तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर एकूण नऊ स्तुपाची निर्मिती करण्यात आली होती त्यापैकी आठ स्तूप हे बुद्धाच्या शरीर धातू वर आणि नववा स्तूप ज्या पात्राने अस्थीचे वाटप केले होते त्या पात्रावर निर्माण करण्यात आला. ते अश्या प्रकारे-
१) राजग्रह स्तूप
२) वैशाली स्तूप
३) कपिलवस्तू स्तूप
४) अलाकप्पा स्तूप
५) रामग्रामा स्तूप
६) पावा स्तूप
७) कुशीनगर स्तूप
८) वेथाडीपीपा स्तूप
९) पिप्रहवा स्तूप
म्हणजे स्तूपची संकल्पना बुद्धाच्या अस्थीचे जतन करणे व संवर्धन करणे होय. सम्राट अशोक राजाला सात स्तुपातील अस्थी मिळविण्यात यश आले, परंतु ८व्या स्तुपातील अस्थी मिळवू शकले नाही तो म्हणजे रामाग्राम स्तूप. रामा ग्रामच्या नाग लोकांनी सम्राट अशोक यांना अस्थी देण्यास नकार दिला होता इतकेच नाही तर जर जबरदस्ती करत असाल तर आम्ही युद्ध करू, परंतु सम्राट अशोक यांनी कलिंगच्या युद्धा नंतर परत कधीही युद्ध करणार नाही असा निश्चय केला होता, म्हणून अस्थी नाही मिळाल्या तरी चालेल पण युद्ध नको अशी सम्राट अशोक राजांनी भूमिका घेतली, व उर्वरित ७ स्तूपा मधील अस्थी वर सम्राट अशोक राजाने ८४,००० स्तुपाची निर्मिती केली.
🎯स्तुपाचे एकूण चार प्रकार :
१) शारीरिक स्तूप : बुद्धाच्या अस्थी धातू वर निर्माण करण्यात आलेल्या स्तुपाला शारीरिक स्तूप म्हणतात.
२) परिभोगीका स्तूप, ऑब्जेक्ट स्तूप : बुद्धाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापरलेल्या वस्तू व त्यावर निर्माण करण्यात आलेल्या स्तुपाला परिभोगिका स्तुप किंवा object स्तुप म्हणतात.
३) कॉममोमोरॅटिव्ह स्तुप, सिम्बॉलीक स्तुप किंवा उद्देशिका स्तुप : बुध्दाच्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या व जिथे जिथे घडल्या. बुध्दा नि ज्या ज्या ठिकाणी प्रवचन दिले किंवा धम्म उपदेश दिले त्या ठिकाणावर जे स्तुप निर्माण केले त्याला सिम्बॉलीक स्तुप किंवा उद्देशीका स्तूप असे म्हणतात.
४) वोटिव्ह स्तूप, मन्नत स्तुप : आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपण वरील स्तूपात जाऊ शकत नाही त्या करिता पूजेचे स्थान निर्माण केले जाते व त्यावर स्तूप निर्माण केल्या जाते त्याला वोटिव्ह स्तूप किंवा मन्नत स्तुप असे म्हणतात. असे स्तूप बहुदा केणी मध्ये निर्माण केले जाते.
स्तुप एकूण आठ गटा मध्ये विभागले आहे :
१) जोथा : जोथा म्हणजे स्तुपाचा पाया किंवा खालचा भाग याला कधी कधी तीन रिंग असतात.
२) मेधी : हा जोथाच्या वरचा भाग व उंच असतो.
३) वेदिका : मेधीच्या वरचा भाग त्याला वेदिका असे म्हणतात.
४) वेदिका पट्टी : वेदिकेच्या वरचा भाग याला रेलिंग असतात हा भाग चक्रमण करण्या करिता उपयोगात येतो.
५) अंड : वेदिकाच्या वरचा भाग हा गोलाकार असतो त्याला अंड असे म्हणतात.
६) हार्मिका : हा अंडच्या वरच्या भागावर हर्मिका असतात त्या कधी तीन तर कधी पाच असतात.
७) यशठी : हा हर्मिकेचा वरचा भाग की जो छत्रावलीला सपोर्ट करतो.
८) छत्रावली : हा स्तुपाचा सर्वात उंच व शेवटचा भाग होय.
