
This blog is for Socially poor ,for uplifting their human values in day today Pure life. Like Buddhism originates in the teachings of Shakyamuni (Gautama Siddhartha), who was born in what is now Nepal some 2,500 years ago. He became increasingly possessed by a longing to abandon the secular world and go out in search of a solution to the inherent sufferings of life. And he gave Triratna ,Four Nobel truth ,Pancasila ,Ashtangik way and ten Parmi .for peace of Globe.
About Me
Monday, April 22, 2024
#लाईफ_वार्निंग_बेल
Saturday, November 4, 2023
अमर्त्य सेन
"आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही."
जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षरता असेल तर अशा समाजात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य निरोपयोगी आहे. आपण फक्त न्याय आणि योजना करण्यापेक्षा त्यांच्या परिणामाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
#अमर्त्य_सेन
नुकताच ३ नोव्हेंबर रोजी जगप्रसिद्ध अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सुरुवातीला नोबेल आणि नोबेल नंतर भारतरत्न असा जगप्रसिद्ध प्रवास करणारे अर्थशास्त्रज्ञ म्हणजे अमर्त्य सेन .
देशातील आणि जगभरातील आर्थिक व्यवहाराच्या अभ्यास करीत असताना मानवता आणि स्त्रियांचे मूल्ये कशी जोपासावे यावर त्यांनी जगभरात संशोधन केले.
१९०९ मध्ये अमर्त्य सेन यांनी पाक्षिक तत्वावर प्रसिद्ध होणाऱ्या “न्यूयॉर्क रिवीहव ऑफ बुक्स” या यामध्ये एक प्रभावी शोधनिबंध लिहिला होता. त्यात त्यांनी आशियाई देशांमधील वाजवीपेक्षा खूप जास्त राहिलेल्या मृत्युदराचे काळजीपूर्वक परीक्षण करून ते या धकादायक निकषावर पोचले होते स्त्रिया मुळातच काटक आणि जीवशास्त्रीय रचनेनुसार पुरुषापेक्षा स्त्रीचे आयुमान पुरुषा पेक्षा अधिकच असते. असे असून देखील , जगात स्त्रिया कशा कमी होत चाललेले आहेत त्याचीही त्यांनी इथं कारण मीमासा केलेली आहे ..
स्त्रीभ्रूणहत्या ,जन्मापूर्वी मोठ्या प्रमाणात लिंग निर्धारण चाचणी, लिंग प्रणित गर्भपात यासारख्या समस्या कडेही त्यांनी लक्ष वेधले . जगत लोकसंखे मुळे चीन आणि भारत हे या स्त्रीविरोधी अंत प्रवाहाचे मुख्य योगदान करीत आहेत आणि एकच अपत्य धोरणामुळे चीनमध्ये पुरुष मुलाला स्वभाविकच अधिकच प्राधान्य दिले गेले ,याचा परिणाम काय तर आज तेथे पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही.? तीच गत भारतात का होणार नाही ?
अशा अनेक विविध पैलू वर विचार करीत असताना जगात स्त्रियांची मृत्यूचे प्रमाण कसे कमी होत आहे याचे त्यांनी अनेक शोधनिबंध तयार केले आहेत .
भारत देशामध्ये दुष्काळामुळे किंवा उपाशीपोटी अनेक लोक मरताना दिसत आहेत. इथे ते १९६० चा चीनमध्ये झालेला दुष्काळ यावर भाष्य करतात . हे होत असताना मोठ्या प्रमाणात त्या काळा मध्ये झालेली मृत्यू हे भारतातील याच काळातील स्थितीच्या अगदी उलट आहेत सेन यांनी असेही प्रतिपादन केले आहे की बहुतेक दुष्काळ हे नैसर्गिक कारणामुळे नव्हे तर मानवनिर्मित कारणामुळे होत असतात .
असे अनेक जगभरात शोधनिबंध लिहिणारे भारतातील लोकशाही वर ही भाष्य करतात.
त्यांच्या योगदानातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘न्यायाची कल्पना आणि न्याय व नीती’ या संकल्पना मधील फरक सांगणारी आहे. न्याय हे परिणाम करते व अधिक भर असणारे आणि सामाजिक व्यवस्थेकडे कमी लक्ष देणारे आहे, तर नीती ही सामाजिक धोरण आणि योजनांची घडणी आहे.
त्यांनी एक उत्तम उदाहरण दिले आहे ‘ तर असा युक्तिवाद केला आहे की जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षरता असेल तर एक परिणाम म्हणून अशा समाजात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सामाजिक व्यवस्था किंवा तत्व निरुपयोगी आहे ‘ त्यांचे म्हणणे हेच की आपण फक्त न्याय कायदे आणि योजना करण्यापेक्षा त्यांच्या परिवाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे . चित्रपट निर्माता मुजफ्फर अली यांनी एकदा या संबधाचे टिपण करताना म्हणले होते की, ‘तुम्ही जर माझी जीभ छाटून टाकली तर माझ्या भाषण स्वातंत्र्याचा मला काय उपयोग ? सेन यांचे समाजा वरील कार्य पारदर्शक आहे.
संधी निर्माण करीत असताना त्या संधीचा भाग जनसामान्य माणूस झाला पाहिजे अशी त्यांचे मत आहे त्यात मूलभूत शिक्षण आणि आरोग्यसेवा तसेच रस्ते व स्वच्छतेची सुविधा यासारख्या सार्वजनिक वस्तू सेवा सुविधांचा आणि त्या पुरवणे ही सरकारची किंवा राज्यकर्त्यांची जबाबदारी असेल.
अमर्त्य सेन यांना १९९८ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हापर्यंत नोबेल मिळणाऱ्या जवळपास ९०० व्यक्तींमध्ये हा पुरस्कार मिळवणारे हे केवळ सहावे भारतीय होत. १९१३ मध्ये पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होती. त्यांनी शांती निकेतन मध्ये जन्मलेल्या या अर्थशास्त्रज्ञांची अमर्ते असे नामकरण त्यावेळी केले होते.
पंतप्रधान बाजपाई यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने अमर्त्य सेन यांना नोबेल नंतर लगेच भारतरत्न बहाल केले यात आश्चर्य वाटण्या सारखे कांही नाही ?
सेन यांनी आपली सर्व कमाई प्राथमिक शिक्षणात काम करणाऱ्या एका ट्रस्ट ला दान केली आहे
हे वर्ष सेन यांची नोबेल पारितोषिक मिळविण्याचे तसेच त्यांनी वयाची नव्वदी ऊलटल्याचे आहे सेन यांचे जीवन आणि त्यांची कामगिरीही विशेषता शिक्षण वेत्यासाठी निश्चितच प्प्रेरणादायी आहे. त्यांचे शिक्षण शांतिनिकेतन प्रेसिजन्सी कॉलेजमध्ये झाले प्रत्येक टप्पा त्यांनी सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण केला आणि केंद्रित विद्यापीठातील ते बीए मध्ये पहिले आले नंतर तिथेच त्यांनी बी एच डी केली ते माधवपूर विद्यापीठात त्यांचे विभागात सर्वोच्च तरुण अध्यापक होते आपल्या कारकिर्दीत त्यांनी दिल्ली स्कूल ऑक्सफर्ड ,केंब्रिज , हवर्ड आणि इतर अनेक ठिकाणी अध्यापन केले आहे.
एकदा तीन हजार विद्यार्थ्यांसमोर एका मोठ्या सभेत त्यांना उत्सुकतेने एक प्रश्न विचारण्यात आला सर भारत महासत्ता कधी होणार ? यावर त्यांनी असे उत्तर दिले की त्यांना या शोधात मला अजिबात रस नाही भारताने सर्व मुलांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य सेवा दिल्यावर भर दिला तरी पुरेशी आहे . असे त्यांनी सुचविले होते.
मोदींच्या नेतृत्व शैलीवर त्यांनी विरोधी कडवट टीका केली आहे त्यांनी जॉन स्टुअर्ट मिल यांचे विचार मंथन करीत म्हटले होते की लोकशाहीचे चर्चेद्वारे घडणारे सरकार असते आणि जर तुम्ही चर्चेचे प्रांगण भयभीत करून टाकले तर तुम्हाला खरी लोकशाही मिळणारच नाही ?
