About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Friday, May 29, 2020

आजचे कीर्तनकर्ते.

आजचे कीर्तनकर्ते /बीआरant🐜Work.

संत तोचि आपुला ओळखावा ....आज पायलीभर भुछत्रा सारखे Youtube धारक ,समाज प्रबोधन करतांना दिसत आहेत ,तो तसा तू तसा आणि ,विवेकशून्य ,चेतना रहित ,प्रज्ञा खुंटीला ठेऊन वा रे वा ss चे नारे लावत आपण किती मतीने छोटे आहोत असे स्वतः दाखवून देतो आहोत .
अमाप पैसे मोजून उकिरडे उखरत वर्तमान विसरून रोजच भटकत भूतकाळात जगत आहोत याची आपणास कधीच लाज वाटत नाही ,मूळ ग्रंथ वाचले की असे फुशारकी मारणारे गल्लाभरु कीर्तनकार आपोआप पिकल्या पणावत गळून पडतील ? 

थोरांचे विचार न वाचता वायफळ अर्धे ज्ञान ऐकूण आपण आणखी भडखाऊ होतो .आणि प्रलोभणास बळी पडतो ..या देशात दोन गोष्टी आहेत पैसे कमवण्यासाठी एक पाकिस्तान आणि दुसरा ब्रह्मन् .

देशाचा प्रश आला की पाकिस्तान म्हणवून आवाज उठवला की तुम्ही देशभक्त ? पाकिस्तान नसता तर ,चीन होताच ,आणि दुसरा म्हणजे ब्रह्मन् ,...

बुद्ध साहित्य जरी ब्राह्मणाने लपवले तरी वृद्धी पण बरह्मणाने केली होती असा इतिहास आहे (बुधघोष) सर्वच ब्रह्मन् दुष्ट नाहीत ..हा फोफाटा किती दिवस चालणार आहे ...?

'आज वर' भाष्य कोणी करीत नाही ..आज कामगार संघटनेचे बोला ,कुठे गेले ते ? असंख्य कामगार मरत आहेत ,चीरडले जात आहेत ,त्याचे प्रश मांडा ,कायम रोजगार द्या ,शिक्षण द्या ? गरिबाला न्याय मागा न्याय मिळत नसेल तर सत्ता उलटण्याचे कारस्थान करा आणि 'समता' स्थापनेची हाक द्या ...कधीतरी समतेची शिकवण द्या ?

पण हे होताना दिसत नाही ? हे येथील बहुजनांच्या दुःखाचे मूळ कारण आहे ...

आज 'आजार हाल्याला ,आणि इंजेक्शन  पखालाला '

 अशी शिक्षित ,डॉक्टर ,वकिंल आणि नेते मंडळीनी समाजाची अवस्था करुण ठेवली आहे ..त्यास कोन जवाबदार नाही ,मी, तो ,ती आणि सर्व बहुजन जवाबदार आहेत .

"... #राष्ट्रसंत #तुकाराम #महाराज म्हणतात "

 " कीर्तनाची विक्री मातेसी गमन
  धन खाई भाड चांडाळ तो "

त्यांनी आपले कीर्तन किंवा ध्यान हे कमाई चे साधन म्हणून वापर केला नाही ? रात्री कीर्तन आणि दिवसभर काबाड कष्ट करीत.
आज कीर्तन म्हणजे कमाई अशी व्याख्या आहे पण अशी समाज बाह्य ' व्यासपीठ कर ! ( व्यास रागावणार तर नाही ?) कश्याला हवे आहेत ..? आपले 'चित्त' हरपले की दुसरा जागा घेतो तेच आज सर्वत्र आहे ! वरच्या गोष्टी बघून वाचन न करता ,एखाद्या उंच बोल्या 'खोटं बोल पण रेटून बोल'  आवाजाला वाssवाss करतो तेही पैसे मोजून ..?
पण आज अश्या भोंदू कीर्तनकाराची गरज आहे का ?
आज प्रश्न वेगळी आहेत ? आणि हा आजचा डाव वेगळा आहे .

बालाजी शिंदे ,नेरुल ७०६
9702158564
balajishinde65@gmail.com

No comments:

Post a Comment

मांसाहारी माणसं.

कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...