Friday, February 9, 2018

बाशा

बाशा २३/१२/२०१७
बाशा एक उदंड पोर ,पांच भावंडा पैकी एक अजब मिश्रण ,बाजारात याचा राबता खूप .लग्न होणे बाकी होते .एकदा संध्याकाळी थोडी गावठी टाकून थेट माझी आजी फुला माय कडे घरी आला आणि म्हणाला ,थोरली माय मला तुझ्याशी काही बोलायचे आहे .माझे आज या जगात कोणी हि नाही .बाप गाव सोडून गेला आणि साळू माय तर कधीच मला सोडून गेली .आता तूच माझी आई आणि माय .
तोरल्या मायने लगेच हाक दिली ,बबन तुला काय म्हणचे आहे ते सरळ सांग ,आणि आज परत पिऊन आला आहेस ?

थोरल्या माय मला लगीन करायचे आहे .हे एकूण थोरली माय एकदम थंडगार पडली काही बोलण्या अगोदर लगेच बबन म्हणाला ,माझ्या वायातीन आपल्या मांन्गुड्यातील सगळ्याचे लग्न झाले ,आणि मी गाढव एकटाच मागे पडलो आहे ,कोणी मला पुसत देखील नाही ..आणि बाशा रडत होता  एखद्या लहान मुलासारखा  ,सगळे मांग वाड्यातील पोर आम्ही बबन ला टोपण नावाने बोलत होतो बाशा म्हणून ,आणि बाशा या नावाने बबन बैल बाजारात प्रसिद्ध होता .

बबन सोबत आम्ही सकाळी पहाटे  चार वाजता शेतात जात असू , गवत चोरी हा बबन चा व्यवसाय .एकदम हात खंडा ,मी व्यंकट ,राजकुमार एके दिवशी माली पाटील यांच्या शेतात हल्ला बोल केला ,आणि सकाळी सात च्या आत बाजारात गवत विकायला तयार .त्या दिवशी आम्ही सगळ्याने मिळून एकूण दहा -दहा रुपय चे गवत विकले असेल .हे गवत चोरी करून विकावे लागत असे .कारण आम्ही मांगाची पोर भूमिहीन शेत्मुजारांची पोर ,आमच्याकडे एकच पर्याय होता चोरी ,कारण आम्हा मांग समाजाचा पोटा पाण्या साठी चोरी करून उदर निर्वाह करणे हाच पर्याय आमच्या हातात होता .बबन आमच्या सगळ्यात पोरात  वयाने मोठा असल्यामुळे आमचा बबन दा होता ,आणि सगळ्याचा बाशा .

मला आज अंधुकस आठवत आहे कि ,त्याच वर्षी बबन दादाचे लग्न झाले होते वर्ष होत सन एकोणी से ऐशी .


No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...