Friday, May 29, 2020

.....म्हणे परत येणार ? काय मरायला येणार का ? \#बीआर🐜antwork.

.....म्हणे परत येणार ? काय मरायला येणार का ? \#बीआर🐜antwork.

मजूर ,कामगार ,घरगडी आणि फार्म हाऊस ,हॉटेल ,मॉल आणि गोदी कामगार ,टाटा ,बिर्ला आणि अडाणी अंबानी याना त्यांची जागा दाखवायची असेल तर ,आप आपल्या राज्यात कामे बघून आपल्या कुटुंबालाला आधार प्रेम द्यावे . पैसे हे सर्वस्व नाही ,आणि तो आज ही तुमच्याडे नाही आणि पूर्वी ही न्हवता ,तुम्ही येथील शोषित वर्गाचे खेळणे आहेत हे विसरू नका.
 स्थानिक कामगार आणि मजूर संघटनांनी आप आपल्या स्थानिक भागात रोजगाराची कामे सुरू करण्यास सरकारवर दवाब टाकून कामे निर्माण करावीत ,मग सगळ्यांचा माज कमी होईल ,रोजगार निर्मिती आणि कामगार पुरवठा नाही झाला तर सर्व दलाल ,मुजोर मालक ,कारखानादार ,छोटे छोटे उद्योग धंदेवाईक मस्तवाल ,मुजोर ,धनिक तोंडघाशील येतील ,आणि मजूर लोकांच्या जीवावर जगणारे अडचणीत येऊन धनिक आत्महत्या करतील तेंव्हा या लोकांना मजूर आणि त्यांच्या कामाची किंमत कळेल .

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुजुर कायदा केला ,आणि त्यांचे नियम तयार केले ,12 तासावरू  8 तासांवर कामाच्या वेळा निर्धारित केल्या ,तरी 8 तासापेक्ष्या जास्त काम करून घेण्याच्या तक्रारी आहेत .

मजुरांची पिळवणूक ,जादा काम ,कामात सुविधा न देणे ,कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण निर्मिती न करणे हे कायद्यात असून तशी सुविधा ना दिल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश निर्माण होतो आणि एकंदरीत त्यांचं कुटुंबिक वातावरणावर परिणाम होतो .

तरी ,सर्व श्रमीक  ,बाळ आणि महिला मजूर कामगार यांनी आपला जीव धोक्यात घालण्यासाठी या मायावी नगरीत येऊ नये ...
शेवटी आपण कष्ट कोणासाठी करता ,आपल्या कुटुंबासाठी तर मग ,घरी राहा आणि आपल्या कुटुंबाला प्रेम आणि सहारा द्या ,त्यांना तुमची आज या "कोरोनाच्या काळात खूप गरज आहे ...

बालाजी शिंदे,नेरुळ -७०६
balajishinde65@gmail.com

www.ayjnihh.nic.in

No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...