Tuesday, June 2, 2020

नात्यात लग्न एक अभिशाप

नात्यात लग्न एक अभिशाप


दिनांक : १७-०४-२०१७

नात्यात लग्न हा जगभरातील लोकसंखेला लागलेला अभिशाप आहे ,त्यात भारतीय संस्कृतीला लाभलेला एक अभिशाप म्हणावे लागेल .नात्यात लग्न करण्याची आदिम काळापासून एक परंपरा आहे ,त्याचे बीजे खूप दूरवर कोरली गेली आहेत.आधुनिक काळात नवीन नवीन संशोधन यामुळे नाते संबंधामुळे त्याचे दूष परिणाम आज जगभर भोगावे लागत आहेत ते म्हणजे आज जगभरात दिसून येत असलेली अपंग बालके ,नाते संबंथ हे अतिशय घातक संबंध सूचित झाले आहेत ,त्याचा परिणाम म्हणजे जन्माला येणारे  अपंग बाळ.सामान्य माणसाला त्याचे काही वाटत जरी नसले तरी ज्या घरात अपंग मुल जन्माला त्याची व्यथा त्या व्यक्ती कडून ऐकलेले बरे ,घरात अपंग मुल जन्माला आल्यावर काय काय उपद्व्याप करावे लागतात ? आणि त्याचे पुनर्वसन किंवा त्यास मुख्य प्रवाहात आणण्य्साठी तारेवरील कसरत करावी लागते.

आपल्या शरीरात असंक्य पेशी आहेत त्यातील गुणसूत्र मिलानावरून त्या त्या प्रकारचे क्रोमोझोम शरीरात वाहून नेले जातात एक्स आणि वाय यातील आई व बाबा कडून येणारे एक्स मधून चार मधून  एकाला अपंग बाळ होण्याची शक्यता असते ,तर आई कडून येणाऱ्या गुणसूत्रात चार गुणसुत्रातून दोन बालकात अपंग बालक होण्याची दाट  श्स्क्यता असते .मुल जन्माला आल्यावर पालकात सम्रंभ असतो. हळू-हळू  मुल वयात येते तेंव्हा त्याची लक्षणे तीव्र जाणवतात .उदाहरणात बहिरे मुल जर जन्मताना रडण्याचा आवाज काढले नाही तर समजावे की ,मुलाच्या एकण्यात दोष आहे ,तीच बाब अंध मुलांच्या बाबतीत म्हणता येईल ,त्यास एखादि  वस्तू डोळ्यासमोर आली तर काहींच प्रतिक्रिया नसेल तर समजा की मुल अंध आहे ,याच बरोबर मुलात काही छुपे आजार उदयास येतात ते आपणास लवकर जाणवत नाहीत ,ही अवस्था बळावल्यास मुळात अनेक प्रकारचे अपंगत्व येण्याची शक्यता असते .त्यास बहुविकलांग असे संबोधले जाते .

  

संशोधनांती असे सिद्ध झाले आहे की ,नात्यात लग्न केल्याने मुल अपंग होण्याची मोठी संभावना असते  ,रक्ताचा गट एक झाल्या कारणाने येणारे मुल अपंग होय शकते मग ते कर्णबधीर असेल ,मतीमंद किंवा अंध असू शकते किंवा अस्थिव्यंग किवा बहुविकलांग असू शकते .जगभरात भारत वगळता युरोप आणि आफ्रिका खंडात भावा सोबत बहिणीचे लग्न लाऊन दिले जाते ,जसा खली उल्लेख केल्या प्रमाणे आज ही फारशी समाज घरातच लग्न करतात जसे भाऊ आणि बहिण यांच्यात विवाह करण्याची खूप काळापासून रूढी परंपरा आहे .फारशी समाजाची ही चुकीची धरणा ही त्या समाजातील लोकसंखेला घटवण्यास कारणीभूत होत आहे . वडिलोपार्जित संपत्ती आपल्या घरात असावी म्हणून ते सख्या बह्वासोबत लग्न करतात . कारण पूर्ण जगभरात फारशी लोकांची संख्या खूप रोडावली आहे .तो धागा पक्सून ही जमत घरात लग्न करीत असल्याचा अहवाल आहे .

