Tuesday, June 2, 2020

कर्णबधिरांच्या दिव्यांगाचे पंख अनोखे ...

कर्णबधिरांच्या दिव्यांगाचे पंख अनोखे ...

 

नुकतेच भारताचे लाडके पंतप्रधान यानि घोषित केले आहे की ,”विकलांग को दिव्यांग कहा जाय” ,किंव की उन्ही के पास जो एक अंग होता है हो दिव्य होता है ,उसका वह अछि तरह से इस्तेमाल करते है ,उन्हें विकलांग कहा नहीं जय ...

 

Calls for encoureging use of “Divyang “ word isnted of Viklang ; Asks people to join drive for builiding phycical ,virtual infrastucture for differerntly abaled …

 

                                       

भारत सरकारच्या अख्त्यारित असलेली निम्न लिखित संस्था दिव्यांग क्षेत्रात भारतात कार्यरत आहेत .

 

1. अलियावर जंग राष्ट्रीय विकलांग संस्था ,मुंबई ,महाराष्ट्र

2. राष्ट्रिय मतिमंद संस्था ,सिकंदराबाद ,आँध्रप्रदेश

3. दिनदयाल उपाध्य संस्था ,दिल्ली  .

4. राष्ट्रिय अंध विकलांग संस्था ,देहरादून .

5. राष्ट्रिय अस्तिविकलांग संस्था ,बॉन हुगली ,कलकत्ता,पश्चिम बंगाल .

6. राष्ट्रिय मनोविकास संस्था ,मुत्तुकुदु ,तमिलनाडु

7. स्वामी विवेकनद राष्ट्रिय प्रशिखन एवं अनुसन्धान संस्था ,निरतार ,ओरिसा

8. राष्ट्रिय सामाजिक उन्नति संस्था,दिल्ली .

 

 

 

 

अली यावर जंग राष्ट्रीय विकलांग संस्था :

 

कानने बहिरा मुका परी नहीं ,

शिकविता भाषा बोले कसा पाहि ....

हे गाणे एके काळी मराठी चानेल दूरदर्शन वर ऐकायला इत असे .....

 

 

९ ऑगस्ट १९८३मध्ये स्थापन झालेल्या मुंबईतीलअलीयावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थेला ३३  वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या तेहतीस  वर्षात संस्थेने आपल्या कामाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारे आवश्यक आणि प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. देशाच्या कानाकोप-यात या संस्थेतून प्रशिक्षित झालेल्या उमेदवारांनी आपल्या कामाचा एक ठसा उमटवला आहे.विविध ठिकाणी ते आपले कौशले पानाला लावीत आहेत ,बरेच प्रशिक्षित विध्यार्थी  देश आणि देशा बाहेर अपंग लोकांना सेवा पुरवीत आहेत गेली ३३वर्ष अली यावर जंग राष्ट्रीय विकलां संस्था अपंग  क्षेत्रात कार्यरत आहे ,जेंव्हा ही संस्था स्थापनेचा भारत सरकार विचार करीत होते तेंव्हामहारष्ट्र  राजाचे पाहिले राज्येपाल असलेले ‘अली यावर जंग’ यांना ही संस्था मुंबई ,महाराष्ट्र  येथे स्थापनेचा अधिकार जातो.कारण त्यांनी आपल्या मालकीची जागा भारत सरकार ला पूर्वीची लाल माती नावाने प्रशिद्ध असलेली  जागा,आत्ताची बांद्रे रिक्लेमेशन  देऊ केली होती,म्हणून त्यांचे नाव या संस्थेला देण्यात आले आहे .

 

अली यावर जंग राष्ट्रीय  विकलांग संस्था या नावाने , हीसंस्था स्थापने पासून बांद्रा पश्चिम , रिक्लमेशन येथे दिमाखात उभी आहे .

ही संस्था मनुष्य  विकास अणि कर्णबधीर  क्षेत्रात संशोधनाचे  कार्य करीत आहे ,इथे संपूर्ण उहापोह करता येणार नहीं कारण संस्थेचे कार्यक्षेत्र खूप दांडगे आहे ,येते विविध विभाग कर्णबधिरांच्या संपूर्ण पुनर्वसन कार्यात समर्पित  आहेत ...

