा कायदा संमत झाला, तेव्हापासूनच आझादीला विरोध करणे सुरु केले असते. पण त्यांनी तसे काहीच केले नाही. याचे तुम्ही काय उत्तर द्याल ?

१५ आॕगस्ट पर्यंत म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत अण्णा भाऊराव साठे आझादी झूठी असल्याविषयी काहीच लिहीत नाहीत किंवा कोठे बोलतही नाही. मग लगेच एकाच दिवसात असे काय घडले, की ज्यामुळे अण्णा भाऊराव साठे यांनी अचानक दुसऱ्याच दिवशी स्वातंत्र्याच्या विरोधी भूमिका घेऊन थेट मोर्चा काढला ? तो सुद्धा हजारोंचा. एवढे नियोजन एका दिवसात जमले असेल तर त्या आंदोलनात सामील झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांपैकी नंतर कोणीतरी या मोर्चाबद्दल लिहीले असते, नंतर तोंडी प्रचार सुरू केला असता, या मोर्चाचे पोलिसांनी तर निश्चित फोटो काढावे लागले असते. नंतर पुन्हा याच घोषणेवर अण्णांनी किंवा मोर्चात सामील झालेल्या असंख्य अनुयायांनी  मोर्चे काढले असते. परंतु नंतर असा एकही मोर्चा कोणीही काढला नाही, याचे कारण काय ? 

कम्युनिस्ट पक्ष हा लोकशाही शासन व्यवस्था मानत नाही. त्यांना कम्युनिस्ट शासनप्रणालीच मान्य असते. (भारतातील कम्युनिस्ट नंतर बदलले. त्यांनी लोकशाही मान्य केली व निवडणूका सुद्धा लढवू लागले) म्हणून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कम्युनिस्टांनी भाग घेतला नाही. आर एस एस ने सुद्धा घेतला नाही. कारण त्यांनाही हिंदू राष्ट्र अभिप्रेत होते. हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. त्यावेळी सुद्धा लोकशाही शासन व्यवस्था मान्य करायची किंवा नाही या एकाच मुद्यावरुन कम्युनिस्ट पक्षात बराच खल झाला. परंतु शेवटी जनमत काँग्रेसकडे आहे हे पाहून लोकशाहीयुक्त स्वातंत्र्य कम्युनिस्टांनी मान्य केले व तसा ठराव पक्षाच्या पाॕलिट ब्युरो मध्ये मान्य करुन घेतला. अण्णा भाऊ साठे तर निष्ठावंत कम्युनिस्ट होते, त्यांच्या अपेक्षे प्रमाणेच पक्षाने ठराव सुद्धा केला, मग ते स्वतःला मान्य असलेल्या पक्षाच्या ठरावा विरुद्ध मोर्चा कसा काय काढतील ?  

परंतु हा इतिहास सामान्य मातंग समाजाला माहीती नसल्यामुळे आणि अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट असल्यामुळे त्यांना स्वातंत्र्य विरोधी ठरवून आपल्या पंक्तीत बसवणे सोपे आहे, या हेतूनेच यह आझादी झूठी है, देश की जनता भूखी है.....  या वाक्याचा जन्म झाला.  

 साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊ साठे  हे स्वातंत्र्यप्रेमी कम्युनिस्ट  होते. तसेच महत्त्वाचे म्हणजे ते लोकशाहीवादी कम्युनिस्ट होते. हे मातंग समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे. कारण साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे हे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणे स्वतंत्र विचारांचे दृष्टे महापुरुष होते.  म्हणून तर फक्त अण्णांनीच धर्म, जात, वर्ण, वर्ग, लिंग भेदाला पूर्णपणे विरोध केल्याचे दिसून येते. आपल्या समग्र साहित्यातून जातधर्मवर्गस्त्रीदास्य अंताची चळवळ फक्त साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा यांनीच चालवली. म्हणून त्यांनी आपल्या चळवळीसाठी स्वजातीच्या लोकांचा सुद्धा आधार घेतला नाही. साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊ साठे हे इतर कम्युनिस्टां प्रमाणे कर्मठ काॕम्रेड नव्हते तर ते मानवतावादी पण राष्ट्रनिष्ठ तसेच नवविचारांचे क्रांतिकारक काॕम्रेड होते.  हे सुद्धा मातंग समाजाच्या तरुणांना आता समजून घ्यावे लागेल. 

 दिल्लीतील १५ आॕगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्याच्या कार्यक्रमात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सहभागी झाल्याचा फोटोसहित व व्हीडीओ क्लिप सहित पुरावा उपलब्ध आहे. मग  खुद्द बाबासाहेबांना स्वातंत्र्य मान्य होते, म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा स्वातंत्र्याला मनापासून पाठिंबाच दिला होता.  पण अण्णा भाऊ साठे यांना मात्र स्वातंत्र्य मान्य नव्हते.  असा दोन महापुरुषा मध्येच स्वातंत्र्याच्या संबधी विचारांचा विरोधाभास, मतभेद मातंग समाजच निर्माण करत आहे, असेच इतर समाजाला वाटणार नाही का ? 

आता सर्वात महत्त्वाचा तर्क.  १९०९ पासूनच भारतात टप्प्याटप्याने राजकीय सुधारणा करायच्या, म्हणून ब्रिटीशांनी १९१९ चा कायदा, १९२९ चे सायमन कमिशन, नंतर झालेला १९३५ चा इंडियन अॕक्ट या सर्व घडामोडीतून हे सूचित झाले होते की भारतात फक्त संसदीय लोकशाहीच येणार हे स्पष्ट होते. कारण खुद्द ब्रिटीशच संसदीय लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते होते. म्हणून भारतात पुन्हा राजेशाही किंवा कम्युनिस्ट राजवट येणे शक्यच नव्हते. मग १५ आॕगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळून फक्त एक दिवस झालेला आहे. संसदीय लोकशाहीच येणार आहे, हे सर्व भारतीयांना माहीत आहे, भारताची राज्यघटना तयार व्हायची आहे. नंतर नवीन सरकार यायचे आहे, त्यांना काम करण्यासाठी वेळ द्यायचा आहे, म्हणजे त्यावेळच्या देशाची परिस्थिती पाहिली तर किमान पाच वर्षे तरी नवीन सार्वभौम देशाच्या सरकारला काम करु देणे भाग होते.  संसदीय लोकशाही नूसार पहिल्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या १९५२ मध्ये.  याचा अर्थ स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्या पाच ते दहा वर्षांनी दलित, श्रमिक, कामगारांसाठी आझादी सच्ची की झूठी ठरणार होती. मग साहित्याचा सम्राट असलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या सारखा महान विचारवंताने किमान दहा वर्षांनी हे स्वातंत्र्य म्हणजे हे सरकार झूठ आहे असा मोर्चा काढला असता. लगेच दुसऱ्या दिवशी मोर्चा काढण्याची एवढी घाई अण्णा करतील का ?


तसेच संसदीय लोकशाहीचे कट्टर समर्थक असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे अण्णा हे लोकशाही स्वातंत्र्याचे समर्थक असतील की विरोधक ? 

 लढवय्या मातंग समाजाचे सवर्ण व इंग्रज या दोघांकडूनही सारखेच शोषण झाल्यामुळे,  तो इतर दलित समाजा पेक्षा विकासात मागे पडला. इंग्रजांनी आणलेल्या १८७१ च्या गुन्हेगारी कायद्यामुळे मातंग समाजाला तीन वेळची हजेरी लागली. चौकशी शिवाय तुरुंगात डांबण्याचा हक्क इंग्रज सरकारला मिळाला. त्याला कोण काम देईना, कामावर सुद्धा घेईना, तो लपून राहू लागला, त्यामुळे संपूर्ण समाज पूर्णपणे उध्वस्त झाला. साहित्यसम्राट अण्णा भाऊराव साठेंनी त्यांच्या फकिरा या जगप्रसिद्ध कांदबरीत या गुन्हेगारी कायद्याचा मांगांना कसा भयानक जाच झाला या संबंधी सविस्तर लिखाण सुद्धा केले आहे.  मग क्रूर इंग्रजापासून मिळणाऱ्या स्वातंत्र्याला अण्णा भाऊराव साठे हे विरोध करतील की पाठिंबा देतील ?


मुंबईत राहणारे काॕम्रेड सुबोध मोरे हे आपल्या एका लेखात म्हणतात की स्वातंत्र्याच्या दिवशी अण्णा भाऊ साठे हे आपल्या पत्नीला व मुलीला घेऊन मुंबईतील गेट वे आॕफ इंडिया येथे स्वातंत्र्याच्या निमित्ताने केलेली रोषणाई पाहण्यासाठी गेले होते. मग स्वातंत्र्याच्या आनंद सोहळ्यात सहपरिवार सामील झालेले अण्णा भाऊराव साठे हे दुसऱ्या दिवशी मोर्चा काढतील का ?


काही समर्थकांचे म्हणणे आहे की प्रस्थापितांच्या तत्कालीन वृत्तपत्रांनी अण्णा भाऊराव साठे यांच्या मोर्चाची दखल घेतली नाही.  पण माझा प्रश्न आहे की स्वातंत्र्याच्या विरोधात निघालेल्या मोर्चाची महाराष्ट्रातील तत्कालीन शासन, पोलिस प्रशासन तर नक्कीच दखल घेणार, मग समर्थकांनी तेथिल माहीती तरी द्यावी. म्हणजे वाद संपेल. परंतु कोणत्याही सरकारी दस्तावेजात तसेच इंग्रजांच्या कागदपत्रात सुद्धा या मोर्चाचा उल्लेख नाही.

 दलितांना, वंचितांना, उपेक्षितांना संपूर्ण न्याय व हक्क देण्यासाठी आजपर्यंतची सर्व सरकारे अपूरे पडले,  हे मान्य. परंतु स्वातंत्र्याच्या काळात असलेली दलितांची, आदिवासींची परिस्थिती व भारतीय राज्यघटनेमुळे काही प्रमाणात का होईना, आज बदललेली दलितांची परिस्थिती, याची तरी चिकित्सा करा. केवळ भडकाऊ भाषणे करुन नेतागिरी करण्यासाठी, दुसऱ्यांचे ऐकून मोर्चा, सभा काढून, सोशल मिडीयावर पोस्ट टाकून स्वातंत्र्यप्रेमी अण्णा भाऊ साठेंना देशद्रोही का ठरवता ?

जर अण्णा भाऊ साठे यांना (संसदीय) आझादी झूठ वाटत होती तर त्यांना १६ आॕगस्ट १९४७ या दिवशी कोणती आझादी सच वाटत होती ? हे सुद्धा सदर वाक्याचे समर्थकांनी सांगितले पाहिजे. पण ते सुद्धा त्यांना सांगता येत नाही. लोकशाही राज्यव्यवस्थेला राजेशाही आणि दुसरी म्हणजे कम्युनिस्ट राजवट असे दोनच पर्याय असतात. अण्णा भाऊंना कम्युनिस्टांची हुकुमशाही राजवट व राजेशाही सुद्धा मान्य नव्हती. संसदीय लोकशाहीच मान्य होती. हेच सत्य आहे. म्हणून तर ते १५ आॕगस्टच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी झाले. 