नालंदा विद्यापीठाची कुलूपती म्हणून सेन यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता आणि मोदी सरकारने २०१५ मध्ये त्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ दिली नाही .एका प्रेक्षक सदस्यांनी त्यांना भर सभेत विचारले की तुम्ही कधी चीनमधील जीवन जगला आणि मी अनुभवला आहेत का ? जरूर काय तो त्यांना विनोद होता अशा टिकेकडे सेन यांनी पारसे लक्ष दिले नाही . त्यांच्या वैयक्तिक जीवनावर एक टीकाकाराने टोमणे मारले होते .
त्यांचे वैयक्तिक जीवन हेवा वाटावे अशी मनोहर आहे . त्यांनी तीनदा लग्न केले होते . त्यापैकी एक चित्रपट अभिनेते देखील आहे. ते कसा आराम करतात असे विचारल्यावर त्यांना उत्तर असते की आवडीच्या विषयावर खूप वाद आल्याचा मिळणे हाच आराम त्यांनी . ते स्वतः नास्तिक आहेत आणि नास्तिकतेवरील संस्कृत अभिजात साहित्यातील विपुद्देकडे निर्देश करून ते त्यांना भूमिकेचे समर्थन करतात ते त्यांची राजकीय विचार व्यक्त करण्यास पचली नाही
सेन डाव्या विचारसरणीचे आहेत परंतु अति डाव्या विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहावे असा ते सल्ला देतात . कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञ सामाजिक निवड सिद्धांत विकास अर्थशास्त्र तत्त्वज्ञान आणि नैतिकता अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी मूलभूत योगदान दिले हे सर्वश्रेष्ठ आहे . अमर्त्य सेने असे समाज धर्मी विचारवंत आहेत जी प्रजाती आज दुर्मिळ बनला चालली आहे युक्तिवाद आणि तर्कशास्त्राच्या पद्धतीची जी वचनबद्ध रहा त्यांनी कायम विवेकाची कास धरली आणि तरी सत्ता शक्तीपुढे गरज पडल्यास खरे बोलण्यास ते घाबरले नाहीत .
अश्या बुद्धिजीवी महान अर्थतज्ञ , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रणालीच्या महान व्यक्तीस उत्तम आरोग्य मिळो ,हीच त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!
प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई ४०० ७०६
Saturday, September 16, 2023
आर्यसत्य ( Nobel Truths )
आर्यसत्य ( Nobel Truths ) अजून कोणत्या संप्रदायात किंवा धर्मात असतील तर कळवा ?
१ पहिले आर्यसत्य – दुःख
२ दुसरे आर्यसत्य – दुःखाचे मूळ
३ तिसरे आर्यसत्य – दुःख निरोध
४ चौर्थ आर्यसत्य – दुःख निरोधाचा मार्ग
महामानव डॉ बाबासाहेब आंबेकर द जुरिस्ट!
महामानव_डॉ_बाबासाहेब_आंबेकर_द _जुरिस्ट!
----------- प्रा.बा.र.शिंदे,नेरूळ नवी मुंबई
प.पू.डॉ.बाबासाहेब हे एक असे दालन आहे जे जयभीम म्हणून ही कळत नाही मग जगातील कोणतीही शिक्षित व्यक्ती का असेना.जगातील तमाम विद्वान लोकांनी त्यांच्या बुध्दीमत्तेला जयभीम करून मार्क्स पासून बाबसाहेब कसे वेगळे आहेत.ते एक ज्यूरिस्ट कसे होते याची उखल केलेली आहे.ते घटनाकार तर होते पण ते जुरिस्ट कसे होते याचे अनेक उदा.देता येतील.
सन १९३५ ते १९५६ हा काळ त्यांचा ' द जूरिस्ट ' म्हणून गणला जातो.मी जरी व्यवसायाने वकील नसलो तरी बाबासाेबांबद्दलचा वकिलीचा असलेला पेशा आणि मिळकत सेवाभाव जाणतो.
तेंव्हाच्या बॉम्बे युनि्हसिर्टीतून ५जुलै १९२३ ला त्यांनी जी सनद घेतली ती केवळ पददलित वर्गलाच न्हवे तर ,जगातील तमाम बॅकवर्ड वर्गाला त्या सनदचा कसा फायदा होईल हेच त्यांनी केलं.
एकच उदा.संपूर्ण कहाणी सांगून जाते.एका केस मध्ये बॅरिस्टर जिन्हा यांनी त्या काळी २५१००/- फिस मागितली तर बाबासाहेबांनी ती केस केवळ २६५/- रुपयात जिंकून दिली.विचारवंताला हे एक उदा.पुरेसे आहे.
मला थोडे बाबासाहेब कळतात म्हणून मी तो कार्यक्रम संपला तेंव्हा स्टेज वर जाऊन हा फोटो छातीला लाऊन घेतला.माझा मित्र सुलील पवार (PLL,Mumbai University) याने टिपला आहे.असा मला कोणी भेट वगैरे नाही दिला आहे.
कारण असे होते मोठ्या दिग्गज लोकांना हा पूर्णाकृती पुतळा नको होता,त्यांनी हार तुर्या सहित स्टेजवर ठेवला कार्यक्रम संपला आणि निघून गेले.केवळ आणि केवळ कार्यक्रमाची शोभा म्हणून तर आणले नसावे.?
आता मुद्धा असा आहे की बाबासाहेब हे कसे जुरिस्ट होते आणि जूरिस्ट कोणाला महणावे.
वर सांगितल्या प्रमाणे त्याने १९३५ ला धर्म बदलण्याची जी घोषणा केली ती १९५६ सली खरी करून दाखवली त्याच कारणाने ते #जुरिस्ट ठरतात.
अश्या आणि अनेक वास्तव सुपीक कल्पना त्यांनी मांडल्या आणि त्या खऱ्या करून दाखवल्या म्हणून ते jurist म्हणून ओळखले जातात.
मग महाड चे चवदार तळे संघर्ष असो की काळाराम मंदिर प्रवेश असो.जे जे वदले ते ते त्यांनी क्रांतीत रूपांतर केले.
या क्रांतीच्या पाऊल खुणा या जगातील अव्वल दर्जाचे jurist म्हणून ओळखायला भाग पाडतात.
त्यांच्या पश्चात कोणी अशी क्रांती केली नाही म्हणून तसा 'THE JURIST ' कोणी होत नाही.म्हणून ते प्रज्ञासुर्य, क्रांतीबा होतात.
समतेच्या,शांतीच्या , धम्माचा वाटेवर घेवून जातात म्हणून ते जगात #ज्यूरिस्ट म्हणून ओलखले जातत.इथेच क्रांतेयबुद्ध ,महामानव म्हणून ही ते ओळखले जातात .
तसे ते पुतळ्यात नाहीत असे नाही, पण ते मला त्यांच्या साहित्यात उजळून दिसतात.मग ते साहित्य त्यांचे असो किंवा त्यांचावर जगातील कोणत्याही कवी ,कथाकार ,लेखक यांनी लिहलेले असो.त्यात त्यांचे प्रतिबिंब दिसते ते खरे.
(स्थळ दीक्षांत सभग्रह ,मुंबई विद्यापीठात, फोर्ट)
Friday, September 15, 2023
३१ अगस्त नंतर सगळ्या महामानवास तिलांजली देऊन बहुजनांच्या घरा घरात गणराया येणार?
३१ अगस्त नंतर सगळ्या महामानवास तिलांजली देऊन बहुजनांच्या घरा घरात गणराया येणार?
-------------------- प्रा.बा.र.शिंदे
लोक जागर,महोत्सव ,जयंती ,जयंती- उत्सव सभा,चर्चासत्र,मेळावे ,प्रचार, यात समाज प्रबोधन करीत विद्वान व्यक्ती, प्राध्यापक,डॉक्टर ,अभियंता,आणि शिक्षक - शिक्षिका यांनी ऑगस्ट चा महिना पिंजून काढणार?