उपलब्ध असलेले भारतातील स्तूप :
१) सांची स्तूप :
सांची स्तूप हा मध्यप्रदेश मध्ये असून भोपाल पासून २५ किमी अंतरावर आहे. हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. त्याचे उतखणन केले असता तिथे बुध्दाचे शिष्य सारीपुत्त आणि महा मोग्गलांन यांच्या अस्थी मिळाल्या आहेत. १९८९ ला या स्तूपाला वर्ल्ड हेरिटेज चा दर्जा मिळाला आहे. यांचा शोध जेव्हा मध्यप्रदेश मधून भीमा कोरेगाव च्या युद्धाला मदत करण्या करिता एक बटालियन निघाली होती परंतु यूद्धाचा शेवट दुसऱ्याच दिवशी झाल्यामुळे ते परत जात असता एका ठिकाणी थांबले व दुसरे दिवसी एका टेकडी वर शिकारीला गेले असता तिथे त्यांना काही मानव निर्मित भाग दिसून आला त्याचे उतखणन केले असता सांची स्तुपाचा शोध लागला.
२) द ग्रेट स्तूपा ऑफ अमरावती :
हा स्तूप इ.स. पूर्वी तिसऱ्या शकतात सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. याचा बराच भाग नष्ट झाला आहे. त्याचे काही शिल्प आणि आर्ट मद्रास संग्रहाय्यत मध्ये सुरक्षित ठेवले आहे. १७९७ मध्ये ब्रिटिश आर्चलोजीस्ट मेजर कोलिन मॅकेन्झी यांनी त्याचा शोध लावला व त्याचा प्लॅन तयार केला.
३) धामेक स्तूप :
हा स्तूप सारनाथ येथे असून सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे व मेजर जनरल सर अलेक्जेंडर कनिंघहॅम पाच पंच वर्गीय भिक्कुना प्रथम उपदेश दिला असा उल्लेख आहे .
४) चौखंडी स्तूप ;
हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. हा स्तूप चौरस असून त्याला आठ बाजू आहेत. याच ठिकाणी जे पाच मित्र होते ते बुध्दाला सोडून गेले होते. आठ बाजू म्हणजे आर्य अष्टणगीक मार्ग चे प्रतीक आहे. हा स्तूप सारनाथ जवळ आहे.
५) बहरुत स्तूप :
बहरुत स्तूप हा सटना मध्यप्रदेश येथे आहे, हा स्तूप ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात सम्राट अशोक राजाने निर्माण केला. हा स्तूप सम्राट अशोक ने प्रथम निर्माण केला. हा स्तूप बराच नष्ट झाला असून त्याचे काही भाग कलकत्ता म्युझियम येथे सुरक्षित ठेवले आहे. या स्तूपाचे संवर्धन सम्राट शुंग ने इ.स. पूर्वी दुसऱ्या शतकात केले. आता तिथे फक्त काही अवशेष शिल्लक आहे. यांचा शोध सर अलेक्जेंडर कनिंघहॅम ने १८७३ मध्ये लावला. येथे काम करण्या करिता व शिल्प कलकत्ता म्युझियमला नेआण करण्या करिता ब्रिटिश सरकारने रेल्वे लाईन टाकली होती.
६) केसारिया बुध्द स्तूप :
केसारिया स्तूप हा बिहार मध्ये आहे. याच ठिकाणी बुध्दाचे महापरीनिर्वाण झाले. हा स्तूप सम्राट अशोक राजाने ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात निर्माण केला. कर्नल मॅकेन्झीयांनी १८१४ मध्ये याचा शोध लावला परंतु सर अलेक्जेंडर कनिंघहॅम यांनी १८६१-६२ मध्ये उतखनन करून याच ठिकाणी बुध्दाचे महापरी निर्वाण झाले ते सिद्ध केले.
७) देऊर कोठार बुद्ध स्तूप किंवा सोनारी स्तूप ;
हा स्तूप मध्यप्रदेश मध्ये आहे. हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. याच ठिकाणी सम्राट अशोक यांनी ८४,००० बुद्ध अस्थी धातूची वाटणी केली होती.
८) महाबोधी महाविहार किंवा महाबोधी स्तूप :
महाबोधी महाविहार याच ठिकाणी बुध्दाला ध्यान प्राप्ती झाली. सम्राट अशोक राजाने प्रत्यक्ष साईट वर हजर राहून या महाविहाराची निर्मिती केली. याच ठिकाणी संयाम देशाचे तपससू आणि भल्लिक यांना बुद्धाने केस धातू दान दिले. सर अलेक्जेंडर कनिंघहॅम यांनी १८८८ ला भेट दिली व बुध्दाचे वजरासन शोधून काढले.