·         शिक्षण विभाग

या विभागत सर्व प्रकारच्या मनुष्यबळ आणि  संशोधन  सेवा सुविदा पुरविल्या जातात ,या विभागा  अंतर्गत बी. एड, एम्. एड, व , ए.व्ही.टी ,व इतर कोर्सेस चालवले जातात .जेने करुण हा कोर्से पूर्ण केल्यावर विध्यार्ती विशेषशाळेवर  विशेष शिक्षक म्हणुन कम करू शकतो,तर श्रावणतज्ञ म्हणून शाळेत ,दवाखान्यात काम करू शकतो किंवा स्वतःची  क्लिनीक  सुरु करू  शकतो , (भारतीय पुनर्वसन परिषदेच्या- RCI नोंदणी  अनिवार्य आहे. ) आता पर्त्येंत असंख्य विध्यार्त्यानी  या  कोर्सस मधून प्रशिक्षण घेतले आहे .आणि ते कुशल प्रशिक्षित शिक्षक म्हणून देशातील विशेष  शाळेवर कार्यरत आहेत .

वाक व श्रावण भाषा आणि विशेष शिक्षण (कर्णबधीर ) क्षेत्रात केवळ पदवीच नाही ,तर पद्युतर पी.एच.डी  .पर्यंतचे शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेकडून उपलब्ध करून दिले जात आहे.

·         श्रवण तपासणी विभाग

या विभागान्तर्गत संस्थेत येणाऱ्या  सर्व प्रकारच्या वयोगटातील व्यक्तीची श्रवण तपासणी केली जाते.त्याआधी त्यांना संस्थेत नाव नोंदणी करावी लागते ,नाव नोंदणी केल्यावर कुटुंबाची सविस्तर माहिती द्यावी लागते ,लहान मुल असेल तर त्या मुलाचे आई –वडील असणे अत्यंत महत्वाचे असते कारण त्या मुलात कर्ण दोष कोणत्या कारणाने झाला आहे हे कळणे सोपे जाते ,वयस्क लोकांसाठी ते स्वतःची माहिती देऊ शकतात ,मग पुढील तपासणी सुरु होते ,प्रथम दर्शनी कानात मळ असेल कानाचा  पडदा फाटला असेल तर कान, नाक, घसा डॉक्टरकडून तपासणी करावी लागते ,नंतर त्या व्यक्तीची श्रवण तपासणी केली जाते ,श्रावण तपासणी झाल्यावर त्या व्यक्तीस एका कानात श्रवण  दोष असेल तर एक श्रवण  यंत्र  दिले जाते दोन कानात श्रवण  दोष असेल तर दोन्ही कानात श्रवण  येण्त्र दिले जाते ( ADIP व्योजने अंतर्गत मोफत श्रवण यंत्र दिले जाते ,ज्यांचे मासिक उत्पन्न रुपय  १५००/ पेक्षा आत आहे त्यांना मोफत तर ज्यांचे माषिक उत्पन रुपय  १५०००/-  ते २००००/- आत असेल तर श्रवण यंत्राची  अर्धी किमत द्यावी लागते ,आणि ज्यांचे मासिक उत्पन्न रुपय  २००००/- वर असेल तर श्रवण यंत्राची  पूर्ण किमत मोजावी लागते ..) ,कोणत्या कनात किती प्रकारचा कर्ण दोष आहे याचे निदान केले जाते ,अणि उचित सल्याने श्रवण यंत्र ट्रायल करूनच कानात  लावले जाते,श्रवण यंत्र  फिटिंग करीत असताना कर्ण साचा हि द्यावा लागतो ,त्याशिवाय श्रवण  यंत्र कानात  नीत बसत  नाही तेंव्हा कर्ण साचा अत्यन्त महत्वाचा भाग आहे .महिन्या काठी ३०००० ते ३५००  ....मुलांची कर्णदोष तपासणी केली जाते ,यात विविध चाचण्यांचा समावेश आहे .

·         वाचा विभाग

श्रवण विभागात व्यक्ति कान तपासणी करुन  आल्यावर ,त्याच्यात असलेली उर्वरित श्रवणशक्ती (Residual Hearing ) योग्येते   नुसार ,वाचा-आणि भाषा  विकास करण्यावर भर दिला जातो ,कानाने एकून तोंडाने बोलण्यावर जोर दिला जातो .आठवड्यातून तीन वेळा वाचा विकास चे धडे दिले जातात ,श्रवण चाचणी विभागातून यंत्र लाऊन आल्यावर बरीच शाळेत जाणारी मुले वाचा दुरुस्तीसाठी येत असतात  .तोतरे पाना  ,उंच स्वरात बोलणे ,हळू आवाजात बोलणे ,अडखळत बोलणे ,नाशिकेत बोलणे ,घोगऱ्या आवाजात बोलणे इत्यादी वर उपचार वाचा तज्ञ मार्फत विचार केले जातात. हे जर वय वर्ष पाच च्या आत पालकांच्या लक्षात आले तर मुले भरा-भरा एकूण बोलण्यास मदत करतात .

