Friday, May 29, 2020

PM Care fund (?)

भारतीय जनतेस कळवण्यात आनंद होतो आहे नुकताच PM Care fund (?)  #PMNRF असताना ,स्थापन केला आहे ,त्यांना सांगा विमानात सर्व सामान लोड होत आले आहे ,रस्त्यावरील गरजू मजूर कामगार यांना मदत लवकर पहुचेल ,जिथे आहेत तिथेच रहा ,पुलाखाली ,#झोपडीत किंवा रस्त्याने गावी जात असेल तर जागा सोडू नका .जर आपली जागा/घर (असेल तर) किंवा भाड्याने राहत असतील (अचानक एवढी भाड्याची घरे कोणाची आली) सोडू नका ...दुसरी कडे मदतीचा हात चालू आहे ,नुकतेच आपले इतर देशात राहणारे भारतीय (इंडियन) यांना विमानाने फुकट घेऊन येण्याचे काम  अजून पूर्णत्वाला आले नाही (आणि त्यांना #कोरोनाची लागण पण झाली नाही ) 

या लोकडाऊन च्या झोन वर्गवारीत ,जर आपणास घरी ,आपल्या राहत्या घृही जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता फ्री / फुकट बसेस सोडल्या आहेत ,(बस वाले फक्त  रुपये 500 ते 1000 मागतील कांही प्रश न करता देऊन टाका).

बाहेरून (forigen) आलेले आपले इंडियन भाऊ आहेत ते दुरून आले आहेत त्यांना अगोदर घरी सोडावे लागत आहे तरी कृपया जिथे आहेत तिथे उपाशी राहून आपली काळजी घ्या .

PM फंडाची मदत (Rescue Team) आपल्या स्थळी येत आहे .या दरम्यान  आपल्या मनोरंजनासाठी सोबत ,जावडेकर ,अक्षयकुमार पण पाठवत आहोत .

घरात राहून कसे नाचत -नाचत आपले हात (AC flats and bungalows) धुवायचे याचे video clip  तासा तासाला बघायला मिळणार आहेत (TV वर) सोबतीला दिवसातून #रामायण #महाभारत आहेच . हे 2 मे ला संपले की ,कृष्णा आणि इतर तुमचा विवेक वाढवण्यासाठी देणार आहोत .

आपणास सरकार कांहीच कमी पडू देणार नाही गहू -ज्वारी पीठ आणि इतर खाद्य पदार्थ यावर मोदी/BJP लिहले असेल तेच खाद्य घ्यावे ,हे विसरू नका आमुची निशाणी ...

गरजेच्या वस्तू खरेदी करण्यास बाहेर जाल तर तुम्हाला कोणी काठी मारून आडवे केल्याशिवाय सोडून देईल.

जसे जमेल तसे असतील तेवढे PM Care फंदात ऑनलाइन फंड जमा करा ,आपले आणि आपल्या परिवारातील सर्व सभासदांच्या खात्यात अगोदरच मोदी सरकारने जाहीरनाम्यात सांगितलंय तसं पैसे जमा केले आहेत हे आपणास ज्ञात आहेच तर मग उशीर कश्याला  pm care fund ( खाते  ) तुम्हा सर्वांना माहीत आहेच  .आजच सर्व भारतीय लोकांनी डिजिटल मोड द्वारे फंड जमा करावा .

(माझ्या fb wall वरून)

क्रमशः पी एम केअर निधी

प्रा.बालाजी शिंदे ,नेरूळ -७०६

                                              balajishinde65@gmail.com


No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...