संविधान सभेत राज्यघटनेवर चर्चा करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की संविधान कितीही चांगले असो, पण ते राबवणारे लोक चांगले नसतील तर संविधान कुचकामी ठरेल. 

लोकशाहीतील (आझादी) स्वातंत्र्य हे नेहमी चांगलेच असते आणि चांगलेच राहणार.  पण सत्ता कोणाच्या ताब्यात आहे, याला महत्त्व आहे. म्हणून मातंग कार्यकर्त्यांनी अण्णांचा आधार घेऊन आझादीवर निरर्थक प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा सत्ताधारी लोकांवर प्रश्न उपस्थित केले पाहिजे, तेच बाबासाहेबांना अभिप्रेत होते.

भगतसिंग हे कम्युनिस्ट असूनही प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांनी कम्युनिस्ट विचारधारेसाठी नव्हे तर भारतातून इंग्रजांना हाकलून देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी हसत हसत फाशी स्वीकारली. म्हणजे भगतसिंग हे राष्ट्रवादी कम्युनिस्ट होते. सेम टू सेम अण्णा भाऊ साठे सुद्धा भगतसिंगांप्रमाणे *राष्ट्रवादी कम्युनिस्ट होते. म्हणून बहुजन, दलित, वंचित, उपेक्षित असणाऱ्या स्त्री पुरुषांचे प्रश्न मांडणारे अण्णा हे मला भारतातील सर्वश्रेष्ठ महापुरुष वाटतात. एवढी प्रचंड सामाजिक व राजकीय जाण असणारे अण्णा देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करुन मोर्चा काढणे शक्यच नाही.

मला असे वाटते की ज्यांना आजची आझादी झूठी वाटते, ते दरवर्षी १६ आॕगस्टला अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा आधार का घेतात ?

जर खरच आझादी झूठी असेल तर स्वतःच्या नावाने रोज आझादी झूठी  म्हणत आंदोलन करावे. पोस्ट लिहाव्यात. आमचे काहीही म्हणणे नाही. पण अण्णांचा आधार घेतला तर किमान मातंग समाज पाठीशी येईल, ही चाणक्यनीती आता मातंग समाजातील कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आहे. कारण स्वतःच्या नावाने आझादी झूठी आहे, असे म्हणून मोर्चा काढला तर यांच्यामागे मातंगच काय कोणताही भारतीय जाणार नाही म्हणून अण्णांच्या तोंडी हे खोटे वाक्य टाकून दरवर्षी लक्ष वेधण्याचा स्टंट केला जातो. 

मातंग समाजाला काँग्रेस पासून तोडून आपल्या बरोबर जोडणे, हा मुख्य राजकीय उद्देश हे वाक्य निर्माण करणाऱ्याच्या डोक्यात होता. या वाक्याची आयडीया अण्णांच्या निधना नंतर दहा बारा वर्षाने  कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून निघाली!

कारण ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात व संपूर्ण देशात सुद्धा काँग्रेसचीच एकहाती सत्ता होती. जनसंघ किंवा भाजप हा तर एक कमजोर पक्ष होता. त्याकाळी जनता पक्ष, त्यानंतरचा जनता दल हाच काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष होता. दलित तसेच मातंग समाज तेव्हा पूर्णपणे काँग्रेसच्या पाठीशी असे. काँग्रेसला एका झटक्यात संपवणे अशक्य होते म्हणून काँग्रेसपासून एक एक जाती तोडत म्हणजे काँग्रेसला  हळूहळू अपंग करीत संपवणे हीच रणनीती आखून त्याप्रमाणे दीर्घकालीन काम करणे आवश्यक होते. 

दुसरा पर्याय नव्हता. काँग्रेसला संपवण्यासाठी काँग्रेस विरोधक वेगवेगळ्या आयडीया लढवत. भावनेवर आधारित राजकारण करणारे पक्ष जात, धर्म, प्रांत, भाषा यावर लोक आकर्षित होतील अशा घोषणा तयार करत. उदा. शिवसेनेने 'गर्व से कहो हम हिंदू है,' ' जय महाराष्ट्र ' या भन्नाट घोषणा काढल्या. 

महाराष्ट्रात आंबेडकरी नेत्यांना मातंग समाजाला बरोबर घेणे आवश्यक होते म्हणून अण्णा भाऊराव साठे यांच्या  नावाने आझादी झूठी म्हणण्याची कल्पना ही घाईघाईने कसलाही मागचा पुढचा विचार न करता काढली गेली आणि मातंग समाजात रुजवण्याचा प्रयत्न सुरु केला. म्हणून आजही हे वाक्य फक्त आंबेडकरी नेते, पक्ष वापरताना दिसतात. पण घाईघाईने व विचार न करता निर्माण केलेल्या या वाक्याला काँग्रेस सहित सर्व पक्षांनी नाकारले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मातंग कार्यकर्ते १५ आॕगस्ट हा आझादीचा दिवस धुमधडाक्यात साजरे करतात, पण विरोधातील लोक सत्ताधारी असतील लगेच दुसऱ्या दिवशी १६ आॕगस्टला आझादी झूठी म्हणतात. पण त्यांचे पक्ष मात्र असे कधी म्हणत नाही, हे सुद्धा यांच्या लक्षात येत नाही. 



मांसाहारी माणसं.



कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं.


कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं.


आपण मांसाहारी आहोत म्हणजे काहीतरी खास आहोत असं समजून, परग्रहावरून अवतरल्या सारखे कायम जमिनीपासून चार अंगुळे वर चालत नाहीत, मांसाहारी माणसं.


आपण मांसाहारी आहोत हे जगाला कळावे म्हणून गळ्यात तुळशीमाळेसारखी एखादी खूण घालून वावरत नाहीत, मांसाहारी माणसं.


उभी हयात शाकाहारी माणसांकडे पाहून नाके मुरडण्यात धन्यता मानत नाहीत, मांसाहारी माणसं.


आपण मांसाहारी आहोत हाच सज्जनतेचा पुरावा मानावा असा अट्टाहास बाळगत नाहीत, मांसाहारी माणसं.




मांसाहार हाच कसा ग्रेट आहे, हे सांगण्यासाठी वैज्ञानिक परिभाषेत अवैज्ञानिक दावे करीत नाहीत, मांसाहारी माणसं.


दाण्याने कंच भरलेली शेतातील कणसे पाहून उद्या हे धान्य कुणाचे तरी भक्ष्य होणार म्हणून शोकगीत गात आपल्या हळव्या संवेदनशीलतेचे बटबटीत प्रदर्शन करीत नाहीत, मांसाहारी माणसं.


एरवी कुणाच्या करांगुलीवर लघुशंका करण्याइतकेही औदार्य स्वतःपाशी नसताना उगाच जगाच्या कल्याणा मांसाहाराचा प्रचार करीत फिरत नाहीत, मांसाहारी माणसं.


सर्वांनी खाऊन पिऊन सुखी असावं. आपण जे खावं, प्यावं, ल्यावं त्याचंच अर्घ्य देवाला दाखवून दैवतांचेही मानुषीकरण करावं, इतकं साधं निर्व्याज जगतात, मांसाहारी माणसं.


रानातील झाडाने ऋतुकाळाप्रमाणे फुलांनी डवरावं कधी पानगळीनं शहारावं तसं अगदी ताजं, स्वच्छ निर्मळ जगतात, मांसाहारी माणसं.

धम्मग्रंथांचे पठन म्हणजे अधम्म होय





१. बाह्मणांनी सर्व भर विद्येवर दिला आहे त्यांची अशी शिकवण आहे की विद्याच अथ (सुरवात) आहे आणि विद्याच इती (शेवट) आहे. यापुढे कशाचाही विचार करण्याची आवश्यकता नाही


२. याविरुद्ध बुद्ध सर्वांकरिता विद्या, सर्वांना शिक्षा याचा पक्षपाती होता. याशिवाय मनुष्य प्राप्त ज्ञानाचा, विद्येचा उपयोग कसा करतो यात बुद्धाला अधिक रुची होती. ज्ञानासाठी ज्ञान यात त्याला काही गम्य नव्हते.


३. परिणामस्वरूप त्याचा आग्रह होता की, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे शीलही असलेच पाहिजे. शीलाशिवाय ज्ञान म्हणजे अनर्थाला आमंत्रणच.


४. भिक्खू पटीसेनाला बुद्धाने जे सांगितले त्यात बुद्ध प्रज्ञेच्या तुलनेने शीलाला अधिक महत्त्व देतो हे स्पष्ट आहे.


५. प्राचीन काळी बुद्ध श्रावस्ती येथे वास करीत होते तेव्हा त्याच वेळी श्रावस्ती येथे पटीसेन नावाचा वृद्ध याचक वास्तव्याला होता. तो प्रवृत्तीने मंदमती आणि मूढमती होता. त्याला एका गाथेचे अध्ययन करणेही कठीण होते.


६. अशा स्थितीत बुद्धाने पाचशे अर्हतांनी क्रमाक्रमाने एक एक दिवस त्याला शिकवावे अशी व्यवस्था केली. तीन वर्षे उलटून गेली तरीही त्याला एकही गाथा मुखोद्गत करता आली नाही. 


७. तेव्हा त्या जनपदातील सर्व प्रकारचे लोक (चारही वर्गातील लोक) त्याचे अज्ञान जाणून त्याची निंदा करू लागले. त्याची टवाळी करू लागले. बुद्धाला त्याची दया आली. बुद्धाने त्याला आपल्या निकट बोलाविले आणि मृदु मधुर स्वरात पुढील गाथा कथन केली. "ज्याची वाणी संयत आहे. ज्याचे चित्त संयत आहे. जो कायेने कोणावरही आघात करीत नाही असे आचरण करणाऱ्या माणसाला निर्वाण प्राप्त होते."


८. पटीसेन तथागताच्या करुणेने हेलावला. त्याचे चित्त प्रमुदित झाले. त्याने गाथा पुनरुक्त केली. मुखोद्गत केली.


९. बुद्धाने त्याला पुढे असा उपदेश केला की, "हे वृद्ध भिक्खू, तुला फक्त एकच गाथा अवगत आहे. इतरांना याची माहिती आहे. ते तुझी निदा करतील. म्हणून मी तुला या गाथेचा अर्थ विस्ताराने स्पष्ट करून सांगणार आहे. तू सावधान चित्ताने तो ग्रहण करावा


१०. त्यानंतर बुद्धाने कायेचे तीन अकुशल कर्म, वाणीचे चार अकुशल कर्म आणि चित्ताचे तीन अकुशल कर्म त्याला स्पष्ट करून सांगितले. त्याला हेही स्पष्ट करून सांगितले की या अकुशल कर्मापासून विरत झाल्यास माणसाला निर्वाण प्राप्त होते. बुद्धाने त्याला अशाप्रकारे देशना दिल्याने त्या भिक्खूला सत्याचे ज्ञान झाले. तो अर्हत पदास प्राप्त झाला.


