Friday, February 9, 2018

जनावराचा जंगी बाज़ार हाळी ,हेच माझे गाव ....

हाळी हे छोटंस गाव .जरी छोट असल तरी जनावराच्या बाजारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात देवणी बैल बाजारानंतर याच गावचा नंबर लागतो .हाळी  तालुका  उदगिर ज़िला लातूर हे मराठवाड़ा विभागातिल बैल बाजारासाठी प्रशिद्ध  स्थळ .इथे तीन दिवस बैल -बाज़ार आसतो ,शनिवार ,रविवार आणि सोमवार ,या तीन दिवसात आपले बैल विकणे आणि खरेदी करणे या साठी खूप मोठ्या प्रमाणात उठाठेव चालू असते आणि ते शुक्रवारी रात्री पासून जे सुरुवात होते ती बाजार ओसंडण्यासाठी सोमवार ची संध्याकाळ होऊन जाते . मग या एकबार भेंट दया ! आमच्या हाळी -हांडरगुली च्या twon ला भेट द्यायला ...

जनावराचा जंगी बाज़ार हाळी ,हेच माझे  गाव ....इथे जनावरांना नदीतून पाणी डोक्यावर वाहून बाजारात  विकून आम्ही उदर-निर्वाह केला ,आणि आई -वडिलांनी लोकांच्या शेतात्तील गवत विकन आपल्या चुली पेटवल्या .....हे सत्य विदारक आजून रुह्दायात कायम आहे .म्हणून बाजाराचे कुतूहल अजून मनातून जात नाही .१९७२ च्या ओल्या दुष्काळात जे आम्ही गरिबी आणि भूक मारीचे दिवस सुगडी खाऊन ,अमेरिकेहून आलेल्या काटीजावा ,मिलो ज्वारी आणि तत्स्सम प्रकारचे आणि निकृष्ट दर्ज्याचे धान्य खाऊन जगलो .याच भयानक भूक -बळी मुळे शाळेला दांडी मारून आठवड्यातून तीन दोन दिवस शाळेत न जातं बाजारात मिळेल ते काम करीत राहिलो आणि घर प्रपंचासाठी हातभार लावला .म्हणून घरात चूल पेटत होती .आई -वडील अशिक्षित ,भूमिहीन शेतमजूर ,शेतात हाहाकार माज्ल्यामुळे पिके आडवी पद्लेलेली ,शेतात काम नाही मग मजुरी कुठे करणांर ?
काही काळ निघून गेल्यावर बाजाराला चांगले दिवस आले .शेतात चारा पाणी मिळू लागला आणि बैल बाजार चा मोसम सुरु झाला .
आठवडी बाजार असल्यामुळे शनिवार ,रविवार आणि सोमवार या तिन्ही दिवसी काम मिळत आसे .शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा असल्यामुळे माय म्हणायची चाल आज अर्ध्या दिवसाची तर शाळा असते ,माझ्यासोबत वावरत काम करायला ...म्हणून माय सोबत मी पण शेतात कामाला जात असे .

तसे पहिले तर बाजार आला की या दोन्ही गावाला सुगीचे दिवस येतात ,कारण या तीन दिवसात वेगवेगळी कामे मिळतात आणि बर्या पैकी दाम पण मिळतो .मग बैलाची सिंगे तासने ,बैल भादरणे,खुरे साळने ही कामे .बैलाला पाणी पाजणे ,चारा देणे आणि एकंदरीत बैलाची निगा राखावी लागते ,माशागत करावी लागते तेव्हा मागेल त्या किमतीला बैल विकला जातो ,म्हणून मालक से सगळे करण्यासाठी त्यावर पैसा खर्च करीत असतो .
दोरखंड विक्रीचा धंदा तेजीत असतो ,हाळी गावात मोठ्या प्रमाणात दोखंड बनवानायचा उद्योग चालत असे ,सर्व बायका हातावर दोर्या ओळून सुंदर दोरखंड तयार करून बाजारात विकत होत्या .आमच्या मांग वाड्यातील भगवान मास्तर यांचा दोरखंड बनवण्याचा मोठा हात -कारखाना होता .ते पाच ते दहा बायका पोरांना धंदा देत होते ,म्हणून त्यांना सावकार म्हणत असू ,आणि मास्तर या साठी की त्यांचा बंडबाजा बाजा चा जोरात इलाका होता म्हणून त्यांना भगवान मास्तर पण म्हणत असू .

काल  मी fb वर  दोन फोटो आणि एक वेदिओ उपलोड केला आणि मित्र मंडळीने खूप प्रतिसाद दिला ...आणि मला त्या दिवसाच्या आठवणी दाटून आल्या आली मला रडू आवरेना

कारण १९७२ च्या ओल्या दुष्काळातील त्या भय विदारक गोष्टी मी आज इथे लिहणार आहे .जेष्ठ पत्रकार संजीवकुमार भगत ,जेष्ठ शिक्षक सत्यवान माने सर आणि आदरणीय दासू भगत सर यांच्या उत्साहामुळे मी मोडक्या शब्दात थोड या बाजारा विषयी लिहणार आहे .

हाळी म्हणताच लगेच हंडरगुळी लगेच पाठोपाठ थोंडात उच्चार येतो .या गावातून फक्त एक नांदेड -बिदर हा रस्ता जातो .त्यामुळे गाव विभागणी झाली आहे .तसे गाव एकच  …

लहान असताना आई म्हणायची तुला उद्या  हंडरगुळीला दळण दलायला जायचं आहे ...
हाळी हे नदी किनारी आहे .तसेच हंडरगुळी पण देखावा एकाच गावचा कारण पिठाची चक्की आमच्या गावात न्हवती ?