कार्यकर्ते गल्ली बोळात जाऊन ' जय लहूजी ' चा नारा देत, लोकशाहीर,डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे,बघता काय सामील व्हा.असे आणि कैक नारे देत चंदा काढून जयंती साजरी करणार? कारण ते आपलेच महामानव आहेत.आपणास पट्टी देणे भाग आहे.हे त्यांचे रास्त मत असते? आणि तसे असणे साहजिक आहे.
झोपडपट्टीतील घराला दार नसले तरी,तेथून ते तमाम चाळी -चाळी तून अमाप पैसा जमा होणार.याच दिमतीवर जयंती साजरी होते.
एकदाची कार्यकर्ते नेते मिळून जयंती साजरी करणार? पदरात काय? पुढील ऑगस्ट ची वाट पाहावी लागते.
आता जसा ३१ ऑगस्ट निघून जाईल तसा दुसऱ्या कार्यक्रमाचे वेध लागते,ते म्हणजे ,गणराया येणार?
तुम्ही कांहीं म्हणा गणराया आमच्या घरी येणार, म्हणजे येणार?
आपणास विचार करायला हवा की ,आपली बुद्धी शुद्ध नसते.आपले डोके इतरांच्या इशाऱ्या वर चालते.म्हणून असे उद्योग सुचत असतात.
राजा शिवराय ,राष्ट्रपिता महात्मा फुले ,शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारात ,साहित्यात कुठे गणपती या शब्दाचा उल्लेख मिळतो का?
मग आपण या महामनवाचे वारसदार कसे ? तर नाही! आपण या महामानवाला खऱ्या अर्थाने तिलांजली देत आहेत.
संकट में। हिंदू धर्म के बाद अभी सनातन (धर्म ?) भी संकट में।
Thursday, August 17, 2023
अण्णाभाऊ यांचे मारे करी .
प्रा. बी. आर. शिंदे ; (विशेष शिक्षण ) नेरूळ नवी मुंबई ७०६ .
जसे मला कळते आहे, १९७२ पासून अण्णाभाऊ साठे यांचेवर नुसते फालतू भाषण एकूण थकलो आहे.माझ्या सारखे कैक तोच प्रश्न मनात करीत आहेत.हे सत्य आहे.उठ सुठ सोम्या गोम्या आमच्या कॉम्रेड साहित्यकाराला ,कम्युनिस्ट (Not a Marxist, he was a Comrade ) येवढ्या पाण्यात पाहतो आहे की ,आमचा बाप दीड दिवस शाळेत जाऊन साहित्यरत्न झाला.गरिबी हालाकी मधून दिवस काढले ? पाई चालत मुंबई गाठली.असे अपमानास्पद छातीठोक पणे बोलत असतो आणि ते आम्ही एकून गप्पा ही बसतो . ?
मा . माझी आमदार पी टी कांबळे ते मा. आमदार सुधाकर भालेराव असे अनेक आमदार होऊन गेले पण मला एकच आमदार भावले ते म्हणजे मा. भालेराव सर .
खूप पोटतिडकीने समाजासाठी कार्य करणारे .
यांनी कितीही संपत्ति कमवली असली तरी कमवू द्या . तुमच्या खिशातून देत आहेत का ? शेवटी मांगाचा ढाण्या वाघ आहे . तब्बल दोन वेळा आमदार होणे हे कांही सोप्पे नाही ?
समाजातील आमदारकिचा इतिहास पहिला तर कुणी गाणे गावून आमदार झाले तर कुणी अण्णाभाऊ यांची छककड गावून आमदार झाले . माझ्या उदगीर राखीव मतदार संघचे पहा . अनेक आमदार दिले आम्ही पण मा. भालेराव साहेब यांच्या कार्याला तोड नाही ? खरे आमदार .
असो तो माझ्या विषय नाही असे म्हणणे हे तेवडेच घातक आहे . कारण बाबासाहेबाणी सत्तेत जा हे सांगून गेले . म्हणून सत्तेत असताना आपले दु:ख मांडणारे नेते अजून भेटले नाहीत ? ही समाजाची खंत आहे . एक म्हण आहे , साहेबाच्या पुढे आणि मागे जाऊ नये ,नाहीतर तुम्ही संपला म्हणा ,या उक्ती प्रमाणे आपले काम भले आणि मी भला असतो .
नेते पुढारी हो ,अरे अण्णाभाऊ कांहीं गरीब नव्हते? त्यांचे कडे शेती होती .शेतकरी होते.शेतीत मशागत करीत होते.पण तिथे त्या शेतीत त्यांचे मन रमले नाही .गाव सोडून मुंबई ला जाऊ तेथील गरीब ,गिरणी कामगार ,मिल मजूर यांच्या बाजूने आपण लढू संघर्ष करू या वैश्विक हेतूने ते राजधानी मुंबई येथे आले होते.
मला या लोकांचे अजब वाटते आहे.त्या काळात शाळा होत्या का? बहुजन वर्गाला शिक्षण संधी होत्या का? गाव कुसा बाहेरील लोकांना शिक्षण होते का? आरे तुम्ही वेशी बाहेर होते . गावा बाहेर होते . फेकलेली जमात होती ( Read : who where Shudras ? ) तरी म्हणे आम्ही या देशाचे पाइक ?
ये आझादी झुटी है ,असे सांगणारा माणूस देश स्वातंत्र्य साठी त्या इंग्रज लोका विरुद्ध का लढेल ? इंग्रज आले म्हणून शिक्षण तुम्हाला माहिती झाले ? नाहीतर पाटलाच्या वाड्या शिवाय दुसरी चौकट माहिती होती का ?
येथील अश्या वाईट शिक्षणाला तिलांजली देऊन .अण्णाभाऊ 'लोक लढ्यासाठी ' मुंबईत आले.हे सांगायला जमत नाही का ? ते मुंबईत मजुरी करण्यास आले होते का ? असे हिडीस भाषणातून का सांगता . बाळ मनावर काय बिंबवायचे आहे आपणास ? तुम्ही आर एस एस च्या भागवत सारखे का अण्णाभाऊ विषयी बोलत आहेत . याचा अर्थ मी असा घेईन की आपण आर एस एस च्या 'गाय माय चे सेवक' आणि भक्त आहेत . हे आम्ही आंबेडकरवादी बहुजन खपवून घेणार नाही ? कदापि नाही ?
कॉ . अण्णाभाऊ समजून घेत असताना कुणी त्यांना वेगळ्या पदव्या मागत आहेत.ते तर भारतरत्न आहेत.फक्त नाव कोरले गेले नाही.
सूर्याला आरसा कश्याला? अन्याय आणि न्याय यातील फरक समजावण्यासाठी त्यांनी आपल्या समोर ' फकिरा ' सादर केली.तिच कादंबरी महामानव बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर यांना अर्पण केली.किती मांग लोकांच्या घरात ही कादंबरी आहे?
पर्वा मागच्या महिन्यात मी पुण्यात एक कार्यक्रमात गेली असता एक व्याख्याते यांनी विचारले की फकिरा कोणी कोणी वाचली आहे?
फक्त दोन लोकांनी हात वर केला होता? किती शरमेची बाब आहे.एकीकडे अण्णाभाऊ चे गुणगान गाता आणि दुसरी कडे त्यांच्यावर घनाघात करीत आहेत. त्या सभेत लाज वाटली ?
१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट नाच गण्यात तल्लीन झालेली पिढी ,गुटके बहादुर यातील ,अण्णाभाऊ कोणाला कळले का ? उत्तर हे नाहीच मिळणार आहे ?
अहो ते डॉक्टर होवू द्या की नाही होवू द्या .आपण त्या डॉक्टर व्यक्तीचे किती साहित्य वाचले आहे? हा बिनीचा प्रश्न आहे .
अण्णाभाऊ काय? पुतळ्यात आहेत का? कधीच नाही?
ते त्यांनी मांडलेल्या आपल्या वैश्विक साहित्यात आहेत.कथा कादंबऱ्या आणि ग्रंथात आहेत . त्यांचे साहित्य वाचा . वाचा अण्णा वाचा.तुम्ही वाचा आणि आपल्या येणाऱ्या मुला बाळाणा पण वाचायला सांगा . अण्णा कांही पुतळ्यात मिळणार नाहीत ?