११. याचसमयी पाचशे भिक्खुनी विहारात वास्तव्याला होत्या. त्यांनी बुद्धाकडे आपणा पैकी एकीला पाठविले आणि प्रार्थना केली की, त्यांना धम्मोपदेश देण्यासाठी भिक्खू पाठवावा.


१२. त्यांची प्रार्थना बुद्धाने स्वीकारली. बुद्धाने अशी मनीषा व्यक्त केली की पटीसेनाने त्यांच्याकडे जावे आणि त्यांना धम्मोपदेश द्यावा.


१३. ही व्यवस्था केली आहे हे ऐकल्यावर त्या सर्व भिक्खुनी हसू लागल्या त्यांनी सर्वांनी असे ठरविले की, भिक्खु पटीसेन उद्या आल्यावर त्या गाथेचे उलटे पठन करावे म्हणजे तो वृद्ध भिक्खु गोंधळून जाईल व लज्जित होईल


१४. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो भिक्खू आला तेव्हा सर्व लहान थोर भिक्खुनींनी त्याचे स्वागत केले. त्याला वंदन केले. असे करताना त्या एक दुसरीकडे पाहून स्मित करीत होत्या


१५. त्यांनी त्या भिक्खूला आसन प्रदान केले. तो आसनस्थ झाल्यावर त्याला त्यांनी अन्नदान केले अन्न ग्रहण करून कर प्रक्षालनानंतर त्यांनी त्या भिक्खूला धम्मोपदेश द्यावा अशी प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना स्वीकारून भिक्खू पटीसेनाने धम्मासन ग्रहण केले आणि धम्मोपदेशास प्रारंभ केला


१६. "भगिनींनो, मी अल्पबुद्धी आहे. माझे ज्ञान सीमित आहे. मला फक्त एकच गाथा अवगत आहे. मी ती गाथा आपणापुढे कथन करणार आहे. मी त्या गाथेचा अर्थही आपणास स्पष्ट करून सांगणार आहे. तुम्ही हा उपदेश सावधान चित्ताने ग्रहण करावा आणि समजून घ्यावा.


१७. त्यानंतर सर्व युवा भिक्खूंनीनी ती गाथा उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला परंतु हे काय । त्यांच्या मुखातून शब्दच बाहेर पडले नाही. त्या लज्जित झाल्या त्या दुःखी कष्टी झाल्या त्यांच्या माना लज्जेने खाली वाकल्या.


१८. पटीसेनाने ती गाथा गायिली. ज्याप्रमाणे बुद्धाने त्याला ती गाथा समजावून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाधेचा अर्थ विशद करून सांगितला.

कोण संविधान बदलणार ?

 

कोण संविधान बदलणार ?








सर्व म्हणतात ,आम्ही संविधान बदलू, आम्हाला संविधान बदलावे लागेल, आम्ही संविधान बदलण्यासाठी सत्तेत आलो आहोत, संविधान बदलल्याशिवाय पर्याय नाही. हि भाषा गेली 70 वर्षांपासून बोलली जात आहे. यात मुख्य समस्या म्हणजे यातले काही महानग IPC (Indian Penal Code) लाच संविधान समजतात. संविधान आणि IPC यातला फरकच आजून या लोकांच्या लक्षात आला नाही ते लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. खरे तर ज्या लोकांनी संविधान बदलण्याची भाषा केली त्यांचा संविधानाचा अभ्यास 0% इतका आहे. यातल्या कोणीही संविधान पूर्णपणे वाचून बघितलेले नाही. 


ज्यांनी कोणी दोन चार कलमे वाचली असतील त्यांना त्याचा अर्थही समजला नसेल. एखादी कादंबरी, एखादी कविता, एखादी कथा वाचण्याइतके संविधान वाचणे सोपे नाही. आणि कोणी जनिवपूर्वक वाचलेच तर ते समजणे सोपे नाही. मला तर असे वाटते की संविधान बदलण्याची भाषा करणारे ते लोक आहेत ज्यांना बारावीला सायन्स शाखा अवघड वाटली म्हणून पदवी ला कला शाखेत प्रवेश घेतला असेल. या लोकांना ना सायन्स समजले आहे ना कला शाखा. अशा लोकांना संविधान काय समजेल. 


    मुळात भारताची संविधान सभा हि जगातली सर्वात ज्यास्त विद्वान असलेल्या लोकांची सभा होती. कारण या संविधान सभेत 100 हुन अधिक लोक हे बॅरिस्टर होते. भलेही तत्कालीन परिस्थितीत भारताची साक्षरता कमी असली तरी संविधान सभा मात्र उच्च शिक्षित लोकांनी गच्च भरलेली होती. अशा विद्वान लोकांनी दोन वर्षे, अठरा महिने आणि सतरा दिवस चर्चा करून हे संविधान तयार केले आहे. म्हणूनच प्रसिद्ध ब्रिटिश लेखक ग्रॅनव्हिल आॅस्टिन यांनी भारतीय संविधानाला ‘राष्ट्राची कोनशीला’ असे संबोधले आहे.


 महत्वाचे म्हणजे हे संविधान तयार होण्यापूर्वीच भारतात संविधानाचे 7 मसुदे तयार होते, जे कि संविधान सभेला सदरही केले होते पण या सात पैकी संविधान सभेने कोणताही मसुदा स्वीकारला नाही. महत्वाचे म्हणजे यात भारताच्या स्वातंत्र्याची लढाई लढणारे आणि संविधान सभेत बहुमत असलेले काँग्रेस चे सर्वेसर्वा  महात्मा गांधी यांचा देखील एक मसुदा होता जो स्वतः महात्मा गांधी यांनी मागे घेतला. आपण या सातही मसुद्यावर नजर टाकली तरी असे लक्षात येते की, हे सातही मसुदे कोण्या साधारण व्यक्तींनी तयार केलेले नव्हते. यात प्रामुख्याने खालील मसुद्यांचा समावेश होता. 


1. मोतीलाल नेहरु यांनी 1928 मध्ये ‘द नेहरु कमिटी रिपोर्ट’ च्या मध्यमातून पहिला मसुदा  तयार केला होता. 


2. मानवेंद्रनाथ राॅय यांनी 1944 मध्ये  ‘काॅन्स्टिट्याूशन फाॅर फ्री इंडिया’ या नावाने न्या. मू. श्री. वि. म. तारकुंडे, प्रा. गोवर्धन पारिख व प्रा. विनयेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या सहकार्याने 137 कलमांचा भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. 


3. हिंदू महासभेने 1944 मध्ये ‘ काॅन्स्टिट्युशन आॅफ हिंदुस्थान फ्री स्टेट’ या नावाने संविधानाचा आराखडा तयार केला. 


4. नारायण अगरवाल यांनी 1946 मध्ये ‘हिंसेचे पर्यवसान केंद्रीकरणात होते; अहिंसेचे मर्म .विकेंद्रीकरणात आहे.’ या गांधीवादी तत्त्वाच्या आधारावर ‘द गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर  फ्रि इंडिया’ या शीर्षकाखाली 22 प्रकरणात विभागलेला 60 पानांचा व 290 कलमांचा भारतीय संविधानाचा आराखडा तयार केला. 


5. समाजवादी पक्षाने 1948 मध्ये  ‘ड्राफ्ट काॅन्स्टिट्युशन आॅफ द इंडियन रिपब्लिक’ या नावाने 27 प्रकरणात विभागलेला व 56 पानांचा व 318 कलमांचा संविधानाचा आराखडा तयार केला. 


6. याच दरम्यान डाॅ. बी. आर. आंबेडकरांनी 1947 मध्ये ‘स्टेट अॅन्ड मायनाॅरिटीज,  त्यांचे अधिकार आणि स्वतंत्र भारताच्या संविधानात त्यांना संरक्षण कसे द्यावे’ या अनुशंगाने एक आराखडा तयार केला होता. 


7. या व्यतिरिक्त ‘द रिव्होल्युशनरी (हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लीक असोसिएशन 1925) या संघटनेने 1928 मध्ये ‘पुर्ण स्वराज डिक्लेरेशन 1930’ या शीर्षकाचे 4 पानांचे व 25 कलमांचे एक मेमारंन्डम तयार केले होते. 


आता प्रश्न असा शिल्लक राहतो कि, जर 1947-48 पूर्वीच संविधानाचे इतके मसुदे तयार होते तर यातला कोणताही एक मसुदा स्वीकारून देशाचा कारभार करता आला असता. महात्मा गांधी तर संविधान सभेत बहुमत असलेल्या काँग्रेसचे नेते होते, शिवाय मोतीलाल नेहरू यांनाही काँग्रेस आदर्श मानत होती यांच्यापैकी कोणत्याही एकाच मसुदा काँग्रेस ने सहज स्वीकारला असता. हिंदू महासभेनेही आपले धार्मिक वजन वापरून तत्कालीन परिस्थितीत सरकारवर दबाव आणून आपला मसुदा मंजूर करून घेतला असता. पण असे काहीही झाले नाही किंवा असा कोणीही प्रयत्न केला नाही. उलट आपले स्वतःचे सर्व मसुदे या नेतेमंडळींनी बाजूला ठेवले आणि संविधानाचा स्वतंत्र मसुदा तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवड केली. 


संविधान सभेत 100 हुन अधिक लोक बॅरिस्टर असताना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच निवड का केली गेली? मुळात या शंभर पैकी कोणीही मसुदा तयार करण्यास तयार नव्हता. म्हणून संविधान सभेने ब्रिटिश संविधान तज्ञ विलियम आयव्हर जेनींग याना निमंत्रित करण्याचे ठरविले. प. नेहरू यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांनी जेनींग यांची भेट देखील घेतली. पण जेनींग यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुमच्याकडे असताना माझी आवश्यकता का भासतेय? 


असा उलट प्रश्न विजयालक्ष्मी पंडित यांच्या मार्फत संविधान सभेला विचारला. यावर संविधान सभेने उत्तर न देता थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत कसे येतील यांच्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुरुवातीला ते बाहेर राहावेत यासाठी प्रयत्न करणारे सर्व नेते देखील त्यांना निवडून आंण्यासाठी प्रयत्न करू लागले. शेवटी एका बॅरिस्टर चा राजीनामा घ्यावा लागला आणि त्यांच्या जागी  दुसरा बॅरिस्टर निवडून आणावा लागला. अन्यथा संविधान सभेला मसुदा समितीसाठी योग्य उमेदवार भेटलाच नसता.  बॅ. तेजबहाद्दूर सप्रु, बॅ. एम. महादेवन यांनी तर स्पष्टपणे संविधान सभेला नकार कळवला होता. 


तत्कालीन परिस्थितीत संविधान सभेत 100 हुन अधिक बॅरिस्टर असताना अशी अवस्था होती तर आजच्या संसदेची काय अवस्था असेल याचा विचार न केलेलाच बरा. आज संसदेत जे लोक बसले आहेत त्यांच्या डिग्रीचा शोध घेता घेताच पुढचे 70 वर्ष निघून जातील. जे नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत त्यांनी आपल्या पदव्या, कायद्याचे ज्ञान जाहीर करावे व त्यांच्या अनुयायांनी आपल्या नेत्यांची औकात तपासून बघावी म्हणजे त्यांना लक्षात येईल की आपण कोणाला नेता मानतो आणि कोणाचे समर्थन करतो. 