 

आत्याच्या मुलीसोबत किंवा मामाच्या मुली सोबत लग्न केल्यावर नात्यातील रक्त गट एक होईन त्यात एक सुत्रता येते आणि रक्ताचा गट एक झाल्यामुळे येणारे मुल अपंग प्रवर्गात जम्माला येते .हा रक्त गट एका कुटुंबाकडून दुसरया कुटुंबाकडे प्रवाहित होत असल्यामुळे लगेच जरी मुल अपंग जन्माला आले नसले तरी ,दुसऱ्या पिढीत ते बाबा किवा आई ला ज्या ठिकाणी लग्न करून दिले असेल त्या ठिकाणी हमखास अपंग मुल जन्माला येते मग ते कोणत्याही परवार्गाचे असो  .

या विषयी आपल्या भारताचा विचार करायचा असेल ते नाते संबंध हे  दृढ होत चालेली बाब आहे ,यामुळे जन्माला येणारे बाळ कोणत्याही अपंगाच्या प्रकारात जन्माला येणाऱ्या प्रवर्गात मोडते. आज मितीला आपण सरास आवती भोवती पाहत आहोत की  बर्याच प्रकारची अपंग बालके जन्माला येत आहेत ,कर्णबधीर ,अस्थीव्यांग,अंध ,मातीन्मंद आणि बहुविकलांग ज्यात एकापेक्षा जास्थ विकलांगता पहावयास मिळते असे त्याचे विविध कारणापैकी एक कारण म्हणजे नात्यात लग्न होय .

नात्यात लग्न जे होतात त्यात हिंदू धर्मात ,मामाच्या मुलीशी ,आत्याच्या मुलीशी , आणि बहिणीच्या मुलीशी आणि जवळच्या नात्यात लग्न करण्याची प्रथा खूप दिवसपासून चालत आलेली आहे ,त्याचा परिणाम अपंग मुल जन्माला येते ते वरील कोणत्याही प्रकारचे असू शकते असे संशोधना अंती शिद्ध झालेले आहे ,मुस्लीम धर्मात ही  ,बहिणीच्या मुलीशी आणि आत्या ,आणि मामा या नाते संबंधात लग्न करण्यची प्रथा आहे .

अनपेक्षित घडून अल्लेला प्रसंग यात भाऊ बहिण ,बाबा -मुलगी , दीर भावजय आणि बालवयात केलेला किवा झालेला अति प्रसंग यातून जर गर्भ धारणा झाली तर अपंग मुल जन्माला येण्याची  शक्यता जास्त बळावते .जर मुलीचे किंवा प्रतिस्पर्ध्याचे वय कमी असेल तर नक्की होणारे मुल अपंग असू  येते . इथे वयाचाही घटक खूप महत्वाचा मानला जातो जो अपंग मुल जन्माला येण्यास कारणीभूत आहे ,पूर्वी च्याकाळी नात्यात लग्न तर करीत असत पण कमी वयात पण लग्न करीत असत त्याचा परिणाम अपंग मुल जम्न्माला येत होते .

अपंग मुल जन्माला येण्याची तशी बरीच करणे आहेत .त्याची वर्गवारी जर केली तर तीन भाग पडता येतील एक जन्माच्या पूर्वी , दुसरा जन्मः आणि तिसरा म्हणजे जन्मानंर .यात वेग वेगळी करणे आसू शकतात .

पण यात अनुवांशिकता  हा सर्वात महत्वाचा घटक आहे .आणि तो म्हणजे नाते संबंध , आदिम काळात विवाह संस्था अस्तित्वात न्हवती तेंव्हा कोणाचे हे कोणासोबत लग्न होत होते , नात्यात लग्न करण्याची पद्धत नसावी ? हळू हळू मानुष्य विकास होत गेला ,वसाहती निर्न्मान झाल्या आणि एक काळ असा आला की विवाह हा नात्यात सुरु झाला .त्याचे कारण असे की एखाद्या अनोळखी व्यक्ती किवा समाजात कसे लग्न करावे ? तर नात्यात लग्न करण्याची प्रथा सुरु झाली असावी ,हळू हळू मानव विकास पावत गेला नि समाजाची  रचना बदलत गेली .ती आजतागायत सामुहिक विवाह पर्येंत पोहचली आहे. पण नात्यात लग्न करण्याची प्रथा कायम ठाण मांडून बसलेली आहे असे म्हणणे वावगे होणार नाही  .