९) भावीकोंडा बुध्द स्तूप किंवा महास्तूपा :
हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला. या स्तुपाचे जेव्हा उतखनन करण्यात आले तेव्हा बोन्स, पॉट, मंजुषा, जेम्स व कॉइन्स मिळाले. हा स्तूप आंध्रप्रदेश मध्ये आहे
१०) देवणी मोरी स्तूप :
हा स्तूप गुजरात मध्ये आहे. या ठिकाणी बुद्धाच्या अस्थी मिळाल्या व त्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ येथे सुरक्षित ठेवल्या आहेत.
११) पवणी स्तूप :
हा स्तूप भंडारा जिल्ह्यात आहे. विदर्भात बौद्ध धम्माचे एक महत्वाचे ठिकाण होते तसेच याला व्यापारीक महत्व होते, तसेच ते दक्षिण भारत व उत्तर भारतला जोडण्याचे मध्यवर्ती ठिकाण होते. येथे सातवाहन सम्राट सातकरणी यांचे नाणे येथे उतखनन केले असता मिळाले. येथील काही शिल्प नॅशनल म्युझियम दिल्ली व मुंबई येथे सुरक्षित ठेवले आहे. अजून बरेच शिल्प इतस्थता विखूरले आहे. स्तुपावर अतिक्रमण करून जगन्नाथ मंदिर निर्माण केले..स्तूपाची निर्मित ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात झाली. त्याचा डायमीटर ३८.१० मिटर आहे. विदर्भातील नाग राजा मुच्चलिंद याला जेव्हा बुध्दाचे महापरिनिर्वाण झाल्याची बातमी समजली तेव्हा तो कुशीणाराला बुध्दाच्या अस्थी मिळविण्या करिता निघाला. जेव्हा तिथे पोहोचला त्यावेळी बुध्दाच्या अस्थीचे विभाजन झाले होते. ज्या ठिकाणी बुध्दाला अग्नी देण्यात आला त्या ठिकाणावर तो गेला व त्याने हाताने सर्व माती गोळा केली त्यामध्ये त्याला दंत धातू अस्थी मिळाल्या व त्या दंत धातू अस्थी वर हा पवणी स्तूप निर्माण केला.
१२) सुलेमान टेकडी स्तूप :
हा स्तुप पवणी स्तुपा पेक्षा मोठा आहे. त्याचा डायमीटर ४१.६ मिटर आहे व हा पवनी येथे आहे. यालाच चांड कापूर स्तूप असे सुद्धा म्हणतात.
१३) हरदोलाल टेकडी स्तूप :
हा स्तूप पवणी येथे आहे. यांचे उतखनन केले असता एक मोठी दगडी शिल्प मिळाले. ते नागपूर च्या म्युझियम मध्ये सुरक्षित आहे. तसेच पवनीला एक किल्ला सुद्धा आहे.
१४) सोप्पारका स्तूप ;
हा स्तूप नाला सोपारा यथे आहे. एप्रिल १८८२ ला पंडित भगवाण दास ईद्राजी या स्तुपाचे उतखनन केले असता स्टोन कास्केट, गोल्ड कास्केट, शिल्प तसेच आठ बुद्धाच्या भिक्षा पात्राचे तुकडे मिळाले व काही सोन्याचे फुले मिळाले, ते एसीयाटीक सोसायटी ऑफ इंडिया मुंबई येथे सुरक्षित आहेत. तर सम्राट अशोक चा ९ वा शिलालेख म्युझियम मध्ये सुरक्षित आहे. सोपारा एक बौद्ध धम्माचे व तसेच व्यापारी केंद्र होते. येथूनच सम्राट अशोक राजाने मुलगी संघमित्रा हिला बोध गया येथील बोधी वृक्षाची फांदी सुवर्ण पात्रात स्वतःच्या हाताने देऊन सिलोनला धम्म प्रचारा करिता रवाना केले.