जसा ३१ अगस्त चा आकडा संपेल तसे मांग समाजाच्या घरा दारात मातीचा ,थर्माकोल चा गणपती विराजमान होईल? काय घनघोर अपमान आहे त्या महानवाचा महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब ,शाहू महाराज आणि आण्णाभाऊ साठे यांनी कुठे आपणास त्यांच्या साहित्यात घरात गणपती बसवण्यास सांगितले आहे का? किती छळ कपट करीत आहेत त्या मानवांचे.
यांचे पाइक म्हणून मिरवत असताना आपल्याला लाज वाटली पाहिजे . ज्या मंडपात महानवाच्या जयंत्या उभ्या केल्या त्याच मांडवात गणपती आणून बसवता ? लाज कशी वाटत नाही आपणास बहुजन समाजाचे नेते आणि कार्यकर्ते म्हणून समाजात मिरवत असताना . समाजाची किती दिशाभूल करीत आहेत . समाज आपणास माफ करणार नाही ? याद राखा !
अण्णाभाऊ यांनी गण आणि गणपती गवळण मोडीत काढीत आपले ' आदी जनाला ' हा झांजवत आपल्या लाल बावटा पथका मार्फत जनमनात पेरला.हे आपणसा कसे कळत नाही ? त्यांना गणपती ची आराधना केलेल कधी कुठे पुरावे असतील तर द्या आणि खुशाल घरात ,घरावर ,अंगणात जिथे जागा असेल त्या जागेवर गणपती बसवा . किंवा डोक्यावर घेऊन खुशाल फिरा ?
हे सांगण्यास आपणास लाज वाटते.म्हणे अण्णाभाऊ शाळेत गेले नाहीत?
हो अण्णाभाऊ शाळेत गेले नाहीत ? नाही जाउद्या , पण परत परत किती वर्ष गुरळ ओकणार आहेत . ? याद राखा खूप मोठी गफलत करीत आहेत. उद्या येणारी पिढी आपल्या तोंडात शेण फेक्तील?
आपले अण्णाभाऊ तर शाळेत गेले नाहीत? मग मी शाळेत जाऊन काय करू? असे जर आपले मुले विचारतील तर ,तेंव्हा उत्तर तयार ठेवा.?
काळ बदलत गेला.डॉक्टर बाबासाेबांबद्दल माहिती आहे का?
परदेशात जाऊन बॅरिस्टर होऊन आले? राज्य घटना लिहली असे एवढेच सांगितले जाते. पण तसे नाही ?
त्यांनी संघर्ष केला आणि त्यातून दलित उठावाच्या ठिणग्या पडल्या , सारा आसमंत पेटून उठला.गुलामी चे साखळ दंड तुटले माणसे ,दलित स्वतंत्र झाला ,हवा मोकळी झाली.
याचा धागा पुढे रेटीत अण्णाभाऊणी जग बदलाची धार आणि कवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कडे झुकती केली .अर्पण केली . ते आंबेडकरवादी होते ? ते तसे नसते तर त्यांनी 'जग बदल घालूणी घाव सांगून गेले मज कार्ल मार्क्स राव ' असे कवण नाही का गायीले असते ?
प. पू. डॉक्टर बाबासाहेब अण्णाभाऊ यांना तेंव्हा कळले त्या काळात कळले ,पण आज आपणास का कळत नाहीत ? या मागचे गौडबंगाल कळायला हवे .
जगभरात ख्याती असलेले अण्णाभाऊ जगाला काळले ,कारण त्यांनी त्यांचे साहित्य वाचले . आपण त्यांचे साहित्य वाचलेच नाही ? तर कळतील कसे ?
प्रा बी आर शिंदे
,नेरूळ नवी मुंबई
- ७०६
लेख पसंत आला तर धम्मदान करा ..........
Saturday, July 29, 2023
धपोलशंख
Saturday, July 8, 2023
विनय पिटक का विनय मतलब विनायक
विनय पिटक का विनय मतलब विनायक :
गोतम बुद्ध तथागत का एक नाम विनायक भी है। विनायक का मतलब विनय के गुरु। विनय के गुरु सिर्फ तथागत ही थे। इसिलए विनय पिटक में उन्हीं के वचन हैं। विनय पिटक एक उसिका अंग है
त्रिपिटक : (तीन पिटक )
(१) विनयपिटक : सुत्तविभंग (पाराजिक, पाचित्तिय),खन्धक (महावग्ग, चुल्लवग्ग) परिवार,पातिमोक्ख,
(२) सुत्तपिटक दीघनिकाय,मज्झिमनिकाय,संयुत्तनिकाय,अंगुत्तरनिकाय,खुद्दकनिकाय,खुद्दक पाठ,धम्मपद,उदान,इतिवुत्तक,सुत्तनिपात,विमानवत्थु,पेतवत्थु,थेरगाथा,थेरीगाथा,जातक,निद्देस,पटिसंभिदामग्ग,अपदान,बुद्धवंस,चरियापिटक
(३) अभिधम्मपिटक : धम्मसंगणि,विभंग,धातुकथा,पुग्गलपंञति,कथावत्थु,यमक,पट्ठान।
यदि कनिंघम ने विनायक का अर्थ विनय का गुरु किया है तो गलत नहीं किया है। सही है।एसे सच्चे लोगों ने इस पवित्र धम्म को जीवन दान दिया है । वे इस भारत मे न आते तो यह पवित्र धम्म कब का नामसेष हुवा होता ।
विनायक का आधार नायक ,नेता नहीं राज्य कर्ता तो कतई है नहीं बल्कि विनय है। इसीलिए विनय विनायक होता है । नायक विनायक नहीं होता है ।
राजस्थान में जो प्रसिद्ध बौद्ध गुफा विनायक है, वह तथागत के नाम के कारण है। गाँव बिनायग है ।
( तस्वीर विनायक बौद्ध गुफा की है।
प्रा बी आर शिंदे ,नेरुल नवी मुंबई ।
Sunday, June 18, 2023
Path of Purity- परिशीलन बुद्धांचे पहिले प्रवचन : दु;ख मुक्ति ची प्राप्ती,
Path of Purity-परिशीलन
बुद्धांचे पहिले प्रवचन : दु;ख मुक्ति ची प्राप्ती
भाग -३५
‘बुद्ध आणि त्यांचा धम्म ‘
----------------------------------------प्रा बी आर शिंदे ,कर्णबधिर विशेष शिक्षणतज्ञ
संपूर्ण मानवाच्या मुक्तीचा एकच मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग होय आणि आपण त्याचा साकल्याने विचार करीत आहोत . बुधांच्या मूल सूत्रात अष्टांगिक मार्गाची जशी मांडणी आहे तशीच मांडणी बाबासाहेबांनी यात मांडणी केलेली आहे . परंतु एकंदरीत बुद्धधर्माचा या परिशुद्धीकडे नेहण्याच्या निरणावणाकडे नेहणारा विचार आधुनिक लोकांना स्पठ व्हावा म्हणून थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडला गेलेला आहे . उदा पंचसील हा अष्टांगिक मार्गाचा मूळ आधार मानून अभिवचन केले आहे आणि त्यास त्यांनी नाव दिले आहे ‘Path Of Purity’ . यालाच विशुद्धीचा मार्ग असे म्हणट्ले आहे . विशुद्धीचा मार्ग स्वीकारल्या शिवाय अष्टांगिक मार्गाचाचे पालन करने काठीन आहे हे त्यांची भूमिका आहे .
दुसर्या भागात या मार्गाची माहिती दिली आहे आणि त्यास अजून दुसरे नाव दिले आहे ‘ Path of Rrightness’ .हा सदाचाराचा मार्ग, म्हणजेच अष्टांगिक मार्ग होय . या पुढे जाऊन असेही म्हंतटले आहे की मनाची परीसुद्धी करणायचा पाया जो बुदधणे सांगितलं आहे तो म्हणजे ‘पारमितेचा ’ मार्ग होय . यालाच पुढे जाऊन बाबा साहेब असे म्हणतात की ‘Path of archive’ . अश्या तीन भागात त्यांनी अष्टांगिक मार्गाचा सारांश जोडला आहे .
