Friday, May 29, 2020

बुद्धपौर्णिमा.

एकच गोष्ट सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेतात, कारण सर्वांची बुद्धी वेगळी असते

शिष्याने गौतम बुद्धांना विचारले की आपण एकच गोष्ट तीन-तीन वेळेस समजावून का सांगता?

उद्या ०७ में वुरूवार  गौतम बुद्धांचा जन्मदिवस आहे. याच दिवशी वैशाखाचा पुर्ण चंद्र दिसतो, त्यामुळे याला 'बुद्ध पौर्णिमा' किंवा 'वैशाख पोर्णिमा' असेही म्हणतात .
 बौद्ध धम्माचे  संस्थापक गौतम बुद्ध यांच्या आयुष्यातील असे अनेक प्रेरणादायी प्रसंग आहेत जे आपल्याला सुखी आणि यशस्वी आयुष्याचा मार्ग सांगतात. म्हणून येथे एका अशाच प्रसंगाचे वर्णन केले आहे ज्यामध्ये सांगितले आहे की, सर्व माणसांची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते. सर्वांची बुद्धी वेगळी असते, त्यामुळे एकच गोष्ट लोक आपापल्या पद्धतीने समजतात.

भगवान गौतम बुद्ध प्रत्येक गोष्टीला तीन वेळेस समजून सांगत असत. एक दिवस प्रवचन सुरू असताना तथागत एकच वाक्य पुन्हा-पुन्हा बोलत होते. त्यामुळे त्यांचा शिष्य आनंदने त्यांना विचारले की गुरूजी आपण एकच गोष्ट तीन वेळेस का सांगता? यावर बुद्ध म्हणाले, आजच्या प्रवचनात संन्यासा व्यतिरिक्त एक वेश्या आणि एक चोरही आला होता. तू उद्या सकाळी या संन्यासी, वेश्या आणि चोराला विचार की, कालच्या प्रवचनात सांगितलेल्या शेवटच्या वचनातून तुम्हाला काय समजले. सकाळ झाल्यावर आनंदला पहिले संन्यासी दिसला त्याने त्याला विचारले की काल रात्री तथागत यांनी सांगितलेले शेवटचे वाक्य, आपण आपले काम करावे? त्यामधून आपण काय शिकलात. यावर संन्याशी म्हणाला, ध्यान करणे आपले दैनंदिन काम आहे, त्यामुळे आपण ध्यान केले पाहिजे. आनंदलासुद्धा याच उत्तराची अपेक्षा होती. उर्वरित लोकांची माहिती घेण्यासाठी तो गडबडीने नगराकडे गेला.

आनंद नंतर त्या चोराच्या घरी पोहचला जो बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी आला होता. चोरालाही शिष्याने तोच प्रश्न विचारला यावर चोर म्हणाला की गुरूजी माझे काम तर चोरी करणे आहे. त्यामुळे मी चोरीच करणार, काल रात्री एवढा मोठा हात मारला की आता मला आयुष्यभर चोरी करण्याची गरजच पडणार नाही. असे उत्तर ऐकून आनंद आश्चर्यचकित झाला आणि त्या वेश्याच्या घराकडे निघाला.

वेश्यालाही आनंदने तोच प्रश्न विचारला त्यावर ती म्हणाली माझे काम तर नाचणे आहे आणि मी काल रात्रीसुद्धा तेच केले. या दोघांच्या उत्तरामुळे आनंद चांगलाच अवाक झाला आणि तेथून निघून आला. परत येऊन त्याने बुद्धांना घडलेली सर्व गोष्ट सांगितली.

यावर तथागत म्हणाले की, ही संपुर्ण सृष्टी अशीच आहे या जगात जेवढे प्राणी आहेत, तेवढेच विचारही आहेत. त्यामुळे गोष्ट जरी एकच असली तरी प्रत्येक व्यक्ती ती गोष्ट आपल्या वैचारिक क्षमतेनुसार समजून घेतो. यावर कोणताही उपाय नाही, ही सृष्टीच अशी आहे.

प्रा.बालाजी शिंदे ,नेरूळ -७०६

                                              balajishinde65@gmail.com


No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...