Friday, May 29, 2020

महाकवी वामनदादा कर्डक.

महाकवी वामनदादा कर्डक /बी आर antWork

महाराष्ट्रातील  सुप्रसिद्ध लोककवी,गीतकार ,शाहीर, थोर विचारवंत. आपलं संपुर्ण जीवन समता आणि आंबेडकर चळवळीसाठी बहाल केलेले कविश्रेष्ठ वामनदादा कर्डक यांचा आज स्मृती दिन .

१५ ऑगस्ट १९२२ ते १५ मे २००४ हा या वादळवाऱ्याचा जीवनपट..एकूण ८१ वर्ष ९ महीने मिळालेले जीवन सार्थक करून अख्या बुद्धजणांना एका गीतात वेड लाऊन गेलेला महाकवी वामनदादा कार्डक .

लोकांच्या मनीमानसी जे गीत जनमानसात वार्‍यासारखे पसरले आणि ठसविलेले गीत म्हणजे....

" उद्धरली कोटी कुळे,भीमा तुझ्या जन्मामुळे ".

सुरुवातीला चित्रपटाला लोकप्रिय गीते लिहून देणारे आणि हे आपले क्षेत्र नाही, ही सजगता ठेऊन पुढील संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीला अर्पण केले आणि समततेकडे वळले.  

हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला.”  हे सांगते ऐका (निर्माता, निदेशक अनंत माने -१९५९)या चित्रपाटातील गीत आणि चल गं हरणे तुरु तुरू, चिमण्या उडती भुरुभुरूपंचारती (निदेशक दत्ता माने -१९६०) या चित्रपट गीताने महाराष्ट्राला वेढ लावले होते.

आपल्या प्रतिभेला प. पू .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाची जोड देऊन ...

" मनमें उजाला करनेवाला

सुरज हमने पाया है ।

सौ सुरज की किरने सारी

एक ही आंबेडकर में है ।"

वामनदादांच्या  कविता म्हणजे सर्वांगसुंदर जगण्याची कविता आहेत .याच्या कवितेने आंबेडकरी चळवळीतील समता आणि संघर्शित कार्यकर्त्यांना खडबडून जागे केले होते . तो काळच क्रांतीचा होता.

·        तुफानातले दिवे....

·        )मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा...

·        )भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते..

·        )तुझीच कमाई आहे ग भीमाई..

·        )जेथे समाज सारा हा एकरूप आहे

·        तेथेच खरा माझ्या बाबांचा स्तूप आहे

 

  .... या प्रेरणेचा वसा जीवननिष्ठा आणि समता म्हणूनच पत्करणारे वामनदादा आपल्या कायमस्वरूपी आठवणीत राहतील.

  ... या अनवट आणि अजरामर अशा गीतांनी वामनदादा आपल्या कायम स्मरणात राहतील.. तृष्णेतल्या विभव तृष्णेने मला मरू दिले नाही, या वामनदादांच्या वाक्यात सारेच जीवनदर्शन आले..!

या महाकवीला विनम्र अभिवादन आणि आदरांजली....

 

वामन कर्डकांना मिळालेले पुरस्कार व सन्मान खालीलप्रमाणे आहेत.

1.   दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.

2.  महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार.

3.  महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे तीन वर्ष सदस्यत्व.

4.  महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व.

5.  औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (१९८७).

6.  प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (१९८७).

7.  मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (२००१)

8.  प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित वामनदादा कर्डक यांची गीत रचनालेख संग्रहाचे प्रकाशन.

9.  नाशिकबुलढाणा येथे नाणेतुला’.

10.परभणी येथे प्रख्यात उर्दू शायर बशर नवाज यांचे सोबत वहीतुला. नंतर या वह्यांचे गरीब मुलांना वाटप करण्यात आले.

11. साहित्य, संस्कृती मंडळाची उत्कृष्ट कविरत्‍नही गौरववृत्ती.

12. युगांतर प्रतिष्ठानतर्फे युगांतर पुरस्कार’ (१९९७).

13. जामखेडच्या भाई फुटाणे प्रतिष्ठानचा संत नामदेव पुरस्कार

14.मुंबईच्या बौद्ध कलावंत संगीत अकादमीचा भीमस्मृती पुरस्कार

15. भोपाळ येथे ताम्रपट मिळाला..

16.भुसावळ येथे चांदीचे मानपत्र मिळाले.

17.हिंगोली जिल्ह्यातील बसमत येथे संजय मोहड यांनी आयोजित केलेल्या स्वरार्हत संगीत संगीतीया कार्यक्रमात नागरी सत्कार आणि गायन

18. मराठवाडा अस्मितादर्श पुरस्कार

 

या महाकवीला विनम्र अभिवादन आणि आदरांजली.... ( संदर्भ: माझ्या जीवनाचं गाणं ,आत्मकथन.. शब्दांकन- प्रा.रविचंद्र हडसनकर, आंबेडकरवादी महागीतकार वामनदादा कर्डक: डॉ.यशवंत मनोहर)

,आणि विकिपेडिया मराठी )

प्रा.बालाजी शिंदे.

9702158564

balajishinde65@gmail.com


No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...