#मैत्री
अवचित एखाद्या कातर क्षणी
सहज ओळखीचे होते कोणी
नसतो कुठलाही ऋणानुबंध
तरीही बांधला जातो बंध
आवडी निवडी जुळतात कधी
मतमतांतरे ही घडतात कघी
तरीही अलगद पडतात रेशीमगाठी
गुणांदोषांसह स्वीकारावे मैत्रीसाठी
मैत्रीत कसले आलेत राग लोभ
मैत्रीत हक्काचे असावेत लोक
न सांगता मनीचे गुज उमजते ती मैत्री
न मागता सुखाची वाट दाखवते ती मैत्री
इवल्याशा सुखात मनभर आनंद देते मैत्री
नकळत चुकीला क्षमा करते ती मैत्री
न भेटता ही दृढबंध होत जाते मैत्री
जीवनातला निखऴ आनंद होते मैत्री..!!! . . .
#antWork

No comments:
Post a Comment