Friday, May 29, 2020

धम्म दान.

IIधम्म दान /बीआरantWork.II

बुध्दत्व प्राप्ती नंतर तथागताने जानलेला, दिव्य दृष्टिने पाहिलेला धम्म जगातील मानव प्राण्यांच्या कल्याणार्थ प्रर्वतीत करण्याचा संकल्प केला. बुध्दापासून निघून गेलेल्या त्याच पंचवर्गीय भिक्खुना बुध्दाने प्रथम धम्म प्रतिपादन करून धम्माचे चक्र प्रवर्तीत केले.

बुध्दाने बौध्द उपासकांसाठी जे दहा गुण सांगितले त्यालाच पारमिता असे म्हणतात. पारमिता म्हणजे श्रेष्ट गुण आणि जो हे गुण पार करतो तोच बुद्ध होय’.

या गुणांना म्हणजेच आचरणाला पारमी असे म्हणता . या दहा पारमी होत.

1.   शील पारमिता

2.  दान पारमिता

3.  उपेक्षा पारमिता (नेक्खम्मात्याग )

4.  नैष्कम्य पारमिता (पण्ण)

5.  विर्यपारमिता

6.  शांती पारमिता (खान्ति )

7.  सत्य पारमिता

8.  अधिष्ठान पारमिता

9.  करूणा पारमिता

10.मैत्री पारमिता (मेत्ता भाव )

 

आता दान पारमी काय ते बघू या . दानवृत्तीला म्हणजेच दानाला बौध्द धम्मात शील  नंतर दुसर्‍या क्रमांकाचे  महत्व आहे. दान करणे हा श्रेष्ठ गुण होय.ज्या कडे हा गुण आहे तो खरा धम्म जाणतो असे म्हणतात दान केल्याने मनाची आसक्ती कमी होते. माणूस घेण्याएवजी  देण्याचे शिकतो. यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते इतरांच्या कल्याणार्थ म्हणून देण्याचे शिकतो. यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते. जे जवळ आहे ते माझे नाही व जे माझे नाही ते इतरांना दिले पाहिजे.

पण आज दांनाची परिभाषा पूर्ण निघून गेली आहे . दान देतांना मात्र बदल्यात दान देणाऱ्याने घेणाऱ्या कडून काहीही अपेक्षा करू नये असे असताना त्या मोबदल्यात स्वताला सतत प्रासर मध्यावर झळकत ठेवण्यासाठी दान केले जात आहे . दोन पार्ले बिसकुट चे पाकेट वाटून दहा फोटो काढल्या जात आहेत .

फोटो घेणे ही अपेक्षा नाही का होत ,हीच तर खरी धर्म आणि धमामतील घपलत आहे . कशाच्या ना कशाच्या मोबदल्यात दिलेले दान हे खऱ्या अर्थाने दानच नव्हे. सुखप्राप्ती, स्वर्ग प्राप्ती, धनप्राप्ती. पाप मुक्त व्हायचे म्हणून, दानी म्हणून नाव लौकिक व्हावा या हेतूने जे दान देतात ते दान नव्हे.हा धर्माचा भाग आहे ,असे दान हे धम्म दान होऊ शकत नाही याचा  देणाऱ्याला काहीच लाभ होत नाही. बौध्द उपासक आणि उपासकिने  धन, द्रव्य, वस्त्र, रक्त व प्रसंगी शरीरिक श्रम दान करण्याची तयारी ठेवायला हवी हाच दानाचा खरा अर्थ होय. समाजाला दान देणे हे आपले कर्तव्य होय कारण आपण जे मिळवले त्यात समाजाचा प्रतेक्ष - अप्रत्यक्ष का होईना पण सहभाग असतोच . दान देणे व दान घेणे या दोन्ही क्रिया अत्यंत निर्मल व श्रध्दापूर्वक व्हायला हव्यात , तरच दानाचा हेतू साध्य होईल व दान देणाऱ्या व घेणाऱ्याचेही कल्याण होईल, मंगल होईल, म्हणून बौध्द उपासकाने शक्य तेवढे दान देत राहावे यातूनच तृष्णेचा, आसक्तीचा लोप होऊ शकतो . यामुळे  तृष्णेचा क्षय होतो , समर्पनाची प्रवृत्ती वाढीस लागते. सर्व दानात श्रेष्ठ दान हे धम्मदान होय, धम्माच्या प्रसार, प्रचारासाठी दान देणे हे आपण आपले कर्तव्य समजले पाहिजे. पण सोंग ढोंग करून भिक मागण्याऱ्यांना, कर्मकांड, देव -दैवतांचे नावावर दान देऊ नये. निरर्थक उत्सवांना दान देऊ नये.

मला इथे एक गोस्ट सांगावी वाटते . धरण किंवा तलावात छोट्या मोठ्या नद्या आणि नाल्यातून पाणी येऊन तलाव किंवा धरण काठोकाठ भरते ,ते फुटू नये महणून अधुन -मधून त्या तलावाचे दरवाजे उघडून पाणी सोडून त्याचे अस्तित्व कायम टिकवले जाते . तीच गत आपण श्रमाने कामावलेल्या  संपती ची आहे ,जर दान रूपी तलावाचे दरवाजे अधुन -मधून उघडले नाही तर एक वेळ अशी येते की तलाव वाहून जाते . महणून बुद्धाणे संपत्ति संचय नाकारला होता. गरजे पूर्ती साठवण करणायस सांगितली होती .जो खरा धम्म जाणकार आहे आणि तो धम्मा त आहे  तो कधीच संपती संचय करीत नाही

तर मग चला दिन दुबळ्याना दान करून कसलीच ( फोटो विडियो ) अपेक्षा न करता आपला धम्म दांनाचा नियम पाळा . आणि सदैव दान करा.

@@@

सर ,

नमस्कार .

मी प्रा.बालाजी शिंदे ,गेली २५ वर्ष दिव्यांगजन ( Disabilities )  क्षेत्रात कार्यरत असून कर्णबधिर हे माझे  कार्येक्षेत्र आहे . आपला अपंग क्षेत्रातील लेख वाचून कोणते आपंग हे कळत नाही ? कर्णबधिर (HI),अंध (VI) ,अस्थिवयंग (OH) ,की मतिमंद (MR) . लेखाचा आशय ठीक आहे , शुभेचा ,पण विकलांग किंवा अपंग म्हणून विसंगती वाटते . यात कोणती दिव्यांगता विशद होत नाही ?

अधिक माहिती साठी ...

Ministry of Social Justice and Empowerment ,Govt of India येथे भेट द्या .

कांही अधिक माहिती हवी असेल तर ,मिराज च्या कर्णबधिर  शाळेत माझा सदर्भ देऊन श्री. गढवीर सर ( विशेष शिक्षक कर्णबधिर यांचेशी संपर्क साधा )

 

प्रा.बालाजी शिंदे.

balajishinde65@gmail.com

9702158564

No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...