ही मांडणी पारंपरिक पद्धती पेक्षा अत्येंत वेगळी असून अधुनिक काळात उपयुक्त आणि उचित आहे .एकूण अष्टांगिक मार्ग आठ असले तरी यात महत्वाची दोनच अंग आहेत ‘स्मेक सती आणि संयेक समाधी .’
सती म्हणजे स्मरण . नुसते स्मरण नशून मूल अर्थ असा लावता येईल की ‘Awareness’ . म्हणजे सतत ची जागरूकता . कायम जागे राहणे किंवा Continues Alertness . थोडक्यात सावधान राहणे हा सतीचा मूळ अर्थ आहे . आणि मानणा सवयच लाऊन घेतली पाहिजे की जे करतोय ,जे वागतोय आणि रोज अनुभवतोय ते आणि त्या कडे जगरूकतेने पाहणायची आणि त्याची दखल घेण्याची आणि मनाला सवय लावणे आवश्यक्ये आहे . महणून संयेक सती हे अतिशय महत्वाची बाब आहे .
संयेक सती बळकट होण्यासाठी मनाचा व्यायाम महत्वाचा आहे . हा व्यायाम कसं असावा जे कुशल असेल तो व्यायाम ,ज्या मुळे मन स्मृद्ध होते . अकुशल असेल तर मनाची शक्ति मारली जाते . रोजच्या जीवनात हे दोन भाग फार म्हतवाचे आहेत.
आपण रोजच्या जीवनात याच दोन मार्गाने जीवन जगत असतो . थोडक्यात चांगले आणि वाईट . माणसाचे मन अधिक चंचल होत जाते . मनाची साधना त्याला करावीच लागते कारण ही चंचल वृती रोजच्या व्यवहारात आपला सतत पिछा करीत असते . आपल्या वागण्या बोलण्यात सगळीकडे चंचलता येते ,कारण यात राग ही आहे आणि द्वेष ही आहे . चांगेल-वाईट ,कुशल अकुशल आहे . या दूरीच्या द्वंद्वत जीवन जगत असताना ‘To be or not to be ‘ चे जीवन होते . म्हणून संयक्ये व्यायामची गरज आहे . यातून हे द्वंद्व संपवण्याची शक्ति निर्माण होते . यातील व्यायमचा पहिला प्रकार म्हणजे जे चांगले आहे ते टिकवायचे . आणि तेचं मनात कायम टिकवायच . मन कमजोर कधीच होऊ द्याचे नाही .मनाला सतत बळकटी देत राहावे .
दूसरा प्रकार म्हणजे जे चांगेल झाले नाही ते मनात निर्माण करणायची जिद्ध तयार करायची. कांही बाबतील कुशल चित्त निर्माण होत नाही ते निर्माण करायचे . हे दोन प्रकार कुशलांचा पाठपुरावा करणारे व्यायाम आहेत .
दुसरे दोन जे आहेत ते मनाची हानी करतात . अकुशल हे कुशलला मारन्या चे काम करतात आणि हानी करतात तपासून वाचले पाहिजे काम दूर राहिले पाहिजे . जे अकुशल मनात आलेले आहे त्याचे उच्चाटन करा . त्याला काढून टाकण्याचा प्रयत्न करा जे मनात अकसुशल येऊ पाहत आहे त्याला रोकून ठेवा त्यासाठी बांध घाला . त्याला जवळच येऊ देऊ नये अश्या तर्हेने मनाला कमजोर करणार्या या दोन नकारात्मक पद्धती आहेत ,यांच्या पासून सावध राहणेचा प्रयत्न करावा . मनाला जी शिकवण दिली तसे वागावे लागते ,आणि सतत जागृती बाळगावी लागते . म्हणून ‘स्म्येक सती’चा अभ्यास त्याचा सुरू होतो. हे करणायसाठी सतत सावध राहिलेच पाहिजे कोणत्या क्षणी मनात काय येईल ,तो मनाचा कांही भरवसा नाही ?
कोणत्या क्षणी आपल्या मनाची काय आवस्था असेल ते आपणास कळत नाही . कांही होऊन गेल्यावर कळतात ,अरे ते आपले चुकले. रागत आपलायला काय कार्याचे ते करतो ,ते नंतर कळते की आपण चुकीचे केले आहे . अरे आपले चुकले असे समजतो आणि नंतर पश्चाताप होतो . मग त्या चुकीला कांही नंतर अर्थ उरत नाही . राग येताच त्याची दखल घेणे हे ही तेवढेच म्हत्वाचे असते .मन सतत दक्ष आणि सावध पाहिजे राग आलेला आहे आणि हा राग अकुशल आहे या प्रमाणे माला वागायचे नाही हे ठरवायला हवे . हे माला माझ्यात टिकू द्यावयाचे नाही ते हद्दपार कराचे आहे . आणि मग हद्दपार करणायचा मार्ग सोप्पा आहे . यावर एकच उपाय आहे ,तीन वेळा दीर्घ स्वश घाय आणि तीन वेळा बाहेर टाका ,रागाचा पारा आपोआप उतरतो .
यामुळे रागाच्या भरात जे करतो ते कधी होणारे नाही . राग उतरल्यावर राग विरहित जर आपण एखादे कार्ये केले तर मनाला शक्ति येते . यातून आत्मविश्वसा बळकट होतो हे फार महत्वाचे आहे .
आज माणसाला व्यावहारिक जीवनात जगणायसाठी आत्मविश्वासाची खूप गरज आहे . हा आत्मविश्वास फक्त सकरत्म्क माध्यमातून वाढतो दुसरे एकही मध्यम आज तरी नाही . त्याला जर बळ कोठून मिळत असेल तर ते व्यावहारिक ज्ञानातून त्यालाच आपण Information किंवा knowledge असे म्हणतो . जेवढे ज्या विषयाचे आपणास ज्ञान असेल तेवढे त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो . मूल आत्मविस् ज्याला आपण समजतो तो त्या त्याच्या ज्ञानावर अवलंबून असतो . आणि तो असतो मनाच्या सकारात्मक आवस्थे मध्ये . ज्ञान तास अधिक पोशाक आणि पूरक महणून काम करते .
यालाच आत्मविश्वास असे म्हणतात हा प्रतेक व्यक्तीत असतोच असे नाही . जेवढा माणूस रागीट तितका त्याचा आत्मविश्व्स्स कमी ,जेवढा द्वेषी त्याचा आत्मविश्वास नसल्या समान आहे. यालाच बुद्धधम्मात त्याला ‘बळ’ असे म्हणतात . हे बळ कोनात ही नसते कमी लोकात असते . हे बळ अधिक वाढवण्यासाठी व्यायमची गरज आहे . याच बळाने स्मृति जागृत राहते . आशयणे माणसाचा पुढील विकासाचा टप्पा जो आहे साधे होतो . यालाच नाव संयेक समाधी असे म्हणतात .
बाबासाहेबांनी विपसणेची विभागणी हो दोन भागात केली आहे . एक समाधी आणि दुसरी संयक समाधी .
‘ चित्तस्स एक्स्स गत्ता ’ चित्ताची एकाग्रता म्हणजे समाधी होय . आणापाणा मधून चित्ताची एकाग्रता सध्ये होते . या एकाग्र चित्तानं जेंव्हा आपण जीवनाच्या मनाचे चिंतन मनन करतो , सखोल गंभीर ,वरवर चे नाही त्या एकाग्र मनाच्या समर्थपणे होते त्यातून आपल्या चित्तत जो बदल होतो तसे आपल्या समाधी जागृत होतात त्या आवस्थेला संयेक समाधी असे म्हणतात . यात तुमचे मन बदलून जाते यात जे कांही जडण घडण वेगळी होते ,अशुद्ध आहे ते गळून पडते . याच मानसिकतेत तुम्ही जगायला लागता . म्हणूनच परिशुद्ध आवस्था जी आहे चित्ताची त्यालाच समक्ये समाधी असे बाबासाहेब म्हणतात. ही बाबासाहेबांची समाधी ची भाषा आहे .
थोडक्यात समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रत होय . जसे पालीत लिहले आहे जसेच्या तसे बाबा साहेबांनी यात लिहले आहे .