 

मानिविकास विभाग

एखादे मुल किंवा व्यक्ती  एकू न  येण्याची तक्रार करीत असेल तर ,त्या ऐकण्या मागील मानसिक कारण असू शकते ,तेंव्हा  त्या वाक्तीची मानसिक चाचणी करावी लागते ,तो खरेच एकत नाही का ? काही मानसिक आजार आहे ? तसे मानसिकतेची बरीच करणे असतात उदा. .एखादी व्यक्ती गर्दीचा ठिकाणी काम करीत असेल तर त्या व्यक्तीस एकू येते  पण ती व्यक्ती त्या गोंगाटामुळे एकू कमी येण्याची तक्रार करते ,तेंव्हा हि तपासणी करणे गरजेचे  असते ,काही मुलात मुळातच मानसिकता  तशी नसते ,मुल लक्ष देत नाही ,किंवा त्याची बौद्धिक क्षमता  कमी असते किंव त्याचा बुध्यांक ( IQ लेवल ) कमी असतो ,म्हणून मानसिक तपासणी होणे गरजेचे असते ,म्हणून कर्ण तपासणी करण्या अगोदर त्या व्यक्तीची मानसिक तपासणी करावी लागते ,ते या विभागात तांत्रिक पद्धतीने करतात .

 

 

·         सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन विभाग

सामाजिक आणि आर्थिक  पुनर्वसन विभागात कर्णबधिरांच्या   पुनार्वस्नाचे कार्य केले जाते ,तांत्रिक कोर्स पास झाल्यावर ,येथे नांव  नोंदणी करुण देण्यात येते ,व्योगेतेनुसार ,काम  अणि मुलाकातीसाथी विविध ठिकाणी निश्चित ठिकाणी  पाठवले जाते राज्यातील विविध सरकारी ,निम सरकारी आणि लिमिटेड कंपन्यात मुलाखती घेऊन पाठवण्यात आले आहे . गेल्या ३० वर्ष्याचा काळात नऊ ते दहा हजार कर्णबधीर मुलांचे पुनर्वसन केलेले आहे .महिन्या काठी १२ ते २५ कर्णबधीर प्रशिक्षित मुलांना कामासाठी पाठवले जाते ,या विभागात दहावी किंवा बारावी पास कर्णबधीर मुलासाठी डी.टी.पी.कोर्स मार्फत प्रशिक्षण दिले जाते .

·         साहित्य सामुग्री विभाग

अली यावर जंग  ही एक अशी राष्ट्रिय विकलांग संस्था आहे की, येथे विविधतेने नटलेले भंडार आहेत असे  म्हणावे लागेल ,या विभागात  विदिध प्रकारची ,जनजागृतीची चे साहित्ये निर्मिती केली जाते .कर्णबधीर मुलांचे पापक ,विशेष  शिक्षक ,या क्षेत्रात काम करणारे  समाज सेवक ,बाल रोग तज्ञ ,अणि या क्षेत्रात  कार्य करणाऱ्या  सर्व व्यक्तीसाठी उपयुक्त  असे दर्जेदार साहित्य उपलब्ध करुण दिले जाते .पोस्टर्स ,बेनर्स ,पाम्प्लेटस  ,लीफ्लेटस  आणि दृक श्राव्य  साहित्ये तयार करून देश पातळीवर पुरवण्याचे कार्य करीत आहे .पालकात असलेला न्यूनगंड समाज आणि गैर समाज दूर करण्यावर भर असतो आणि तश्या प्रकारची पुस्तके वितरीत केली जातात .

 

भारतीय सांकेतिक भाषा सेल

अली यावर जंग राष्ट्रीय विकलांग संस्थे मध्ये कर्णबधीरासाठी विशेष असा एक विभाग आहे यात ,सर्वच थरातील (कर्णबधीर आणि सामान्य व्यक्ती ) व्यक्तींना इंडियन साईन लांग्वेज  चे प्रशिक्षण दिले जाते ,सहा महिने ,एक वर्ष असे पूर्ण वेळ व अंश कालीन प्रशिक्षण दिले जाते ,यात अ, ब आणि क असे कोर्सेस चालवले जातात. विशेष शिक्षक ,पालक आणि या क्षेत्रात कार्य करणारी कोणीही  व्यक्ती प्रवेश घेऊ शकते .जरी जगभरात कर्ण बधीरांची भाषा वेगळी असली तरी ते एकत्र आल्यावर आपली मातृ भाषा (इंगित भाषेत ) मस्त आणि आनंदी असतात .त्यांना भाषेचे वावडे नाही .