हे असे का होते,याची कारणे जरी वेगळी असली तरी विवाह एक असा खेळ आहे जो आज पर्येंत कोणालाही सुटलेला नाही कारण ही एक सामाजिक संस्था आहे ,एक संस्कृती आहे .आणि पारंपारिक पद्धत आहे .जनन -प्रजनन आणि उत्पतीचा भाग असून  राष्ट्र विक्साचा मूळ पाया ही .जगात जन्म घेणारे बाळ सुधृद हव्हे म्हणून प्रत्येक समाज ,देश झटत असते .तरीही एवढ्या उप्द्य्वातून अपंग मुल जन्माला  आल्या शिवाय राहत नाही .हा नात्यात लग्न करण्याचा अभिशाप आहे .

म्हणून याला एकाच उपाय आहे आणि तो म्हंजे असे लग्न टाळणे होय ,लोकात जनजागृती झाली पाहिजे या साठी वैक्तिक ,सामाजिक संथा आणि शासन संस्थेचा हस्थ्क्सेप खूप महत्वाचा आहे .पूर्वी जेव्हा  गोवर कांजण्या ची साथ येत असे तेंव्हा जनजागृती खूप केली जात असे “देवीचा रोगी कालवा ,आणि हजार रुपय मिळवा “. त्याच पद्धतीने जर अपंग मुल जन्माला येण्यापासून थांबवायचे असेल तर अश्या पद्धतीने लोकात जनजागृती केली पाहिजे ,”नात्यात लग्न टाळा आणि पाच हजार रुपय मिळावा “.

 

आजच्या बदलत्या जगात आणि धावपळीच्या काळात समाजातील गटांनी या बाबीकडे गांभीर्याने पहावयास हवे ,जाती बाहेर जाऊन ,शहराबाहेर जाऊन ,जिथे आपणास योगे स्थळ वाटेल तिथे विवाह केला पाहिजे .ज्या मुळे येणारे मुल सुधृद आणि निरोगी जम्माला येईल .आणि त्याचा परिणाम देश विकासासाठी हातभार लावण्यास मदत होईल ,आणि अपंग बालक जन्माला येण्याची संख्या कमी होईल .

एकंदरीत संपूर्ण भारताचा विचार केला तर उत्तर राज्यातील तुलनेत दक्षिण राज्यातील लोक जवळच्या नात्यात लग्न करण्यास जास्त पसंती देतात .मग अश्या विवाहास का पसंती देण्यात येते ? कारण एकच आहे नाते संबंध ,रुंनुबंध कायम असावे ,आपुलकी हा एवढाच समंध आहे ,मग एखादे मुल अपंग झाल्यावर घरात एक कोठडी का करून ठेवता आले तरी चालेल ? सामजिक भीती पोटी उच्च कुलीन आणि मध्यम वर्गी देखील घरात जन्माला आलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला लपवण्याचा प्रयन करतात .पण आज थे चित्र थोडे बदलून गेले आहे ,जागरूकता आणि  सामजिक जाण  आज अपंग व्यक्तींना मिळत असलेल्या सेवा सुविधा यामुळे मुल समाजाचा घटक  बनत चालले आहे .

सामाज प्रवाहात येण्यासाठी पालक ,शिक्षक आणि सेवा संस्था यांच्या पुढाकाराने ,नात्यात लग्न करण्याचे प्रमाण कमी झाले असून ,अश्या नाते संबंधातून जन्माला येणारे अपंग  मुल दिसत नाही .जरी अपंग मुल जन्माला येत असले तरी त्यांची करणे वेगळी आहेत हे लक्ष्यात  घेण्याची बाब आहे .अश्या संबंध्तून जन्माला येणाऱ्या मुलांच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न उद्भवतो आणि वेळ खाऊ आणि खर्चिक असला तरी कुटुंबाचा मानसिक त्रास वाढतो आहे . या सर्व जाचापासून दूर राहण्यासाठी नात्यात विवाह न करणे हे सामाजिक, मानसिक, शारीरिक ,आणि देश हिताच्या दृष्टीने अत्येंत असरदार आहे .

 

शेवटचे अद्यावत


17-04-2017


प्रा. बालाजी रघुनाथराव शिंदे

9702158564

balajishinde65@gmail.com विस्तार सेवा सहायक (विषेष शिक्षा ) विस्तार सेवा विभाग , अली यावर जंग राष्ट्रीय दिव्यांगजन संस्था ,बांद्रा रिक्लेमेशन ,बांद्रा (प ),मुंबई -४०० ०५०

(सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय ,भारत सरकार )



No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...