आपण फक्त बाजार विषयी बघू ….पूर्वी आमच्या काळी बाजार हाळीत भरत ( बसत ) असे ,पण जागे अभावी तो हंडरगुळी ला गेला ,आणि आज तागायत तिथेच आहे .खूप मोठ्या प्रमाणात महसूल हंडरगुळीच्या ग्राम पंचायतला मिळतो ,हाळी आपली कोरडीच ..
सन १९७० ( अंदाजे ) दोन्ही गावात या बाजारा वरून खूप मारामारी झाल्या आहेत याची सरकारी कचेरीत नोद आहे बरीच लोक त्या काळात जखमी झाली होती तेव्हा  मी लहान होतो .

हाळी च्या आसपास एकूण बारा वाड्यांचा आणि लमाण तांडा चा पसारा आहे या गावातील आणि वाड्यातील बैल विक्री साठी येत असतात .जरी बाजार एक दिवासचा असला तरी तसा याचा आवाका खूप मोठा आहे.हा बाजार  चार दिवस असतो . मुख्य बाजार रविवारी असतो पण पण बैल शुक्रवारी राती येऊन आपल्या  जागा कायम करतात कारण आवाका एवढा मोठा की मुख्य ठिकाणी जागे साठी बैल दावणीला बांधावे लागतात , बैल खूप मोठ्या प्रमाणावर येतात आणि बाजाराचे मैदान, जागा कमी पडते .शनिवारी त्याची पूर्ण तयारी होते ,हजारो दावणी पडतात .शनिवारी त्या बैलाच्या माश्यागती कराव्या लागतात ,शिंग तासने ,बैल भादारणे ,खुर साळने ,बैल चका -चक धुऊन उभे करावे लागतात ,यात चारा पाण्याची व्यास्वस्था करावी लागते .यात स्थानिक लोक चार दिवस आपला रोजगार मिळवतात ,कोनि पाणी पाजण्याचे मजुरी करते ,कोणी गावात चारा विकतात ,कोणी बैल धुत्तात तर कोणी शिंग तासण्याचे  काम करतात .या बाजारात जो सर्वात महत्वाचा घटक म्हणजेदलालहे दलाल  एका दिवसात खूप माला -माल होतात ,खोट्या बतावणी करून बैल विकत असतात

मलक हा बैल घा हो असा बैल तुम्हाला अख्या बाजारात मिळणार नाही ,या रोटीची शपथ ( दलालाच्या खांद्यावर एक सोगा असतो त्यात ते आपली फाटकी चप्पल ठेवतात आणि म्हणतातया रोटीची शपथ ...आणि मालक पटतो

माझा चुलता ( काका ) सिंगे तासणी चे म्हणजे सोलण्याचे  काम करीत असे ….”मालक सिंग तासायचे का सिंगअसा बाजारात आवाज काढीत  प्रत्येक दावणीत  फिरत असे ….आणि त्याला बर्या पैकी पैका मिळत असे

मी स्वतः नदीवरून घागरिने पाणी वाहून  घेऊन जाऊन पाणी विकले आहे ,तेंव्हा रुपये १०/- ला घागर विकत असे ,पण सोबत मीठ आणि एक छोटे  घंगाले ( गोल तबकडी चे पसरत भांडे  ) ठेवावे लागते ,कारण बैल मालक  पाणी पाजण्या अगोदर विचारतो की ए पोरा मीठ आहे का र ? हो मलक म्हणून पाणी विकावे लागते ,तेंव्हा खडा मीठ खूप स्वस्थ मिळत असे
एक प्रंसग सांगतो ,मी पाणी तर पाजले त्यात मीठ पण टाकले पण बैल काही पाणी पीत नाही ,तेंव्हा बैलाचा मालक माझ्यावर ओरडला ,...ए पोर्रा पाणी चांगल आहे ,मीठ पण आहे ,आर पीठ कुठ आहे ,माझे बैल पीठा शिवाय पाणी पीत नाहीत ….आणि खरेच त्या मालकाने मला पैसे दिले नाहीत ... कारण बैलाने पाणी पिले नाहीच .

अशी खूप कामे बाजारात करून आपल्या घर परिवाराचा कमवता हिस्सा झालो होतो .या पैश्याचं लोभ कमी होत नहव्ते म्हणून  शनिवारी आणि सोमवारि  शाळेला गुल्टी ,या काष्ठाच्या आणि मेहनतीच्या कमाई सोबत मज्जा पण खूप केली आणि बघायला पण  मिळाली
म्हणून परत गावी जावे वाटते ? पण ते दिवस आज राहिले आहेत का ? बैल ही नाहीत ,चारा  ही नाही आणि पाणी ही नाही ,आमची तेरु नदी आज ओसाड झाली आहे .ज्या नदीत आखा शनिवार भिजून काढला खूप पोहलो खूप उदंड होतो मी

याच नदीच्या पुलावरून आमच्या अशोक शिंदे काका ने पैज लाऊन पुलावरून पाण्यात उडी घेतली होती ,त्या नन्तर राजकुमार आणि माझा नंबर होता उडी मारायचा ?
पण एक भय झाले जसा अशोक वर उडी मारून उसळी घेऊन पाण्याबाहेर आला तेंव्हा एका विहारीच्या आकाराचे तांबड्या रंगाचे  वर्तुळ पाण्यावर तरंगले म्हणजे ,त्याच्या पायात पाण्यातील  दगडाची चीप लागून टाचा चिरल्या होत्या म्हणून रक्त बाहेर आले आणी हे  बघून आम्ही दोघे  पाण्यात उड्या  न मारता खली नदीत पळत सुटलो ,वाटले आता अशोक चे डोके फुटले आणि अशोक मेला ….असे अनेक प्रसंग


No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...