 

 

·         विस्तार सेवा विभाग

विस्तार सेवा विभाग ,हा एक संस्थेचा मैलाचा दगड म्हणावा लागेल ,हा विभाग संथेचे बाहेर राज्यात जाऊन संथेचे प्रथिनिधित्व  करीत असतो. संस्थेतील  सेवा गाव पातळीवर जाउन पुरवित असतो . तज्ञ व्यक्तीचा चमू दुर्गम भागतील लोक मुबई येथे येऊ शकत नाहीत अणि उपचार घेऊ शकत नाहीत त्या दुर्गम भागातील लोकांसाठी सेवा पुर्वन्याचे कार्य करीत आहे ,यात कर्णबधीर शाळा  ,लायन्स  क्लब ,रोटरी कल्ब ,इनर व्हील ,अणि इतर सेवाभावी संस्था ज्या अपंग  क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांची स्थानिक सहकार्याने स्थानिक पातळीवर आयोजन करते आणि संस्थेतील सम्पूर्ण सेवा पुरवते ,यात सम्पूर्ण कान तपासणी करुण कानाचे उचित श्रवणयंत्र वर उल्लेख केल्या प्रमाणे  ADIP योजने अंतर्गत देते .तसेच तांत्रिक मार्गदर्शन पण देत असते यात  ,शैक्षणिक आणि व्यावसाईक  मार्गदर्शन हा ही महत्वाचा भाग आहे . तसेच पालक मेळावे आयोजित करते ,त्याच बरोबर शिक्षित आणि प्रशिक्षित शिक्षकांसाठी प्रशिक्षण यांचे पण आयोजन करते ,आजवर भारताच्या कानाकोर्यात जाऊन बहिर्गम विभागाने पताका रोवली आहे .भारताच्या राज्यातील  जिल्हा अधिकारी ,समाज कल्याण अधिकारी हे हि त्यांच्या स्थानिक पातळीवर शिबिरांचे आयोजन करीत असतात .मी स्वतः गेली २२ वर्ष या क्षेत्रात कार्य करीत आहे दक्षिण भारत  असो कि दक्खन चे पठार असो वा  हिमालाय्च्या  पर्वताच्या रांगा असो किंवा आसाममधील आदिवासी पाडे अथवा जम्मू काश्मीरमधील बर्फाळ प्रदेश अशा अनेक ठिकाणी संस्थेचे प्रतिनिधी जाऊन याविषयी मोलाचे कार्य करत आहे.

 

एडीप योजना:

संस्थेची महत्वाची योजना म्हणजे भारत सरकार ची एडीप (ADIP) योजना होय,या योजने अंतर्गत कर्णबधीर व्यक्तीना श्रवणयंत्र वाटप ही एक त्यातील भाग आहे .वर उल्लेख केल्या प्रमाणे श्रवणयंत्र वितरीत केले जाते ,पण यात एक नवीन भर पडली आहे ती म्हणजे कोक्लिअर इम्प्लांट ,या योजने अंतर्गत वयाच्या 5 वर्षापार्येंत ज्या मुलाला जन्मतः अति तीव्र श्रवणदोष आहे ,व ज्यांना श्रवणयंत्राचा काहीच उपयोग होत नाही अश्या मुलांचे कॉक्लीअर इंप्लाट (कर्णरोपण तंत्रज्ञानं) केले जाते ,या योजनेचा एकूणखर्च सात ते आठ लाख होतो ,या साठी अली यावर जंग पूर्ण खर्च करते ,यात मापिंग आणि थेरपी दोन वर्षापार्येंत अली यावर जंग करते .कर्ण रोपण तंत्रज्ञानं (Cochlear Implant) हे एक अत्याधुनिकइलेक्ट्रोतंत्रज्ञानं आहे. याच्या मदतीने कर्णबधीरव्यक्तीस  आवाज ऐकणे शक्य  होऊ शकते ,ज्या व्यक्तीस श्रवण यंत्र फायदेशीर नसते अश्या व्यक्तीस Cochlear Implant येशस्श्वी रित्या हे आवाज ऐकवयाचे काम करते.1980 पासून या तंत्रज्ञानाचा  उपयोग सुरु झाला आहे.

छोटी शस्त्रक्रिया करून  कानामागील त्वचेखाली इम्पालांट  बसवले जात.इम्प्लांट, आतील कानाचा खराब झालेला भाग बायपास कन थेट कानाच्या  नसेला उत्तेजितकरते,आणि उत्तम प्रकारे एकूण बोलण्यास मदत करते .

