Friday, February 9, 2018

माझे पुलावरून उडी मारण्याचे सवप्न कायमचे राहून गेले

हाळी हे छोटंस गाव तालुका  उदगिर ज़िला लातूर हे मराठवाड़ा विभागातिल बैल बाजारासाठी प्रशिद्ध  स्थळ .इथे तीन दिवस बैल -बाज़ार असतो ,शनिवार ,रविवार आणि सोमवार  !

( Halli is one of the biggest village in Udgir Taluka.population Near about ten thousands. Cattle Bazar is famous in Maharashtra , Karnataka, Andhra and Madhya Pradesh. It is situated on SH 217 equi distance i.e. 95 KM. Hallis Just besides Handergulli village which Famous for Hemadpanthi Mahadev Mandir which has been built in 12th century…... By Google Currency )

या गावाच्या नावातच जादू आहे ,संपूर्ण बालपण बाजारात गेल्यामुळे काहीना काही रोज आठवणी मनात येत असतात .आज एक  घटना इथे लिहित आहे .

वर्ष १९८० च्या दर्मान चा किस्सा आहे .तसे आम्ही सगळे पोर उनाड होतो.शनिवारी कधीच शाळेत गेलो नाही . दर शनिवारी काही न काही उचापती चालू आसे .रानात जाने ,नदीला पोहायला जाने आदी .आम्ही पाच जन मित्र ,अशोक ,बबन, किसन,राजकुमार,संजू  आणि मी .

हाळी हे हे तेरु नदीच्या काठी वसलेले आहे .तेरु नदी दक्षिण ते उत्तर वाहते .तेरु नदी त्या काळी दुथडी वाहत असे .पाउस आला कि ती रुद्ररूप धारण करीत असे .आम्ही नदीचा पूर ओसरून गेला कि सगळे पोर शनिवारी शाळेला दांडी मारून खूप खूप वेळ पोहत असू

एके दिवशी आम्ही डोहात पोहत असताना काही बायका नदीवर धुणे धुवत होत्या ,त्यात आमच्या वर्गातील मुली पण त्यांच्या घरातील बायका सोबत कपडे धुण्यासाठी नदीला आल्या होत्या .

त्यांना बघून आम्ही एक शर्यत लावली .ती म्हणजे तिरू पुलावरून उड्या मारण्याची .आणि आम्ही कांही हि विचार न करता ,बघता -बघता तिरू पुलावर वानरा सारखे उभे राहिलो ,पूल महा उंच चार माजली इमारत मावेल एवढा उंच .पण आम्ही कोणीहि घाबरलो नाही असे दाखवत होतो .कारण सगळ्या बायका आमच्या कडे टक लाऊन बघत होत्या कि हि पोर पागल तर झाले नाहीत ? त्या  चिंतेत बघत होत्या ,आणि आम्ही त्यांच्या कडे बघत माकडा सारखे तिरू पुलाच्या काद्ठ्ड्यावर उभे होतो .आता सगळ्यात पहिली उडी कोणी मारायची ?

तेंव्हा अशोक म्हणाला ,मी सगळ्यात मोठा आहे ,माझा मान पहिला .आर सरका बाजूला बघताय काय मीच पहिली उडी मारतो .असे म्हणत क्षणाचा विलंब न करता अशोक ने पुलावरून डोहात झेप घेतली .सरकन वाऱ्या सारखा डोहात जाऊन बुडाला .लगेच माझा नंबर होता. पण सगळ्याची फाटली होती .आमची नजर खोल पाण्यावर गेली .बघता बघता पाण्यावर  एक तांबडे खळे तयार झाले .संपूर्ण लाल लाल रक्त वरून दिसत होते .आम्ही सर्व घाबरो आणि पळत असोक कडे सुटलो .वाटले अशोक चे डोके फुटले किंवा हात पाय नक्की मोडला .

आणि आमचा उडी चा प्रसंग टळला . अशोक लगेच पाण्याबाहेर आला .त्याच्या पायात पाण्यातील दगडाची धारदार चीप लागली होती आणि उजव्या पायाची टाच फाटून  सतत रक्त वाहत होते. ...बायका बघत होत्या आणि आम्ही दवाखान्याचा रस्ता धरला होता

माझे पुलावरून उडी मारण्याचे सवप्न कायमचे  राहून गेले .


No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...