१५) घारापुरी बुध्द स्तूप :
दिनांक २० फेब्रुवारी २०२२ या दिवशी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेले जवळपास १५० लोकांनी घारापुरी मौर्या कालीन प्राचीन स्तुपाला भेट दिली व स्तुपाचे महत्व जाणून घेतले. प्रशांत माळी यांनी लेणी संवर्धन कसे आवश्यक आहे ते समजावून सांगितले. मुकेश जाधव यांनी आलेल्या लोकांचे आभार व्यक्त केले, तर रवींद्र सावंत यांनी घरापुरी स्तूपा बद्दल विस्तृत माहिती दिली. राहुल जाधव यांनी सम्राट अशोक यांचे काढलेले सुंदर स्केच ला भेट दिले, तर पुणे येथून आलेले अनिल ननावरे यांनी बुद्ध स्तुपाची प्रतिकृती प्रशांत माळी यांना भेट दिली. तसेच आम्ही भारतीयच्या संघमित्रा बारसा कडे यांनी चित्रीकरण केले. एलिफंटा केव्ह हे वर्ल्ड हेरिटेज आहे, परंतु याच ठिकाणी दोन तीन किमीच्या अंतरावर मौर्य कालीन स्तूप आहे. जेव्हा पोर्तुगिज लोक महाराष्ट्रात आले तेव्हा ते लोक लेणी वर सराव करायचे. परंतु जेव्हा ब्रिटिश लोक आले त्यांनी मात्र भारतातील प्राचीन बौद्ध धरोधर यांचा शोध लावला. या स्तुपाचे त्यांनी उतखनन केले नाही, परंतु अओलख बुद्धिस्ट मोनूमेंट म्हणून नोंद केली. हे ठिकाण अरबी समुद्र किनाऱ्यावर आहे. येथून जे एन पी टी बंदर जवळ आहे. यांचे उतखनन होने बाकी आहे.
१६) पुष्पगिरी बुध्द स्तूप :
हे बुद्धिस्ट मॉनस्ट्रि ( ज्या ठिकाणी ऋषी-मुनी राहतात; मठ, मठ) आहे. ओडिसा मध्ये पुरी जिल्ह्यात आहे. बौद्ध धम्माचे एक महत्वाचे केंद्र होते, त्याच प्रमाणे ललितगिरी, रत्नागिरी व उदयगिरी येथे मोठ्या प्रमाणात होत्या ते सम्राट अशोक राजाने निर्माण केले होते. चायनीस प्रवासी युवानच्वांग यांनी सहाव्या शतकात भेट दिली असता इथे मोठ्या प्रमाणात संघाराम होते अशी नोंद केली होती. १९९० ला उदयगिरीच्या जवळ लंगुडी हिल येथे उतखनन केले असता (पुष्प सभर गिरिया) अश्या प्रकारचा शिलालेख मिळाला होता, म्हणून याला पुष्पगिरी हे नाव दिले, हे एक प्राचीन विद्या पीठ होते.
१७) कोल्हापूर स्तूप :
इथे प्राचीन मौय कालीन प्राचीन स्तुप होता. ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात बौद्ध धम्माचे एक महत्व पूर्ण ठिकाण होते. इथे १३५ वर्षा पूर्वी उतखनन केले असता बुध्दाच्या अस्थी मिळाल्या होत्या. त्या कुठे आहे याचा शोध लागत नाही. तसेच मिरज हे सुद्धा बौद्ध धम्माचे प्राचीन केंद्र होते.
१८) भोन स्तूप ;
हा मौर्या कालीन स्तूप असून बुलढाणा जिल्यात शेगाव जवळ आहे. ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात हे ठिकाण बौद्ध धम्माचे एक महत्वपूर्ण ठिकाण होते. येथे उतखनन केले असता सातवाहन कालीन ५ नाणे मिळाले. सध्या इथे स्तूपा वर शेती करतात तर काही भागावर भोन गावची वस्ती आहे
१९) अंगुलीमाल स्तूप :
हा स्तूप श्रावस्थी मध्यप्रदेश मध्ये आहे. या स्तूपाचे उतखनन १८६३ मध्ये करण्यात आले. याच ठिकाणी अंगुलीमाल आणि बुध्द यांची भेट झाली व अंगुलीमाल यांना भिक्कू संघात समाविष्ट करण्यात आले.
२०) अनाथ पिंडक स्तुप श्रावस्थी :
हा स्तूप अनाथ पिंडक यांनी निर्माण केला. हा कॉममोमोरेटिव्ह स्तुप आहे. अनाथ पिंडकने बुध्दाला व भिक्कू संघाला जेवणाचे निमंत्रण दिले होते ते याच ठिकाणी.
