गाढवाला सुरुवातीला मालक बांधून ठेवतो, पळून जाऊ नये म्हणून पण नंतर ते त्याच्या सवयीचे होते आणि मालकाने नुसती बांधायची ॲक्शन केली तरी ते पळून जात नाही. न बांधता पण गाढव जागेवर उभे रहाते
पिंजऱ्याची सवय लागली आणि पोपट उडायचे विसरला की त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढले तरी तो उडत नाही .आपल्याला उडून स्वतंत्र होता येते हेच तो विसरतो
लोकांना वाटते स्त्री शिकली आता तिला पूर्वी सारखे बंधनं नाहीत. ती आता मुक्त जगेल पण नाही हो या बेड्यांची सवय झालीय तिला आणि त्या बेड्या आता अलंकार समजून ती अभिमानाने मिरवतेय. त्या बेड्या आहेत आणि तुझी गुलामगिरी संपली तरी तू मानसिक गुलामीत जगतेय याची तिला जाणीव करून द्यावी लागेल
आत्ता नुकतीच हाथरस येथे एका सत्संगात चेंगरा चेंगरीची घटना घडली. ही काही चेंगरा चेंगरीची पाहिलीच घटना नाही. जिथे धार्मिक कार्य तिथं स्त्रियांची गर्दी जास्त, ही गर्दी प्रमाणा बाहेर गेली की चेंगरा चेंगरी आणि मृत्यू
स्त्री अंधश्रद्धेतून बाहेर काढायची असेल तर आधी ती या अंधश्रद्धेत कशी अडकली हे पहावे लागेल
1.शिक्षणाचा अभाव
पूर्वी स्त्री शिक्षण कोणत्याच धर्मात दिले जात नसायचे.धार्मिक पोथी वाचणे म्हणजे शिक्षण नव्हे. अगदी 18 व्या शतकापर्यंत पाश्चिमात्य देशात पण ही बंदी होती. काही शिक्षण स्त्रीसाठी वर्ज्य होते त्यामुळे ती अज्ञानी राहिली त्यामुळे सहज अंधश्रद्धा, चुकीच्या समजुतींना बळी पडली. धर्माभिमानी झाली... कारण जीवनात संसार आणि मुलं यांच्यापलिकडे फक्त धार्मिक गोष्टीचं तिला मन रमवायला आणि पालन करायला होत्या
2.निर्णय_स्वातंत्र्य_नसणे -
आजही कित्येक घरात स्त्रियांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. पूर्वी तर नव्हतेच त्यामुळे तिला स्वतःची ईच्छा पूर्ण करण्याचे माध्यम म्हणजे देव मग नवस, उपवास, प्रार्थना या माध्यमातून स्वतःची मागणी देवापुढे मांडणे हाच तीचा मार्ग,
3.पुरूषसत्ताक_व्यवस्था
स्त्रीला कपडा आणि अन्न दिले की तिला काही समस्याच उरली नाही असे समाजाला वाटते पण तिला अनेक समस्या आणि शारीरिक व्याधी यांना सामोरे जावे लागते. घरातील लोक अपमानकारक वागणूक देत असतात, या सगळ्यांवर उपाय तिला या बाबा, बुवा(सर्व धर्म) यांच्याकडे सापडतो.. तो बाबा जो उपाय सांगतो ते ती करायला तयार असते कारण अज्ञान आणि निर्णय क्षमतेचा अभाव. नंतर त्यात वाहवत जाते अगदी कुटुंबाचे पण ऐकत नाही
4.समाजाची_मानसिकता
स्त्री स्वतःचे,छंद आवड जपण्यासाठी फार काळ बाहेर रहात असेल तर सामाजिक कार्य किंवा पिकनिक निमित्त बाहेर जात असेल तर सामान्य मध्यमवर्गीय, गरीब लोकं आजही पचवत नाहीत त्यापेक्षा ती प्रवचन, किर्तन, भजन यासाठी अगदी रात्री एक पर्यंत बाहेर राहिली तरी चालते मग तिचा कल याचं गोष्टींकडे वाढत जातो
5. बुवांची_हातोटी
कोणताही बुवा स्त्रियांनी कशी संस्कृती जपली पाहिजे, स्त्रीला बंधन कसे गरजेचे आहे हे सांगत असतो, अगदी मधाळ भाषेत स्त्रीची थोरवी गात असतो पण ती थोरवी कशात आहे तर या बुवांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करण्यात, अगदी बाबा बुवा अशा स्त्रियांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक शोषण करतात तरी यांची तक्रार नसते. हे आपल्या भल्यासाठीच चालले आहे असे त्यांना वाटते
हिप्नोटाईज होतात स्त्रिया
घरी पण नवऱ्याने प्रेम दाखवत गोड बोलून तिला काहीही करायला लावले तर ती सगळ्या समाजाशी अगदी स्वतःच्या आईबापाशी पण पंगा घेईल एवढी हिप्नोटाईज होते, तर या गोष्टीतून स्त्री ला बाहेर काढणाऱ्या, तिच्या शोषणाला विरोध करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संघटना निर्माण होणे गरजेचे आहे. त्याला सपोर्ट करावा समाजाने, स्त्रीचे प्रबोधन होणे ही गरज आहे, नाहीतर अशा घटना घडत रहाणार
No comments:
Post a Comment