वेळ बंद
आज वेळ बंद आहे
माझी तुझी त्याची आणि तिचीही
आज वेळ बंद आहे ,घरची शाळेची
आणि कॉलेजची ही
आज वेळ बंद आहे मंदिर ,मस्जित
आणि चर्च गुरुद्वाराची
आज वेळ बंद आहे माझ्या तुझ्या
नी त्याच्या कार्यालयाची
मंत्रालय आणि सचिवालयाची
आज वेळ बंद आहे तमाम देवाच्या
येजेंटाची जयवंत साळगावकर याची ही
आज यांची ही वेळ बंद आहे टाटा आणि
अडाणी अंबाणीची
पण खरंच वेळ बंद आहे हो ..
त्या ऊस तोड
कामगारांच्या मुला बाळांची
वीटभट्टी वर काम करणाऱ्या चिमुकलीची
आणि वेळ बंद आहे त्या गोवंडी खाडीत
कचरा गोळा करणाऱ्या चिमुकलीची
कचरा गोळा करणाऱ्या चिमुकलीची
प्रा.बालाजी शिंदे.
9702158564
balajishinde65@gmail.com

No comments:
Post a Comment