 

जगातील बदल आणि संथेची उठाठेव   :

 

भाषा विकास हा संस्थेचा मुखे गाभा आहे .भाषाशास्त्रात हावभावाच्या भाषेला खूप महत्त्व आहे.पूर्वी आदिम जमातिपसुन्न हवभावाची भाषा अवगत होती . भाषेच्या उगमाची विविध कारणे सांगण्यात येत असली, तरी मानवी भाषेची उत्पत्ती ही हावभावाच्या भाषेपासून झाली आणि पुढे ती वृद्धिंगत होत गेली, असे मत जगातील अनेक भाषा अभ्यासकांनी नोंदवले आहे. मानवी भाषा विकासाच्या सुरुवातीच्या काळात या भाषेचे महत्त्व कळले नसले, तरी आता ही भाषा अनेक बदलांनंतर जगभरातील विशेषत: कर्णबधिराच्या संवादाची मुख्य भाषा बनली आहे. कर्न्बधिरांची मातृ (Mother Toungue ) भाषा म्हणजे हातवारे किंवा इशारे म्हणावे लागेल,तीच त्यांची इंगित भाषा म्हणावी लागेल . ही भाषा कर्णबधिरांसाठी प्रामुख्याने (साइन लँग्वेज) खुणांची भाषा, हावभावाची भाषा म्हणून ओळखली जात असली तरी ती जगभरातील कर्णबधिरांच्या संवादाची ती एकमेव भाषा आहे.जसी कालपरतावे भाषा जरी बदलत असली तरी कर्न्बधिरांची भाषा  ही सांकेतिक असते ,या सांकेतिक भाषेतून कोणत्याही देशात, प्रांतात या एकाच भाषेच्या माध्यमातून कर्णबधिरांशी संवाद साधता येतो. त्यामुळे जगातील कोणत्याही भाषेचे, प्रांताचे आणि देशाचे बंधन या भाषेला लागू होत नाही. यामुळेच ही भाषा जाणणारी अमेरिकेतील एखादी व्यक्ती भारतातील कोणत्याही कर्णबधिरांशी त्यांच्या भाषेत संवाद साधू शकते, ही या भाषेची ताकद असून हेच तिचे मुख्य वैशिष्टयही आहे.परकीय व्यक्ति भेटली की अपन थोड़े घाबरतो  की या व्यक्तिशी का्य नि कसे बोलावे ?

 

 पण कर्णबधिर व्यक्ति ती लगेच जुळवून घेतो ,त्यास अजिबात अडचण भासत नाही ,जी आपणास सामान्ये माणसास जाणवते !

कर्णबधिरता, अपंगत्व हा नैसर्गिक किंवा अपघाताद्वारे निर्माण होणारा आजार म्हणून ओळखला जात असला तरी ,तो आजार नाही ,यामागची कारणे वेगवेगळी असतात.यात विविध करणे जरी असली तरी ते मुखेता  जन्म पूर्वी ,जन्मतः आणि जन्मानंतर असे तीन भागात विभागणी केली आहे ,जसे आईच्या गर्भात असताना ,जन्म झाल्यावर तो कुठे झाला आहे यावर आणि ,जन्मानंतर कोणत्याही वयात येणारे करण्बाधीरत्व . यासंदर्भात केल्या जाणा-या अभ्यासातून त्याची कारणे आणि उपायही स्पष्ट झाले आहेत.कर्णबधिरांसाठी जसा भाषेचा विकास झाला, तसेच त्यांना हाताळता येईल असे तंत्रज्ञानही मोठया प्रमाणात विकसित झालेले आहे.जसे शाळेत वापरात येणारे विविध साधने आणि उपकरणे हे भाषा विकासास पूरक आहेत . बहिरेपणा/कर्णबधीर  काय असतो, त्याची कारणे, उपाय, निदान, चिकित्सा, उपचारपद्धती, सेवा, सुविधा, त्याविषयी संशोधन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनजागृतीचेही काम केले आहे.

संगणकांपासून माहिती-तंत्रज्ञानाची इतर सगळी साधने कर्णबधिरसाठी उपलब्ध आहे.यामुळे तंत्रज्ञानाच्या आधारे कर्णबधिरांना अनेक प्रकारची मदत मिळालेली आहे.