२१) महास्तूप नेला कोंडा पल्ली :
हा स्तूप खम्मान जिल्हा तेलंगणा येथे आहे. हे एक प्राचीन बुद्धिझमचे महत्वाचे ठिकाण होते, तसेच हे एक मंडलचे मुख्यालय होते. येथे प्राचीन मानवनिर्मित लेक आहे, तसेच इथे उतखनन केले असता १०० प्राचीन नाणे मिळाले, तसेच १९७६ ते १९८५ मध्ये उतखनन केले असता हा स्तूप ५४ फीट उंच आहे, ८४ फीट आतील डायमिटर व बाहेर १३८ फीट आहे. इथे सुद्धा नाणे,जमिनीत मिळाले व ते विजयवाडा म्युझियम येथे सुरक्षित आहे. सम्राट सातवाहन यांनी या स्तुपाला अति भव्य बनविले.
२२) सिलिगुरी बुद्ध स्तूप :
वेस्ट बंगाल ही एक पूर्वी चे मठ आहे. दलाई लामाने निर्माण केली आहे. यांची उंची १०० फीट आहे.
२३) अनेगुट्टी बुद्ध स्तूप :
हा स्तूप संनती स्तूपच्या उत्तरेला २ किमी अंतरावर आहे, इथे मोठ्या प्रमाणात हत्तीचे शिल्प दान दिल्याची नोंद आहे व सन्नती स्तूपाच्या प्रोटेक्शन करिता निर्माण केला आहे. हा स्तूप सम्राट सातवाहन यांनी निर्माण केला आहे.
२४) सन्नती महास्तूप, कनगनाहल्ली स्तूप :
सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. हा स्तूप गुलबर्गा कर्नाटक येथे आहे. सम्राट अशोक यांनी पदभार स्विकारल्या नंतर १४ वर्षी भेट दिली व दुसरी भेट राज्याभिषेक झाल्या नंतर २० व्या वर्षी दिली व भव्य स्तूप बांधण्याच्या विषयी सूचना केली. व त्या नंतर सम्राट सातवाहन यांनी तिथे शिल्प कला विकसित केली.
२५) अद्दूरू बुद्धिस्ट स्तूप, अद्दूरू बुद्धिस्ट स्तूप :
हा आंध्रप्रदेश येथे आहे. वानेतीया नदीच्या किनाऱ्यावर असून सम्राट अशोक यांची मुलगी संघमित्रा श्रीलकेला जात असते वेळी याच ठिकाणी थांबली होती. येथे १९५३ ला उतखनन केले असता धम्मचक्र मिळाले, त्याचा डाय मिटर १७ फीटचा होता.
२६) अमरावती स्तूप :
महाचैत्य स्तूप हा आंध्रप्रदेश मधील सर्वात मोठा स्तूप आहे, डाय मिटर ५० मीटर व उंची २७ मीटर आहे. यातील काही भाग मद्रास म्युझियम आणि ब्रिटिश म्युझियम मध्ये ठेवले आहेत. याच ठिकाणी सम्राट अशोक यांनी भिक्कू महादेवा यांची नियुक्ती मनीषा मनडला म्हणून केली व त्याच्या वर हिमालयात धम्म प्रचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
२७) कुरुषेत्र बुद्ध स्तुप :
कुरुक्षेत्र किंवा हरियाणा हे बुद्ध धम्माचे प्राचीन केंद्र होते. सम्राट हर्षवर्धन यांच्या शासन काल मध्ये चिनी प्रवाशी हुएन सांग यांनी आपल्या प्रवास वर्णन मध्ये या ठिकाणी बुद्ध स्तुप असल्याचे वर्णन केले आहे. हे स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केले होते. हा स्तूप कुरुक्षेत्र विद्यापीठच्या परिसरात आहे. हा स्तूप लुप्त झाला होता, परंतु स्थानिक बुद्ध अनुयायांनी यांचा पाठपुरावा केल्यामुळे ASI ने संवर्धनचे काम सुरु केले, तसेच दुसरा बुद्ध स्तूप यमुना नगर येथे आहे.
२८) गिरीयाक बुद्ध स्तूप :
हा स्तूप नालंदा प्राचीन विद्यापीठ पासून २२ ते २५ किमी अंत्तरावर आहे. हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. हा स्तूप सिलेंड्रीकल असून त्याची उंची ३० फिट आहे, व चैत्यगिरी पर्वतावर आहे. इथे सुद्धा प्राचीन बुद्ध विद्यापीठ होते.