अशा अंध भक्तीने प्रभावित कार्यकर्ते आणि नेत्यामुळे संविधानच नाही तर लोकशाही आणि इथला प्रत्येक माणूस देखील अडचणीत सापडला आहे. 1952 च्या निवडणुकीवेळी आमचे पूर्वज अशिक्षित होते पण त्यांनी विद्वान नेते निवडले आज आम्ही सुशिक्षित झालो आणि अडाणी नेत्याच्या मागे फिरू लागलो. त्याचे परिणाम आमच्या भविष्यावर पडत आहेत.


 पण आम्ही आमच्या नेत्याचं ऐकून संविधानाला दोष देत बसलो आहोत. यातून आम्हाला बाहेर यावं लागेल. जर बॅरिस्टर असलेले महात्मा गांधी, बॅरिस्टर असलेले हिंदू महासभेचे सावरकर यांनी आपले संविधानाचे  मसुदे मागे घेतले असतील तर आज तुमच्या अडाणी नेत्यांची संविधान बदलण्याची आणि दुसरे संविधान तयार करण्याची औकात काय असेल? याचा विचार त्यांच्या विद्वान अनुयायानीच करावा हीच त्यांना नम्र विनंती असेल. 

                     -----------------------------प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई - ७०६ 


( लेख अच्छा लगे तो प्रोत्साहन राशि भेट स्वरूप दे ..दूरध्वनी : ९७०२ १५८ ५६४)

 

 


                                             लेख आवडला तर  धम्मदान करा   .......... 

अपील : मी प्रा. बी.  आर.  शिंदे ,(विशेष शिक्षा कर्णबधिर विभाग ,भारत सरकार ) सध्या सामाजिक कार्यासाठी लेखन स्वरूपात  स्वताला समर्पित केले आहे . पूर्वी कर्णबधिर  सरकारी क्षेत्रात  कार्यरत होतो . तिथे पण मी ३१ वर्ष सेवा केली आहे . शेवटी आपले घर आपला  समाज ,हयाचे ऋण देणे असते , ते मी करीत आहे .आपले हे हेच कर्तव्य असायला हवे .  समाज कार्य करण्यास नक्कीच अर्थसहाय्य करावे .  हयाच  मूळ कारणाने समाज आज तळा गाळात आहे .राष्ट्रपिता  महात्मा फुले यांनी सांगितल्या प्रमाणे ' अर्था विना शूद्र खचले ' माझ्या  सारख्या अनेक धुरीण व्यक्तीने मोठया कसोसिने समाजात विविध पदावर राहून ,वेगवेगळ्या क्षत्रात कार्य केले आहे . 

 

    तेच कार्य मी आज एक खारीचा वाटा  उचलून कार्य करण्याचा  करीत आहे ,आपण ही एक खारीचा वाटा होऊन समाज कार्य करावे ही अपील आहे. आणि उपरोक्त गुगल लोगोवर आपल्या इच्छे प्रमाणे मदत करावे हे माझे अपील आहे . 

 

जय भीम ! नमो बुद्धाय ! 

 




आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती

 आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते. ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जो पर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते तो पर्यंत रावणाने पाप केले तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता, परंतु जेव्हा बिभीषणा सारख्या  भक्ताला लाथ मारली व लंके मधून निघून जाण्यास सांगितले, 

    तेव्हापासून रावणाचा  विनाश होण्यास  सुरूवात झाली आणि शेवटी  रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही! अशाचप्रकारे हस्तिनापूर मध्ये जो पर्यंत विदूरासारखे भक्त राहात होते तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदूरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की 'काका! आपण तीर्थयात्रेला जावे'. जसे विदुरने हस्तिनापूर सोडले, कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि  कौरवांच्यामागे कोणीही वारस राहिले नाही !! 

    याचप्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात जो पर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तो पर्यंत  आपण व आपल्या घरात आनंदी आनंद असतो. विचार करा! एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ति जेंव्हा आपला त्याग करते तेंव्हा पासून आपली ओहटी सुरु होते. म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. 

    लक्षात ठेवा, आपण जे कमाऊन खातो ते कुणाच्या तरी पुण्याईने  मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परीवारात कोणी भक्त, भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. 

    आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा. व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत रहा !!  सोबत काही घेऊन आलो नाही व  जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा..!!*

सुंदर बाराखडी

 किती सुंदर बाराखडी


अ : अशुद्ध अंतकरण शुद्ध असावे.

आ: आत्मा कुणाचाही दुखवू नये.

इ : इच्छाशक्ती प्रबळ असावी.

ई : इमानदारीने काम करावे.

उ: उपकार कुणाचाही घेऊ नये.

ऊ : ऊठसूट कुणाकडे धावू नये.

ए : ऐतखाऊ बनून जगू नये.

ऐ : ऐकावे जनाचे करावे ज्ञानाचे.

ओ : ओझे कुणावरही होऊ नये.

औ : औकात कृतीतून सिद्ध करावी.

अं : अंदाजे तर्क - वितर्क करु नये.

अ: : अ:! वा शब्द बोलावेत.

क : कपट मनी कधी नसावे.

ख : खरं तेच आपलं म्हणावं.

ग : गर्व,अहंकार करु नये.

घ : घमेंड कशाचीही करु नये.

च : चमचेगिरी करु नये.

छ : छळ कुणाचाही करु नये.

ज : जपून जपून शब्द वापरावेत.

झ : झऱ्यासारखं निर्मळ असावं.

ट : टणक असावे पोलादासारखे.

ठ : ठकास नेहमी महाठक असावे.

ड : डर मनात बाळगू नये.

ढ : ढगांसारखंच प्रेम बरसावं.

ण : ण...ऐकणाऱ्यांस शिकवू नये.

त : तक्रार करुनी जगू नये.

थ : थंडपणा कामात असू नये.

द : दगडासारखा निर्दयी असू नये.

ध : धनांत लालच असू नये.

न : नम्रशब्दातून मन जिंकावे.

प : पटकन हो - नाही म्हणू नये.

फ : फजिती कुणाची करु नये.

ब : बडबडीपेक्षा कृती करावी.

भ : भय मनात बाळगू नये.

म : मजबुरीचा फायदा घेऊ नये.

य : यशासाठी मनी तळमळ असावी.

र : रंग सरडयासम बदलू नये.

ल : लबाड संगत करु नये.

व : वजन कृतीतून सिद्ध करावे.

श : शहाणपणाने जीवन जगावे.

ष : षडयंत्र कधी रचू नये.

स : सहनशक्ती अंगी असावी.

ह : हसून उपहास करु नये.

ळ : लबाळपणाने जगू नये.हे 

क्ष : क्षमा, मन-हृदयातून करावी.

ज्ञ : ज्ञान परिसाला अखंड स्मरावे

अंग्कोरवाट महाविहार

 



कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकांची सत्ता होती. वर्ष होते १८६०. त्या काळोख्या दाट जंगलात पुढे पाऊल ठेवण्यासाठी त्याला झुडपे, वेली तोडतच पुढे जावे लागतं होते. किर्र जंगलात शोधता शोधता अचानक त्याला समोर असे काही दिसले की त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले! क्षणभरं त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना!

समोर होती, त्याच्या नजरेच्या कवेत मावत नव्हती, एवढी प्रचंड इमारत! संपूर्ण दगडात बांधलेली! जंगलामध्ये लुप्त! शेकडो वर्षांपासून मानवी हस्तक्षेपासून दूर, महाकाय झाडांनी वेढलेली.


अवाढव्य, महाप्रचंड आणि अदभूत!

खरेतरं, अविश्वसनीय!

त्याने त्याच्या आयुष्यात एवढी महाप्रचंड इमारत पाहिली नव्हती. त्यानेचं काय, संपुर्ण युरोप खंडात कोणीही अशी इमारत पाहिली नव्हती. पाहणार तरी कशी? कारण एवढ्या प्रचंड आकाराची इमारत संपूर्ण युरोपमध्ये नव्हतीचं! कोणी बांधण्याचा विचारही करू शकतं नव्हते. आधुनिक तंत्रज्ञानात स्वत:ला खुप प्रगत समजणाऱ्या संपुर्ण युरोपला आणि जगाला थक्क करणारी ही घटना होती!

हे एक बुद्ध विहार होते. नाव होते, 'अंग्कोर वाट'!

एक महाविहार ! भारतापासून ५००० किलोमीटर दुर देशातील एक महाकाय बुद्ध विहार !

आजमितीसही, 'अंग्कोर वाट' जगातले सर्वात मोठे वंदना स्थळ आहे! जगात कुठल्याही धर्माचे एवढे मोठे प्रार्थनास्थळ नाही.

एवढे अवाढव्य वंदना स्थळ त्यापुर्वी ना कोणी बांधले होते, ना कोणी नंतर बांधू शकला!


एका कंबोडियन बौद्ध सम्राटाने हे बांधले होते १२व्या शतकात! इसवीसन ११५०च्या सुमारास!

मात्र, १५व्या शतकापासून काही अनाकलनीय कारणाने ते जंगलात लुप्त झाले होते. मंदिरातले बोटावर मोजण्याएवढे बौद्ध भिक्षू आणि मंदिर परीसरात राहणारे काही आदिवासी खेडूत वगळता, शेकडो किलोमीटर अंतरात लोकवस्तीही नव्हती...

५०० एकर एवढ्या भव्य क्षेत्रफळावर बांधलेले 'अंग्कोर वाट' विहार आहे, भगवान बुद्धांचे...!

 मुख्य प्रवेशद्वारापासून गर्भगृहापर्यंत पोहोचायलाचं ३ ते ४ किलोमीटर चालावे लागते! विहाराच्या सभोवती एक आयताकृती कालवा आहे, त्याचीच एकत्रित लांबी ५.५ किलोमीटर आहे!

४ मिटर खोल असलेल्या या कालव्याची रूंदी आहे २५० मिटर म्हणजे पाव किलोमीटर! हा कालवा ओलांडूनच विहाराच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतां येते! फक्त पहिल्या प्रवेशद्वारापाशी, विहारात नाही!

पुढे अशी अजून दोन प्रवेशद्वारे ओलांडूनचं आपण मुख्य विहाराजवळ येतो!


तत्कालीन कंबोडियन बौद्ध राजा (दुसऱ्या) सुर्यवर्मनने हे भव्यदिव्य विहार घडवले, तेव्हा कालांतराने ही वास्तू जगातल्या आश्चर्यांपैकी एक मानली जाईल, असे त्याला वाटलेही नसेल!

 'अंग्कोर वाट'पेक्षा आकाराने निम्म्या वा त्याहूनही छोटे असणाऱ्या युरोपातले 'कॅथेड्रल्स' बांधायला १५० ते २०० वर्षे लागली, काहींना ३००!

दुसऱ्या सुर्यवर्मनने हे विहार घडवले ते फक्त ३० ते ३५ वर्षात!