 

जगात कर्णबधिरांच्या प्रश्नांवर ख-या अर्थाने काम करण्यास सुरुवात झाली परकीय राष्ट्रात , ती म्हणजे २९ सप्टेंबर १९५१ रोजी. याच दिवशी इटलीच्या रोममध्ये जागतिक कर्णबधिर महासंघाचीवर्ल्ड फेडरेशन ऑफ दी डेफची स्थापना झाली. यामुळे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने गेल्या सहा दशकांत प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा कर्णबधिर सप्ताह तर शेवटचा रविवार हा आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस म्हणून साजरा केला जात आहे. जगातील कर्णबधिरांसाठी वापरण्यात येत असलेल्या भाषेत अनेक प्रकारच्या सुधारणा करण्याची, त्यांना अधिकाधिक उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, माहिती आणि सेवा पुरवणे, त्यांना देण्यात येणा-या अधिकारांमध्ये अधिक सुधारणा करणे, त्यासाठी संस्थांची स्थापना करणे आदी कार्य अव्याहतपणे सुरू आहेत. त्यासोबतच जगभरातील कर्णबधिरांसाठी मानवी अधिकार आणि समता मिळवून देणे, त्यांची कर्तबगारी, त्यांचे सांस्कृतिक योगदान जगाच्या समोर आणणे आणि या लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे यासाठी जागतिक कर्णबधिर महासंघाचे कार्य चालते.मागील काही वर्षात युनो ने पुढाकार घेऊन UNCRPD कायदा केला आहे .भारत हा या घडामोडीचा साक्षीदार आणि सहभागी  देश होता .

 

संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित असलेल्या जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, जागतिक बँक, युरोप आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना, जागतिक आर्थिक व सामाजिक परिषद आदींचे सहकार्य महासंघाच्या कामाला मिळत आहे. अपंगांना संधी देणे, त्यांना बरोबरीचा दर्जा उपलब्ध करून देणे यासाठी प्रत्येक संघटनेकडून एक महत्त्वाचे योगदान मिळत असले तरी यातील शेकडो संस्थांचे जाळे नियंत्रित करण्याचे कामही जागतिक कर्णबधिर महासंघाकडून केले जाते.युनो (UNO) आणि who सारखी संघटना जागतिक पातळीवर अपंगासाठी प्रथम दर्शनी कार्य करीत आहेत.एकंदरीत जगाचा सहभाग मोठ्या प्रमाणत वाढला आहे ,भारत हा यात अग्रभागी आहे असे म्हणणे वावगे होणार नाही .

 

या महासंघाच्या स्थापनेनंतर १९५१मध्ये कर्णबधिरांसाठी पहिली जागतिक काँग्रेस परिषद इटलीमध्ये झाली होती. त्यानंतर महासंघाकडून युगोस्लाव्हिया, जर्मनी, स्वीडन येथे दर चार वर्षानी काँग्रेस परिषदा झाल्या. मात्र या वेळी महासंघाकडे कोणत्याही प्रकारच्या संकल्पना नव्हत्या, मात्र १९६७मध्ये पोलंड येथे झालेल्या परिषदेपासून प्रत्येक परिषदेत एक विशेष संकल्पना घेऊन कार्यक्रम आखण्याची सुरुवात झाली. त्यानंतर प्रत्येक दर चार वर्षानी पॅरिस, वॉशिंग्टन, बल्गेरिया, इटली, इथिओपिया, फिनलँड, टोकियो, व्हिएन्ना, ब्रिस्बेन, माँट्रियल, माद्रिद आणि २०११मध्ये डर्बन या ठिकाणी या परिषदा झाल्या आहेत. महासंघाकडून राबविण्यात येत असलेल्या संकल्पनांपैकी २००९ या वर्षात कर्णबधिरांची सांस्कृतिक कार्य, २०१०मध्ये कर्णबधिरांसाठीचे शिक्षण, प्रशिक्षण ,आणि पुनर्वसन करण्यावर जोर देण्यात आला होता .२०११मध्ये त्यांच्यासाठी वापरण्यात येत असलेली ज्ञानसाधने, संप्रेषण, २०१२मध्ये सांकेतिक द्वैभाषिकता आणि मानवी अधिकार या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम राबवण्यात आले.

 

महासंघाच्या स्थापनेची उद्दिष्टे कर्णबधिरांच्या एकूण विकासाशी संबंधित होती. यामुळे कोणत्याही प्रकारे मानवी हक्कांचे जतन करत कर्णबधिरांसाठी बोलीभाषेवर जोर देऊन  भाषेचा विकास करणे आणि त्या माध्यमातून जगातील या लोकांना एकत्र करण्याचे महत्त्वाचे कार्य केले जात आहे. जगभरात काम करणा-या विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींच्या परिषदा आयोजित करून त्यातून अनेक नवीन मार्ग चोखाळले जात आहेत.

महासंघाने आजवर विविध प्रकारच्या संकल्पना राबवल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह, आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करून कर्णबधिरांसाठी अनेक प्रकारच्या विकासांचे मार्ग खुले करून देण्यात येतात .