२९) सुजाता बुद्ध स्तूप :
हा स्तूप बोध गया च्या जवळ आहे. फाल्गु नदीच्या तिरावर हा स्तूप आहे. याच ठिकाणी सुजाताने सिद्धार्थ गौतम यांना खीर दान दिली होती. हा स्तूप ई.स. पूर्वी दुसऱ्या शतकात सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. ASI ने १९७३-७४ ला उतखनन केले असता देवापाल राज घराण्याचा शिलालेख मिळाला (देवापाला राजस्य सुजाता ग्रीह) हा स्तूप कॉममोमोरेटिव्ह स्तूप आहे. सातव्या शतकात जेव्हा चिनीस प्रवासी हुएन त्संग निरंजना नदी क्रॉस केल्या नंतर त्याने स्तूप, स्टोन कॉलम बघितल्याची नोंद आहे. तसेच या ठिकाणाला गंध हस्ती असे म्हटले जात असे. बुद्धाने खीर प्राशन केल्या नंतर त्यांच्या शरीरात ऊर्जा निर्माण झाली व बुद्धाने निष्कर्ष काढला की, जिवंत राहण्या करिता मानवाला अन्नाची आवश्यकता आहे.
३०) कनिष्क स्तुप :
हा स्तूप सम्राट कनिष्क यांनी निर्माण केला, यालाच शाहजी की ढेरी असे म्हटले जाते, तसेच याला हाऊस ऑफ बुध्दा रिलीक्स असे म्हटले जाते. हे एक प्राचिन स्तुप असून जगातील सर्वात उंच स्तूप आहे. हा स्तूप ई.स. पूर्वी पहिले शतक ते ई.स. नंतर पहिले शतक मध्ये निर्माण करण्यात आला. सुरुवातीला हा स्तूप लाकडी बनविण्यात आला व त्यावर precious स्टोन लावण्यात आले, एकूण १३ लेयर मध्ये निर्माण करण्यात आले. सर्वात उंचीवर कॉपरचे छत्र बसविण्यात आले. इथे १९०८-१९०९ ला ब्रिटिश ए एस आय ने डेव्हिड ब्रेनार्ड ने उतखनन केले असता बुध्दाच्या अस्थी धातू मिळाल्या व त्या बर्मा येथे सुरक्षित आहेत, तर सम्राट कुशान च्या अस्थी पेशावर च्या म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवल्या आहेत. कुशान पिरेड हा गांधार शैली म्हणून प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी चौथी धम्म सांगिती ७८ एडि ला कनिष्क च्या अध्यक्षते खाली झाली होती. व तेव्हा पासून ई.वि. सणाची सुरुवात झाली. पूर्वीचे कनिष्कपूर व आताचे काश्मीर.
३१) शिंगारदार स्तूप :
तिसऱ्या शतकात निर्माण केले आहे. स्वात घाटी मध्ये ब्रिटिश ए एस आय कर्नल डेने आणि एस ए स्टेन यांनी १८८६-१९३० मध्ये शोधून काढला. राजा उत्तरसेन जेव्हा बुध्दाच्या अस्थी घेऊन जात असतानी त्याचा हत्ती इथे थांबला होता, हा स्तूप स्वात राजाने निर्माण केला.
३२) एकसे आठ स्तुपा ऑफ चायना :
ही १०८ बुध्द स्तूपची गॅलरी हिल साईड ऑन दि वेस्ट बँक ऑफ येलो रिव्हर निनगा झिया चीन येथे १०३८ ते १२२७ मध्ये वेस्टर्न जिया राजवन्स ने निर्माण केले आहे. पश्चिमात्य देशामध्ये १०८ या नंबरला खूप महत्व आहे. १०८ स्तूपाच्या समोर दोन स्तूप होते ते १९५८ नष्ट झाले. १९८७ ला नुतनीकरण केले असता बुद्धिस्ट सूत्र धम्म लिपी मध्ये लिहिलेले आढळून आले, तसेच मातीचे स्तूप व त्यावरील झाकणे व त्यावर बुध्दाचे शिल्प व काव्य आढळून आले. हे स्तूप एक सारखे नसून लहान मोठे आहे तसेच त्याची प्रतिकृती रथा सारखी आहे.