लाखो कंबोडियन नागरिक,कामगार, कारागीर, मूर्तीकार, निष्णात अभियंते, वास्तूरचनाकार, शेकडो हत्ती, हजारो बैलगाड्या, तराफे या विहारासाठी ३५ वर्षे अविरतं झटतं होते!

४८ लाख टनांपेक्षा जास्त दगड लागले, ही वास्तू पुर्ण करण्यासाठी. बरं हा दगडही मंदिराच्या जवळपास ऊपलब्ध नव्हता, तो आणावा लागला दुर असलेला महेंद्र नामक पर्वत फोडून. रस्तामार्गे हे जड दगड वाहाणे अशक्य होते. नदीतून आणावे म्हंटले तर अशी नदीही या बांधकाम स्थानापासून दुर होती. अंतर जवळपास ८०-९० किलोमीटर होत होते. एवढे वजनदार आणि एवढ्या संख्येने दगड वाहून आणने, महाकठीण काम. 


दुसऱ्या सुर्यवर्मनकडे या अवाढव्य  महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. वैभवशाली राज्य असल्याने पैशांचा तर महापुर होता, नव्हता तो फक्त वेळ! 

त्याला त्याच्या जिवनकालातचं हे विहार पुर्ण करायचे होते. मग या राजाच्या बुद्धिमान अभियंत्यांनी महेंद्र पर्वतापासून मंदिराच्या स्थानापर्यंत महाप्रचंड असे कालव्यांचे जाळे ऊभारले!

सारेचं अवाढव्य!

डोंगरातून कापलेले दगड तराफ्याने कालव्यांमार्गे बांधकामाच्या ठिकाणी आणले जायचे, तिथे त्यांना जरूरीप्रमाणे कापले जायचे. एकमेकांवर घासून हे कठीण दगड चारही बाजूने सपाट केले जायचे आणि मग बांधकामात वापरले जायचे! दगडाचे असे किती तुकडे एकूण बांधकामासाठी लागले, याची मोजदाद अशक्य!


या साऱ्या बांधकामासाठी ना सिमेंट, ना काँक्रीट ना लोखंड! सगळे बांधकाम दगडावर दगड रचून साकारायचे म्हणजे अतिशय कठीण आणि जोखमीचे काम!

आतमध्ये दगडी भित्तिचित्रे असलेल्या दोन-दोन किलोमीटर लांब दगडी 'गॅलरीज' आहेत (यांचे छप्परसुद्धा दगडाचेच). त्यांना आधार द्यायला जे असंख्य खांब आहेत, ते सगळे इतके काटेकोरपणे सरळ रांगेत की तसुभरही फरक नाही.

एक मिलिमीटर सुद्धा मागे पुढे नाही! आजकालच्या 'लेझर' किरणांच्या तोडीस तोड तंत्रज्ञान! बांधकामातले कौशल्य अचंबीत करते! अतिशय अवघड असे हे तंत्रज्ञान. 

या तंत्रज्ञानाविषयी फारशी माहिती आता ऊपलब्ध नाही, पण हे लोक फारचं प्रगत तंत्रज्ञान वापरत होते, यात शंकाच नाही!

अशा ३ गॅलरीज आहेत. ह्या ज्या लांबलचक गॅलरीज आहेत, त्यांनी संपुर्ण मंदिराला विळखा घातलायं. २५० मिटरचा कालवा ओलांडून आले की, एक प्रवेशद्वार. ते ओलांडून एक-दिड किलोमीटर पार केल्यावर दुसरे प्रवेशद्वारं. हे प्रवेशद्वार पहिल्या आयताकृती  महाप्रचंड गॅलरीचा भाग आहे. ते पार करून थोड्या ऊंचावर दुसरी आयताकार गॅलरी सुरू होते. ती पार करून मग तिसरी आणि मग मुख्य विहाराची सुरुवात!


या सगळ्या गॅलरीज एकापेक्षा एक ऊंचावर आहेत. एका पिरॅमिड सारखी रचना. सगळ्यात वर विहाराचे आभाळात घुसलेले ५ कळसं.... एक मुख्य कळस मध्यभागी आणि चार उपदिशांना ऊंचीने थोडे कमी असलेले  चार  कळस. सुरूवातीला ओलांडून यायच्या कालव्यापासून ऊंची मोजली, तर मुख्य कळसाची ऊंची २३३ मिटर आहे! म्हणजेचं ७०-८० मजली ऊंच इमारती एवढी!

हे विहार पुर्ण झाले आणि आजुबाजुला लोकवस्ती झाली, तेव्हा लंडनची लोकसंख्या होती ३०,०००, आणि 'अंग्कोर'ची लोकसंख्या होती दहा लाख!


युरोपात औद्योगिक क्रांती होण्याअगोदरचे जगातले सर्वात मोठे शहर!

बांधकामाच्या कलेत आणि शास्त्रात प्राविण्य असलेले, बौद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, एक सुसंस्कृत शहरं!

( हे भरभराटीला आलेले शहर, विहार पुढच्या दोन-तिनशे वर्षांत, ओसाड पडेल, असे तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटले नसेल....)

आजही भल्या भल्या अभियंत्यांना तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या या विहाराची रचना, बांधणी त्याकाळी कशी केली असेल या विचाराने थक्क व्हायला होते!

या गॅलरीजमध्ये अडीच मिटर ऊंच आणि एकत्रित साडेचार किलोमीटर लांब अशी दगडात कोरलेली असंख्य आणि अखंड भित्तिचित्रे आहेत!

पौराणिक कथा, सिद्धार्थाचे जीवन आणि दुसऱ्या सुर्यवर्मनची कारकिर्द दगडात कोरलीयं!

विहारात जवळपास १५०० अप्सरा कोरल्यात, प्रत्येक अप्सरा वेगळी! एकीसारखी दुसरी नाही. सारख्या वाटल्या आणि निरखून पाहिले तर पैंजण तरी वेगळे असेल, बाजुबंद तरी वेगळा असेल, हार वा कंगण तरी वेगळे असेल वा केशभूषा!

अविश्वसनीय आणि अतर्क्य!


ही सगळी भित्तिचित्रे बघायची म्हंटली तर चार-पाच किलोमीटरची पायपीट आलीचं!

हे सारे कोरीवकाम दगडी भिंतीवर तिन ते चार इंच खोलीत!

 हे कोरणे तर अवघडंच, पण असा एवढा मोठा 'कॅनव्हास' तयार करणेही सोपे नव्हते. एकावर एक अशा दहा-बारा शिळा चढवून भिंत बनवलेली. दोन दगडांमध्ये हवासुद्धा जाऊ नये इतके एकमेकांवर घासायचे, नंतर पुर्ण भिंत नाजूक  छिन्नी-हातोड्याने एकसंध बनवायची आणि मुर्तीकारांच्या सुपूर्द करायची.

मग या कलाकारांचे कोरायचे काम सुरू! भित्तिचित्रे कोरताना एखाद्यावेळी हातोडा जोरात पडला, एखादी चुक झालीच,

तर संपूर्ण भिंतच परत रचायची! परत सपाट करायची आणि परत पहिल्यापासून कोरायला सुरूवात करायची!


असे अवाढव्य बुद्ध विहार बांधायची कल्पना करणे, असंख्य अडचणींवर मात करून ती कल्पना प्रत्यक्षात उतरवने हे सारेचं अफलातून!

असे म्हणतात की या विहाराच्या ऊभारणीसाठी दुसऱ्या सुर्यवर्मनच्या राज्यातील प्रत्येक कुटूंबातील एकजण तरी सहभागी होता.

धन्य ती सारीचं मंडळी!

हे असले काही भव्यदिव्य पाहिले की हात आपोआप जोडल्या जातात. भारतीयांच्या तत्कालीन स्थापत्यज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा अभिमान वाटतो आणि आपल्याला किती महान संस्कृतीच्या ओटीत बाबासाहेबांनी टाकलय याची जाणीव होते! पण दुर्दैव असे की या महाकाय बौद्ध विहाराच्या उल्लेख विष्णू मंदिर असा केला जातो आणि भारत देश तेथे धार्मिक सहलीचे आयोजन करीत आहे, भारतातील सर्व बौद्धांनी या जागतिक वारसाला भेट देऊन एका दैदिप्यमान स्मृतीला वंदन केले पाहिजे. आणि खोटा इतिहास सांगणारे व लिहिणारे यांचे मनसुबे हाणून पाडले पाहिजे.

या जगाला युद्धाची गरज नाहीच. फक्त बुद्धाची गरज आहे हे इतर देशांनी हजारो वर्षापूर्वी ओळखले आणि युद्ध सोडून बुद्धाला शरण आल्याचे हे जीवंत उदाहरण आहे.

                                         

स्त्री_आणि_अंधश्रद्धा

 






गाढवाला सुरुवातीला मालक बांधून ठेवतो, पळून जाऊ नये म्हणून पण नंतर ते त्याच्या सवयीचे होते आणि मालकाने नुसती बांधायची ॲक्शन केली तरी ते पळून जात नाही. न बांधता पण गाढव जागेवर उभे रहाते

पिंजऱ्याची सवय लागली आणि पोपट उडायचे विसरला की त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढले तरी तो उडत नाही .आपल्याला उडून स्वतंत्र होता येते हेच तो विसरतो

  

लोकांना वाटते स्त्री शिकली आता तिला पूर्वी सारखे बंधनं नाहीत. ती आता मुक्त जगेल पण नाही हो या बेड्यांची सवय झालीय तिला आणि त्या बेड्या आता अलंकार समजून ती अभिमानाने मिरवतेय. त्या बेड्या आहेत आणि तुझी गुलामगिरी संपली तरी तू मानसिक गुलामीत जगतेय याची तिला जाणीव करून द्यावी लागेल

  

आत्ता नुकतीच हाथरस येथे एका सत्संगात चेंगरा चेंगरीची घटना घडली. ही काही चेंगरा चेंगरीची पाहिलीच घटना नाही. जिथे धार्मिक कार्य तिथं स्त्रियांची गर्दी जास्त, ही गर्दी प्रमाणा बाहेर गेली की चेंगरा चेंगरी आणि मृत्यू


स्त्री अंधश्रद्धेतून बाहेर काढायची असेल तर आधी ती या अंधश्रद्धेत कशी अडकली हे पहावे लागेल


1.शिक्षणाचा अभाव

पूर्वी स्त्री शिक्षण कोणत्याच धर्मात दिले जात नसायचे.धार्मिक पोथी वाचणे म्हणजे शिक्षण नव्हे. अगदी 18 व्या शतकापर्यंत पाश्चिमात्य देशात पण ही बंदी होती. काही शिक्षण स्त्रीसाठी वर्ज्य होते त्यामुळे ती अज्ञानी राहिली त्यामुळे सहज अंधश्रद्धा, चुकीच्या समजुतींना बळी पडली. धर्माभिमानी झाली... कारण जीवनात संसार आणि मुलं यांच्यापलिकडे फक्त धार्मिक गोष्टीचं तिला मन रमवायला आणि पालन करायला होत्या