‘चित्तस्स एक्स्सगता समाधी’ ही समाधी प्राप्त करून घेण्यासाठी मानसाच्या मनामध्ये पाच प्रकारचे अडथळे असतात असे बुद्धाणी सांगून गेले आहेत.
या मनाच्या प्रवृती मुळे तो आपला एकाग्रता साध्य करू शकत नाही . मन आपले चंचल आहे . चंचल कशामुळे आहे . हे विनाकारण आहे का चंचल ? विनाकारण नाही याला कारण नक्कीच लागते , हा विश्वाचा नियम आहे . श्रुष्टीचा नियम आहे त्याला नक्कीच कारण लागते . मग विचार करा मन चंचल का आहे ? याची करणे आहेत ते पाच कारने बुद्धधम्मत सांगितली आहेत . यालाच ‘पंच निवरण ’ असे संबोधले जाते .इंग्रजी भाषेत five fitters असे म्हणतात .हेच मानवी जीवन उज्वल करण्यात येणारे आडथळे आहेत .
पहिला अडथळा लोभ – जो प्रयेंत मनसाच्या मनात लोभ घर करून आहे तो प्रयेंत चंचलता राहनारच . लोभाचा स्वभाव कसा, जिकडे लक्ष जाईल ते आपल्याला हवे असते . ते पाहिजे असते ,जे मनात येईल ते आपल्याला हवे असते . म्हणून एका क्षणात हे तर एका क्षणात ते असे चंचल होते . मन जिकडे जाईल तिकडे घेऊन जाते . जे मनात ते आपल्याला पाहिजे तिकडे घेऊन जाते ,मन क्षणात बदलत असते हे पाहिजे का ते ? अशी अवस्था करून टाकते. लोभावर नियंत्रण ठेवले पाहिजे . वाटेल ते प्रतेक गोष्ठ हवी ती भावना कमी केली पाहिजे . परत तिथे जागृतीचा प्रभाव येतो ,अरे यात माझे कांही अडलेले नाही . मला हे नको ते नको असे मन तयार झाले पाहिजे . ही भावना निर्माण झाली की लोभाची मात्रा कमी होते .
मार्केट मध्ये छान कपडे बघून नुसते चालतो का पुढे ,मन आपले काम कारला सुरुवात करते . ते दिसतात कसे सुंदर ते घायला पाहिजे . हे चांगले दिसते घायला पाहिजे असे किती तरी मनामध्ये लिस्ट होऊन जाते . त्या क्षणी त्याची गरज असते का पण मन त्या कामात गुंतले जाते .गरज नसताना अश्या तर्हेने मनाची एकग्रता कमी होते . अश्या आवडीच्या खूप गोस्ठि असतात आपल्या आवती भोवती ,या मध्ये कांही लोकांना नादच लागतो . आणि मार्केटिंग ची सवय लागते. नुसतेच फिरत राहण्याची सवय लागते ,यालाच यूरोपियन देशात त्याला ‘Window Shopping’ असे म्हणता . घ्यायचे कांही नाही पण खिडकीत काय देखावा तो पाहत फिरायचे आणि मनात लिस्ट करायची, नुसतेच मन चंचल म्हणून बाजारात गेल्यावर जे लागेल ते घेणे आणि सरल घरी निघून येणे . हा त्याला आळा घालणायचा प्रकार आहे ,म्हणून लोभाळा आळा घातला पाहिजे . यामुळे एकाग्रता होत विचलित होत नाही .
दुसरी भावना ,आडचनीची सांगितली आहे ते म्हणजे द्वेष मत्सर -
यामुळे माणसाला राग येतो ईर्षा येते ,नावड येते तिरष्कार येतो हे सारे द्वेसाचे भाऊबंध आहेत. गोतावळा ,परिवार या पैकी जी भावना निर्माण होईल तेंव्हा आपली एकाग्रता गेली . केंव्हा राग येईल याचा पत्ता आहे का ? द्वेष केंव्हा ही येऊ शकतो त्याचा कांही पत्ता नाही .ईर्षा मत्सर द्वेष राग हे कायमच चालू असते .
कोणत्या क्षणी काया निर्माण होईल याचा भरवसा नसतो . आपले मन एकाग्र होणायचे थांबते आणि त्या भावनाच्या मध्ये रममाण होते . मन वाटल जात आणि त्याची विभागणी होते क्षती होते . हा आडथळा आहे महणून द्वेष रोखला पाहिजे .याचा परित्याग केला पाहिजे .
म्हणून मानत सतत मैत्री भावना करुणेचे लक्षण ठेवा असे बुद्धाणे संगितले आहे . जे कांही करेन ते मैत्री भावनेच्या रूपातून करेन ,जे कांही बोलेन मैत्री करुणेच्या बोलेन जो कांही विचार कारेन मैत्री करुणेच्या भावनेतून करेन हा विचार मानत ठेवावा असे वागन्याचा सतत प्रयत्न म्हणजे सम्यक व्यायाम आहे . सम्यक स्मृति आहे . म्हणजे माणसाला meditation करताना ध्यान करायचे आणि एरवी कसे ही वागायचे असा प्रकार आहे का ? नाही . हे दोन जीवनाचे इतके म्हत्वाचे आंग आहे . हा व्यायाम कायम करायचा . आणि आपला रोजचा जीवन मार्ग सुखकर करावा
लेख आवडला तर धम्मदान करून मदत करा ..
झाली एकदा किलबिल सुरू
राज्यातील विदर्भ वगळता शाळांमध्ये आजपासून म्हणजेच 15 जून 2023 पुन्हा किलबिल सुरू होणार आहे . शाळा गजबजलेल्या असणार आहेत ,शाळा भरलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आज शाळा - शाळातून ध्जय्यत तयारी सुरू झालेली आहे. मात्र पहिल्याच दिवशी शाळांमधून विद्यार्थ्यांना गणवेश न मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले?
यामागील काय राजकारण आहे ते अद्याप कळलेले नाही? गणवेश आणि वह्या पुस्तके यामागे या राज्यातच नसून संपूर्ण देशामध्ये मोठे राजकारण अडकलेले आहे. यामागचे मोठे घोडबंगल अजून उलगडलेली नाही?
खऱ्या अर्थाने उन्हाळ्याच्या अति तीव्रतेमुळे २०२० -२३ हे शैक्षणिक वर्ष एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच संपवले गेले ,कारण होते अति तीव्र उन्हाळा. एकंदरीत अंदाजे पावणेदोन महिन्याच्या सुट्टीनंतर बालक आणि पालक एकमेकांशी भेटणार आहे दीर्घ सुट्टीनंतर आजपासून पुन्हा शाळा सुरू होत आहे..
मागील काळात जाहीर केल्याप्रमाणे विदर्भ विभागातील शाळा अजून सुरू झालेल्या नाहीत..पूर्व प्राथमिक मधून पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागलेली आहे.. पालकांनी त्यांची लगबग सुरू झालेली आहे. शाळेविषयी आपुलकी वाटावी , आदर वाटावा शिक्षकाचा सन्मान व्हावा पालकांचा सन्मान व्हावा यासाठी शाळेतून उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
आज शाळेत पहिलं पाऊल टाकलेल्या चिमुकल्या बालकांचे त्यांच्या पालकांचे, शिक्षकाचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक अनेक हार्दिक अभिनंदन!!
येवलाआणिधम्मातर_घोषणा !
येवलाआणि धम्मातर_घोषणा !
येवला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे छोटे शहर आहे. येथे हातमागावरील जगप्रसिद्ध पारंपरिक पैठणी विणण्याचा व्यवसाय आहे. काही ठिकाणी यंत्रमाग वापरले जायला लागले आहेत. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरीसाठी येवला प्रसिद्ध आहे. या नक्षीमध्ये मोराची प्रतिमा अधिक लोकप्रिय आहे. येथील पैठण्या निर्यातही होतात.
कार्यालयीन कामा निमित्त अनेकदा इथे जाण्याचा योग आला . आमचे मित्र कोकाटे सर या गावचे. यांनी मला अनेकदा इथे बोलावले होते .ते एक शासन मान्य कर्णबधिर शाळा चालवतात . एकदा येथील इतिहास कळल्या पासून परत परत जाण्याची इच्छा होत असे कारण असे की ही भूमी डॉक्टर बाबासाहेब यांच्या पदस्पर्शाने पावन तर झाली होती पण इथूनच हिंदू धर्म त्याग करण्याची घोषणा झाली होती .
मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे प्रथम केली होती, त्या ठिकाणी २०१४ साली मुक्तिभूमी स्मारक निर्माण केले गेले.
आणि ती घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो .
जय भीम !नमो बुद्धाय !!
प्रा. बी. आर. शिंदे ,कर्णबधिरांचे विशेष शिक्षण तज्ञ .
(संदर्भ फोटो : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक, येवला)
Saturday, February 4, 2023
मतिमंद मुलांची वैशिष्ट्ये
मतिमंद मुलांची वैशिष्ट्ये
जगात आपण अनेक प्रकारचे मुले पाहतो जे अनेक आजारांचे शिकार झालेले असतात . हे मुले पाहत असताना आपण विविध प्रकारची दिव्यांग मुले पाहत असतो . यात कर्णबधिर . मतिमंद . अंध आणि अस्थि व्यंग हे होत . मी आपणास इथे मतिमंद मुलाविषयी बोलतो आहे .
काही मुले मानसिकदृष्ट्या सामान्य असतात. अशा उप-सामान्य मुलांना शिक्षणातील शिक्षकांचे शिकवण्याचे कार्य समजू शकत नाही किंवा सहज समजू शकत नाही. अशा मुलांना मतिमंद मुलांच्या श्रेणीत ठेवले जाते. अशा मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे हे वैज्ञानिक सत्य आहे.
मुलांचे वर्गीकरण त्यांच्या बुद्धिमत्ता भागाच्या आधारे केले जाते.त्यात अनेक वर्गीकरण दिसून येते . वेगवेगळ्या अभ्यासकाने विविध भाषी केली आहेत .
टर्मन यांच्या मते काय म्हणतो ते पहा : ७० पेक्षा कमी बुद्ध्यांक असलेल्या मुलाला 'मंदबुद्धी' मूल म्हटले जाते.निस्तेज आणि मागासलेले 70-80 अशी मुले कोणत्याही शारीरिक आणि मानसिक आजारामुळे मंदबुद्धीचे प्रदर्शन करतात आणि त्यांच्या वयानुसार कोणतेही काम करू शकत नाहीत. या दोषाचा परिणाम असा होतो की त्यांच्यात अनेक प्रकारचे न्यूनगंड जन्माला येतात. परिणामी अनेक मतिमंद मुले समाजात सर्व बाजूंनी दुर्लक्षित राहतात.
अशी मतिमंद मुले भावनिक स्थिरता, सामाजिक परिपक्वता आणि बौद्धिक प्रगल्भता यामध्येही मागासलेली असतात. कधीकधी अशी मुले शारीरिकदृष्ट्या प्रौढ होतात, परंतु त्यांचे सामाजिक आणि भावनिक वर्तन त्यांच्या वयाच्या मुलांपेक्षा खूप मागे असते.ते आपण रोजच्या व्यवहारात पाहतो आहे .
आयझॅक (आयसेंक) यांच्या मते : "मानसिक क्षमतांचा अपूर्ण आणि अपुरा सामान्य विकास याला मानसिक मंदता म्हणतात." (मानसिक मंदतेची व्याख्या मानसिक क्षमतांचा अपूर्ण किंवा अपुरा सामान्य विकास म्हणून केली जाते.)
पेजच्या मते : "मानसिक मंदता ही मानसिक विकासाची उप-सामान्य स्थिती आहे जी जन्माच्या वेळी मुलामध्ये असते किंवा लवकर बालपणात विकसित होते." त्याचे मुख्य वैशिष्ट्य - मर्यादित बौद्धिकता आणि सामाजिक अपुरेपणा हे होय .
मानसिक मंदता ही जन्मत: किंवा लवकर बालपणात उपस्थित असलेल्या उप-सामान्य विकासाची स्थिती आहे आणि मुख्यतः मर्यादित बुद्धिमत्ता आणि सामाजिक अपुरेपणा द्वारे वैशिष्ट्यीकृत आहे.
हेकच्या मते : “मंदबुद्धी अशी मुले आहेत जी मानसिक परिपक्वता नसल्यामुळे कोणतेही काम करू शकत नाहीत.” मतिमंद मुलांचे वर्गीकरण असे केले आहे . I.Q च्या आधारे वर्गीकरण ते खालील प्रमाणे आहे .
IQ च्या आधारे केलेले वर्गीकरण सर्वांनी स्वीकारलेले वर्गीकरण नाही. वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी मंदतेच्या वेगवेगळ्या मर्यादा सांगितल्या आहेत. पण या मुलांचा मानसिक विकास सामान्य मुलांच्या तुलनेत खूपच कमी असतो यावर सर्वांचेच एकमत आहे. ही मुले मानसिक क्रियाकलापांमध्ये सामान्य मुलांप्रमाणे असू शकत नाहीत.
युनेस्कोच्या एका प्रकाशनाने मतिमंद मुलांचे IQ (I.Q.) स्तर खालीलप्रमाणे प्रकाशित केले: मतिमंदतेची श्रेणी अशी आहे .
इडियट ०-१९ ; बेफिकीर 20-49; क्षीण मन ५०-६९ ;निस्तेज आणि मागासलेले 70-80
मग मतिमंद मुलांची वैशिष्ट्ये काय आहेत ते पहा :
मानसिक आरोग्य चांगले नसणे : सतत खराब आरोग्य आणि मंद प्रतिक्रिया मानसिकदृष्ट्या अपंग मुलांचे आरोग्य सतत चांगले नसते. कोणत्या ना कोणत्या रोगाने त्यांना घेरले आहे, त्यांच्या प्रतिक्रियाही खूप मंद असतात.
अपुरे व्यक्तिमत्व : अशा मुलांचे व्यक्तिमत्व कधीच परिपूर्ण असू शकत नाही. त्यांच्यात नैसर्गिकता आणि गतिशीलता फारच कमी आहे. ते स्वतःहून निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. भविष्यातील परिस्थितीशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते फक्त वर्तमानात जगतात.
इतरांवर अवलंबून राहणे: मंद मुले इतरांवर अधिक अवलंबून असतात. त्यांच्याकडे वैयक्तिक आणि सामाजिक समस्यांना तोंड देण्याची क्षमता जवळजवळ नसते. तसेच त्यांचे त्यांच्या इच्छांवर नियंत्रण नसते आणि ते समाजविघातक कार्यात सहभागी होऊ शकतात.
मर्यादित बुद्धिमत्ता: मंदबुद्धीची बुद्धी खूपच मर्यादित असते, म्हणजे ७० पेक्षा कमी, या कमतरतेमुळे, त्यांच्यात समायोजन करण्याची आणि इतर मानसिक प्रक्रिया पूर्ण करण्याची क्षमता नसते.
अॅबस्ट्रॅक्ट थिंकिंगचा अभाव: कमी बुद्ध्यांकामुळे मंद मुलं अमूर्त विचार करू शकत नाहीत. ते समस्येचे विश्लेषण करू शकत नाहीत. मानसिक मंदतेची कारणे.