 

 

जागतिक कर्णबधिर महासंघाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच हे काम चालत असलं तरी त्याही पलीकडे जाऊन संस्थेने आपल्या कामाची एक वेगळी  छाप निर्माण केली आहे.भारत सरकारच्या अखत्यारीत कार्य करीत असताना ,आणि RCI चे तांत्रिक मार्गदर्शन बंधनकारक आहे . यामुळे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ  संस्थेला दोन आंतरराष्ट्रीय आणि तब्बल १२हून अधिक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेची कोलकाता, नवी दिल्ली, सिकंदराबाद, भुवनेश्वर येथे विभागीय तर भोपाळ आणि अहमदाबाद येथे संयुक्त विभागीय केंद्रे कार्यरत आहेत.मधील काळात संपूर्ण भारतात एकूण १०८ जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राची (DDRC) स्थापना केली होती ,तीन वर्ष हे जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र राष्ट्रीय संस्थेचा NI’s च्या मार्गदर्शनाखाली होती व आर्थिक आणि तांत्रिक मार्गदर्शन पुरवीत होती , ३ वर्षानंतर ती काही जिल्हा अधिकारी  तसेच काही केंद्र एनजीओ  ला  हस्तांतरित केली आहेत ,तर काही केंद्रांना  अद्याप अली यावर जंग राष्ट्रीय विकलांग संस्था  तांत्रिक सेवा पुरवत आहे .

 

कर्णबधिरांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी विविध प्रकारचे संशोधन करणे आणि मोफत सोयी-सुविधा पुरविणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. आजघडीला संस्थेकडे अद्यावत सुसज्य  पुस्तक वाचनालय  आहे अमूल्य  किमतीची देश विदेशातील पुस्तके, ग्रंथ, संदर्भग्रंथ, बुलेटीन मग्जीन ,आणि संशोधन अहवाल उपलब्ध आहेत.. यातील बहुतेक अभ्यासक्रम मुंबई आणि नाशिक विद्यापीठ व त्याअंतर्गत असलेल्या संस्थांमध्ये सुरू आहेत. मात्र देशभरात पारंपरिक विद्यापीठे, राष्ट्रीय मुक्त विद्यापीठे, खासगी शिक्षण संस्था, एनजीओ यांच्यामार्फत अनेक प्रकारचे अभ्यासक्रम आणि उपक्रम राबविले जात आहेत. कोणत्याही संस्थेतून पदवी, पदव्युत्तर, बी.एड्., एम.एड्. केलेल्या विद्यार्थ्यांना देश - देशातील कोणत्याही राज्यात नोकरी अथवा अध्यापनाचे कार्य करता येते. ही या अभ्यासक्रमांची मोठी जमेची बाजू आहे.

श्रवण, वाक् व भाषा अभ्यासक्रम हे महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ,नाशिक अंतर्गत तर विशेष शिक्षण हे मुंबईत मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत चालवण्यात येते. हे सर्व अभ्यासक्रम ‘ भारतीय पुनर्वसन परिषदेच्या ‘(RCI) मान्यतेनुसार चालतात. यासोबतच संस्थेकडून वैद्यकीय, निमवैद्यकीय शिक्षण, आरोग्य शिक्षण, माध्यम शिक्षण व सामाजिक, आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध समूहांसाठी अल्पावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमही राबवले जातात. देशाच्या कानाकोप-यात संस्थेचे प्रतिनिधी जाऊन अभिमुखीकरण, कार्यशाळा, मेळावे, प्रदर्शने, चर्चासत्रांचे आयोजन करतात. याच माध्यमातून संस्थेच्या मुंबई व विभागीय केंद्रांवर श्रवण, वाक् व भाषा शिक्षणविषयक निदान, चिकित्सा व उपचार सेवा पुरविली जाते. वाक् व भाषा विशेषज्ञाबरोबरच बालरोग व मेंदूविकारतज्ज्ञ, विशेष शिक्षक व सामाजिक कार्यकत्यरंच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करण्यात येते.

 