2.निर्णय_स्वातंत्र्य_नसणे -

आजही कित्येक घरात स्त्रियांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. पूर्वी तर नव्हतेच त्यामुळे तिला स्वतःची ईच्छा पूर्ण करण्याचे माध्यम म्हणजे देव मग नवस, उपवास, प्रार्थना या माध्यमातून स्वतःची मागणी देवापुढे मांडणे हाच तीचा मार्ग,


3.पुरूषसत्ताक_व्यवस्था

स्त्रीला कपडा आणि अन्न दिले की तिला काही समस्याच उरली नाही असे समाजाला वाटते पण तिला अनेक समस्या आणि शारीरिक व्याधी यांना सामोरे जावे लागते. घरातील लोक अपमानकारक वागणूक देत असतात, या सगळ्यांवर उपाय तिला या बाबा, बुवा(सर्व धर्म) यांच्याकडे  सापडतो.. तो बाबा जो उपाय सांगतो ते ती करायला तयार असते कारण अज्ञान आणि निर्णय क्षमतेचा अभाव. नंतर त्यात वाहवत जाते अगदी कुटुंबाचे पण ऐकत नाही


4.समाजाची_मानसिकता

स्त्री स्वतःचे,छंद आवड जपण्यासाठी फार काळ बाहेर रहात असेल तर सामाजिक कार्य किंवा पिकनिक निमित्त बाहेर जात असेल तर सामान्य मध्यमवर्गीय, गरीब लोकं आजही पचवत नाहीत त्यापेक्षा ती प्रवचन, किर्तन, भजन यासाठी अगदी रात्री एक पर्यंत बाहेर राहिली तरी चालते मग तिचा कल याचं गोष्टींकडे वाढत जातो


5. बुवांची_हातोटी

कोणताही बुवा स्त्रियांनी कशी संस्कृती जपली पाहिजे,  स्त्रीला बंधन कसे गरजेचे आहे हे सांगत असतो, अगदी मधाळ भाषेत स्त्रीची थोरवी गात असतो पण ती थोरवी कशात आहे तर या बुवांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करण्यात, अगदी बाबा बुवा अशा स्त्रियांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक शोषण करतात तरी यांची तक्रार नसते. हे आपल्या भल्यासाठीच चालले आहे असे त्यांना  वाटते

हिप्नोटाईज होतात स्त्रिया

घरी पण नवऱ्याने प्रेम दाखवत गोड बोलून तिला काहीही करायला लावले तर ती सगळ्या समाजाशी अगदी स्वतःच्या आईबापाशी पण पंगा घेईल एवढी हिप्नोटाईज होते, तर या गोष्टीतून स्त्री ला बाहेर काढणाऱ्या, तिच्या शोषणाला विरोध करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संघटना निर्माण होणे गरजेचे आहे. त्याला सपोर्ट करावा समाजाने, स्त्रीचे प्रबोधन होणे ही गरज आहे, नाहीतर अशा घटना घडत रहाणार



स्तूपाचे प्रकार आणि त्यांचे महत्व

 


तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर एकूण नऊ स्तुपाची निर्मिती करण्यात आली होती त्यापैकी आठ स्तूप हे बुद्धाच्या शरीर धातू वर आणि नववा स्तूप ज्या पात्राने अस्थीचे वाटप केले होते त्या पात्रावर निर्माण करण्यात आला. ते अश्या प्रकारे-

१) राजग्रह स्तूप

२) वैशाली स्तूप

३) कपिलवस्तू स्तूप

४) अलाकप्पा स्तूप

५) रामग्रामा स्तूप

६) पावा स्तूप

७) कुशीनगर स्तूप

८) वेथाडीपीपा स्तूप

९) पिप्रहवा स्तूप

म्हणजे स्तूपची संकल्पना बुद्धाच्या अस्थीचे जतन करणे व संवर्धन करणे होय. सम्राट अशोक राजाला सात स्तुपातील अस्थी मिळविण्यात यश आले, परंतु ८व्या स्तुपातील अस्थी मिळवू शकले नाही तो म्हणजे रामाग्राम स्तूप. रामा ग्रामच्या नाग लोकांनी सम्राट अशोक यांना अस्थी देण्यास नकार दिला होता इतकेच नाही तर जर जबरदस्ती करत असाल तर आम्ही युद्ध करू, परंतु सम्राट अशोक यांनी कलिंगच्या युद्धा नंतर परत कधीही युद्ध करणार नाही असा निश्चय केला होता, म्हणून अस्थी नाही मिळाल्या तरी चालेल पण युद्ध नको अशी सम्राट अशोक राजांनी भूमिका घेतली, व उर्वरित ७ स्तूपा मधील अस्थी वर सम्राट अशोक राजाने ८४,००० स्तुपाची निर्मिती केली.


🎯स्तुपाचे एकूण चार प्रकार :

१) शारीरिक स्तूप : बुद्धाच्या अस्थी धातू वर निर्माण करण्यात आलेल्या स्तुपाला शारीरिक स्तूप म्हणतात.

२) परिभोगीका स्तूप, ऑब्जेक्ट स्तूप : बुद्धाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापरलेल्या वस्तू व त्यावर निर्माण करण्यात आलेल्या स्तुपाला परिभोगिका स्तुप किंवा object स्तुप म्हणतात.

३) कॉममोमोरॅटिव्ह स्तुप, सिम्बॉलीक स्तुप किंवा उद्देशिका स्तुप : बुध्दाच्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या व जिथे जिथे घडल्या. बुध्दा नि ज्या ज्या ठिकाणी प्रवचन दिले किंवा धम्म उपदेश दिले त्या ठिकाणावर जे स्तुप निर्माण केले त्याला सिम्बॉलीक स्तुप किंवा उद्देशीका स्तूप असे म्हणतात.

४) वोटिव्ह स्तूप, मन्नत स्तुप : आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपण वरील स्तूपात जाऊ शकत नाही त्या करिता पूजेचे स्थान निर्माण केले जाते व त्यावर स्तूप निर्माण केल्या जाते त्याला वोटिव्ह स्तूप किंवा मन्नत स्तुप असे म्हणतात. असे स्तूप बहुदा केणी मध्ये निर्माण केले जाते.

स्तुप एकूण आठ गटा मध्ये विभागले आहे :

१) जोथा : जोथा म्हणजे स्तुपाचा पाया किंवा खालचा भाग याला कधी कधी तीन रिंग असतात.

२) मेधी : हा जोथाच्या वरचा भाग व उंच असतो.

३) वेदिका : मेधीच्या वरचा भाग त्याला वेदिका असे म्हणतात.

४) वेदिका पट्टी : वेदिकेच्या वरचा भाग याला रेलिंग असतात हा भाग चक्रमण करण्या करिता उपयोगात येतो.

५) अंड : वेदिकाच्या वरचा भाग हा गोलाकार  असतो त्याला अंड असे म्हणतात.

६) हार्मिका : हा अंडच्या वरच्या भागावर हर्मिका असतात त्या कधी तीन तर कधी पाच असतात.

७) यशठी : हा हर्मिकेचा वरचा भाग की जो छत्रावलीला सपोर्ट करतो.

८) छत्रावली : हा स्तुपाचा सर्वात उंच व शेवटचा भाग होय.


उपलब्ध असलेले भारतातील स्तूप :


१) सांची स्तूप :

सांची स्तूप हा मध्यप्रदेश मध्ये असून भोपाल पासून २५ किमी अंतरावर आहे. हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. त्याचे उतखणन केले असता तिथे बुध्दाचे शिष्य सारीपुत्त आणि महा मोग्गलांन यांच्या अस्थी मिळाल्या आहेत. १९८९ ला या स्तूपाला वर्ल्ड हेरिटेज चा दर्जा मिळाला आहे. यांचा शोध जेव्हा मध्यप्रदेश मधून भीमा कोरेगाव च्या युद्धाला मदत करण्या करिता एक बटालियन निघाली होती परंतु यूद्धाचा शेवट दुसऱ्याच दिवशी झाल्यामुळे ते परत जात असता एका ठिकाणी थांबले व दुसरे दिवसी एका टेकडी वर शिकारीला गेले असता तिथे त्यांना काही मानव निर्मित भाग दिसून आला त्याचे उतखणन केले असता सांची स्तुपाचा शोध लागला.


२) द ग्रेट स्तूपा ऑफ अमरावती :

हा स्तूप इ.स. पूर्वी तिसऱ्या शकतात सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. याचा बराच भाग नष्ट झाला आहे. त्याचे काही शिल्प आणि आर्ट मद्रास संग्रहाय्यत  मध्ये सुरक्षित ठेवले आहे. १७९७ मध्ये ब्रिटिश आर्चलोजीस्ट मेजर कोलिन मॅकेन्झी  यांनी त्याचा शोध लावला व त्याचा प्लॅन तयार केला.


३) धामेक स्तूप :

हा स्तूप सारनाथ येथे असून सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे व मेजर जनरल सर  अलेक्जेंडर कनिंघहॅम पाच पंच वर्गीय भिक्कुना प्रथम उपदेश दिला असा उल्लेख आहे . 


४) चौखंडी स्तूप ;

हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. हा स्तूप चौरस असून त्याला आठ बाजू आहेत. याच ठिकाणी जे पाच मित्र होते ते बुध्दाला सोडून गेले होते. आठ बाजू म्हणजे आर्य अष्टणगीक  मार्ग चे प्रतीक आहे. हा स्तूप सारनाथ जवळ आहे.


५) बहरुत स्तूप :

बहरुत स्तूप हा सटना मध्यप्रदेश येथे आहे, हा स्तूप ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात सम्राट अशोक राजाने निर्माण केला. हा स्तूप सम्राट अशोक ने प्रथम निर्माण केला. हा स्तूप बराच नष्ट झाला असून त्याचे काही भाग कलकत्ता म्युझियम येथे सुरक्षित ठेवले आहे. या स्तूपाचे संवर्धन सम्राट शुंग ने इ.स. पूर्वी दुसऱ्या शतकात केले. आता तिथे फक्त काही अवशेष शिल्लक आहे. यांचा शोध सर अलेक्जेंडर कनिंघहॅम ने १८७३ मध्ये लावला. येथे काम करण्या करिता व शिल्प कलकत्ता म्युझियमला नेआण करण्या करिता ब्रिटिश सरकारने रेल्वे लाईन टाकली होती.


६) केसारिया बुध्द स्तूप :

केसारिया स्तूप हा बिहार मध्ये आहे. याच ठिकाणी बुध्दाचे महापरीनिर्वाण झाले. हा स्तूप सम्राट अशोक राजाने ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात निर्माण केला. कर्नल मॅकेन्झीयांनी १८१४ मध्ये याचा शोध लावला परंतु सर अलेक्जेंडर कनिंघहॅम यांनी १८६१-६२ मध्ये उतखनन करून याच ठिकाणी बुध्दाचे महापरी निर्वाण झाले ते सिद्ध केले.


७) देऊर कोठार बुद्ध स्तूप किंवा सोनारी स्तूप ;

हा स्तूप मध्यप्रदेश मध्ये आहे. हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. याच ठिकाणी सम्राट अशोक यांनी ८४,००० बुद्ध अस्थी धातूची वाटणी केली होती.