अधिगम की धीमी गति (Slow Learning) : मानसिक रूप से मन्द बुद्धि बालकों के अधिगम की गति बहुत ही धीमी रहती है। इसे तीव्र करना असंभव होता है।
शारीरिक हीनता (Physical Inferiority) : इस प्रकार के बच्चों में शारीरिक हीनता भी आ जाती है। उनका शरीर विकृत हो जाता है। शारीरिक रोगों का सामना करने की शक्ति उनमें कम होती है सामान्यतः वे अस्वस्थ रहते हैं तथा उनका शारीरिक विकास कम होता है।
संवेगात्मक अस्थिरता (Emotional Unstability) : मानसिक रूप से पिछड़े बालक संवेगात्मवा रूप से अस्थिर होते हैं अर्थात् उनका संवेगों पर कोई नियंत्रण नहीं होता। कई बार तो बहुत ही निम्न श्रेणं के बालक जीवित रहने की इच्छा ही खो बैठते हैं। वे अपनी मूलभूत आवश्यकताओं की अभिव्यक्ति कर में भी असमर्थ होते हैं।
अपूर्ण और और दोषपूर्ण शब्दावली (Incomplete & Defective Vocabulary) : इस श्रेणी के बालकों की शब्दावली अपूर्ण और दोषपूर्ण होती हैं। उन्हें भाषा का सीमित ज्ञान होता है।
सीमित रुचियां (Limited Interests) : मानसिक रूप से पिछड़े बालकों की रुचियाँ सीमित होती हैं। वे किसी एक ही कार्य में अपनी रुचि का प्रदर्शन करने में सक्षम होते हैं।
लघु अवधान विस्तृति (Short Attention Span) : मन्दबुद्धि बालकों में लघु अवधान विस्तृति होती है। लम्बे कार्य में मानसिक रूप से मन्द बालकों की रुचि समाप्त हो जाती है तथा उनका ध्यान विचलित हो जाता है। ऐसे बालक सामान्य बालकों की तरह किसी लक्ष्य को प्राप्त करने की योजना का अनुसरण नहीं कर पाते।
मौलिकता का अभाव (Lack of Originality) : इन बालकों में मौलिकता का अभाव रहता है अर्थात् वे अपने स्वयं के चिन्तन के अभाव में कोई कार्य नहीं कर पाते।
सामान्यीकरण की योग्यता का अभाव (Lack of ability to Generalize) : मानसिक रूप से मन्द बालकों में तथ्यों का सामान्यीकरण करने की योग्यता का अभाव रहता है अर्थात् वे किसी स्थिति का निष्कर्ष निकालने के योग्य नहीं होते।
प्रोत्साहन का अभाव (Lack of Inspiration) : ऐसे बालकों में प्रायः प्रोत्साहन की कमी रहती है तथा स्कूलों में जाने की रुचि बिल्कुल नहीं होती। इनका झुकाव अनैतिकता और अपराध की ओर रहता है।
धीमी विकास गति (Slow Development) : ऐसे मन्द बुद्धि बालक सामान्य बालकों की अपेक्षा प्रत्येक क्षेत्र में धीरे-धीरे विकसित होते हैं। कई बार इनका विकास इतना धीमा होता है कि वे आयु वर्ग से बहुत पीछे रह जाते हैं।
समायोजन का अभाव (Lack of Adjustment) : स्कूल की शिक्षा का स्तर कम होने के कारण ये बालक सामाजिक और संवेगात्मक रूप से स्वयं का समायोजन नहीं कर पाते।
मंद बुद्धिमत्ता अनेक प्रकारच्या परस्परसंवादामुळे उद्भवते. यासाठी कोणतेही एक कारण जबाबदार धरले जात नाही. मंदबुद्धीची असण्याचे मुख्य कारणे खालील प्रमाणे आहेत :
1 . आनुवंशिकता
2. शारीरिक घटक
3. भावनिक घटक
4. समाजशास्त्रीय घटक
आनुवंशिकता: मानसिक मंदतेची जबाबदारी आनुवंशिकतेला कारणीभूत आहे. पालकांच्या मानसिक मागासलेपणाचा मुख्य भाग त्यांच्या मुलांवर जातो. बुद्धीचा अभाव हा प्रकार पूर्वजांमध्ये देखील आहे आणि तो त्यांच्या मुलांमध्ये हस्तांतरित केला जाऊ शकतो. हे हस्तांतरण गुणसूत्रांद्वारे होते.
शारीरिक घटक: मेंदूच्या कोणत्याही भागात दोष असल्यास मूल मानसिकदृष्ट्या अपंग किंवा मतिमंद असू शकते. याशिवाय तापामुळे मेंदूच्या पेशींना होणारी इजा यांचाही शारीरिक घटकांमध्ये समावेश होतो. इतर अनेक रोग देखील मंदतेला जन्म देतात, जसे की मेंदुज्वर, जन्मजात सिफिलीस, जर्मन गोवर, एपिलेप्सी, पक्षाघात, अपोप्लेक्सी इ. या आजारांव्यतिरिक्त, गर्भधारणेदरम्यान सामान्य स्थिती, बाळंतपणाच्या वेळी अपघात किंवा मेंदूवर एखाद्या उपकरणामुळे झालेला आघात, बाल्यावस्थेत डोक्याला दुखापत, असंतुलित आहार किंवा खराब आहार.मुले मंद मनाची असू शकतात.
भावनिक घटक: मतिमंद मुले भावनिकदृष्ट्या चुकीची असू शकतात. कधीकधी अशी मुले खूप उत्साही आणि आक्रमक असतात. या मुलांच्या भावनिक असंतुलनामुळे त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर निश्चितच परिणाम होतो. असे घडते कारण ही मुले त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत किंवा त्यांना कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही. अशा परिस्थितीत ही मुले स्वत:शी जुळवून घेऊ शकत नाहीत.
समाजशास्त्रीय घटक: समाजशास्त्रीय घटक देखील मानसिक मंदतेला कारणीभूत ठरतात. मानसिक मागासलेपणा हे कुटुंबातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे होते, असे काही समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. वरील कारणांव्यतिरिक्त, इतरही काही कारणे आहेत, जसे की गर्भधारणेदरम्यान गर्भाशयावरील एक्स-रेचा गर्भाच्या मानसिक विकासावर लक्षणीय परिणाम होतो. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या वातावरणातील निस्तेजपणा, आपुलकीचा अभाव, सुखद अनुभवांचा अभाव, अव्यवस्थित आणि दु:खी कुटुंब, गैरसोयी इत्यादीही मानसिक मंदतेला कारणीभूत आहेत.
अश्या अनेक कारणामुळे मतिमंद मुले समजापासून दूर फेकली जातात . अश्या मुलं प्रवाहात येण्यासाठी समाजात विविध उपाय योजले जावेत . जेणेकरून अशी मुले जन्माला येणार नाहीत . लवकर हस्तक्षेप केला तर लवकर निदान करता येते आणि योग्ये वेळेवर उपाय करता येतात
प्रा. बी. आर. शिंदे , (विशेष कर्णबधिर मुलांचे शिक्षण .) ,नेरूळ नवी मुंबई - 400 706
लेख पसंत आया तो
धम्मदान करो
..........
Monday, October 24, 2022
पुस्तक: तीमिरभेद
मांसाहारी माणसं.
कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...
-
नात्यात लग्न एक अभिशाप दिनांक : १७-०४-२०१७ नात्यात लग्न हा जगभरातील लोकसंखेला लागलेला अभिशाप आहे ,त्यात भारतीय संस्कृतीला लाभलेला एक ...
-
दलाली दिनांक : शुक्रवार २०, जून २०१८ दलाली म्हंटल की कित्तेक लोकासमोर परिस्तिथी जन्ने विदिध लोक डोळ्यासमोर दिसतात ,मग बाजार असो ...
-
. हाळी-हांडरगुळी जनावराचा जंगी बाज़ार : २०/११/ 2017 तालुका उदगिर ज़िला लातूर हे मराठवाड़ा विभागातिल बैल बाजारासाठी प्रशिद्ध ...
-
भारतीय शिक्षण प्रणाली बर्याचदा आपनास एखादे आव्हान भेडसावत असते आणि एखादा गहन प्रश्न पडतो उदा : राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (एनसीएफ)...
-
अंधश्रद्धा एक अभिशाप २१/११/२०१७ -२३/११/१७ -29/११/२०१७ .final correction on 08/12/2017 “आई ! आज शनिवार आहे न ग .रस्त्यावर लिंबू मिरची...
-
दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना दर वर्षी सर्वसाधारण विद्यार्थ्यां सोबत कर्णबधिर विद्यार्थी हि एस एस सी...
-
शेंगा उकरायला येता का ? भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना बारीक स्वरात माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज ...
-
भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना बारीक स्वरात माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज करीत असायचा आणि आमची झोप मोड व्ह...
-
स्पर्श एक एहसास है जो बचपन से लेकर अंतिम सांस तक सचेत रहता है। पहला स्पर्श माँ से होता है , जन्म के तुरंत माँ अ...