३३) बोरोबर स्तूप :
हा स्तुप जावा बेटावर इंडोनेशिया येथे आहे. हा स्तूप ७ व्या शतकात निर्माण केला. हा जगातील सर्वात मोठा बुद्धिस्ट स्तूप आहे. या स्तुपाला एकूण २६७२ पॅनल असून ५०४ बुध्द मूर्ती आहे. स्तुपाची रचना शष्ठकोनी असून वरचा भाग त्रिकोणी आहे..मुख्य गोलाकार घुमट मध्ये एकूण ७२ बुद्धाच्या मूर्ती आहेत. १८१४ मध्ये सर थॉमस स्टानफोर्ड राफेल ने शोध लावला. १९७५ ते १९८२ या काळा मध्ये इंडोनेशीयन सरकारने मोठ्या प्रमाणावर संवर्धन केले व त्याला वर्ल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट केले.
३४) रुंमिन देवी स्तूप :
हा स्तूप नेपाळ येथे आहे. याच ठिकाणी बुध्दाचा जन्म झाला. सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. राज्याभीषेक झाल्या नंतर आठ वर्षानी या ठिकाणाला भेट दिली, व त्या गावाचा कर माफ केला. फक्त आठवा भाग देण्यात यावा अश्या प्रकारचा शिलालेख लिहिण्यात आला.
३५) शांती स्तूप लेह जम्मू अँड काश्मीर :
हा स्तूप १९८३ ते १९९१ या दरम्यान जपानी बौद्ध भिक्षु बुद्धाच्या २५०० व्या जयंती निमित्ताने व जगाला शांतीचा संदेश देण्या करिता डोंगर दऱ्या मध्ये निर्माण केला.
३६) द्रो डूल chorten स्तूप सिक्कीम :
हा स्तूप ट्रुलशिक रिणपोचे आणि निंजमा चे प्रमुख तिबेटन बुद्धिझम यांनी १९४५ मध्ये निर्माण केला. इथे एक साथ ७०० भिक्कू किंवा उपासक बसू शकतात.
ट्रुलशिक रिनपोचे
३७) क्लेमेंट टाउन स्तुप डेहराडून :
यांची उंची १८५ फीट आणि रुंदी १०० फीट आहे. इथे १०३ फीट उंची बुध्द स्टेटस आहे. बुद्धिस्ट आर्ट, मुरेल्स आणि श्राइन रूम तिबेटीयन पद्धतीचे आहे.
३८) गोसाराम चोरटन स्तूप :
हा स्तूप अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. हे इम्पॉर्टन्ट बुद्धिस्ट सेंटर आहे. तवंग पासून ९० किमी अंतरावर आहे. हा स्तूप १२ व्या शतकात मोनपा मोङ्क यांनी निर्माण केला.
३९) कल्याण स्तुप :
कल्याण पूर्वेला बिग बाजार च्या समोर जी टेकडी आहे तिथे पूर्वी प्राचीन बुद्ध स्तूप होता, आजही त्याचे अवशेष बघायला मिळतात. परंतु आज त्यावर मज्जीद आहे. कल्याण हे बुद्ध धम्माचे तसेच व्यापाराचे प्रसिद्ध केंद्र होते. सम्राट सातवाहन यांच्या राजवटीत ते अत्यंत प्रगती पथावर होते. व्यापार जलद व्हावा म्हणून २५०० फिट चा डोंगर फोडून नाणे घाट निर्माण केला. कान्हेरी लेणी मध्ये एकूण ७५ च्या वर शिलालेख आहेत, त्यापैकी १२ शिलालेख मध्ये कल्याण येथील राहिवासी यांनी धम्म दान दिल्याची नोंद आहे.
४०) सम्राट अशोक स्तंभ :
हा स्तंभ मलबार हिल येथे आहे, तसेच इथे प्राचीन महाथेरो चा स्तूप होता, आज त्याला म्हातारीचा बूट असे म्हणतात. ब्रिटिश सरकारचे पूर्वी हेड क्वार्टर परेल येथे होते परंतु मुंबई ला महापूर आल्यामुळे त्यांनी हेड क्वार्टर मलाबार हिल ला शिफ्ट केले, तेव्हा पासून इथे सरकारी व खाजगी बांध काम निर्माण झाले.
अश्या उपरोक्त प्रकारचा परिपूर्ण स्तूप आपणाला संपूर्ण जगत लेणी वर बघायला मिळतो.