८) महाबोधी महाविहार किंवा महाबोधी स्तूप :

महाबोधी महाविहार याच ठिकाणी बुध्दाला ध्यान प्राप्ती झाली. सम्राट अशोक राजाने प्रत्यक्ष साईट वर हजर राहून या महाविहाराची निर्मिती केली. याच ठिकाणी संयाम देशाचे तपससू आणि भल्लिक यांना बुद्धाने केस धातू दान दिले. सर अलेक्जेंडर कनिंघहॅम यांनी १८८८ ला भेट दिली व बुध्दाचे वजरासन शोधून काढले.


९) भावीकोंडा बुध्द स्तूप किंवा महास्तूपा :

हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला. या स्तुपाचे जेव्हा उतखनन करण्यात आले तेव्हा बोन्स, पॉट, मंजुषा, जेम्स व कॉइन्स मिळाले. हा स्तूप आंध्रप्रदेश मध्ये आहे 


१०) देवणी मोरी स्तूप :

हा स्तूप गुजरात मध्ये आहे. या ठिकाणी बुद्धाच्या अस्थी मिळाल्या व त्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ येथे सुरक्षित ठेवल्या आहेत.


११) पवणी स्तूप :

हा स्तूप भंडारा जिल्ह्यात आहे. विदर्भात बौद्ध धम्माचे एक महत्वाचे ठिकाण होते तसेच याला व्यापारीक महत्व होते, तसेच ते दक्षिण भारत व उत्तर भारतला जोडण्याचे मध्यवर्ती ठिकाण होते. येथे सातवाहन सम्राट सातकरणी यांचे नाणे येथे उतखनन केले असता मिळाले. येथील काही शिल्प नॅशनल म्युझियम दिल्ली व मुंबई येथे सुरक्षित ठेवले आहे. अजून बरेच शिल्प इतस्थता विखूरले आहे. स्तुपावर अतिक्रमण करून जगन्नाथ मंदिर निर्माण केले..स्तूपाची निर्मित ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात झाली. त्याचा डायमीटर ३८.१० मिटर आहे. विदर्भातील नाग राजा मुच्चलिंद याला जेव्हा बुध्दाचे महापरिनिर्वाण झाल्याची बातमी समजली तेव्हा तो कुशीणाराला बुध्दाच्या अस्थी मिळविण्या करिता निघाला. जेव्हा तिथे पोहोचला त्यावेळी बुध्दाच्या अस्थीचे विभाजन झाले होते. ज्या ठिकाणी बुध्दाला अग्नी देण्यात आला त्या  ठिकाणावर तो गेला व त्याने हाताने सर्व माती गोळा केली त्यामध्ये त्याला दंत धातू अस्थी मिळाल्या व त्या दंत धातू अस्थी वर हा पवणी स्तूप निर्माण केला.


१२) सुलेमान टेकडी स्तूप :

हा स्तुप पवणी स्तुपा पेक्षा मोठा आहे. त्याचा डायमीटर ४१.६ मिटर आहे व हा पवनी येथे आहे. यालाच चांड कापूर स्तूप असे सुद्धा म्हणतात.


१३) हरदोलाल टेकडी स्तूप :

हा स्तूप पवणी येथे आहे. यांचे उतखनन केले असता एक मोठी दगडी शिल्प मिळाले. ते नागपूर च्या म्युझियम मध्ये सुरक्षित आहे. तसेच पवनीला एक किल्ला सुद्धा आहे.


४) सोप्पारका स्तूप ;

हा स्तूप नाला सोपारा यथे आहे. एप्रिल १८८२ ला पंडित भगवाण दास ईद्राजी या स्तुपाचे उतखनन केले असता स्टोन कास्केट, गोल्ड कास्केट, शिल्प तसेच आठ बुद्धाच्या भिक्षा पात्राचे तुकडे मिळाले व काही सोन्याचे फुले मिळाले, ते एसीयाटीक सोसायटी ऑफ इंडिया मुंबई येथे सुरक्षित आहेत. तर सम्राट अशोक चा ९ वा शिलालेख म्युझियम मध्ये सुरक्षित आहे. सोपारा एक बौद्ध धम्माचे व तसेच व्यापारी केंद्र होते. येथूनच सम्राट अशोक राजाने मुलगी संघमित्रा हिला बोध गया येथील बोधी वृक्षाची फांदी सुवर्ण पात्रात स्वतःच्या हाताने देऊन सिलोनला धम्म प्रचारा करिता रवाना केले.


१५) घारापुरी बुध्द स्तूप :

दिनांक २० फेब्रुवारी २०२२ या दिवशी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेले जवळपास १५० लोकांनी घारापुरी मौर्या कालीन प्राचीन स्तुपाला भेट दिली व स्तुपाचे महत्व जाणून घेतले. प्रशांत माळी यांनी लेणी संवर्धन कसे आवश्यक आहे ते समजावून सांगितले. मुकेश जाधव यांनी आलेल्या लोकांचे आभार व्यक्त केले, तर रवींद्र सावंत यांनी घरापुरी स्तूपा बद्दल विस्तृत माहिती दिली. राहुल जाधव यांनी सम्राट अशोक यांचे काढलेले सुंदर स्केच  ला भेट दिले, तर पुणे येथून आलेले अनिल ननावरे यांनी बुद्ध स्तुपाची प्रतिकृती प्रशांत माळी यांना भेट दिली. तसेच आम्ही भारतीयच्या संघमित्रा बारसा कडे यांनी चित्रीकरण केले. एलिफंटा केव्ह हे वर्ल्ड हेरिटेज आहे, परंतु याच ठिकाणी दोन तीन किमीच्या अंतरावर मौर्य कालीन स्तूप आहे. जेव्हा पोर्तुगिज लोक महाराष्ट्रात आले तेव्हा ते लोक लेणी वर सराव करायचे. परंतु जेव्हा ब्रिटिश लोक आले त्यांनी मात्र भारतातील प्राचीन बौद्ध धरोधर यांचा शोध लावला. या स्तुपाचे त्यांनी उतखनन केले नाही, परंतु अओलख  बुद्धिस्ट मोनूमेंट म्हणून नोंद केली. हे ठिकाण अरबी समुद्र किनाऱ्यावर आहे. येथून जे एन पी टी  बंदर जवळ आहे. यांचे उतखनन होने बाकी आहे.


१६) पुष्पगिरी बुध्द स्तूप :

हे बुद्धिस्ट मॉनस्‌ट्‌रि ( ज्या ठिकाणी ऋषी-मुनी राहतात; मठ, मठ) आहे. ओडिसा मध्ये पुरी जिल्ह्यात आहे. बौद्ध धम्माचे एक महत्वाचे केंद्र होते, त्याच प्रमाणे ललितगिरी, रत्नागिरी व उदयगिरी येथे मोठ्या प्रमाणात  होत्या ते सम्राट अशोक राजाने निर्माण केले होते. चायनीस प्रवासी युवानच्वांग यांनी सहाव्या शतकात भेट दिली असता इथे मोठ्या प्रमाणात संघाराम होते अशी नोंद केली होती. १९९० ला उदयगिरीच्या जवळ लंगुडी हिल येथे उतखनन केले असता (पुष्प सभर गिरिया) अश्या प्रकारचा शिलालेख मिळाला होता, म्हणून याला पुष्पगिरी हे नाव दिले, हे एक प्राचीन विद्या पीठ होते.


७) कोल्हापूर स्तूप :

इथे प्राचीन मौय कालीन प्राचीन स्तुप होता. ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात बौद्ध धम्माचे एक महत्व पूर्ण ठिकाण होते. इथे १३५ वर्षा पूर्वी उतखनन केले असता बुध्दाच्या अस्थी मिळाल्या होत्या. त्या कुठे आहे याचा शोध लागत नाही. तसेच मिरज हे सुद्धा बौद्ध धम्माचे प्राचीन केंद्र होते.


१८) भोन स्तूप ;

हा मौर्या कालीन स्तूप असून बुलढाणा जिल्यात शेगाव जवळ आहे. ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात हे ठिकाण बौद्ध धम्माचे एक महत्वपूर्ण ठिकाण होते. येथे उतखनन केले असता सातवाहन कालीन ५ नाणे मिळाले. सध्या इथे स्तूपा वर शेती करतात तर काही भागावर भोन गावची वस्ती आहे 


१९) अंगुलीमाल स्तूप :

हा स्तूप श्रावस्थी मध्यप्रदेश मध्ये आहे. या स्तूपाचे उतखनन १८६३ मध्ये करण्यात आले. याच ठिकाणी अंगुलीमाल आणि बुध्द यांची भेट झाली व अंगुलीमाल यांना भिक्कू संघात समाविष्ट करण्यात आले.


२०) अनाथ पिंडक स्तुप श्रावस्थी :

हा स्तूप अनाथ पिंडक यांनी निर्माण केला. हा कॉममोमोरेटिव्ह स्तुप आहे. अनाथ पिंडकने बुध्दाला व भिक्कू संघाला जेवणाचे निमंत्रण दिले होते ते याच ठिकाणी.


२१) महास्तूप नेला कोंडा पल्ली :

हा स्तूप खम्मान जिल्हा तेलंगणा येथे आहे. हे एक प्राचीन बुद्धिझमचे महत्वाचे ठिकाण होते, तसेच हे एक मंडलचे मुख्यालय होते. येथे प्राचीन मानवनिर्मित लेक आहे, तसेच इथे उतखनन केले असता १०० प्राचीन नाणे मिळाले, तसेच १९७६ ते १९८५ मध्ये उतखनन केले असता हा स्तूप ५४ फीट उंच आहे, ८४ फीट आतील डायमिटर  व बाहेर  १३८ फीट आहे. इथे सुद्धा नाणे,जमिनीत  मिळाले व ते विजयवाडा म्युझियम येथे सुरक्षित आहे. सम्राट सातवाहन यांनी या स्तुपाला अति भव्य बनविले.


२२) सिलिगुरी बुद्ध स्तूप :

वेस्ट बंगाल ही एक पूर्वी चे मठ  आहे. दलाई लामाने निर्माण केली आहे. यांची उंची १०० फीट आहे.


२३) अनेगुट्टी बुद्ध स्तूप :

हा स्तूप संनती स्तूपच्या उत्तरेला २ किमी अंतरावर आहे, इथे मोठ्या प्रमाणात हत्तीचे शिल्प दान दिल्याची नोंद आहे व सन्नती स्तूपाच्या प्रोटेक्शन करिता निर्माण केला आहे. हा स्तूप सम्राट सातवाहन यांनी निर्माण केला आहे.


२४) सन्नती महास्तूप, कनगनाहल्ली स्तूप :

सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. हा स्तूप गुलबर्गा कर्नाटक येथे आहे. सम्राट अशोक यांनी पदभार स्विकारल्या नंतर १४ वर्षी भेट दिली व दुसरी भेट राज्याभिषेक झाल्या नंतर २० व्या वर्षी दिली व भव्य स्तूप बांधण्याच्या विषयी सूचना केली. व त्या नंतर सम्राट सातवाहन यांनी तिथे शिल्प कला विकसित केली.