संस्थेकडून राबवण्यात येत असलेल्या अनेक उपक्रमांपैकी माहिती व प्रलेखन, विकास साधने हा भागही महत्त्वाचा आहे. संस्थेकडे असलेल्या सुसज्ज ग्रंथालयात अपंगत्व आदी विषयांवर जगातील सर्व प्रकारची पुस्तके, संदर्भग्रंथ, सीडी ऑनलाइन आणि अपंगांसाठी खास असलेल्या सुविधा डिसअ‍ॅबिलिटी इन्फॉर्मेशन लाइनच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही उपलब्ध करून दिल्या जातात. तसंचआयव्हीआरएसया संगणक प्रणालीवर आधारित देशातील विविध राज्यांतील लोकांना अपंग पुनर्वसनविषयक सेवा कशा उपलब्ध केल्या जातील, त्या कुठे मिळतील याची माहिती हिंदी आणि इंग्रजीसह त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध केली जाते. यासाठी संस्थेने देशातील कोणत्याही व्यक्तीला सहज माहिती मिळेल, अशी व्यवस्था दूरध्वनीवरून सुरू केली आहे. अपंगत्व, कर्णबधिरता आदींची माहिती  कर्णबधिरता, त्याची कारणे, उपाय, वाक् व भाषादोष, विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम, सेवा-सुविधा आणि सर्वसामान्यांनाही कळेल या भाषेत माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जातात. या पुस्तिका देशातील सर्वच मुख्य भाषांत उपलब्ध आहेत. आतापर्यंत माहिती पुस्तके आणि जनजागृतीच्या सामग्रीच्या तब्बल दहा लाखांहून अधिक प्रतींचे वितरण करण्यात आले आहे.

 

अधिक सेवा सुविधा साठी अली यावर जंग राष्ट्रीय विकलांग संस्थेच्या  विभागीय केंद्राला भेटी द्या :

उत्तर भारत

एन आय एम एच बिल्डींग ,प्लॉट न ४४ –ए

ब्लोक क सेक्टर ४० ,गौतम बुद्ध नगर नोइडा २०१ ३०,दिल्ली .

फोन +९१ ८५२७ ६९६०५२

E-mail : adnrc-nihh@nic.in , ayjnihhnrc@gmail.com 

(Administration, NRC - E-mail : admnrc-nihh@nic.in)

 

 

पुर्वांचल

राष्ट्रीय अस्ति विकलांग संस्था कॅम्पस

बी टी रोड बोन हुगळी ,कोलकत्ता -७०० ०९०

Telefax : 033-25311427 / 25315492

Toll free : 18003455492

E-mail : aderc-nihh@nic.in,ercofayjnihh@gmail.com 

(Administration, ERC - E-mail : admerc-nihh@nic.in)

 

दक्षिण

राष्ट्रीय मानिमंद विकलांग संस्था कॅम्पस

बोवेन्पल्ली मनोविकास नगर ,सिकंदराबाद ५०० ००९

Phone : 040-27753385/27750827 (Ext. 207)

Clinics : Audiology - 040-27950138, Speech - 040-27955365

Fax : 040-27758500

E-mail : adsrc-nihh@nic.in, adnihhsrc@gmail.com

(Clinic, SRC - E-mail : clinicsrc-nihh@nic.in)

(Academic Cell, SRC - E-mail : acdsrc-nihh@nic.in)

(Administration, SRC - E-mail : admsrc-nihh@nic.in)

 

 

केंद्रींय कर्णबधीर शिक्षक प्रशिक्षण केंद्र

AYJNIHH राज्य साम्नाय्वाय केंद्र ,

मु.ओग्लापडा पोस्ट जलना,जिल्हा खुर्दा ,ओरिसा

Telefax : 0674-2460641.

E-mail : adtctd-nihh@nic.in , tctdbbsr@yahoo.com

 

 

 

 

सी आर सी भोपाल , अली यावर जंग संस्था प्रशासन अंतर्गत

क्मापोसिट रिजनल केंद्र

पुनर्वास भवन ,खजुरी कलान रोड ,पोस्ट पिपलानि ,भोपाळ -४६२ ०२१ मध्ये प्रदेश

Phone : 0755-2685950/51 Fax : 0755-2685949

E-mail : crcbhopal-nihh@nic.in , crcbhopal2k@gmail.com

 

 

सी आर सी अहमदाबाद , अली यावर जंग संस्था प्रशासन अंतर्गत

क्मापोसिट रिजनल केंद्र

भिक्षुक गुरु कॅम्पस ,जी आई डी सी ओढाव,अहमदाबाद -३८२४ ४१५ ,गुजरात .

Phone : 079-22870544

E-mail : crcahmd-nihh@nic.in , crcabad@gmail.com

 

अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळावर  पहा

www.ayjnihh.nic.in

www.rehabcouncil.nic.in

www.socialjustice,nic.in


 

प्रा.बालाजी रघुनाथराव शिंदे

९७०२१५८५६४

balajishinde65@gmail.com

विस्तार सेवा सहायक (विषेष शिक्षा )

विस्तार सेवा विभाग ,

अली यावर जंग राष्ट्रीय विकलांग संस्था ,बांद्रा रिक्लेमेशन ,बांद्रा (प ),मुंबई -४०० ०५०

(सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय ,भारत सरकार ,नवी दिल्ली )

 

                                                                  

No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...