२५) अद्दूरू बुद्धिस्ट स्तूप, अद्दूरू बुद्धिस्ट स्तूप :

हा आंध्रप्रदेश येथे आहे. वानेतीया नदीच्या किनाऱ्यावर असून सम्राट अशोक यांची मुलगी संघमित्रा श्रीलकेला जात असते वेळी याच ठिकाणी थांबली होती. येथे १९५३ ला उतखनन केले असता धम्मचक्र मिळाले, त्याचा डाय मिटर १७ फीटचा होता.


२६) अमरावती स्तूप :

महाचैत्य स्तूप हा आंध्रप्रदेश मधील सर्वात मोठा स्तूप आहे, डाय मिटर ५० मीटर व उंची २७ मीटर आहे. यातील काही भाग मद्रास म्युझियम आणि ब्रिटिश म्युझियम मध्ये ठेवले आहेत. याच ठिकाणी सम्राट अशोक यांनी भिक्कू महादेवा यांची नियुक्ती मनीषा मनडला म्हणून केली व त्याच्या वर हिमालयात धम्म प्रचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.


२७) कुरुषेत्र बुद्ध स्तुप :

कुरुक्षेत्र किंवा हरियाणा हे बुद्ध धम्माचे प्राचीन केंद्र होते. सम्राट हर्षवर्धन यांच्या शासन काल मध्ये चिनी प्रवाशी हुएन सांग यांनी आपल्या प्रवास वर्णन मध्ये या ठिकाणी बुद्ध स्तुप असल्याचे वर्णन केले आहे. हे स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केले होते. हा स्तूप कुरुक्षेत्र विद्यापीठच्या परिसरात आहे. हा स्तूप लुप्त झाला होता, परंतु स्थानिक बुद्ध अनुयायांनी यांचा पाठपुरावा केल्यामुळे ASI ने संवर्धनचे काम सुरु केले, तसेच दुसरा बुद्ध स्तूप यमुना नगर येथे आहे.


२८) गिरीयाक बुद्ध स्तूप :

हा स्तूप नालंदा प्राचीन विद्यापीठ पासून २२ ते २५ किमी अंत्तरावर आहे. हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. हा स्तूप सिलेंड्रीकल असून त्याची उंची ३० फिट आहे, व चैत्यगिरी पर्वतावर आहे. इथे सुद्धा प्राचीन बुद्ध विद्यापीठ होते.


२९) सुजाता बुद्ध स्तूप :

हा स्तूप बोध गया च्या जवळ आहे. फाल्गु नदीच्या तिरावर हा स्तूप आहे. याच ठिकाणी सुजाताने सिद्धार्थ गौतम यांना खीर दान दिली होती. हा स्तूप ई.स. पूर्वी दुसऱ्या शतकात सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. ASI ने १९७३-७४ ला उतखनन केले असता देवापाल राज घराण्याचा शिलालेख मिळाला (देवापाला राजस्य सुजाता ग्रीह) हा स्तूप कॉममोमोरेटिव्ह स्तूप आहे. सातव्या शतकात जेव्हा चिनीस प्रवासी हुएन त्संग निरंजना नदी क्रॉस केल्या नंतर त्याने स्तूप, स्टोन कॉलम बघितल्याची नोंद आहे. तसेच या ठिकाणाला गंध हस्ती असे म्हटले जात असे. बुद्धाने खीर प्राशन केल्या नंतर त्यांच्या शरीरात ऊर्जा निर्माण झाली व बुद्धाने निष्कर्ष काढला की, जिवंत राहण्या करिता मानवाला अन्नाची आवश्यकता आहे.


३०) कनिष्क स्तुप :

हा स्तूप सम्राट कनिष्क यांनी निर्माण केला, यालाच शाहजी की ढेरी असे म्हटले जाते, तसेच याला हाऊस ऑफ बुध्दा रिलीक्स असे म्हटले जाते. हे एक प्राचिन स्तुप असून जगातील सर्वात उंच स्तूप आहे. हा स्तूप ई.स. पूर्वी पहिले शतक ते ई.स. नंतर पहिले शतक मध्ये निर्माण करण्यात आला. सुरुवातीला हा स्तूप लाकडी बनविण्यात आला व त्यावर precious स्टोन लावण्यात आले, एकूण १३ लेयर मध्ये निर्माण करण्यात आले. सर्वात उंचीवर कॉपरचे छत्र बसविण्यात आले. इथे १९०८-१९०९ ला ब्रिटिश ए एस आय  ने डेव्हिड ब्रेनार्ड ने उतखनन केले असता बुध्दाच्या अस्थी धातू मिळाल्या व त्या बर्मा येथे सुरक्षित आहेत, तर सम्राट कुशान च्या अस्थी पेशावर च्या म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवल्या आहेत. कुशान पिरेड हा गांधार शैली म्हणून प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी चौथी धम्म सांगिती ७८ एडि  ला कनिष्क च्या अध्यक्षते खाली झाली होती. व तेव्हा पासून ई.वि. सणाची सुरुवात झाली. पूर्वीचे कनिष्कपूर व आताचे काश्मीर.


३१) शिंगारदार स्तूप :

तिसऱ्या शतकात निर्माण केले आहे. स्वात घाटी मध्ये ब्रिटिश ए एस आय  कर्नल डेने  आणि एस ए स्टेन  यांनी १८८६-१९३० मध्ये शोधून काढला. राजा उत्तरसेन जेव्हा बुध्दाच्या अस्थी घेऊन जात असतानी त्याचा हत्ती इथे थांबला होता, हा स्तूप स्वात राजाने निर्माण केला.


३२) एकसे आठ स्तुपा ऑफ चायना :

ही १०८ बुध्द स्तूपची गॅलरी हिल साईड ऑन दि वेस्ट बँक ऑफ येलो रिव्हर निनगा झिया  चीन येथे १०३८ ते १२२७ मध्ये वेस्टर्न जिया  राजवन्स ने निर्माण केले आहे. पश्चिमात्य देशामध्ये १०८ या नंबरला खूप महत्व आहे. १०८ स्तूपाच्या समोर दोन स्तूप होते ते १९५८ नष्ट झाले. १९८७ ला नुतनीकरण केले असता बुद्धिस्ट सूत्र धम्म लिपी मध्ये लिहिलेले आढळून आले, तसेच मातीचे स्तूप व त्यावरील झाकणे व त्यावर बुध्दाचे शिल्प व काव्य  आढळून आले. हे स्तूप एक सारखे नसून लहान मोठे आहे तसेच त्याची प्रतिकृती रथा सारखी आहे.


३३) बोरोबर स्तूप :

हा स्तुप जावा बेटावर इंडोनेशिया येथे आहे. हा स्तूप ७ व्या शतकात निर्माण केला. हा जगातील सर्वात मोठा बुद्धिस्ट स्तूप आहे. या स्तुपाला एकूण २६७२ पॅनल असून ५०४ बुध्द मूर्ती आहे. स्तुपाची रचना शष्ठकोनी असून वरचा भाग त्रिकोणी आहे..मुख्य गोलाकार घुमट मध्ये एकूण ७२ बुद्धाच्या मूर्ती आहेत. १८१४ मध्ये सर थॉमस स्टानफोर्ड राफेल  ने शोध लावला. १९७५ ते १९८२ या काळा मध्ये इंडोनेशीयन सरकारने मोठ्या प्रमाणावर संवर्धन केले व त्याला वर्ल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट केले.


३४) रुंमिन देवी स्तूप :

हा स्तूप नेपाळ येथे आहे. याच ठिकाणी बुध्दाचा जन्म झाला. सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. राज्याभीषेक झाल्या नंतर आठ वर्षानी या ठिकाणाला भेट दिली, व त्या गावाचा कर माफ केला. फक्त आठवा भाग देण्यात यावा अश्या प्रकारचा शिलालेख लिहिण्यात आला.


३५) शांती स्तूप लेह जम्मू अँड काश्मीर :

हा स्तूप १९८३ ते १९९१ या दरम्यान जपानी बौद्ध भिक्षु बुद्धाच्या २५०० व्या जयंती निमित्ताने व जगाला शांतीचा संदेश देण्या करिता डोंगर दऱ्या मध्ये निर्माण केला.


३६) द्रो डूल chorten स्तूप सिक्कीम :

हा स्तूप ट्रुलशिक  रिणपोचे आणि निंजमा  चे प्रमुख तिबेटन बुद्धिझम यांनी १९४५ मध्ये निर्माण केला. इथे एक साथ ७०० भिक्कू किंवा उपासक बसू शकतात.

ट्रुलशिक रिनपोचे

३७) क्लेमेंट टाउन स्तुप डेहराडून :

यांची उंची १८५ फीट आणि रुंदी १०० फीट आहे. इथे १०३ फीट उंची बुध्द स्टेटस  आहे. बुद्धिस्ट आर्ट, मुरेल्स आणि श्राइन  रूम तिबेटीयन पद्धतीचे आहे.


३८) गोसाराम  चोरटन  स्तूप :

हा स्तूप अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. हे इम्पॉर्टन्ट बुद्धिस्ट सेंटर आहे. तवंग  पासून ९० किमी अंतरावर आहे. हा स्तूप १२ व्या शतकात मोनपा मोङ्क  यांनी निर्माण केला. 


३९) कल्याण स्तुप :

कल्याण पूर्वेला बिग बाजार च्या समोर जी टेकडी आहे तिथे पूर्वी प्राचीन बुद्ध स्तूप होता, आजही त्याचे अवशेष बघायला मिळतात. परंतु आज त्यावर मज्जीद आहे. कल्याण हे बुद्ध धम्माचे तसेच व्यापाराचे प्रसिद्ध केंद्र होते. सम्राट सातवाहन यांच्या राजवटीत ते अत्यंत प्रगती पथावर होते. व्यापार जलद व्हावा म्हणून २५०० फिट चा डोंगर फोडून नाणे घाट निर्माण केला. कान्हेरी लेणी मध्ये एकूण ७५ च्या वर शिलालेख आहेत, त्यापैकी १२ शिलालेख मध्ये कल्याण येथील राहिवासी यांनी धम्म दान दिल्याची नोंद आहे.


४०) सम्राट अशोक स्तंभ :

हा स्तंभ मलबार हिल येथे आहे, तसेच इथे  प्राचीन महाथेरो चा स्तूप होता, आज त्याला म्हातारीचा बूट असे म्हणतात. ब्रिटिश सरकारचे पूर्वी हेड क्वार्टर परेल येथे होते परंतु मुंबई ला महापूर आल्यामुळे त्यांनी हेड क्वार्टर मलाबार हिल ला शिफ्ट केले, तेव्हा पासून इथे सरकारी व खाजगी बांध काम निर्माण झाले.


अश्या उपरोक्त प्रकारचा परिपूर्ण स्तूप आपणाला संपूर्ण जगत  लेणी वर बघायला मिळतो. 



भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये:

भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये: भरहुत स्तूप हा भारतातील प्राचीन बौद्ध स्तूपांपैकी एक महत्त्वपूर्ण स्तूप आहे. तो मध्य प्रदेश राज्य...